Thursday, 22 December 2016

गर्लफ्रेंड्सच्या सूचना...

गर्लफ्रेंड्सच्या सूचना...

अनेक पुरुषांना अनेक गर्लफ्रेंड्स असू शकतात. एकाचवेळी अनेक स्त्रियांना ‘खेळविण्यात’ काही पुरुष वाकबगार असतात. स्त्रियांना नेमके काय आवडते याचा अदमास घेत असे चतुर पुरुष स्त्रीला संमोहित करून आपला ‘कार्य’भाग साधून घेतांना दिसतात. अशा पोचलेल्या पुरुषाकडे गुणग्राहकता जास्त प्रमाणात असते. म्हणजे असे की एखाद्या स्त्रीने अडून अडून एखादी गोष्ट सुचविली की ही बाब त वरून तपेलं समजावं असं त्यांना समजून येतं आणि चाणाक्षपणे सदरहू सूचना ते तात्काळ अमलांत आणून तिला सुखद धक्का देतात.  –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)रूप-गंध-रस यांबाबत स्त्रिया कमालीच्या चोखंदळ असतात. पुरुषाचे नीटनेटके दिसणे स्त्रियांना भावते. भडक आणि बेंगरूळ पोशाख केलेले पुरुष स्त्री टाळू पाहते. आवडणाऱ्या पुरुषाला ‘तू अमुक तमुक शर्टमध्ये आणखी छान दिसशील...’ इतके सुचवलेले पुरुषाने तातडीने लक्षात ठेवून अगदी तस्साच शर्ट पुढीलवेळी घातला तर स्त्रीच्या आनंदाला पारावर उरणार नाही.
२)‘तू कोणतं आफ्टरशेव लोशन वापरतो रे?’ हा प्रश्न नसून वेगळं वापर असे सुचविण्याची सूचना असते. नाव सांगून शोभा करण्यापेक्षा तुला कोणता आवडेल असे विचारून खुबीने स्त्रीची आवड-निवड जाणून घेतले पाहिजे. बक्कळ आफ्टरशेव लोशन चोम्बाळून भेटायला जावू नये, मोजकेच लोशन वापरले तर त्याचा सुगंध हलका येत राहतो. स्त्रीला कीस करतांना हा आफ्टरशेव लोशनचा गंध अधिक परिणामकारकता दर्शवित असतो.
३)खोबरेल तेल चोपडून बसवलेले ‘चिपकू’ केस स्त्रीला अजिबात आवडत नाहीत. अशावेळी स्त्री सुचवते- ‘जस्मिन हेअर ऑईल लावत जा ना...’ यावरून पुरुषाला ताडता आले पाहिजे की स्त्रीच्या उरोजांवर ओठ टेकवताना आपले केस तिच्या नाकाशी येतात आणि तिला हवा तो प्रफुल्लीत गंध घेता येत नाही.
४)तसेच सेंट किंवा डीओ बाबतसुद्धा स्त्री काहीतरी सुचवत असते. ‘माझा भाऊ अमुकतमुक डीओ वापरतो, काय सेक्सी सुगंध असतो ना...’ असे स्त्रीने उच्चारताच तिने घेतलेले डीओचे नाव कानात साठवून घ्यावे आणि नेक्स्ट टाईम तोच डीओ मारून तिला अचंबित करावे लागते. स्त्रीची एकांतात आलेली कोणतीही सूचना पुरुषाने कधीच नजरेआड करायची नसते!
५)पुरुषाने जवळ येतांना कोणती पथ्ये पाळावीत, त्याचे वागणे, बोलणे, कृती कशी असावी याबाबत अनेक सूचना स्त्री न चुकता करत आलेली असते. पुरुषाने चतुरता सिध्द करीत त्या सूचना अमलांत आणल्यास प्रणय रंगविण्यात काहीच अडथळा येत नसतो. अनेक स्त्रियांकडून मिळणाऱ्या सूचनांचे स्वागत करीत त्यांचा युक्तीपूर्ण वापर प्रत्येक स्त्रीसोबतच्या संभोगादरम्यान करता आल्यास पुरुष नक्कीच यशस्वी ठरतो!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishava.blogspot.com  

Wednesday, 21 December 2016

स्त्रीची ‘काम’स्मृती...

स्त्रीची ‘काम’स्मृती...

आजकाल स्त्रीला अनेक पुरुष मित्र असतात. त्यातील काही पुरुष नको इतके ‘जवळ’ येऊन गेलेले असतात! असे पुरुष सेक्सच्या वेळी कसे वागले, त्यांनी कसा सेक्स केला हे मात्र स्त्रीला बिलकुल आठवत नसते. तिच्या कामस्मृती कमकुवत असतात. कारण स्त्रीला प्रत्यक्ष सेक्स ऐवजी प्रणय, प्रेम, कामक्रीडा यात रस असतो. आवडणाऱ्या त्या पुरुषाच्या प्रेमस्पर्शाने आपण कसे रोमांचित होत गेलो, त्याच्या सहवासात आपण कसे चुरचुर होत गेलो याचीच आठवण स्त्रीच्या स्मृतीपटलावर रुंजी घालतांना आढळते... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पूर्वायुष्यातील सेक्सविषयक घटना स्त्री विसरण्याचा प्रयत्न करते. त्या तिच्या आयुष्यातील दुर्घटनाच म्हणाव्यात असा तिचा एकंदर कल असतो. पुरुषाला ‘हवे’ ते मिळाले की तो स्त्रीची प्रतारणा करतो आणि ती पुन्हा एकाकी पडते. खरे तर तिला त्याच्याकडून सेक्सच्या बदल्यात शाश्वत आधार आणि प्रेम यांची अपेक्षा असते.
२)अपेक्षाभंगाचे ओझे बाळगून जगण्यात स्त्रीला स्वारस्य नसते. सद्य स्थितीला सामोरे जाण्यात स्त्री पुरुषापेक्षा नक्कीच खंबीर असते. त्यामुळे भूतपूर्व घटनेत रमण्याचा तिचा मानस उरत नाही, आलेल्या परिस्थितीला तोंड देत ती सद्य आयुष्यात असलेल्या पुरुषाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते.
३)प्रेमात पडलेली स्त्री मात्र शृंगाराच्या अनेक कला अंगीकारून पुरुषाला कायम मोहित ठेवण्याचा व त्याने आपल्याशीच एकनिष्ठ राहण्याचा हेतू उराशी बाळगून राहते. त्यासाठी तिचे हरतऱ्हेचे प्रयत्न चालू असतात.
४)संबंधित पुरुषाला भेटायला जातांना आपण कोणती साडी किंवा ड्रेस परिधान केला होता हे मात्र चांगलेच आठवत असते. त्यावेळी त्याने आपल्यावर कसा प्रेमाचा वर्षाव केला, कोणते गिफ्ट दिले, आपल्याला समजावून घेतांना आपले कसे सांत्वन केले... वगैरे सारख्या आधार देणाऱ्या पुरुषाच्या कृती तिला आठवू शकतील.
५)स्त्री नैसर्गिकरीत्या सेक्सबाबतच्या स्मृतीला बांधील नसते. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात अनेक पुरुष येऊन गेलेले असले तरी ती त्या पुरुषाबाबतच्या आठवणी जपण्याच्या मूड मध्ये नसते. तिला झाले गेले ते विसरून पुढे पुढे चालणे आवश्यक वाटते. ‘काम’स्मृतीचे स्मरणरंजन तिला सहसा आवडत नाही. पुरुषाने केलेला ‘सेक्सचा प्रकार’ स्मरणात ठेवण्याच्या भानगडीत स्त्री कधीच पडतच नाही!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

पुरुषाची ‘काम’स्मृती...

पुरुषाची ‘काम’स्मृती...

पुरुषाने कोणत्या स्त्रीशी, कधी, कुठे, कसा सेक्स केला याची आठवण त्याला नेहमी सतावत असते. फावल्यावेळी तो त्याच रासक्रीडेचा विचार करून स्वतःला धन्य आणि कृतकृत्य समजत असतो. अमुक तमुक स्त्री किंवा स्त्रिया मनसोक्त उपभोगता आल्या याची स्मृती येऊन तो स्वतःला लकी मानत असतो. अशा रोचक आठवणींना तो कवटाळून शेवटपर्यंत त्यांची उजळणी करण्याचा अट्टाहास बाळगून असतो.  –भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाला एखादी स्त्री आवडली की तो तिचा मागोवा घेत जातो. ती कुठे जाते, कुठून येते, काय करते, कुणाची नातेवाईक आहे, कुणाची बायको आहे... अशा असंख्य उत्तरांच्या शोधात तो तिचा पाठलाग करून तिच्याबाबत इत्यंभूत माहिती गोळा करू लागतो.
२)आवडणाऱ्या स्त्रीविषयीच्या प्रत्येक माहितीची नोंद त्याच्या मेंदूमध्ये अगदी फिट्ट रुतून बसते. याच नोंदी वेळोवेळी आठवत राहून त्याचा चतुरपणे वापर करण्यात पुरुष वाकबगार असतो. तिच्याशी बळेबळे बोलून तिला बोलते करतो. ती बधली तर ठीक, नाहीतर दुसरी शोधणे क्रमप्राप्त ठरते.
३)पटलेल्या स्त्रीची मनधरणी करत, तिला काय हवे नको ते पाहत, तिला प्रेझेंट देत, ट्रीट देत आपलेसे करून घेतो. आणि एकांतात मौका साधून लगट करण्याचा प्रयत्न करतो. ती आसुसलेली असेल तर नक्कीच त्याच्या प्रेमाच्या धगीने विरघळू लागते...
४)मग त्या पटलेल्या स्त्रीशी पुरुष यथेच्छ संग करतो. असे अनेक प्रसंग तो आपल्या स्मृतीत तेवत ठेवतो. ती स्त्री दिसली की त्याला तो ‘कामोत्सव’ प्रकर्षाने आठवू लागतो. त्या स्वप्नात तो गुंग होत जातो... अशा अनेक स्त्रिया जरी त्याने उपभोगल्या असल्या, प्रत्येकीशी जरी त्याने सारखाच संग केला असला तरी प्रत्येकीच्या वेळी आपण तिला कसे भावविभोर करून सोडले याची ‘काम’स्मृती मात्र वेगवेगळ्या पद्धतीने पुरुषाच्या कायमस्वरूपी स्मरणात नांदत असते!
५)पुरुषाच्या नैसर्गिक स्मरणातील जवळपास नव्वद टक्के भाग हा केवळ सेक्स या विषयाशी संबंधित असतो. त्यामुळे कोणत्याही स्त्रीशी केलेला फार पूर्वीचा सेक्सदेखील त्याला लख्ख आठवत राहतोच राहतो...
--भोगगुरू कामदेव.    kaamvishva.blogspot.com  

Tuesday, 13 December 2016

शिस्नाचे आकार प्रकार...

शिस्नाचे आकार प्रकार...

प्रौढ निरोगी पुरुषाचे शिस्न उत्तेजित अवस्थेत साधारणतः चार ते सहा सेमी जाड आणि चार ते सहा इंच लांब असते. या आकारमानात व्यक्तीनुरूप बदल असू शकतो. व्यवस्थित कामोत्तेजना लाभली असता शिस्न ताठर बनण्याचा व लांब-रुंद होण्याचा परिणाम कामोत्तेजक संवेदनानुसार कमीजास्त असू शकतो. त्यामुळेच किडकिडीत पुरुषाचे शिस्न उत्तेजना लाभली असता बलदंड पुरुषाच्या शिस्नापेक्षाही अधिक लांब-रुंद होऊ शकते!  --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)साधारणपणे शिस्न ताठर अवस्थेत शरीराशी लघुकोन करते, म्हणजेच ते ताठर स्थितीत वरील दिशेने वळलेले दिसते. जशीजशी कामोत्तेजना वाढेल तसेतसे हा कोन कमी होत जाऊन लिंग अधिकाधिक वरील बाजूकडे जाते. आपले पूर्वज जे मर्कट होते ते मादीला मागील बाजूने ‘जुगत’ असत. गर्भाशयाची शारीरिक ठेवण आणि आकार लक्षात घेतल्यास मागील बाजूने जुगतांना शुक्राणू थेट गर्भाशयमुखाशी पडावेत या हेतूनेच शिस्न उत्तेजित अवस्थेत वरील बाजुकडे झेपावू लागत असते!
२)काही पुरुषांचे लिंग वाकडे, एका बाजूला झुकलेले किंवा खाली वळलेले आढळते. या वक्रतेचा संबंधित पुरुष उगाच बाऊ करून घेऊन नाराज असतो. लिंगाचे असे वक्रीभूत असण्याने प्रत्यक्ष संभोगात किंवा यशस्वी गर्भधारणेत काहीही फरक पडत नसतो. ही वक्रता केवळ मानवप्राण्यातच आढळून येते! इतर प्राण्यांचे लिंग ताठर अवस्थेत अगदी सरळ आणि वरील बाजूला झुकणारेच असते. याचे मुख्य कारण म्हणजे मानवेतर प्राणी ‘फिट्ट अंडरवियर’ घालत नाहीत हेच आहे!
३)पोर्नक्लिप मध्ये दाखवितात तसे पुरुषाचे लिंग चक्क फुटभर लांबीचे तसेच भरपूर जाडीचे असते! असे प्रत्यक्षात होऊ शकते मात्र त्यासाठी शस्त्रक्रिया गरजेची आहे. ‘सिलिकॉन बॉल’ वापरून पोर्नस्टार स्त्रिया जसे आपले स्तन उन्नत करतात तसाच काहीसा हा प्रकार आहे! शिस्नाच्या मधोमध ‘सिलिकॉनचे रॉड’ टाकून त्याची लांबी वाढविता येणे शक्य आहे. यातील तोटा असा की हे ‘सिलिकॉन रॉडचे लिंग’ कायम ताठच राहते. संभोगाव्यतिरिक्त इतर वेळी ते ओटीपोटावर दुमडून बसवावे लागते!
४)आपले लिंग लांब असावे, सरळसोट असावे, मनगटाच्या जाडीचे असावे हा कल्पनाविलास फक्त पुरुषाचाच असतो. स्त्रीला पुरुषाच्या शिस्नाच्या लांबी-जाडीचे मुळातून आकर्षण नसतेच. स्त्रीने आपले शिस्न हाताळावे, त्याची प्रशंसा करावी असे स्वप्न पुरुषच पाहू शकतो. स्त्रीला मात्र पुरुषाच्या शिस्नाच्या लांबी जाडी पेक्षा त्याने संभोगापूर्वी केलेल्या प्रेमाची व प्रणयक्रीडेची खोली-उंची अधिक प्रिय वाटत असते!
५)शिस्नमण्यावरील लिंगचर्म प्रत्यक्ष संभोगादरम्यान मागे जाणे अपेक्षित असते, परंतु काही पुरुषांना हे त्रासदायक ठरू शकते. अशावेळी शस्त्रक्रिया करून ‘सुंथा’ करावा लागतो. असे ‘चर्महीन’ शिस्न आकर्षकच दिसते, कारण शिस्नमण्याला ‘गुप्त’ ठेवणारे चर्म तेथे नसते आणि उत्तेजित अवस्थेत शिस्नमणी टम्म फुगून ‘लाल-गुलाबी’ अशा चित्ताकर्षक रंगात बदलत असतो! काही जाती-धर्मांमध्ये आजही पुरुषाचे लिंगचर्म बालवयातच कापून टाकले जाते. त्यामुळे लिंगचर्म शिस्नमण्याला जिथे चिकटते तो बिंदू थोडासा बोथट होण्याची शक्यता असते. पुरुषाला कामोद्दीपित करणारा व विर्यच्युती घडवून आणणारा हा महत्वाचा बिंदू शस्त्रक्रियेनंतर किंवा सुंथा केल्यामुळे काहीसा ‘बधीर’ झाल्याने संभोगाचा कालावधी लांबविता येत असेल का? यावर संशोधन चालू आहे...
 --भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

अनुरूपता...

अनुरूपता...

किती मुली पहिल्या पण एकही पसंत पडत नाही किंवा कितीतरी मुले सांगून आली पण हिने नाकारली. या पसंत-नापसंतीच्या मागे काय हेतू दडलेला असतो? सुदृढ असलेली व्यक्ती सुद्धा ‘क्लिक होत नसल्याने’ नाकारणे म्हणजे काय असते? पाहताचक्षणी प्रेमात पडणाऱ्या व्यक्ती अनुरुपतेची कोणती दखल घेत असतील?
एखादी व्यक्ती आपल्याला अनुरूप आहे किंवा नाही ही कसोटी मानवप्राण्याकडून जास्तीत जास्त वेळा लावली जाते. निसर्गातील इतर चराचरांचा भावनिक-वैचारिक विकास मानवाइतका झालेला नसल्याने तसे घडणे शक्य आहे. मानवेतर प्राणी अनुरुपतेच्या शोधार्थ दारोदार भटकत नाहीत. त्यांना ‘हवे ते’ प्रकर्षाने जाणवत असले की लगेच नर-मादीशी ‘जुगु’ लागतो! –भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.in  
१)रंग-रूप ही अनुरुपतेची पहिली कसोटी मानता येईल. ज्या व्यक्तीशी ‘एकरूप’ व्हावेसे वाटते अशा व्यक्तीची छबी मनात आकार घेत असते. ‘त्या’ चौकटीत समोरील व्यक्ती रंग-रूपाने बसते आहे किंवा नाही याचा विचार केला जाऊन सदरहू व्यक्ती स्वीकारली वा अव्हेरली जाते. कैकदा रंगरूपतेच्या वेगवेगळ्या कसोट्या व्यक्तीपरत्वे भिन्नभिन्न असू शकतात.
२)व्यक्ती स्थिरावलेली आहे किंवा नाही ही कसोटी विशेषतः स्त्रियांकडून लावली जाते. स्त्रीचा नैसर्गिक कल शाश्वत आधार, अलोट प्रेम याकडे असल्याने ती नेहमीच ‘वेलसेटल्ड’ पुरुष निवडते. निसर्गातील माद्यासुद्धा उमद्या, धडधाकट, पराक्रमी अशा नरालाच सर्वस्व बहाल करतांना आढळून येतात. कोणतीही मादी मरतुकड्या, मनहूस, अकार्यक्षम नराच्या सावलीलासुद्धा उभी राहत नसते!
३)शेलाट्या अंगाची, नितळ त्वचेची, आकर्षक बांध्याची आणि क्लिक होणाऱ्या चेहऱ्याची कसोटी बहुदा पुरुषाकडून लावली जाते. मूलतः दर्शनाने प्रभावित होण्याचा व चटकन प्रेमात पडण्याचा स्थायीभाव पुरुषाने निसर्गातील नरांकडून उचललेला असतो. पुरुषाला केवळ ‘एकच’ गोष्ट स्त्रीकडून हवी असते. ‘ती’ क्लिक झाली की त्याला स्त्री पसंत पडते!
४)आजकाल लग्नापूर्वी स्त्री-पुरुषाला एकांतात बोलू देण्याची मुभा मिळते. प्रचलित भारतीय लग्नसंस्थेतील हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याचा प्रतिसाद काही मिनिटांच्या भेटीने उलगडू शकत नसतो. निसर्गनियमानुसार विशेषतः पुरुष नेहमीच स्त्रीवर प्रभाव टाकून तिचा स्वभाव जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो अशा क्षणिक भेटीत कमालीचा ‘गुळचट’ बोलण्याचा संभव वाढतो!
५)लिव्ह इन रिलेशनशिपचा पायंडा पडू पाहतो आहे तो निश्चितपणे अनुसरण्यासारखा आहे. या कसोटीनुसार स्त्री-पुरुष काही दिवस (आणि रात्रीही!) ठरवून एकत्र राहतात. अशावेळी एकमेकांची ‘बेडवरील’ अनुरूपता जोखली जात असते आणि ‘हीच कसोटी’ महत्वाची ठरते. नाहीतर छत्तीस गुण जुळलेली जोडपीसुद्धा छत्तीसच्या आकड्यासारखी फारकत घेऊन बेडवर निमूटपणे निजत लग्नाचे ‘जोखड’ ओढत राहिल्याची कैक उदाहरणे देता येतील!
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

सेक्स आणि सुगंध...

सेक्स आणि सुगंध...

मन पुलकित होण्याचे एक कारण अल्हादी सुगंध हे असते. अचानक प्रफुल्लीत करणारा गंध आल्यास आपण इकडेतिकडे शोध घेऊ लागतो. प्रत्येक व्यक्तीला आपले स्वत्व अधोरेखित करणारा शारीरिक गंध किंवा सुगंध निसर्गतःच लाभलेला असतो. मानवी घ्राणेन्द्रीय असा व्यक्तीकेंद्रित  गंध चटकन ओळखू शकत नसले तरी त्या गंधाचा परिणाम मात्र वर्तनावर घडलेला दिसून येतो. असाच एक अनामिक गंध असतो, कामेच्छा अधीर करणारा!  –भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.in
१)स्त्री-पुरुष नजीक आले की एकमेकांचे अतिसूक्ष्मसे शारीरिक गंध त्यांना त्यांच्याही नकळत उमजून येतात. ही व्यक्ती आपल्याला सुयोग्य आहे किंवा नाही याचा पडताळा मेंदूच्या लिम्बिक सिस्टीम नामक केंद्रात घेतला जातो. या गन्धामुळेच व्यक्ती एकमेकांवर अनुरक्त होतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
२)तारुण्यात शरीराच्या संप्रेरकांच्या प्रभावामुळे अशा यौवनगंधाची रेलचेल शरीरात झालेली असते. याच गुंत्यात एकमेकांना आकर्षित करणारा एक सूक्ष्म गंध लपलेला असतो. आवडणारी व्यक्ती जवळ आली असता हा गंध अधिक परिणामकारकरीत्या स्रवू लागतो. तो सुगंध नजीक आलेल्या व्यक्तीला बरोब्बर उमजतो!
३)काही स्त्री-पुरुषांना सेंट किंवा डीओ वापरण्याची सवय असते. अशा व्यक्ती त्यांना स्वतःला आवडणारा सेंट किंवा डीओ मारतात. तो नजीक असणाऱ्या व्यक्तीस आवडेलच असे नाही. परंतु होते असे की जवळ आलेली व्यक्ती जर सर्वथा आवडत असेल तर तो सुगंध त्या व्यक्तीची ओळख म्हणून स्मरणात साठविली जाते आणि तो गंध अचानक आला तरी आवडत्या व्यक्तीची आठवण येऊन मन अधीर होऊन जाते!
४)सेक्स अगोदर होणारी प्रणयक्रीडा एकमेकांच्या यौवनगंधाचा परिचय होण्यासाठी उपयुक्त ठरते. मान, गळा, पाठ, छाती, पोट, मांड्या येथील गंधाच्या तुलनेत काखा आणि गुह्यभागाचा गंध अधिक प्रकर्षाने जाणवतो. तेथील विशिष्ट घर्मग्रंथी कडून हा यौवनगंध आवडत्या व्यक्तीच्या सान्निध्यात जास्त प्रमाणात स्रवला जातो. सर्वांगचुंबने घेतांना हा यौवनगंध नकळत मनावर कोरला जातो. नंतर इतरवेळी देखील तशाच गंधाच्या संपर्कात आल्यावर व्यक्ती कामोत्तेजित होऊ शकते असे सिध्द झाले आहे!
५)काही व्यक्ती शरीराला येणारा दर्प लपविण्यासाठी डीओ किंवा सेंट वापरतात. ते चुकीचे मुळीच नाही. धुम्रपान, मद्यपान, गुटखा आदी व्यसने करणाऱ्या व्यक्तींना हे आवश्यक वाटणे साहजिक आहे. पण अशा तात्पुरत्या मलमपट्टीची गरजच नसते. कारण व्यक्तीचा मूळचा ‘यौवनगंध’ संम्भोगादरम्यान व्यक्त होतच असतो. त्यामुळे डीओ च्या कितीही जाहिराती करून प्रोडक्ट माथी मारण्याचा उद्योग भरभराटीस येत असला तरी स्वत्व जपणारा यौवनगंधच नेहमी योग्य ते ‘काम’ करतो हे लक्षात ठेवावे!
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

Friday, 9 December 2016

स्त्रीचे सहकार्य...

स्त्रीचे सहकार्य...

पुरुषाचे कामोत्तेजन जसे लवकर होते, तसेच तो स्त्रीच्या आधीच विर्यच्युती होऊन कामतृप्त होत असतो. स्त्रीचे सहकार्य लाभले तर अनेक अर्थांनी संभोग हा सम्यक भोग म्हणून घडवून आणता येतो. नाहीतर तो संभोग एकसुरी ठरण्याचा धोका असतो. कधी पुरुष उत्तेजित होऊन स्त्रीला पटकन रेडी होण्याची घाई करू लागतो तर कधी स्त्री अतृप्त राहिल्याने पुरुषाच्या झटकन विर्यच्युती होण्याच्या क्रीयेबाबत संभ्रम व्यक्त करते, प्रसंगी नाना शंका-कुशंका उपस्थित करते. पेरणी करायचीय पण मातीची मशागत नीट न झाल्याने पाउस पडूनही काही उपयोग होत नाही अगदी तसेच संभोगक्रियेबाबत घडते! हे टाळण्यासाठी स्त्रीचे संभोगासाठी यथोचित सहकार्य पुरुषाला अपेक्षित असते.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाची कामोत्तेजक संवेदना स्त्रीपेक्षा सहापट अधिक वेगवान असल्याने शरीरसुखाच्या केवळ कल्पनेनेच तो उत्तेजित झालेला असतो. पुरुषाच्या मनातील जलद घडामोडींमुळे त्याचे लिंग तात्काळ ताठर बनते आणि तो स्त्रीकडे थेट संभोगाची मागणी करतो. याउलट स्त्री संथ गतीने संभोगाला तयार होणारी असल्याने दोघांचा हिरमोड होऊ शकतो. कैकवेळा पुरुषाला सांगून जमत नाही, त्याला संभोगापूर्वीची कामक्रीडा, प्रणयक्रीडा शिकवावी लागते!
२)वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला यशस्वी कामक्रीडा तडीस नेण्यात पुरुष असमर्थ ठरतो. तो नेहमी प्रत्यक्ष संभोगास आतुर असतो. यावेळी स्त्रीने त्याची मानसिकता लक्षात घेऊन स्वतःलाच ‘रेडीपझेशन’मध्ये ठेवणे गरजेचे ठरते. ते स्त्रीने समरसून केले तर दोघांनाही मिलनाचा परमानंद लाभेल.
३)उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, हे पुरुषाच्या बाबतीत तंतोतंत जुळते. त्याची कामवृत्ती तत्पर, तातडीने, जलदतेने कार्यप्रवण होणारी असल्याने तो तात्काळ वीर्यस्राव करून मोकळा होण्याच्या वाटेने जातो. हे अनेक पुरुषांच्या बाबत घडत असते. यालाच ‘शीघ्रपतन’ म्हणतात. ही शीघ्रता टाळण्यासाठी सर्वस्वी स्त्रीचे सहकार्य गरजेचे ठरते. उधळणाऱ्या मत्त घोड्याला लगाम घालण्याचे मुख्य कार्य स्त्रीकडेच येते!
४)स्त्रीने पुरुषाला प्रणय कसा करावा, तिला पुरुषाने कसे, कोठे आणि कितपत (कामोद्दीपित करणारे) स्पर्श करावेत हे शिकवितांना पुरुष अतिरिक्त उत्तेजित होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. स्त्रीने पुरुषाकडून स्वतःला आधी व्यवस्थित उत्तेजित करून घ्यावे आणि नंतरच पुरुषाला तयार करणे अपेक्षित आहे. म्हणजे उतू जाणारे दूध ज्योत कमी करून थोपविता येते, तसा हा प्रकार स्त्रीला आमलांत आणता येतो!
५)स्त्री नेहमीच कामातूर असत नाही. तिला अनेक प्रापंचिक जबाबदाऱ्यांची कसरत पार पाडावयाची असल्याने स्त्रीच्या मनात संभोगाची क्रिया केवळ दहाच टक्के उरलेली असते. त्यामुळे शयनगृहात शिरतांना तिला सर्व विचारांची जंत्री दाराबाहेर सोडूनच आत शिरावे लागते. उत्तेजित पुरुषाला व्यवस्थित हाताळून स्वतःही कामक्रीडेत रममाण होत पुरुषाच्या नैसर्गिक कामवृत्तीला सहकार्य केले तर संभोगक्रियेचा ‘सम्यक भोग’ होण्यास वेळ लागणार नाही...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com