Friday, 9 December 2016

शिस्नाचे कार्य...

शिस्नाचे कार्य...

निसर्गनियमानुसार पुरुषाने आपल्यासारखी प्रजा निर्माण करणे घडून येते. यासाठी पुरुषाचे लिंग हा अवयव महत्वाचे कार्य पार पाडत असतो. स्त्रीचे गर्भधारणेचे अवयव अंतस्थ असल्याने तिथपर्यंत शुक्राणू पोहचविणे हेच शिस्नाचे काम असते. एखाद्या पिचकारी सारखे शुक्रजंतू योनीत सोडले जाणे इतकेच कार्य लिंगाकडून अपेक्षित असते. हे अपोआप घडणे आणि मुद्दाम घडवून आणणे यात बराच फरक असतो. त्यासाठी पुरुषाचे लिंग कसे कार्य करते ते समजून घेणे आवश्यक आहे.
–भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाला ठरवून लिंगात ताठरपणा आणताच येत नसतो. अमुक वाजून तमुक मिनिटांनी माझे लिंग ताठ झालेच पाहिजे असे ठरवून लिंग ताठ होत नसते. ही प्रक्रिया सर्वस्वी स्वायत्त मज्जासंस्थेमार्फत घडवून आणली जाते. त्यावर पुरुषाचे नियंत्रण नसते. त्यामुळे योग्य त्या कामोत्तेजक भाव-भावना निर्माण झाल्या तरच शिस्न ताठर होऊ लागते.
२)कामुक स्वप्नरंजन, स्त्रीची नग्नता पाहणे, लिंगाला कामुक स्पर्श होणे यांमुळे पुरुष कामोत्तेजित होतो व लिंगाकडील रक्तप्रवाह आपोआप वाढला जाऊन लिंग स्फुरण पावू लागते. शिस्नातील रक्तवाहिन्या तट्ट होऊन लिंगाची जाडी तसेच लांबी वृद्धिंगत होते.  अशावेळी योनीची घट्ट पकड लिंगावर बसत राहिल्यास ते आणखीनच कडक होत राहते.
३)ताठरलेल्या शिस्नातून चिकट असे चार पाच बिंदूस्राव बाहेर येतात. त्यांमुळे योनीतील लिंगाचा प्रवेश सुकर होऊ शकतो. लिंग योनीत प्रविष्ट केल्यानंतर पुरुष जघनभागाची मागेपुढे अशी हालचाल करू लागतो. या पुढेमागे होण्याने शिस्नाच्या कामसंवेदना अधिक वाढून उत्कट क्षणाची अनुभूती पुरुषाला येऊ लागते. लिंग खूपच ताठर होऊन योनीत खोलवर जाऊ लागते. सर्व शरीरात, नसांनसांत कामसंवेदना पसरू लागतात.
४)साधारणतः तीन मिनिटांपर्यंत ही स्थिती चालू राहिल्यास वीज चमकावी तशी अनुभूती लाभून पुरुषाचा बांध फुटतो व चार-पाच आचके शिस्नाला बसून वीर्यच्युती होते. या स्फोटक क्रियेवर पुरुषाचा अंमल चालत नसतो. कामसंवेदना पराकोटीला पोचल्या की विर्यच्युती होऊन जाते. ज्याप्रमाणे अनावर झालेली शिंक वेळीच आवरता येत नाही, त्याप्रमाणेच विर्यच्युती अजिबात थोपविता येत नाही. फारफार तर जघनभाग पुढेमागे करण्याची क्रिया काही क्षण थांबवून जवळ येणारा उत्कट बिंदू जरासा लांबविता येऊ शकतो.
५)पुरुषाची विर्यच्युती झाली की तो कामतृप्त होतो. शिस्न ढिले किंवा शिथिल पडू लागते. विर्यच्युती नंतर काही कालावधी जाईपर्यंत लिंग पुन्हा ताठ होऊ शकत नाही. त्यामुळे पोर्नक्लिप मध्ये दाखवतात तसे पुरुषाला एकाचवेळी अनेकदा विर्यच्युती घडवून कामतृप्ती लाभत नसते. चित्रफितीत जे दाखवतात ते अवास्तव आणि अशक्य असते. प्रत्यक्षात तसे घडत नाही. पुरुष तासनतास संभोग करू शकत नाही. बराच काळ संभोग चालू राहिला तर थकवा येऊन लिंग आपोआप शिथिल पडते.
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

शिस्नाची शरीररचना...

शिस्नाची शरीररचना...


पुरुषाचे लिंग हा शरीराच्या बाहेरील बाजूस असलेला प्रभाग असल्याने स्पष्ट दृगोचर होत असतो. मात्र त्यामागील रचना जरा गुतागुंतीची असते. शिस्नाच्या ठिकाणी कामोद्दीपन केंद्रे एकवटलेली असतात. त्यामुळे ते ताठर बनते. तसेच लिंगाच्या पुढील टोकाला एक छोटे छिद्र असून त्यातूनच मूत्रविसर्जन आणि वीर्यच्युती होत असते. म्हणजेच स्त्रीच्या योनीमध्ये असणारे तीन प्रभाग कामोद्दीपन, मूत्रविसर्जन आणि योनिद्वारे संभोग अशी वेगवेगळी कार्ये करतात. तसे पुरुषाच्या लिंगात वेगळे प्रभाग नसून वरील तीनही कार्ये एकाच अवयवाने सिध्द होत असल्याचे दिसते. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)प्रौढ पुरुषाचे लिंग हे ताठर अवस्थेत साधारणतः तिने ते चार सेमी जाड आणि चार ते सहा इंच लांब होते. शिस्नावर ‘लिंगचर्म’ नामक पातळ त्वचेचे आवरण असते. ते मागे घेतल्यावर अंडाकृती गुलाबी लालसर रंगाचा ‘शिस्नमणी’ दिसतो. कधी कधी काही पुरुषांत ही त्वचा अजिबात मागे जात नाही, आणि संभोगादरम्यान योनीत लिंग प्रविष्ट होत असतांना ती त्वचा किंचीतशी फाटून मागे जाते, याला ‘पुरुषाचा कौमार्यभंग’ म्हणता येईल. काहीवेळा मागे गेलेली अशी घट्ट त्वचा अजिबात पुढे येत नाही, शिस्नमणी काळानिळा होऊन टम्म फुगतो, अशावेळी तातडीने शस्त्रक्रिया करून ‘सुंथा’ करावा लागतो!
२)शिस्नाच्या मूलभागी लोंबणारी त्वचेची पिशवी असते. त्यात दोन गोट्या सदृश ‘वृषणे’ असतात. यातच शुक्राणू निर्माण होतात. शुक्राणूंचे तपमान योग्य राखण्यासाठी ही वृषणे आखडतात किंवा लोंबतात. विर्यच्युतीच्या वेळी ही वृषणे इतके आखडतात की शिस्नाच्या मूलभागी दिसेनाशी होऊन त्यातील शुक्राणू मूत्रवाहिनीत ढकलले जातात.
३)शिस्नमण्याच्या खालील बाजूस जेथे वरील त्वचा मण्याला चिकटलेली असते तेथे अधिक चेतातंतू असल्याने पुरुषाची कामोद्दीपित करणारी केंद्रे एकवटलेली असतात. हा बिंदू पुरुषाला त्वरित उत्तेजित करण्यासाठी उपयुक्त असतो. ताठरलेल्या लिंगाला अधिक रक्तपुरवठा झाल्याने कामोत्तेजक संवेदना देखील जास्त प्रमाणात ग्रहण केल्या जातात.
४)पुरुषाचे लिंग हा स्नायूंनी बनलेला मांसल प्रभाग असला तरी त्यात सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे भरगच्च जाळे असते. ज्यावेळी लिंग शिथिल असते त्यावेळी ते कमालीचे नरम आणि लिबलिबीत लागते. मात्र जेव्हा पुरुष उत्तेजित होतो तेव्हा रक्तपुरवठा वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्त भरले जाते आणि रक्ताचा शरीराकडे जाणारा मार्ग स्नायूंनी रोखला जाऊन ते अधिकाधिक ताठर बनत जाते, इतके की एखादे कडक लाकूड भासावे!
५)स्त्रीला पुरुषाच्या लिंगाचे अजिबात आकर्षण नसते. पोर्नक्लिप मध्ये दाखवतात तसे स्त्रीला पुरुषाच्या शिस्नाशी खेळावे, ते ओठांनी चोखावे असे बिलकुल वाटत नसते. शिवाय लिंगाचे कार्य शुक्राणू योनीत पोहचविणे इतकेच असल्याने त्याच्या जाडीशी वा लांबीशी स्त्रीला काहीच घेणेदेणे नसते. ते पुरेसे उत्तेजित होऊन योनीप्रविष्ट होत असेल तरी काहीच प्रश्न उरत नसतो. ‘शिस्न लांब व जाड असावे तरच स्त्री कामतृप्त होईल,’ हा केवळ पुरुषाचा पोकळ भ्रम असतो!
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

Tuesday, 6 December 2016

स्त्रीच्या गुह्येंद्रियाचे कार्य...

स्त्रीच्या गुह्येंद्रियाचे कार्य...

पुरुषाला जसे स्वतःच्या लिंगाचे आकर्षण असते तसे स्त्रीला स्वतःच्या योनीबद्दल आकर्षण नसते. याला प्रमुख कारण म्हणजे पुरुषाची कामोत्तेजित करणारी केंद्रे शिस्नात एकवटलेली असतात. तर स्त्रीची कामोत्तेजित करणारी केंद्रे मान, गळा, ओठ, पोट, स्तने, मदनिका अशी सर्वांगीण असतात. स्त्रीच्या योनीची रचना माहिती झाल्यावर त्यांतील प्रदेशाचे कार्य माहीत करून घ्यावे लागते. कारण मदनिका, मूत्रमार्ग आणि योनी यांचे कार्य पूर्णतः वेगवेगळे असते. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)मदनिका किंवा शिस्निका या प्रदेशाच्या हळूवार उत्पिडनाने स्त्री कामोत्तेजित होते. कामसंवेदनांचे ग्रहण केंद्र शिस्निकेच्या ठिकाणी असते. या संवेदनामुळे मदनिका शिस्नासारखी ताठर होते परंतु तिची लांबी आत शोषली गेल्याने बाहेरून शिस्निका उत्तेजित झाल्याचे दिसत नाही.
२)मुत्राद्वारातून मूत्र बाहेर टाकले जाते. कामक्रीडेत या प्रदेशाचा सहभाग जवळजवळ नसतोच. मात्र संभोगापूर्वी मूत्रविसर्जन करावे, कारण जोराची लघवी लागलेली असतांना केला जाणारा संभोग कष्टदायक ठरू शकतो. किंवा कामतृप्ती नंतर जी शिथिलता येते तेव्हा अनाहूतपणे मूत्र विसर्जित होण्याचा संभव असतो.
३)कामोत्तेजित झाल्यावर मुत्रद्वाराच्या खाली असलेल्या योनीद्वाराचे काही प्रमाणात विस्फारण होते. योनीत कामसलील स्रवू लागते व योनीमार्ग ओलसर आणि शिस्नप्रवेशासाठी गुळगुळीत होऊन जातो. योनीच्या भोवती स्नायूंचा वेढा असल्याने लिंगाला पकडून ठेवणे त्यावर दाब देणे असे कार्य घडून येते.
४)वरील विवेचन वाचल्यास असे लक्षात येईल की स्त्रीच्या योनीतील तीनही शरीर भाग वेगवेगळे कार्य करतात. शिस्निका पुरुषाच्या शिस्नाप्रमाणे कामोद्दीपित होण्याचे कार्य करते मात्र त्यातून पुरुषाच्या लिंगासारखे वीर्य बाहेर पडत नाही किंवा त्यांतून मूत्रसुद्धा येत नाही. कामतृप्तीसाठी हे केंद्र उत्तेजित राहणे आवश्यक असते.
५)योनीमार्गाच्या आत दीड ते दोन सेंटीमीटर नंतर संवेदना नाहीशा होत असल्याने संभोगादरम्यान योनीचे कार्य केवळ लिंगाला घट्ट पकडून उत्तेजित ठेवणे इतकेच असते! त्यामुळे पुरुषाचे लिंग लांब असले काय, आखूड असले काय किंवा कमी जाडीचे असले काय योनीमार्गाला शिस्नाच्या लांबी-जाडीच्या संवेदना जाणवत नसतात. म्हणून योनीमार्गात शुक्राणू पोचवणे इतकेच कार्य लिंगाकडून अपेक्षित असते. योनीमार्ग पुढे वीर्यग्रहणाचे कार्य करतो. तसेच ऋतूस्राव आणि अपत्याचा जन्म योनीमार्गेच होतो.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

योनीची रचना...


योनीची रचना...

आजही सेक्स ही अंधारात केली जाणारी कृती असून पुरुषाला आपल्या शिस्नाचा स्त्रीच्या योनीत होणारा प्रवेश स्त्रीकडूनच करून घ्यावा लागतो! काही पुरुष अंदाजानेच योनीत लिंगप्रवेश करू शकतात. पहिल्या प्रयत्नातच योनिद्वार सापडले आणि लिंग प्रवेश सहज झाला असे कधीच होत नसते. स्त्रीच स्वतःच्या हाताने लिंगाला योग्य मार्ग दाखवून शिस्न आपल्या योनीत सारून घेत असते. स्त्रीला संभोगावेळी उजेड असलेला आवडत नसल्याने योनीची नेमकी शरीररचना पुरुषाला अवगत होत नाही. स्त्रीचा ‘गुह्येंद्रीय’ भाग शब्दाप्रमाणेच गहन, अगम्य राहतो. योनिद्वार नेमके कुठे आहे हे पुरुषास ‘यशस्वी संभोगाच्या’ हेतूने माहीत असावयास पाहिजे.  –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाचे गुह्येंद्रीय म्हणजेच शिस्न हे पाहताच क्षणी लक्षात येते. तसे स्त्रीच्या योनीचे नसते. स्त्रीच्या गुह्येंद्रियात मदनिका, मूत्रद्वार आणि योनिद्वार असे छुपे शरीर प्रदेश असतात. छुपे अशासाठी की ते सहजासहजी दिसत नाहीत. मोठे भगोष्ठ आणि आतील लहान भगोष्ठ यांनी वरील तिन्ही रचना पूर्णतया झाकून ठेवलेल्या असतात. योनिभगोष्ठ विलग झाल्याशिवाय ते दिसत नाहीत. हे प्रदेश संभोगाच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यांची रचना पुरुषाला जाणून घ्यावीच लागते.
२)पुरुषाचे लिंग गुदद्वारापासून बरेच वरील दिशेला असते तर स्त्रीची योनी गुदद्वारानजीकच एक ते दोन इंचावर असते. त्यामुळे योनिद्वारात शिस्न प्रविष्ट करतांना स्त्रीने आपल्या मांड्या विलग करून वर उचललेल्या असाव्या लागतात. तरच उपरोक्त तीनही प्रदेश दिसू शकतील. या तीनही रचनांमध्ये काही सेंटीमीटर अंतर असल्याने हे भाग अगदी जवळजवळ एकवटलेले असतात.
३)महाभगोष्ठ विलग केल्यावर वरील टोकाला मदनिका किंवा शिस्निका असते. पुरुषाचे शिस्न जेथे असते, त्याच ठिकाणी मदनिका असते. फक्त त्यांतून मूत्रविसर्जन होत नाही. मात्र शिस्निकेच्या उद्दिपनाने स्त्रीला कामोत्तेजित करता येते तसेच ती कामतृप्तही होते. मदनिकेला हळुवार स्पर्श अधिक सुखद वाटतो. स्त्रीचा हा तसा बराच नाजूक अवयव समजावा.
४)महाभगोष्ठ विलग केल्यावर आतून पातळ त्वचेचे लघु भगोष्ठ असते. लहान पाकळ्या वरील बाजूस एकत्र येऊन शिस्निकेला जोडलेल्या असतात. त्या बिंदू खाली मूत्रद्वार असते. काहीवेळा शुचिता पाळली न गेल्यामुळे लगेच इन्फेक्शन होऊन स्त्रीला मूत्रदाह (उन्हाळी लागणे) होतो. बहुदा पहिल्या रात्रीनंतर हा त्रास होतो म्हणून त्यास हनिमून सिस्टायटीस म्हणतात.
५)मूत्रद्वाराच्या खालील बाजूस योनिद्वार असते. हे एका पातळ त्वचेने झाकलेले असते, ज्यास योनीपटल म्हणतात. प्रथम संभोगाच्यावेळी हे विदीर्ण होते, फाटते या बदलास कौमार्यभंग म्हणतात. परंतु काही व्यायाम प्रकार, सायकलिंग यांमुळेसुद्धा ते फाटू शकते. ते पटल अविद्ध असणे म्हणजे स्त्री कुमारी आहे, किंवा ते फाटले तर स्त्रीचा आधी पुरुषाशी शरीरसंबंध झाला होता या शंकांना वाव देता येत नाही. योनीद्वारातून लिंगप्रवेश केला असता शुक्राणू गर्भाशयापर्यंत पोहोचले जातात.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

Thursday, 1 December 2016

संभोगोत्सुक पुरुष...

संभोगोत्सुक पुरुष...


पुरुष जरी लगेच रंगात येत असला तरी स्त्रीला ते काहीवेळा बिलकुल समजत नाही. पुरुषाला सेक्स हवा आहे हे स्त्रीला पटकन ताडता येत असले तरी त्याने तत्पूर्वी दिलेले काही संकेत ओळखून स्त्रीने अगोदरच तयारीला लागणे महत्वाचे असते. दोघांनीही रुची दाखविली, रस घेतला तर कामतृप्ती निश्चित असते. पुरुष नेहमीच तयार असतो पण स्त्रीने स्वतःला सेक्ससाठी तयार होण्यासाठी पुरुषाने दिलेले संकेत ओळखता येणे गरजेचे असते. स्त्रीची तयारी नसतांना होणारा संभोग स्त्रीसाठी क्लेशदायक ठरतो. म्हणून पुरुषाचे हेतू पटकन लक्षात घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करणे स्त्रीला आवश्यक असते. काय असतात संभोगोत्सुक पुरुषाची लक्षणे? –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)संभोगोत्सुक पुरुष लवकर घरी येतो किंवा स्त्रीला लवकर आवरण्याची घाई करतो. ‘मुलांना लवकर झोपव’ असेही सुचवतो. त्यावरून स्त्रीने जाणून घ्यावे की आज पुरुषाला ‘लव’करत झोपायचे आहे! काही पुरुष सफाचट शेव्हिंग करून आल्यावर आपल्या हनुवटीवरून बोटे फिरवून तो स्त्रीला काही सुचवू इच्छितात. ‘आज काय विचार आहे?’ याअर्थी पुरुष भिवया उडवतो व मादक असे हास्य त्याच्या डोळ्यांतून विलसते.
२)पुरुषाने कधीतरी गजरा किंवा फुले किंवा स्त्रीच्या आवडीची वस्तू आणली की समजावे हा मामुलीसा ‘नैवेद्य’ असून पुढे त्याला गाभाऱ्यात शिरून ‘दर्शन’ घ्यावयाची इच्छा निर्माण झाली आहे!
३)संभोगोत्सुक पुरुषाने पटकन काढता येतील असा पोशाख आवर्जून केलेला असतो. स्त्रीला आवडणारा स्प्रे किंवा डीओ मारलेला असतो. कधी कधी काही पुरुष स्त्री येण्याआधीच बेड आवरतात, बेडशीट बदलतात, रूमफ्रेशनर मारून सर्व तयारी करून ठेवतात.
४)संभोगोत्सुक पुरुष स्त्रीशी बोलतांना चावट गप्पा मुद्दाम मारतो. अश्लील विनोद किंवा सेक्सी जोक्स सांगू लागतो. पुरुष स्त्रीच्या जरा जास्तच नजीक जाण्याचा प्रयत्न करतो. तिला मिठीत घेत चुंबने घेऊ लागतो. स्त्रीचे स्तन कुरवाळू लागतो. ती पटकन उत्तेजित व्हावी असे स्पर्श करू लागतो.
५)पुरुषाला थेट संभोग हवा असल्याने कामोत्तेजित पुरुष लगेच जाणता येतो. त्याचे लिंग त्याच्या वस्त्रांवरूनही लक्षात येण्याजोगे स्फुरण पावत असते. पुरुषाचे शिस्न ताठर होणे हे त्याच्यात निर्माण झालेल्या संभोगोत्सुकतेचेच लक्षण असते.
वरील सर्व संकेत प्रत्येक पुरुष देईलच असे नाही. काही पुरुष थेट मागणी करतील किंवा थेट विषयाला हात घालतील. अशावेळी स्त्रीने पुरुषाला जरासे थोपवीत तिला आवडेल तसा प्रणय त्याच्याकडून रंगवून घ्यावा आणि ‘शयनेषु रंभा’ ही उक्ती सार्थ करावी!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

प्रणयोत्सुक स्त्री...

प्रणयोत्सुक स्त्री...

पुरुषाची कामोत्तेजना लगेच होत असल्याने तो नेहमीच ‘संभोगोत्सुक’ असतो. मात्र बऱ्याचवेळा असे घडते की स्त्री ‘प्रणयोत्सुक’ नसते. मागे सांगितल्याप्रमाणे स्त्रीला संभोगापेक्षा प्रणयात अधिक रुची असते. स्त्रीचा ‘कल’ पुरुषाला स्पष्ट होत नाही. स्त्री सेक्ससाठी ‘रेडी’ आहे की नाही, हेच कधीकधी पुरुषाला कळत नाही. काहीवेळा स्त्री सेक्ससाठी इंटरेस्ट दाखवीत नाही. अशावेळी पुरुषाने घाई करून केलेला सेक्स वेदनादायी ठरतो किंवा ती एक प्रकारची बळजबरीच असते! परंतु जेव्हा कधी स्त्रीला प्रणयाची ओढ लागते तेव्हा स्त्री तिच्याही नकळत काही अस्पष्ट हालचाली, काही अस्फुटसे संकेत पुरुषाला देत असते. ते अचूक ओळखणारा पुरुष आदर्श समजला जातो... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)सर्वच स्त्रिया सेक्ससाठी लगेच राजी होत नसतात. परंतु ज्यावेळी स्त्रीला प्रणय हवासा असतो तेव्हा त्यांच्या काही हालचाली पुरुषाला समजल्याच पाहिजेत. प्रणयोत्सुक स्त्री रोज करते त्यापेक्षा अधिक नीटनेटका शृंगार करते. हा महत्वाचा बदल पुरुषाने जोखलाच पाहिजे. तिने तिची केशभूषा बदललेली असते. मोजकेच पण लक्षणीय अशीच स्वर्ण आभूषणे-अलंकार तिने ल्यालेले असतात. स्त्री आकर्षक  व रोचक वस्त्रे परिधान करते. तिचा मेकअप देखील वाखाणण्याजोगा झालेला असतो. ती पुरुषाची आवडीने वाट पाहत असल्याचे जाणवते.
२)वरील बदल पुरुषाला काही कारणास्तव जाणता आला नाही तर स्त्री खट्टू होतेच पण काही क्षणात स्वतःला सावरून पुरुषाला नेत्रकटाक्षाने काही आव्हानात्मक संकेत देते. या कामुक नजरेसोबत स्त्री आकर्षक स्मितहास्य रेखाटत असते. नेहमीच्या नजरेपेक्षा ‘पौरुषा’ला आव्हान देणारी ही नजर फार कमी पुरुषांना ओळखता येते. या नजरेला नजर भिडवून प्रत्युत्तर देणारा पुरुषच ते आव्हान जाणू शकतो. नजर चोरणारे पुरुष पळपुटेच ठरतील यात शंका नाही!
३)नजरानजर झाल्यावर स्त्रीच्या गालांवर लालिमा चढल्याचे जाणवते. तिचे ओठ जरासे थरथरू लागतात. बोलतांना स्त्रीचे अधर जरासे अडखळतात. चेहऱ्यावर रक्तिमा जमा होऊ लागतो. स्त्रीला शहारून आल्याचे भास होतात आणि ते स्त्रीच्या रोमांचित होण्याने पुरुषाला जाणता येतात. स्त्रीच्या त्वचेवरील लव आणि केस स्पंदन पावू लागतात. यासाठी पुरुषाने सूक्ष्म दृष्टीचा चाणाक्षपणा दाखविला पाहिजे.
४)इतके करूनही पुरुष अचल राहिला, ढिम्म दिसला तर स्त्री आपल्या कामुक प्रणयरम्य हालचालींतून पुरुषाला संकेत देते. पायांवर पाय घेत पैंजणांचा मंजुळ नाद करते. पुरुषाचे लक्ष वेधण्यासाठी मोहक चालते. ओठांमध्ये किंवा दातांमध्ये करंगळी घेत मादक नजरेने पुरुषाकडे पाहू लागते. नजरानजर होताच स्त्री भृकुटी हलवून किंवा नेत्रांचे विभ्रम निर्माण करून ‘मला जवळ घे ना...’ असे पुरुषाला सुचविण्याचा प्रयत्न करते. पुरुषाच्या जवळ जाऊन त्याला नाजूक बोटांनी स्पर्श करणे हा स्त्रीचा पुढील संकेत असतो.
५)आणखी थेट संकेत देण्याच्या प्रयत्नात स्त्री आपले ‘पुष्टत्व’ पुरुषापुढे पेश करते. स्त्री आपले गोलाकार नितंब आणखी पुष्ट कसे दिसेल याचा प्रयत्न करू लागते. जोरात आणि खोल श्वास घेऊन छातीवरील उन्नत उरोजांचे दर्शन आणि स्पर्शन पुरुषाने करावे या हेतूने स्तनांना हलकेच आंदोलने देऊ लागते. दातांखाली ओठ घेऊन चावत मधाळ आणि कामसूपणे पुरुषाला नखशिखांत न्याहाळू लागते. तिचे हात तिच्याच उरोजांवरून आकर्षकरीतीने फिरू लागतात...
वरील सर्वच्या सर्व संकेत प्रत्येक स्त्री देईलच असे नाही. पहिलाच संकेत जर पुरुषाला कळला नाही तर स्त्री रागावून मनातल्या मनात म्हणते... ‘येडं कुठलं...!’
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

स्त्रीचे भौतिकसुख आणि शारीरिकसुख...

स्त्रीचे भौतिकसुख आणि शारीरिकसुख...


बंगला, गाडी, जमीनजुमला, नोकरचाकर... ही भौतिकसुखे स्त्रीला खुणावतात. सर्व अपेक्षा, आशाआकांक्षा, सूप्त हेतू फलद्रूप व्हावेत हे कोणत्याही स्त्रीला वाटत असतेच. सर्वच स्त्रियांना ही भौतिकसुखे प्राप्त होतात असे नाही. तर काही स्त्रियांपुढे अशी सुखे हात जोडून उभी असतात. त्या किती सुखी समाधानी असतील असा विचार सामान्य स्त्रीच्या मनात येणे साहजिक आहे. सामान्य स्त्रीला जिच्याकडे अशा सोयी-सुविधा-सुखासीनता नाही तिला श्रीमंत स्त्रीबाबत असूया वाटणे क्रमप्राप्त असते. तरीही गरीब स्त्रियांच्या चेहऱ्यावर तजेला, समाधान, सर्वकाही लाभल्याचे सुख विलसत असते, त्याउलट श्रीमंत स्त्रिया खिन्न, दुर्मुखलेल्या, कष्टी आणि काहीतरी उणीव राहिली असल्याने असमाधानी असल्याचे दिसते... असे का?  --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)कोणत्याही स्त्रीला भौतिक सुखाऐवजी शारीरिक सुख जर जास्त परिणामकारकतेने मिळाले तर ती अधिक सुखी, समाधानी दिसून येते. एक परीक्षण अहवाल असे सांगतो की श्रीमंत स्त्रियां जरी भौतिकसुखात लोळत असल्या तरी शरीरसुखाला वंचित असतात, काय असतील याची करणे? यांचा अभ्यास करतांना सेक्स तज्ञांना अनेक नवीन निष्कर्ष काढता आले.
२)काही स्त्रिया मूलतःच असमाधानी वृत्तीच्या असतात. त्यांच्यासाठी पुरुषाने कितीही कष्ट उपसले तरी त्यांची हाव, ईर्ष्या, गरजा, अजून काहीतरी मिळविण्याची भूक काहीकेल्या कमी होत नाही. अशा स्त्रियांची कपाटे असंख्य कपडेलक्ते, दागदागिने यांनी ओसंडून वाहत असतात तरी त्यांचे समाधान होत नसते. ‘अजून पाहिजे, अजून पाहिजे’ असा तगादा त्या पुरुषाकडे लावतात. त्यामुळे पुरुष झपाटून काम करीत राहतो. स्त्रीच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हट्टापायी त्याचे कामक्रीडेवरील लक्ष विचलित होत राहते, परिणामी त्यांना सतत कार्यमग्न असणाऱ्या पुरुषाकडून शरीरसुख लाभत नाही. अशी स्त्री ‘काम’अतृप्त राहून तिची असमाधानी वृत्ती वाढतच राहते.
३)याउलट गरीब स्त्रीच्या गरजा मात्र कमालीच्या कमी असतात. शिवाय ‘आहे त्यात’ सुख मानण्याची समाधानी वृत्ती तिच्यात असते. गरजाच कमी म्हटल्यावर त्या झोपडीतला पुरुष निश्चिंत असतो. खूप काबाडकष्ट करण्याच्या भानगडीत पडत नाही. माफक काम करून त्याला रोजीरोटी मिळेल इतका पैसा कमावता येत असतो. त्यामुळे साहजिकच रात्री घरी परततांना त्याच्या मनात स्त्रीला कामतृप्त करण्याचे नियोजन ठरलेले असते. त्याप्रमाणे कामक्रीडा करीत तो स्त्रीला कामोत्तेजित करून तृप्त करतो.
४)सर्व सुखसोयींनी युक्त असलेली स्त्री खूप सुखी, समाधानी असायला हवी पण तसे नसते. ज्या ठिकाणी सर्व सुखे हजर असतात, त्या घरातील पुरुषाला सुद्धा बरेच कष्ट, खूप कार्यक्षमता दाखवत पैसा कमवावा लागतो. खर्चाची बाजू वाढत जाते म्हणून अधिक कमाईची लालसा पुरुषाच्या मनात असते, परिणामी त्याचे सर्व लक्ष इनकम कसा वाढवावा या भोवतीच फिरत राहते.
५)अशा वेळी पुरुषाचे मन प्रणय, प्रेम, कामक्रीडा यांत रमत नाही आणि स्त्रीला अपेक्षित असणारा कामोद्दीपनाचा स्पर्श पुरुषाकडून होत नाही. केवळ यांत्रिकता त्या स्पर्शात असते. पटकन उरकण्याची क्रिया म्हणून तो संभोग करतो. त्यात रममाण होत नाही. त्याला स्त्री उत्तेजित करण्यापेक्षा आपली विर्यच्युती होऊन कामतृप्त होणे अधिक योग्य वाटू लागते. वेळेअभावी पुरुष स्त्रीला फक्त उपभोगतो, ज्यामुळे ती अतृप्त राहते, समाधानी दिसत नाही.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com