Friday 5 February 2016

सेक्स आणि वय...

सेक्स आणि वय...

रोपट्याचे झुडूप होते, त्याचे खोड रुंदावते, फांद्या डेरेदार होऊन त्याचे तरुण वृक्षात रुपांतर होते, यथोचित कालावधीत ते झाड कमालीचे बहरते, डौलदारपणे पाने फुले उमलून त्याचे अंगोपांग पुलकित होऊन जाते, भ्रमरांचे पिंगा घालणे, फुलपाखरांचे फुलांवर येणेजाणे, मधमाशांचे गुंजारव यांचा मनसोक्त अनुभव घेत फुलाचे फलन होऊन बीजधारणा होते, झाड फळाला येते, नंतर हळूहळू पानगळ सुरु होऊन खोडाचे वठणे अनिवार्य ठरते... अशाच प्रकारे मनुष्यप्राण्याच्या ‘सेक्सलाइफ’चा कार्यकाल मांडता येतो. वय जसजसे वाढत जाते तसतसे सेक्सची ओढ किंवा जोम कमी होत जाणे साहजिक आहे आणि ते स्त्री-पुरुष दोघांनीही मान्य करणे गरजेचे ठरते, अन्यथा उतारवयात स्त्रीने ‘तुमच्यात आता दमच नाही’ असे पुरुषाला हिणवून त्याची प्रतारणा करणे कामशास्त्रीयदृष्ट्या उचित ठरत नाही. जराशी समजूतदारी बाळगली तर वयाच्या नव्वदीतदेखील सेक्सचा पुरेपूर आनंद लुटणारी जोडपी पहावयास मिळतात! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)—वयाच्या विसाव्या वर्षी घडून येणारा सेक्स हा नेहमीच धसमुसळा ठरतो! उन्माद, जोश, जोम, उत्साह, आतुरता, अधीरता, कधीही, केव्हाही, कुठेही सेक्स करण्यास सज्ज होणारे शारीर अशा अनेक कंगोऱ्यांनी या वयातील सेक्स विशेष स्मरणीय ठरत असतो. स्त्री आणि पुरुष दोघेही या वयात सेक्सचा मनमुराद आनंद घेऊन तृप्तीची ढेकर येऊनही पुन्हा सेक्ससाठी उत्सुक असलेले पहावयास मिळतात.
२)—वयाच्या तिशीत नाही म्हटले तरी लग्न होऊन जबाबदाऱ्यांचे ओझे वागवीत सेक्ससाठी तयार राहायचे असते. अनेक प्रापंचिक विवंचना सतावत असतांना सेक्ससाठी सज्ज असावे लागते. सेक्स म्हणजे पुरुषाची या वयातील तारेवरची कसोटीच ठरते. कारण या वयात स्त्रीची कामेच्छा कमालीच वाढलेली आढळून येते. कामतृप्ती म्हणजे काय हे तिला नक्कीच उमजलेले असते. त्यामानाने पुरुषाचा जोम जरासा उतरणीला लागलेला असतो. शिवाय व्यवसायात स्थिरस्थावर होणे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अशी अनेक मोठी यादी त्याला बेचैन करून सोडत असते. अशा वयात स्त्रीला व्यवस्थित कामतृप्त करण्याचे तंत्र जर पुरुषाला अवगत नसेल तर स्त्री बाहेरख्याली होण्याचा धोका उद्भवतो.
३)—चाळीशीत जबाबदाऱ्या आणखी वाढलेल्या असतात. सेक्समधील पूर्वीचा जोम जोश उत्साह आतुरता अधीरता कमी होत चाललेली असते. स्त्री आणि पुरुष दोघेही धावपळ करून थकून गेलेले असतांना सेक्स करावा की नको अशा संभ्रमात बेडवर पहुडतात आणि मानसिक थकवा आलेला असल्याने तत्काळ निद्राधीन होतात. सकाळी उठून स्त्री किंवा पुरुष अचानक चिडचिड करू लागतो. त्यामागे अतृप्त कामेच्छा हेच कारण असते. ठरवून एखाद्या रात्री सेक्स करावा लागतो. पण नियोजन केलेला सेक्स म्हणजे यांत्रिक क्रिया ठरण्याचा संभव असतो. यावर उपाय म्हणून महिन्यातून एकदातरी तीन दिवसांची हनिमून ट्रीप आयोजित करणे क्रमप्राप्त ठरते.
४)—वयाच्या पन्नाशीत मात्र बऱ्याच व्यापातून सवड मिळू लागते. मुले स्थिरस्थावर झालेली असतात. त्यामुळे ती विवंचना सतावत नसते. स्त्री-पुरुष बरेच मोकळे झालेले असल्याने पुन्हा एकदा यौवनात येऊन सेक्सचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. मात्र यावेळी कामतृप्तीचा अट्टहास असू नये. पुरुषाची सेक्सपॉवर उतरणीला लागलेली असते तर स्त्रीच्या शरीरात रजोनिवृत्तीची ओहोटी दिसू लागलेली असते. त्यामुळे पूर्वीचा विशीतला जोम जोश सेक्समध्ये अजिबातच नसतो. एकमेकांना स्पर्शानेच उत्तेजित करावे लागते. लिंग अपोआप ताठरणे कधीच शक्य होत नाही, ते हाताळले तरच कामोद्दीपित होऊन कडक होऊ लागते आणि पूर्वीइतका ताठरपणाही जाणवत नसतो. तसेच स्त्रीची योनिसुद्धा पूर्वीप्रमाणे ओलावत नसते, योनीत बरीच शिथिलता आलेली असल्याने लिंगावर घट्ट पकड बसत नाही.शिस्नावर योनीचा पुरेसा दाब पडत नाही. परिणामी लिंगाचे स्फुरण पावणे कमी प्रमाणात घडते. या सर्व नकारात्मक निसर्गक्रिया लक्षात घेऊनच सेक्स केला जावा. या वयात योग्य ती स्वच्छता पळून स्त्री-पुरुषांनी एकमेकांचे हस्तमैथून-मुखमैथून करून कामतृप्ती करवून घेण्यात काहीएक गैर ठरत नाही.
५)—साठीनंतर मात्र सर्वच गात्रे शिथिल होत जातात. बीपी, डायबेटीस, संधिवात किंवा तत्सम उतारवयातले आजार जडलेले असतात, त्यावरील गोळ्या न चुकता खाव्या लागत असतात, त्यातील काही औषधांचा साईडइफेक्ट म्हणून लिंग ताठ होणे किंवा योनीत कामसलील स्रवणे शक्य होत नाही आणि त्यावेळी सेक्स ही केवळ ‘स्वप्नकल्पनाच’ बनून राहते. पुरुषाचे लिंग बराचवेळ हाताळत ठेउनच ताठ करता येते. स्त्रीला देखील कामोद्दीपित करणे अवघड ठरते. कारण स्त्रीचे स्तन पुरेशा संवेदना कामकेंद्रापर्यंत पोहचवू शकत नाहीत. परंतु या वयात देखील एकमेकांचे हस्तमैथून-मुखमैथून करून कामतृप्ती अनुभवता येते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com