Friday, 9 October 2015

वयानुरूप स्त्री-पुरुषातील सेक्स...

वयानुरूप स्त्री-पुरुषातील सेक्स...

कामवासना ही प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या शेवटपर्यंत टिकून राहते. व्यक्तीच्या वयानुसार व लिंगानुसार कामवासनेचा दर्जा, तीव्रता यात फरक पडतांना आढळतो. कामवासना नेहमीच स्त्रीत पुरुषाच्या केवळ एकचतुर्थांश इतकीच असते. वयाच्या सतरा अठराव्या वर्षी पुरुषाची कामवासना अत्त्युच्च पातळीवर असते व त्यानंतर त्यात उतार पडत जातो. तसे स्त्रीत आढळत नाही. स्त्रीची कामोत्तेजना उच्च पातळीवर पंचवीस ते तीस या वयात आढळते. या वयात पुरुषाची कामेच्छा काहीशी कमी झाल्याने त्याला सेक्स नकोसा वाटतो तर स्त्रीची कामेच्छा अधिक असल्याने तिला संभोगाची आवड व असूया निर्माण झालेली असते. यात जो सुवर्णमध्य साधेल तोच वैवाहिक जीवनात यशस्वी ठरेल.
उतारवयात स्त्री-पुरुषांनी नियमित संभोग केल्यास संप्रेरकांची पातळी यथोचित राहून दीर्घायुष्य लाभते असे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहेच. उतारवयात संभोग करणारे पुरुष अधिक जगतात असेही आढळून आलेले आहे!    --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
जगविख्यात सेक्सतज्ञ ‘किन्से’ यांनी १२ हजार पुरुष व ८ हजार स्त्रियांची मुलाखत घेऊन वयानुसार स्त्री-पुरुषात होणाऱ्या सेक्स विषयी काही निष्कर्ष काढले ते नक्कीच अभ्यासण्याची गरज आहे.
१)-- वयात येईतो स्त्री-पुरुषाला फारशी कामेच्छा निर्माण होत नाही.
२)--  वयात आल्यानंतर स्त्री-पुरुषांची कामेच्छा वाढते मात्र पुरुषाची कामेच्छा स्त्रीच्या पाचपट अधिक असते. म्हणजेच पुरुष स्त्रीच्या पाचपट अधिक वेगाने उद्दीपित होत असतो.
३)--  वयात आल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीचा कामोद्दीपनाचा आलेख समांतर असतो. म्हणजे तिला वयात आल्यापासून प्रत्यक्ष संभोगाऐवजी प्रणयक्रीडा, प्रेम, सहवास यांचा हव्यास असतो. पुरुषाने स्तनमर्दन, स्तन चूषण, शिस्निका उत्पीडन यांचा वापर करून कामतृप्त करावे अशी तिची अपेक्षा असते. यातूनच स्त्रीला अधिक कामतृप्ती लाभत असते. याउलट पुरुषाला प्रत्यक्ष संभोगातूनच कामतृप्ती मिळते. हा फरक पुरुषाने आवर्जून लक्षात ठेऊन यातील सुवर्णमध्य गाठला की कामजीवन यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.
४)--  स्त्री तिच्या तिशीत अधिक कामप्रवण झालेली असते तर पुरुष किंचित उताराला लागलेला असतो. तरीही त्याची कामोत्तेजना नेहमीच स्त्रीच्या पाचपट अधिक असल्याने तो तिला नक्कीच कामतृप्त करू शकतो. हे वय दोघांसाठी अधिक महत्वाचे ठरते. या वयात स्त्री कामतृप्तीसाठी अधीर झालेली असतांना पुरुषाने तिच्या कामतृप्तीकडे कानाडोळा करून चालत नाही. काही सेक्सतज्ञ प्रणयक्रीडा करून झाल्यांनतर उत्तेजित झालेल्या स्त्रीची हस्तमैथूनाने कामतृप्ती करून द्यावी आणि नंतर स्वतःची कामतृप्ती प्रत्यक्ष संभोगातून करून घ्यावी अशी सामोपचाराची उपचार पद्धती सुचवितात.
५)— रजोनिवृत्तीनंतर बहुतेक स्त्रिया संभोगासाठी राजी नसतात. याच वयात पुरुषाची देखील कामेच्छा कमी प्रमाणात येत असते. योनीमार्गात कामसलील पुरेसे तयार न होणे, योनीचे स्नायू लवचिक नसणे यांमुळे स्त्री संभोग नको म्हणते.
६)--  वय वाढत जाते तसे स्त्री-पुरुषातील कामेच्छा कमी निर्माण होतात. हे खरे असले तरी पुरुषाची कामेच्छा नेहमीच स्त्रीच्या पाचपट अधिक असल्याने तो साठीत सुद्धा सोळा वर्षीय तरुणीपेक्षा अधिक कामेच्छा बाळगून असतो. पुरुषाला योग्य संवेदना लाभल्या तर तो साठीत देखील परिणामकारक संभोग करू शकतो.
७)--  वयानुसार स्त्री-पुरुषातील कामेच्छा कमी अधिक आढळण्याचे कारण काय तर पुरुषाचे नैसर्गिक काम शुक्रजंतू गर्भाशयापर्यंत पोहचविणे हेच आहे, त्यामुळे त्याची कामेच्छा स्त्रीच्या पाचपट अधिक असते. याउलट स्त्रीला गर्भ पालन, गर्भ पोषण, मातृत्व, संगोपन ही नैसर्गिक कर्तव्ये पार पाडावयची असल्याने मुळात तिचा कल केवळ शुक्रजंतू सामावून घेण्याकडे असतो. संभोगक्रीडा कोणत्या प्रकारे केली, किती वेळ चालली, कितीवेळा घडून आली यात तिला बिलकुल स्वरस्य नसते. पुरुषाकडून प्रत्यक्ष संभोगापूर्वी मिळणारे प्रेम, आधार, प्रणय, आश्वासक साथ यांची गरज स्त्रीला अधिक भासते. कारण स्त्रीची नैसर्गिक प्रेरणाच मुळी मातृत्व या संकल्पनेभोवती एकवटलेली असते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

स्त्रीचे वय आणि सेक्स...

स्त्रीचे वय आणि सेक्स...

पुरुषाच्या कामवासनेत जसा उतार पडत जातो तसे स्त्रीचे नसते. तिची कामवृत्ती एकाच मार्गाने चाललेली आढळते. स्त्रीला प्रत्यक्ष संभोगातून मिळणाऱ्या कामतृप्तीऐवजी प्रणयाराधन, आलिंगन, चुंबन, प्रेमालाप, प्रणयक्रीडा, कामचेष्टा यातून अधिक आनंद प्राप्त होत असतो. स्त्रीची कामलालसा सर्वांगीण स्वरुपाची असते तर पुरुषाची कामलालसा केवळ लैंगिक स्वरुपाची असते. --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
लहान मुलींची कामविषयक संकल्पना अनभिज्ञ स्वरुपाची असते, त्यामुळे लहान मुलात आढळणारा लिंग ताठरता हा प्रकार मुलींमध्ये आढळत नाही.
मुली वयात येतांना त्यांची कामविषयाची उत्सुकता वाढते. ‘ते’ म्हणजे काय असते? इतकेच त्यांना जाणून घ्यायचे असते. त्याचा अनुभव मात्र नकोसा असतो. कारण त्यांना लैंगिक समागमाऐवजी भावनिक एकरूपता अधिक महत्वाची वाटते. या वयात कामोद्दीपनाची क्षमता आलेली नसते. त्यामुळे कामतृप्ती हा प्रकार सहसा आढळत नाही. तरुण पुरुषाप्रमाणे तरुण स्त्री हस्तमैथून करून कामतृप्ती अनुभवून घेतांना फारच क्वचितवेळा आढळते. त्यामुळे पुरुष या वयात जसा अनेक स्त्रियांवर प्रेम करू शकतो, तसे तरुण स्त्री फक्त एकाच तरुणावर प्रेम करतांना दिसते!
तरुण स्त्रीची पहिली रात्र बहुधा निराशाजनकच ठरते. कारण तत्पूर्वी तिला कामतृप्ती हा प्रकार अनुभवास आलेला नसतो. तिची ओढ कामक्रीडा, स्तनाग्रांचे उद्दीपन, शिस्निकेचे उत्पिडन अशातच असते. त्यातच तिला कामसुख अधिक लाभते.
वयाच्या वीस वर्षानंतरही स्त्रीला संभोगात रस वाटत नसतोच. प्रणयक्रीडा, संभोगपूर्व क्रीडा तिला अधिक भावतात. पुरुषाच्या मर्जीसाठी ती संभोग करते. या वयात पुरुष संभोगक्रिया उरकून झोपी जातो. स्त्री मात्र अर्ध्यातच राहते. ‘तू मला असे असे उत्तेजित करावेस..’ असे स्पष्ट सांगण्यास स्त्री कचरते किंवा तिला कामतृप्ती तितकीशी महत्वाची वाटत नसते. केवळ पुरुषाला हवे म्हणून ती संभोगात सहभागी होते.
तिशीतली स्त्री मात्र कामतृप्ती अनुभवण्यास कमालीची उत्सुक असल्याचे आढळते. अशावेळी तिची योग्य प्रकारे कामतृप्ती झाली नाही तर कलह उदभवू शकतो किंवा अतृप्त स्त्रीची मनोकायिक लक्षणे दिसू लागतात. याच वयात स्त्री बंडखोरी करून परपुरुषाकडे आकृष्ट होऊन त्याच्याकडून कामतृप्ती मिळवू पाहते. संभोगक्रीडेत तिला अधिक रस निर्माण होतो. म्हणून स्त्रीची तिशी तिच्या कामजीवनात महत्वाची ठरते. या वयात ती जोडीदाराकडून कामतृप्त होत असेल तर तिचे पुरुषाशी असणारे नाते अधिक घट्ट होण्यास मदत मिळते.
चाळीशीमध्ये स्त्रीच्या रजोनिवृत्तीला सुरुवात झालेली असते. मासिक पाळी थांबली की स्त्रीला संभोगात अजिबात स्वारस्य राहत नाही हा मोठा गैरसमज पुरुषांत पसरलेला आढळतो. यावेळीही स्त्रीला योग्यप्रकारे उत्तेजित केले तर तिला संभोग निश्चितच हवासा वाटू लागतो. एक बदल मात्र होतो की स्त्रीच्या योनीत कामसलील तयार होण्याचे प्रमाण काहीअंशी कमी झाल्याने संभोगासाठी पुरुषाने वंगणयुक्त जेली वापरणे क्रमप्राप्त ठरते.
पन्नाशीतील स्त्री संभोग टाळू पाहते, कारण योनिभगोष्ठ लवचिक राहिलेले नसतात, कामसलीलसुद्धा पुरेसे तयार होत नसते. परिणामी संभोग दुःसह ठरतो. शिवाय या वयात मुलेही मोठी झाल्याने त्यांचे करियर इत्यादी विवंचना स्त्रीला सतावत असतात. त्यामुळेही स्त्री संभोगाला नकार देते.
साठीतील स्त्री संभोगापेक्षा पुरुषाच्या सहवासात अधिक आनंद घेऊ पाहते. तसे पाहिले तर योग्य प्रकाराने उत्तेजित केल्यास आणि प्रत्यक्ष संभोगावेळी वंगणयुक्त जेलीचा वापर केल्यास स्त्रीला कामतृप्तीचा अनुभव घेता येतो. साठीनंतर स्त्रीने पुरुषासोबत निजू नये असा अलिखित नियम असल्याने स्त्रीकडून संभोग वर्ज्य मानला जातो, पण तरीही इच्छा निर्माण झाल्यास ती या वयात देखील संभोगाचा आनंद घेऊ शकते मात्र तो मर्यादित स्वरूपाचा राहतो हे नक्की.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

वयानुसार पुरुषाचा सेक्स...

वयानुसार पुरुषाचा सेक्स...

जसे एखादे झाड नवी नवेली लेऊन डौलात तरारून येते आणि कालांतराने त्याची पाने गळून ते वठते... अगदी तसेच पुरुषाच्या कामवृत्तीचे वर्णन करता येईल. --भोगगुरु कामदेव.  kaamvishva. blogspot.in
बालपणात मुलाचे लिंग ताठ होत असते परंतु तो प्रभाव पुरुषी हार्मोन्सचा असतो. शिस्न ताठ होण्याचा लैंगिकतेशी काडीमात्र संबंध नसतो.
पुरुष वयात आला की त्याचे लिंग कामुक विचारांनी देखील पटकन ताठ होते कारण कामवासना जागृत होऊन ती लैंगिक अवयवात केंद्रित झालेली असते. वयाच्या अठराव्या वर्षी पुरुष चटकन कामोद्दीपित होतो. याच वयात कामुक स्वप्ने पडून क्वचित विर्यस्त्राव होऊन कामतृप्ती लाभते. तरुण मुलींचे आकर्षण वाढून संभोगाची अतीव इच्छा निर्माण होत असते. मग त्या इच्छेचा मान राखून हस्तमैथून केले जाते व कामतृप्ती घेता येण्याचा नैसर्गिक पायंडा असतो. या वयात लिंग तात्काळ उत्थान पावते. शिस्नाला हात लागला, कपडे घासले, तरुणीचा अंगाला स्पर्श झाला, कामुक विचार मनात आले तरी लगेच लिंग ताठरते. वीर्य उत्सर्जक स्नायूंचे कार्य अधिक प्रभावीपणे होत असल्याने वीर्याची पिचकारी बरीच लांबवर जाते. कामतृप्ती झाल्यावर लगेच पुन्हा लिंग ताठ होऊ शकते. हे वय पुरुषाच्या कामवृत्तीचा बहर असतो.  --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
पुरुषाच्या तिशीमध्ये आठवड्यातून तीन-चार वेळा संभोग झाला तरी तो तृप्त होतो. कारण कामविषयक मोह जरासा कमी झालेला असतो. कामुक विचार मनात येणे कमी झालेले असते. तरीही संभोगाच्यावेळी शिस्न चटकन ताठ होते, कामतृप्तीनंतरही ताठरता काही काळ टिकून राहते. परंतु लागोपाठ दोन वेळा संभोग करण्यातली शक्ती नाहीशी झालेली असते. त्यामुळे एखादा पुरुष जर सांगत असेल की, ‘मी तर रोज रात्री तीन वेळा...’ तर ती निश्चितच अतिशयोक्ती असते!
वयाच्या चाळीशीत कामवासनेचा दर्जा कमी झालेला आढळतो. संभोग म्हणजे केवळ लैंगिक खेळ वाटत नाही तर स्त्रीच्या सर्वांगीण सहवासाची ओढ लागलेली असते. कामतृप्ती झालीच पाहिजे असे न वाटता केवळ स्त्रीचा नग्न सहवास हवा असतो!
वयाच्या पन्नाशीनंतर दोन संभोगातील अंतर खूपच वाढलेले दिसून येते. आठवड्यातून एकदा जरी संभोग केला तरी पुरुष तृप्त राहू शकतो. एकदा वीर्यच्युती झाली की पुढील एक ते दोन दिवस लिंगात ताठरता येत नाही. बळेच ताठ केल्यास तोंडात बोटे घालून विनाकारण उलटी आणल्याचा अनुभव येतो!
पन्नाशीत पूर्वीसारखी नग्न स्त्री पाहण्याने, कामुक विचार केल्याने लिंगात ताठरता येत नाही. शिस्न स्त्रीने हाताळले तरच ते ताठ होत जाते. ताठरता बऱ्यापैकी टिकून राहते मात्र विर्यच्युती अल्प प्रमाणात व क्षीण असते. वीर्य थेंबासारखे गळते. त्याची पिचकारी अजिबात उडत नसते. त्यामुळे पोर्न फिल्ममध्ये एखादा पन्नाशीचा पुरुष वीर्याची धार स्त्रीच्या मुखकमलावर फेकीत असला तर ती चक्क धूळफेक समजावी!
साठीत जसा काठीचा आधार घ्यावा लागतो तसेच लिंगताठ होण्यास देखील आधाराची गरज भासू लागते. बराच काळ झिम्मा फुगडी घातल्याशिवाय डाव रंगत नाही. खूप वेळ लिंग हाताळावे लागते तरच ते ताठर होते. पण ताठ झाले की बराचवेळ ताठरता टिकून राहते. उलट वीर्यस्त्राव व्हायला वेळच लागतो. त्यामुळे, “किती वेळ झटता? व्हा की बाजूला..” अशी म्हातारी म्हाताऱ्यावर कावण्याची शक्यता वाढलेली आढळते!
साठी नंतर मात्र गाडी डबघाईला आल्याचे जाणवते, परंतु गाडी पिक’अप’ नक्कीच घेऊ शकते. म्हणजे लिंग ताठ होण्यास कमालीचा जास्त वेळ लागत असला तरी ते ताठ मात्र होते आणि वीर्यच्युती होईपर्यंत ताठसुद्धा राहते. पण एकदा का वीर्यस्त्राव झाला की लगेचच ते ढिले पडून पुन्हा ताठ होण्यास किमान पंधरा दिवस वाट पहावी लागते! त्यामुळे म्हातारचळ लागण्याचा संभव वाढतो. म्हणजे केवळ स्त्रीच्या विविध अंगप्रत्यांगाला हाताळून कामानंद प्राप्त करावासा वाटू लागतो, लिंग ताठ होऊन संभोग करावा व कामतृप्ती करून घ्यावी ही अपेक्षा फारच थोड्या वृद्धाना जाणवते. हे खरे की, लिंगाची योग्य हाताळणी झाली, यथोचित संवेदना प्राप्त झाल्या तर शिस्न नक्कीच ताठ होतांना आढळते.
वृक्ष वठला तरी कोलमडून पडत नाही, तद्वत पुरुष थकला तरी त्याचे लिंग आयुष्याच्या शेवटपर्यंत ताठ होण्याची क्षमता टिकवून ठेवत असते!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

Monday, 5 October 2015

पक्षी-प्राणी-मानव आणि सेक्स...

पक्षी-प्राणी-मानव आणि सेक्स...

मैथून ही प्रत्येक चराचराची नैसर्गिक प्रेरणा असते. त्यायोगे त्यांना आपल्यासारखा सजीव निर्माण करण्याची उपजत उर्मी आलेली असते. म्हणूनच नर मादीच्या शोधात भटकत राहतात, कधीकधी मादी नराच्या शोधात फिरतांना आढळते. पक्षी प्राण्यांत जसे मैथून आढळते, तसे मनुष्यप्राण्यात असते का? नेमकी कोणती भिन्नता आणि कोणती साम्यता दोहोंच्या कामवृत्तीत आढळते? निसर्गातील मैथुनाचे सिंहावलोकन करून पुरुषाला काही टीप्स मिळू शकतील का? त्यांची माहिती मिळवून प्रत्यक्ष कामजीवनात चतुरतेने वापर करून सुखी वैवाहिक जीवन व्यतीत करता येईल का? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)— पशु पक्षी आणि प्राण्यांमध्ये बहुतेकदा मैथून केले जाते. मैथून अनेकांशी अनेकवेळा केलेला संभोग असतो तर मानव प्राणी सहसा संभोग करतो. म्हणजे एकावेळी एकाच जोडीदाराशी सम्यक भोग (दोघांनाही कामतृप्ती लाभेल असे मैथून) ठेवतो. निसर्गातील नर नेहमी मादीवर कुरघोडी करून बळजबरीचा सेक्स करतांना आढळतो. मार्जार कुळातील नर मादीच्या मानगुटीवर चावा घेत मैथून करतो. तसेच काही कुक्कुटवर्गातील पक्षी मादीच्या डोक्यावरील पिसे चोचीने ओढून मैथून करतांना आढळतात. मादी राजी नसतांना तिला गनिमीकाव्याने पकडून मैथुनाला सज्ज करण्याचा हा प्रकार असतो. असा बळजबरीचा संभोग पुरुषाने स्त्रीशी केला तर तो मात्र गुन्हा ठरतो!
२)--  निसर्गात मैथूनाशी संबंधित काही विलोभनीय दृश्ये पहावयास मिळतात. मादीला मनवण्यासाठी नर हरतऱ्हेचे प्रयत्न करतांना दिसतात. सुगरणीचा नरपक्षी वैशिष्टपूर्ण खोपा बांधून मादीला आकर्षित करू पाहतो. तिला जे घरटे आवडेल म्हणजे ज्याची कला आवडेल त्याच्याशी ती संसार थाटते. पण हा नर पक्षी चलाखपणाही दाखवतो. तो एकापेक्षा अनेक खोपी बांधून जास्तीत जास्त आपलीच ‘चलती’ कशी राहील याकडे लक्ष देतांना आढळतो! इतरही प्राणी मादीला आकर्षित करण्यासाठी निरनिराळे आवाज काढतात, आपली बळकट काया, देखणे रंग, आपल्यातील कसब दर्शवितात. म्हणजेच पुरुषालादेखील आपल्या सदगुणांचे प्रदर्शन करून स्त्रीला आकृष्ट करता येते हे नक्की. ज्याच्याकडे वैभव आहे, जो वेलसेटल्ड आहे, ज्याच्याकडे गाडी-बंगला आहे, त्यालाच स्त्री डोळे झाकून पसंत करते हे त्रिवार नैसर्गिक सत्य आहे असेच म्हणावे लागेल. म्हणजेच पुरुषाने स्त्रीच्या स्वागताची जय्यत तयारी केल्याबिगर पुढे पाऊल टाकू नये असेच निसर्गाला सूचित करायचे तर नसेल ना?
३)--  मयूरनृत्य सर्वांना परिचित आहेच. ढगांना पाहून मोर नाचतो हे खरे नसून लांडोरीचा अनुनय करण्यासाठी तो पिसारा फुलवून आपले रंगीले वैभव प्रकट करीत तिला भुरळ पाडीत असतो. ज्या नराचा पदन्यास उत्तम, ज्याचे प्रणयाराधन डौलदार असते आणि जो नर आपले मोरपिसांचे वैभव दर्शवून डोळ्यांचे पारणे फेडू शकतो अशाच नराशी मादी जुगते. म्हणजे संभोगपूर्व क्रीडेला निसर्गात जितके महत्व आहे तितके पुरुषाने द्यायला हवे. कामक्रीडा केल्याशिवाय प्रत्यक्ष संभोग अजिबात करू नये, असा एकतर्फी संभोग ‘सम्यक’ भोग न राहता केवळ ‘उपभोग’ ठरतो.
४)--  निसर्गातील अनेक नर मादीसाठी घमासान लढाई करतांना दिसतात. त्यात जो जिंकेल तोच मादीला जुगतो. प्रसंगी कमकुवत नराला धाराशायी पडावे लागते. जो शक्तिमान, जो ताकतवर, जो सुदृढ असेल तोच मादीला जिंकू शकतो. पुरुषालासुद्धा स्वतःला सिध्द केल्याशिवाय बोहल्यावर चढता येत नाही, परिणामी स्त्रीवरही चढता येत नाही! विनोदाचा भाग सोडला तरी हे त्रिकालाबाधित सत्य आहेच की! पुरुषाकडे एखादातरी प्लस पॉईंट असायलाच हवा ज्यावर स्त्री अनुरक्त व्हावी. या स्पर्धेत जो टिकेल तोच स्त्री जिंकेल!
५)— बहुतेक प्राणी पक्षी मादीला मागील बाजूने जुगतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे मैथून केवळ गर्भधारणेपुरतेच मर्यादित राहते. शिवाय मैथूनाचा कालावधी अत्यल्प असतो. पशु-पक्षी-प्राण्यांचे मैथून केवळ काही सेकंदेच चालू राहते. कामतृप्ती हा प्रकार मानवेतर प्राण्यांमध्ये आढळून येत नाही. म्हणून पुरुषाने अधिक सजग असणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुषांचा संभोग हा काही मिनिटे ते काही तास चालत असल्याने त्यात विविधता असणे, पुरेसा प्रणय अंतर्भूत करणे आणि स्त्रीची कामोद्दीपित करणारी स्थाने लक्षात ठेवून आवर्जून त्यांचे उत्पीडन करणे आवश्यक ठरते. पुरुषाची आवड म्हणून तो श्वानानुनय संभोगासन म्हणजे डॉगी स्टाईल सेक्स करण्याची इच्छा बाळगतो. परंतु यात स्त्रीची शिस्निका जी की कामोद्दीपनाची सौदामिनी ठरते, तिचे उत्पीडन अजिबात होत नसल्याने स्त्रीला प्रत्यक्ष संभोगातून येणारी कामतृप्ती बिलकुल लाभत नाही.
--भोगगुरु कामदेव.  kaamvishva.blogspot.com

Saturday, 3 October 2015

स्त्री-पुरुषाच्या 'काम'वृत्तीतील फरक..

स्त्री-पुरुषाच्या ‘काम’वृत्तीतील फरक...

स्त्री आणि पुरुष कामरूपी नाण्याच्या दोन बाजू होत. एक काटा असला तर दुसरा छापा असतो. ती कुलूप असते तर तो तिची चावी! शारीरिक ठेवणीत जसा फरक तसाच मानसिक पातळीवरही दोघांच्या कामवृत्तीत भिन्नत्व असते. बेडवर प्रणयाचा टॉस केला असता तो काटाही पडू नये किंवा छापाही, अशी समतोल स्थिती साधावी की ‘टॉस’ उभाच राहिला पाहिजे! कामजीवनाची यशस्वी वाटचाल यातच दडलेली असते. म्हणून दोघांनीही एकमेकांची ‘काम’वृत्ती समजावून घेतली तर असा समतोल राखणे काहीही अवघड नसते. म्हणतात ना ज्यांचे बेडवर चांगले पटते, त्यांचे आयुष्यभर चांगलेच पटते! ही उक्ती प्रत्येकाला तंतोतंत लागू पडते. यास्तव दोघांच्या कामवृत्तीतील फरक माहीत करून घेणे अगत्याचे ठरते... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)--  कामुक विचारांनी पुरुष तात्काळ उत्तेजित होतो आणि त्याची कामतृप्तीसुद्धा तात्काळ स्वरुपाची असते. म्हणजे विर्यच्युती झाली की त्याला कामतृप्ती लाभते. तसे स्त्रीचे नसते. तिला उत्तेजित होण्यास वेळ लागतो. परंतु तिची उत्तेजित अवस्था पुरुषाच्या तुलनेत अधिक काळ टिकून राहते आणि तिची कामतृप्ती सर्वांगीण असते.
२)--  पुरुषाचे कामोत्तेजक बिंदू लिंगाच्या ठिकाणी एकवटलेले असल्याने त्याला प्रत्यक्ष संभोगात अधिक रुची असते आणि त्यामुळे तो उत्तेजित झाल्यास लगेच सेक्स करण्यास सुरुवात करतो. याउलट स्त्रीचे कामोत्तेजक बिंदू हे सर्व शरीरभर पसरलेले असतात. विशेषतः मान, पाठ, गळा, कानाच्या मागील बाजू, स्तनाग्रे, स्तनमंडले, ओटीपोट, नाभी, तळवे, पोटऱ्या, मांड्यांची आतील बाजू, योनिभगोष्ठ, शिस्निका याठिकाणी कामोत्तेजक संवेदना पसरलेल्या असतात. जास्तकरून स्तनाग्रे व शिस्निका ही स्थाने तात्काळ कामोद्दीपित करणारी असतात.
३)--  पुरुषाला प्रत्यक्ष संभोगाची आवड असते. तो उत्तेजित झाल्याबरोबर त्याचे ताठरलेले लिंग योनीमध्ये घुसडू पाहतो. परंतु स्त्रीला प्रत्यक्ष संभोगात अजिबात रस नसतो, त्यापेक्षा पुरुषाने प्रणयाराधन करावे, सर्वांगाला स्पर्श करून कामोत्तेजीत करावे, स्तनाग्रे, शिस्निका यांचे हळूवार उत्पीडन करावे अशी तिची अपेक्षा असते. त्याद्वारे स्त्रीला अधिक कामतृप्ती लाभते. प्रत्यक्ष संभोग अगदी शेवटी तिला हवा असतो. प्रणयक्रीडेने होणारी कामतृप्ती तिला जास्त आवडत असते.
४)--  मानसिकपातळीवर पुरुष हा सुंदर आणि कमनीय दिसणाऱ्या स्त्रीकडे तात्काळ आकर्षित होतो. त्या स्त्रीकडून त्याला लगेच सेक्स हवासा वाटतो. त्याउलट स्त्री गोऱ्यागोमट्या, चिकण्या किंवा बॉडीबिल्डर असलेल्या पुरुषाकडे तात्काळ आकर्षित होऊ शकत नाही. म्हणजेच पुरुषाप्रमाणे केवळ ‘का भुललासी वरलिया रंगा’ असा प्रकार स्त्रीच्या मानसिकतेचा नसतो. पुरुषाकडून ती नेहमीच प्रेमाची आधाराची आणि आश्वासकतेची अपेक्षा धरून असते, ते तिला मिळाले की ती त्याच्याकडे आकृष्ट होऊन आपले सर्वस्व त्याला बहाल करते. पुरुष सेक्ससाठीच स्त्रीवर प्रेम करतो तर स्त्री प्रेमासाठी पुरुषाशी रत होते.
५)--  सेक्स हा पुरुषाचा नैसर्गिक धर्म आहे, ते त्याचे नैसर्गिक आद्य कर्तव्य आहे, सेक्स म्हणजे त्याच्यातील नराचा पुरावा आणि साध्यही आहे. त्याउलट स्त्रीला बालकाचे पालनपोषण गर्भातही आणि बाहेरही करायचे असते. ही तिची नैसर्गिक उर्मी असते. त्यामुळे आधार, प्रेम, संरक्षण याची खात्री करून घेतल्याशिवाय ती सहसा सेक्ससाठी राजी होत नाही. हा तिचा नैसर्गिक बाणा असतो. कारण पुरुषाकडून आधार, प्रेम, संरक्षण मिळाले नाही तर ती अपत्याचे पालनपोषण व्यवस्थित करू शकणार नाही ही तिची नैसर्गिक वृत्ती ‘काम’वृत्तीत देखील प्रतिबिंबित होत असते.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com

Friday, 2 October 2015

सेक्स आणि मदिरापान ...

सेक्स आणि मदिरापान...

मदिरेची बधिरता अंगी भिनली की मदिराक्षी पुरुषाला अधिक हवीशी वाटू लागते. मदिरा आणि मदिराक्षी यांचा संबंध पूर्वापार चालत आलेला आहे. मग शारीरिक संबंध येण्यात अडथळा तो कसला? मदिरेची झिंग चढली की लिंग ताठ उभे राहू लागते. मदिरापानानंतर भलेही पुरुषाला ताठ उभे राहता येत नसेल मात्र त्याचे लिंग आपसूकच ताठ मानेने कुठेतरी घुसू पाहते. असे का होते? मदिरापानानंतर सेक्स कसा करावा? मदिरा आणि मदिराक्षी यांत फरक काय? सेक्स आणि मदिरा यांचा काही अन्योन्यसंबंध असतो का? कामशास्त्र काय सांगते? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)--  मदिरा म्हणजे मद्य आणि मदिराक्षी म्हणजे मादक नेत्रपल्लवी करणारी कमनीय स्त्री! तिच्या प्रेमळ डोळ्यांत पाहून मदिरेचा एकेक घोट रिचवण्यासारखे सुख नसते. ती जशी चढते तशी हीही चढते! दोघींचा अंमल सुरु झाला की हळूच पुरुष तिच्याकडे आकृष्ट होतो. यात गैर काहीच नाही. हा सर्व निसर्गनियम आहे.
२)--  मदिरेची धुंदी सुरु झाली की पुरुष सर्व विवंचना चिंता अपोआप विसरून जातो आणि त्याचे मूळ ‘काम’ त्याला आठवते. साहजिकच पुरुषी हार्मोन्स अधिक स्त्रवू लागतात व लिंगाला ताठरता येऊ लागते. एक मात्र नक्की मदिरेसोबत मदिराक्षी असेल तरच हे घडते. केवळ चारचौघांसोबत मद्य पितांना हे कदापि घडणे अशक्य!
३)--  साधारणतः १०० मिली मद्य पुरुषाच्या कामेच्छा उद्दीपित करणारे ठरते. त्यापेक्षा जास्त झाल्यास संवेदना अधिक बधीर होऊन बेडवर ‘बल्ल्या’ होण्याचाच संभव जास्त! त्यामुळे केवळ ‘तार’ लागेल, करंट सुरु होईल इतकेच मद्य घ्यावे आणि त्या वाजवी व माफक पातळीच्या ‘करंट’मध्ये संभोगाचा आनंद मनमुराद लुटता येतो. असे कामशास्त्र सांगते.
४)--  बहुतेक स्त्रियांना पुरुषाने ड्रिंक्स घेऊन सेक्स केलेला आवडतो. कारण पुरुष मदिरेच्या धुंदीत अधिक परिणामकारकरित्या सेक्स करू शकतो असे एका पाहणीत आढळले आहे. त्याचे कारण वर नमूद केलेच आहे. कामोत्तेजक संवेदना काहीशा संथपणे मेंदूपर्यंत पोचविल्या जातात. त्यामुळे प्रत्यक्ष संभोगाचा कालावधी नेहमीपेक्षा वाढलेला असतो.
५)--  काही स्त्रियांना पुरुषाने ड्रिंक्स घेऊन सेक्स केलेला आवडत नाही. अशावेळी गनिमीकावा तंत्र वापरावे. म्हणजे मदिरापानानंतर मिंट किंवा मुखशुद्धीसाठी मसाला पान वगैरे खावे, त्यामुळे ड्रिंक्सचा गंध स्त्रीला येणार नाही. तिच्याशी समोरासमोर बोलण्यापेक्षा कानात कुजबुज करावी त्यामुळे देखील मदिरेच्या अंमलाखाली पुरुष नाहीये याची स्त्रीला खात्री पटते.
६)--  माफक मदिरापान केल्यानंतर पुरुष 'ओक्के' असतो. फक्त त्याच्या संवेदनांना किंचित बाधिर्य आलेले असते. हेच सेक्ससाठी उपयुक्त ठरते. उच्च क्षणाचा परिस्फोट काही मिनिटे निश्चित लांबविता येतो असे सेक्सोलॉजिस्ट डॉ.विजय पाटील यांनी नमूद केले आहे.
७)--  मदिरेचा करंट उतरण्यापूर्वीच प्रणयाराधन सुरु करावे. स्तनमर्दन, स्तनचूषण अशा यथोचित प्रणयक्रीडा करून स्त्रीला पराकोटीचे उत्तेजित करावे. (ड्रिंक्सचा गंध येऊ नये म्हणून मुखचुंबन कसोशीने टाळावे. त्याऐवजी स्तनाग्रे अधिकवेळ चोखावीत.) मगच प्रत्यक्ष संभोग सुरु करावा. स्त्रीच्या कानात सेक्सी वाक्ये कुजबुजत मदिरेच्या करंटमध्ये मनसोक्त सेक्स होईल यात शंकाच नाही.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com

Thursday, 1 October 2015

अतृप्त स्त्रीची लक्षणे...

अतृप्त स्त्रीची लक्षणे...

शीघ्रपतन झाल्यामुळे किंवा आवश्यक तितका वेळ प्रत्यक्ष संभोग होऊ न शकल्यामुळे स्त्रीची कामतृप्ती होत नाही. रंगलेल्या प्रणयाचा अचानक बेरंग होऊन जातो. काहीवेळा पुरुष त्याची वीर्यच्युती झाली की बाजूला होतो आणि स्त्री तशीच अर्ध्यात राहते, तिची कामतृप्ती झालेली नसते. बहुतेकदा पुरुष थेट संभोगच करू लागतो. पुरेशा प्रणयक्रीडेअभावी स्त्रीची योनी ओलसर होत नाही व लिंगप्रवेश कष्टप्रद होतो. कोरड्या योनीत लिंग घुसडण्याची घाई केल्याने वंगण म्हणून पुरुषाची विर्यच्युती होऊन जाते व लिंग ढिले पडू लागते. तोवर स्त्रीची उत्तेजना काही अंशी सुरु झाल्याने संभोग अपूर्ण राहतो. अशा अधुऱ्या कहाणीमुळे राजाराणीच्या मधुर संबंधात बाधा येऊ लागते. म्हणून पुरुषाला अतृप्त स्त्रीची लक्षणे माहीत असायला पाहिजेत. जेणेकरून तो त्यावर उपाय शोधून आपले कामजीवन यशस्वी करू शकेल... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
लग्नानंतरची वर्ष सहा महिने गुण्यागोविंदाने गेल्यावर मात्र स्त्रीची चिडचिड सुरु होते. तिची असमाधानी वृत्ती उफाळून येते. काही मनोकायिक लक्षणे अचानक दिसू लागतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून ती रुसू लागते, अबोला धरू लागते. कितीही आवडीच्या साड्या घेतल्या, कितीही महागडे दागिने केले तरी तिचे समाधान काहीकेल्या होत नसते.  हे का घडते आहे हे तिलाही कळत नाही. पुरुष तिच्या अशा असहकार पुकारण्याने गांगरून जातो. त्यालाही उमजत नाही नेमके काय होतेय हिला. नव्याचे नऊ दिवस उलटल्यावर स्त्री मधील कामचेतना जागृत होतात व जर तिला कामतृप्ती होत नसेल तर मात्र अशी असमाधानी लक्षणे प्रकट होऊ लागतात. कोणतीही गोष्ट सामंजस्याने घेण्याऐवजी ती हमरीतुमरीवर का येते हे पुरुषाला कळत नाही. यामागील कामशास्त्रीय कारण लैंगिक अतृप्तीच असते, असे मास्टर आणि जॉन्सन यांनी नमूद केले आहे.
१)--  सकाळच्या रम्य आणि उत्साहवर्धक वेळी स्त्री चिडचिड करू लागते. उठल्यापासून तिची भुणभुण चालू होते. क्षुल्लक कारणांवरून ती त्रागा करू लागते. आपली मनस्थिती अशी का झालीय हेही तिला कळून येत नाही. रात्रीच्यावेळी अपूर्ण राहिलेल्या संभोगाचे ते कारण असते. तिची कामतृप्ती न झाल्यामुळेच तिची घालमेल होत असते.
२)--  काही सोशिक स्त्रिया रात गयी सो बात गयी असे समजून लैंगिक भूक शमली नाही तरी निमूटपणे आपली कामे करीत राहतात. अशा वर्गातील स्त्रिया सेक्स फक्त पुरुषाच्या आनंदासाठीच असतो असे मानून चालत असतात. त्या संभोगात भाग घेतात पण निश्चेष्ट पडून राहतात, पुरुषाला अजिबात प्रतिसाद देत नाहीत.
३)--  काही स्त्रिया मात्र अव्यक्त राहणेच पसंद करतात. आपली कामतृप्ती झालेली नाहीये हे त्यांना उमगलेले असते, परंतु त्याबाबत त्या चकार शब्द काढीत नाहीत. पण हे त्यांचे लैंगिक असमाधान मात्र मनोकायिक लक्षणे उपस्थित करू लागते. मग सकाळी उठल्यावर कंबर दुखते, ओटीपोट ओढल्यासारखे वाटत राहते. कोणताही शारीरिक आजार नसतांना अशी लक्षणे दिसून येतात.
४)--  काही स्त्रिया तात्काळ व्यक्त होणाऱ्या असतात. कामतृप्ती झाली नाही तर त्या पुरुषाला सडेतोड शब्दांत नापसंती दाखविण्याचे धारिष्ट अंगी बाळगतात. पुरुषाला प्रसंगी षंढ ठरविण्यात देखील त्या कचरत नसतात. येताजाता पुरुषाला घालूनपाडून बोलतांना त्यांना काहीच वाटत नाही. क्वचित चारचौघात देखील त्या पुरुषाचा अवमान करू धजतात. रात्रीच्या वेळी बेडवर त्या पुरुषाला झिडकारतात, सेक्स साठी स्पष्ट नकार देतात. काही वेळा कामतृप्ती दुसऱ्या पुरुषाकडून मिळवण्याची बंडखोरीदेखील अशा स्त्रिया करू शकतात.
५)--  भारतातील किमान दहा टक्के स्त्रिया कामतृप्ती बाबत अनभिज्ञ असतात. आयुष्यात त्यांनी कामतृप्ती म्हणजे काय ते अनुभवलेले नसते. अशा स्त्रिया सेक्स झाल्यानंतरही क्लिष्ट विषयांवर घडाघडा बोलू शकतात. संभोगानंतर सुद्धा त्या प्रापंचिक बाबी मनसोक्तपणे चर्चेला घेत असतात. कामतृप्तीनंतर येणारी ग्लानी त्यांना कधी अनुभवास मिळालेलीच नसते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in