Tuesday 29 November 2016

अश्लीलता पाहणे योग्य की अयोग्य?

अश्लीलता पाहणे योग्य की अयोग्य?


‘श्लील किंवा अश्लील हा वस्तूचा गुण नसून माणसाच्या मेंदूचा गुण आहे!’ –प्रा. र. धों. कर्वे.
‘मानवाचे अन्नविषयक ज्ञान जर त्याला असलेल्या कामविषयक ज्ञानाइतकेच त्रोटक असले असते तर तो चटकन उपाशीच मेला असता!’ –डॉ. डेव्हिड रुबीन.
‘संपूर्णतया श्लीलता असलेले जगातील एकमेव पुस्तक म्हणजे टेलिफोन डिरेक्टरी!’ बर्नोड शॉ.
वरील नामवंताची वक्तव्ये विचारात घेऊन अश्लीलता या संज्ञेअंतर्गत येणारे घटक म्हणजेच- नग्नता दर्शविणारी स्त्री-पुरुषांची चित्रे, नग्नता शब्दांकित करणारी पुस्तके व साहित्य, नग्नतेचा वापर करून संभोगाची रेलचेल असणाऱ्या चित्रफिती हे पाहणे-वाचणे योग्य आहे की अयोग्य? याचा उहापोह केला जावा... --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)अश्लीलता पाहिली असता व्यक्ती कामोद्दीपित होते, तिचा कामविषयक ‘कोंडमारा’ कमी होतो, तिचे कामविषयक भावनांच्या उद्दिपनाने मनोरंजन होते. ताणतणाव निवळतात असे अनेक तज्ञांचे मत आहे. पोर्नोग्राफी पाहिल्याने लैंगिक गुन्हे घडतात याला काहीही शास्त्रीय आधार नाही असेही सिद्ध झालेले आहे!
२)पोर्नोग्राफी पाहिल्याने किंवा कामुक पुस्तके, कादंबऱ्या वाचल्याने व्यक्ती पुढील चोवीस तास कामोद्दीपित राहू शकते. ज्या व्यक्तींना चटकन कामोद्दीपित होता येत नाही अशा व्यक्तींसाठी अश्लीलता पाहणे हा उपचार सेक्स थेरपिस्टकडून आमलात आणता येतो.
३)संभोगक्रियेत तोचतोचपणा येत राहिल्याने सेक्स कंटाळवाणा ठरू शकतो, अशा दाम्पत्यांसाठी पोर्नोग्राफी पाहून नवनवीन संभोगासनांचा वापर करीत कामक्रीडेतील नाविन्य टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. वयोमानानुसार येणारा अनुत्साह पोर्नोग्राफी पाहिल्यास दूर होऊन पुन्हा नव्या जोमाने कामोद्दीपित होता येते.
४)अश्लीलता पाहण्याचे वरील महत्वाचे फायदे जरी असले तरी काही तोटे मात्र संभवतात. विशेषतः पोर्नोग्राफीचा अधिक विपरीत परिणाम दिसून येतो. कारण पोर्नोग्राफीत चित्रित केलेला संभोग हा तासनतास चालणारा, अतर्क्य अशी संभोगासने ठसवणारा, स्त्रीवर नेहमीच वरचढ ठरेल किंवा स्त्रीला संभोगात दुय्यम स्थान देऊन अत्याचारासारखे कृत्य अधोरेखित करणारा असाच असतो. प्रेम, प्रणय, कामक्रीडा या स्त्रीच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणाऱ्या कृतींना फाटा देऊन भलतेच कामसंस्कार करणाऱ्या अशा या पोर्नफिल्म्स असतात.
५)अजाणत्या वयात किंवा उत्सुकता म्हणून पाहिल्या, वाचल्या जाणाऱ्या अश्लील साहित्यात किंवा चित्रफितीत दर्शविलेले कामशास्त्रीय ज्ञान म्हणजे ‘पाण्यात वाळूचा कण शोधण्याइतके’ तुटपुंजे असते की त्याचा विपरीत असर युवक-युवतींवर होऊन ‘आपण जे पाहतो आहोत तेच कामजीवन’ असा त्यांचा गैरसमज होण्याचा संभव अधिक असतो. कामजीवन हा अतिशय विस्तृत असणारा, जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा आणि प्रत्येकाने अनुसरण्यासारखा आवश्यक विषय असला तरी या ‘विषया’त आजची युवापिढी पारंगत होऊ इच्छित नाही ही कामशास्त्रीयदृष्ट्या नाचक्कीची बाब आहे!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

बालपणातील कामभावना...

बालपणातील कामभावना...

निसर्गातील पशुपक्ष्यांप्रमाणे मनुष्य प्राण्याला जरी उपजत कामज्ञान असले तरी ते त्रोटक ठरते. कारण पशु-पक्ष्यांचे मैथून उघड्यावर, त्यांच्या आईबापांसमोर, भावंडासह होत असल्याने त्यांना त्यातील ज्ञान घेण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही. निसर्गाला अपेक्षित असलेली वंशवृद्धीची सहजप्रवृत्ती प्राण्यांमध्ये मुबलकतेने विकसित होतांना दिसते. त्याउलट ‘नग्नता म्हणजे वाईट कृत्य’, ‘संभोग म्हणजे अंधारात करावयाची कृती’, ‘त्याबद्दल चारचौघांत चर्चा करणे म्हणजे पाप किंवा अश्लीलता’ असे चुकीचे संस्कार लहानपणापासून मुला-मुलींवर होत राहिल्याने ‘काम’शास्त्रीय ज्ञान त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळू शकत नाही व ते कामजीवनात अतृप्त राहतात.
म्हणून बालपणातील मुला-मुलींच्या कामभावना वेळीच ओळखून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर देऊन त्यांना ‘काम’साक्षर करणे हे अत्यंत महत्वाचे असते.  –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)बालपण हे अनुकरणप्रिय वय असते. मुले-मुली जे पाहतात, ऐकतात तसे करण्याचा, वागण्याचा प्रयत्न करतात. उदा. खोटे खोटे भातुकलीचे खेळ खेळतांना मुली आई तर मुले बाबा बनतात, एकत्र निजतात! किंवा एखादा मुलगा डॉक्टर बनून मुलीच्या नितंबावर काडीने इंजेक्शन टोचतो!
२)कधीकधी मुला-मुलींची उत्सुकता चाळवल्यामुळे ते एकमेकांचे गुह्येंद्रिय पाहण्याची कृती करतात. काही मुले मुलींना मागील बाजूने पकडून श्वानासन संभोगकृती करू पाहतात! या कृती म्हणजे क्षणिक कामभावनांचा कल्लोळ असून त्या क्रिया ‘विकृती’ मुळीच नसतात! यावरील पालकांच्या बालकांना मारहाण करून कामविषयक प्रश्न अनुत्तरीत ठेवण्याच्या कृती मात्र विकृती गणल्या जाऊ शकतात!
३)काही मुले-मुली अश्लील साहित्य वाचून त्यातून नवीन काही कळतेय का, कामविषयक ज्ञान मिळतेय का? अशी चाचपणी करून आपली उत्सुकता तडीस नेतात. काहीवेळा पोर्नोग्राफी पाहून नको ते अवास्तव संस्कार मनावर करून घेतात! हे वेळीच ओळखून त्यांचे कामविषयी असलेले शंकानिरसन करणे पालकांचे आद्य कर्तव्य असते.
४)लहानग्यांच्या हरेक कामविषयक प्रश्नाला पालकांनी शास्त्रीयदृष्ट्या योग्य असेल असे उत्तर त्यांना समजेल अशाच शब्दांत द्यावे लागते. असे जर झाले नाही, त्यांचा बालबोध प्रश्न धुडकावून लावला तर ते कामशास्त्राबाबत उदासीन बनतात किंवा असे काही करणे म्हणजे गुन्हा आहे, चूक आहे, नग्नता म्हणजे अपराध आहे... अशा अनेक समजुती बालकांच्या मनात रुतून बसल्याने ज्यावेळी प्रत्यक्ष ‘काम’ करण्याचे प्रसंग येतात त्यावेळी त्यांची मानसिकता बावचळून गेलेली आढळून येते!
५)कोंबडा कितीही झाकला तरी पहाट होण्याचे थांबत नाही त्याप्रमाणे बालकांच्या मनातील कामविषयक उत्सुकता कितीही दाबून ठेवली तरी उसळी घेतेच. अशावेळी योग्य मार्गदर्शन लाभले नाही तर मुले-मुली इतर चोरीच्या मार्गाने कामविषयक ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करतात. भावना उद्दीपित करणारी पिवळी पुस्तके, पोर्नफिल्म्स, इंटर्नेटवर उपलब्ध असलेली अशास्त्रीय माहिती घेण्याचे प्रयत्न होतात. भावी ‘काम’जीवनात असे अशास्त्रीय ज्ञान तकलादू ठरते किंवा अवास्तव अपेक्षा राखणारे ठरू शकते, ज्याचा दुष्परिणाम म्हणून अनेकांना कामजीवनात दुःखाचा सामना करत जगावे लागते.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

Wednesday 23 November 2016

लैंगिक शिक्षणाचे महत्व...

लैंगिक शिक्षणाचे महत्व...


एका सर्वेक्षणांती असे सिध्द झाले आहे की दहा टक्के स्त्री-पुरुषांमध्ये लैंगिक शिक्षणाचा संपूर्ण अभाव असतो. दहा टक्के स्त्रियांना आयुष्यात कधीच कामतृप्ती लाभलेली नसते. दहा टक्के जोडप्यांना अखेरपर्यंत संभोग जमत नाही!
असे का घडते? सर्वच स्त्री-पुरुषांना कामशास्त्रीय ज्ञान का मिळत नाही? जीवनात लैंगिक शिक्षण अनिवार्य असतांना ते का दिले जात नाही? काय आहे लैंगिक शिक्षणाचे महत्व?  --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या या लैंगिक शिक्षणाच्या अभावातून निर्माण झालेल्या आहेत. उदा. कुमारी मातृत्व, लैंगिक अत्याचार, वासनाकांड, वेश्याव्यवसाय, गुप्तरोगांचा सुळसुळाट, भोंदू लिंगवैदू, घटस्फोट... अशा समस्या योग्य लैंगिक शिक्षण दिल्यास नक्कीच कमी होतील.
२)वयात येणाऱ्या मुला-मुलींना अनेक लैंगिक प्रश्न पडत असतात. परंतु पालकांच्या धाकाने ते विचारीत नाहीत किंवा पालक त्यांच्या प्रशांना उत्तरे देण्यास असमर्थ असतात वा थेट टाळतात. असे प्रश्न अधांतरीत राहिल्याने मुला-मुलींमध्ये लैंगिक आगळीक घडण्याचा धोका असतो.
३)लैंगिक विज्ञानाचे पाठ्यपुस्तक अजूनही उपलब्ध नाही. मुळात हा विषय चार-चौघांत चर्चीण्यायोग्य नाही, अश्लील आहे, घृणास्पद आहे... म्हणत टाळला जातो. पाठ्यपुस्तक निर्माण करावे या हेतूने १६० विद्यापीठांतील प्राध्यापकांना कामविषयक प्रश्नपत्रिका पाठवून उत्तरे मागविण्यात आली. धक्कादायक निष्कर्ष असा निघाला की, ‘सुशिक्षित प्राध्यापकांनाही काम विषयाचे विस्तृत ज्ञान नाहीये!’
४)कामशास्त्रीय ज्ञानाला भीती, लज्जा, संकोच यांनी ग्रासलेले आहे, ते प्रावरण दूर करून अंधारातील हे ज्ञान उजेडात आणणे महत्वाचे आहे. पालकांनीच स्वतः लैगिक साक्षर होऊन आपल्या पाल्यांना यथोचित लांगिक ज्ञान क्रमक्रमाने दिले पाहिजे. मुला-मुलींना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेच पाहिजे. तरच लैंगिक दुराचार फोफावणार नाहीत, कामसमस्या उद्भवणार नाहीत.
५)आपल्या भारतातील अनेक प्राचीन मंदिरांच्या शिखरांवर, भिंतींवर पाषाण शिल्पे आहेत की ज्यातून लैंगिक शिक्षण दिले गेले आहे. त्याकाळी जर खुलेआम असे चित्रण पाहिले जात असेल तर आजच्या काळात त्याला गहनतेचे वेष्टन घालून, अश्लीलतेचा शिक्का मारून किंवा त्याबद्दल मौन बाळगून अज्ञानात राहणे कितपत योग्य आहे?
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

संभोगाचे इष्ट परिणाम...

संभोगाचे इष्ट परिणाम...


काही व्यक्ती संभोग करणे म्हणजे काहीतरी अश्लील करणे, पाप करणे, काही तरी द्ष्कृत्य करणे असे मानतात व संभोग शक्यतो टाळतात! काही व्यक्ती मात्र नियमितपणे संभोग करतात, त्यातील मौज लुटतात, जोडीदाराला तृप्त करतात! अशा दोन टोकांची व्यक्तिमत्वे आढळून येतील. परंतु कामशास्त्रीयदृष्ट्या संभोग करणे स्त्री आणि पुरुष दोहोंसाठी खूपच अनिवार्य, जास्तीत जास्त फायदेशीर आणि एकमेकांवरील प्रेम दृढ करण्याचा उत्तम मार्ग असतो. म्हणून प्रत्येकाने नियमित, आवर्जून, तृप्त करणारा संभोग हा केलाच पाहिजे... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)संभोग करणे (हस्तमैथून नव्हे!) म्हणजे एकाचवेळी अनेक स्नायूंनी भरगच्च व्यायाम करणे होय! जघनभागाचे स्नायू, कमरेचे स्नायू, पोटांचे स्नायू, हातांचे पायांचे स्नायू... असे अनेकविध स्नायू या क्रियेत सहभाग नोंदवितात. आदर्श व्यायाम म्हणून संभोगाकडे पाहिले जावे.
२)संभोग करतांना हृद्य गती किंवा नाडीचे ठोके जवळपास दुप्पट होतात, म्हणजे किती छान व्यायाम होत असतो पहा! हृदयाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळून ते अधिक कार्यक्षमतेने काम करू लागतात. नियमित संभोग करणाऱ्या व्यक्तींना त्यामुळेच हृद्यविकार संभवत नसतो!
३)संभोगातील अंतिम स्थितीत स्त्री-पुरुष एकमेकांना इतके घट्ट बिलगलेले असतात की अशी मिठी, असे प्रेम, अशी एकरूपता इतर कोणत्याही क्रियेत संभवत नाही. म्हणूनच एकमेकांवरील दृढ प्रेमाची पोचपावती म्हणजेच संभोग असतो!
४)दिवसभर कडाकडा भांडणारी जोडपी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हसतमुखाने एकेमकांना टाळी देतात, याचे न उलगडणारे कोडे म्हणजे रात्रीचा यशस्वी झालेला आणि कामतृप्तता लाभलेला संभोगच असतो. याचमुळे संभोग हा दाम्पत्यांमधील अतूट बंधनाचे कारण असते!
५)संभोगानंतर येणारी सुखावह ग्लानी, गाढ निद्रा आणि कृतकृत्य झाल्याची भावना इतर कोणत्याही व्यायाम प्रकाराने लाभत नाही हेच इथे अधोरेखित होते. म्हणून नियमित संभोग करणे प्रत्येक व्यक्तीस अनिवार्य आहे. ‘केल्याने होत आहे रे... आधी केलेचि पाहिजे!’ ही उक्ती काही चुकीची नाहीच!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

Tuesday 22 November 2016

स्त्री वशीकरण तंत्र आणि मंत्र...

स्त्री वशीकरण तंत्र आणि मंत्र...


पुरुषाला नित्य नव्याची आवड असल्याने प्रत्येक स्त्रीला निरखून पाहण्याचा, तिच्या शरीराकडे अंमळ नजरेने न्याहाळण्याचा, तिचे पुष्टत्व जाणून घेण्याचा त्याला ‘पौरुषी छंद’ असतो. प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्रीकडे काही क्षण का होईना टक लावून पाहतो, त्यात वावगे असे काहीच नसते. स्त्री देहाची त्याची लालसा पूर्वापार चालत आलेली असल्याने तो स्त्रीला नखशिखांत पाहणार हे नक्कीच!
परंतु प्रत्येक स्त्री सेक्सला तयार होईलच असे नाही. मग पुरुष स्त्रीला वश करण्याचे वशीकरण तंत्र-मंत्र यांच्या शोधात फिरू लागतो... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)स्त्री जन्मजात खूपच चोखंदळ असते. तिचा नैसर्गिक स्वभाव दिसेल त्याच्यावर भाळण्याचा मुळीच नसतो. पुरुष दिसायला धष्टपुष्ट, राजबिंडा, बॉडी बिल्डर असला तरी तो वागतो कसा? त्याचे चलन वलन कसे आहे? त्याचे आचार विचार कसे आहेत? यावर ती त्याला होकार द्यायचा की नाही हे ठरवते. पुरुषाने कितीही नाट्यमय गोड संभाषण करून स्त्रीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी ती केवळ एकाच नजरेने पुरुषाचे सर्व हेतू पारखू शकते!
२)काही पुरुषांना स्त्रीच्या अंगचटीला जाऊन नकोसे स्पर्श करण्यात मानसिक आनंद मिळतो. असे चोरटे, बीभत्स किंवा चहाटळ स्पर्श ओळखण्याची कला स्त्रीला जन्मजात मिळालेली असते. अशी चाणाक्ष स्त्री सहजासहजी सेक्सला राजी होत नाही. आधी तिला मनाने जिंकावे लागते मगच ती तनाने तयार होते!
३)स्त्रीला प्रथमदर्शनी पुरुष आवडू शकतो, पण त्याच्या डोळ्यांत आत्मविश्वास हवा, तिला शाश्वत आधार मिळवून देण्याचा रंग दिसावा, स्त्रीला आदरयुक्त वाग्विण्याचे आश्वासन दिसावे. पुरुषाच्या क्षुल्लक हालचालींतून\देखील त्याच्या मूळ हेतू प्रकट होत असतो, तो हेतू जाणण्याचे कसब स्त्रीकडे असते. त्यामुळे पुरुषाने अगोदर स्त्रीचा विश्वास संपादन करणे गरजेचे ठरते. ‘मी अमुक मी तमुक, मी असा मी तसा...’ अशी स्वतःची टिमकी वाजविण्याऐवजी ‘मी तुझ्यासाठी काय काय उत्तम करू शकतो?’ हे पटवून देणे महत्वाचे असते.
४)स्त्री पुरुषाच्या गुळचट बोलण्याला मुळीच भाळत नाही. त्याच्या बोलण्यांतून आपल्या विषयी किती आत्मीयता आहे? किती जिव्हाळा दडलेला आहे? किंवा किती प्रेम लपलेले आहे? हे स्त्रीला पुरुषाच्या प्रत्येक शब्दांच्या ‘फक्त उच्चारावरून’ ताडता येत असते. त्यामुळे प्रेमाचा नुसता दिखावा करणारे पुरुष क्षणार्धात उघडे पडतात!
५)स्त्रीला वश करण्यासाठी वरील मुद्दे पुरुषाने आवर्जून घोकावेत. राहता राहिली सेक्सची गोष्ट. एकदा का स्त्रीने पुरुषाला निरखून पारखून आपलेसे केले की ती त्याला आपले सर्वस्व बहाल करते. पण इथेही पुरुषाने चतुराई दाखवून स्त्रीच्या आवडीनिवडीचा विचार करून ठेवावा लागतो. थेट सेक्स करणे चुकीचे ठरते. पुरुष डायरेक्ट संभोग करू लागला तर ‘केवळ याच साठी ह्याने मला स्वप्ने दाखविली...’ अशी तिची पक्की धारणा होऊन ती पुरुषाला प्रतिकार करू लागते. म्हणून मागे सांगितल्याप्रमाणे आधी प्रेमळ वार्तालाप, मग प्रणय रंगवणे, मग कामक्रीडा करणे आणि स्त्रीची उत्कटता वाढली तरच संभोग. या चढत्या क्रमाने स्त्रीला वश केले तरच तो पुरुष यशस्वी ठरतो...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

Monday 21 November 2016

पुरुष वशीकरणाचे तंत्र आणि मंत्र...

पुरुष वशीकरणाचे तंत्र आणि मंत्र...


निसर्गातील नर ज्याप्रमाणे नेहमीच माजलेल्या मादीच्या मागावर आणि वासावर असतो, तसेच पुरुष सुद्धा स्त्रीच्या मागावर असतो. तिने इशारा करताच हा तात्काळ बैल होऊन तिला हुंगु लागतो!
मात्र काही पुरुष स्त्रीला अजिबात दाद देत नाहीत. स्त्रीने केलेले इशारे किंवा संकेत कळून न कळल्यासारखे वागतात. स्त्री माजावर आलीय हे अशा पुरुषांना समजत नसावे काय? ब्रह्मचाऱ्याचे सोंग घेत हे सेक्स का टाळतात? अशा पुरुषांना कसे वश करावे? असा प्रश्न सेक्ससाठी आसुसलेल्या स्त्रीला पडत असतो...  –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश म्हणजे मृत्यू... अशा भंपक संकल्पनांचे मनात अधिष्ठान रुतून बसलेले असल्याने काही वैराग्यमूर्ती पुरुष स्त्रीला वश होत नाहीत. अगदी टोकाची भूमिका नसली तरी स्त्रीसंबंध म्हणजे पाप, सेक्स करणे म्हणजे पातक घडणे, जगातील सर्व स्त्रिया मातेसमान... अशा खुळचट कल्पना खऱ्या मानून त्यांचा काटेकोर अवलंब करणारे पुरुष स्त्रीला वश होऊ शकत नाहीत. अशा एकलकोंड्याना स्त्रीची अॅलर्जी असते. स्त्रीशी बोलतांनाही ते कचरतात, स्पर्श करणे तर कोसो दूरची बात!
२)बऱ्याच पुरुषांना सेक्स कसा करावा याचे मुलभूत ज्ञान झालेले नसते. हस्तमैथून, स्वप्नदोष, आखूड लिंग, कमी जाडीचे लिंग, ताठरपणा जास्त वेळ टिकत नाही... अशा अनेक विवंचनेने काही पुरुषांना ग्रासलेले असते. त्यामुळे सेक्स नकोच, असे म्हणत ते स्त्रीला टाळू लागतात. काही पुरुष उत्सुकतेपोटी वेश्येकडून सेक्स शिकावा म्हणून धाडस करतात.  अर्थात वेश्यागमन म्हणजे कामशास्त्र शिकण्याची शाळा नव्हे! तो एक छुपा व्यवसाय असल्याने तेथून काहीच शिकता येत नाही. उलट ती वेश्या पुरुषाचे हस्तमैथून करून देण्यातच वाकबगार असते!
३)काही पुरुषांना अनावश्यक जबाबदाऱ्या विनाकारण अंगावर ओढून घेण्याची सवय असते. त्यामुळे जेव्हा सेक्सची याचना करीत स्त्री नजीक येते तसे तसे हे विचारवंत दूर दूर पळू लागतात. त्यांना सेक्सपेक्षा इतर कर्तव्ये, जबाबदाऱ्या महत्वाच्या वाटत असतात! ‘हिला काय कळतंय जबाबदारी कशी पेलायची ते? हिला राहून राहून सेक्च सुचतो, त्यापेक्षाही किती महत्वाची कर्तव्ये बजावण्याची ही वेळ आहे...’ अशा भ्रामक कल्पनांमध्ये स्वतःला गुरफटून घेत असे पुरुष स्त्रीला वश होऊ शकत नाहीत. अशा थंड प्रतिसाद देणाऱ्या पुरुषांना कसे जागे करावे? कसे वश करावे? हेच स्त्रीला कळत नसते.
४)पुरुषाची कामचेतना स्त्रीच्या सहापट अधिक असली तरी काही पुरुष वरील प्रमाणे कामेच्छेचे वारंवार दमन करीत असतात. परंतु स्त्रीकडे असे काही ‘स्फोटक अवयव’ असतात की त्या उन्नत भागांचे दर्शन होताच पुरुष निश्चयापासून ढळू लागतो. प्रथमतः स्त्रीने आपल्या ‘कामुक’ नजरेने पुरुषाला घायाळ करावे लागते. आपले मनोहर डोळे, ओठ, भुवया, चेहरा यांचा कल्पनारम्य वापर करून स्त्रीने पुरुषाला त्याच्या पौरुषत्वाला आव्हान द्यायचे असते. स्त्रीने आपली कमनीयता पुरुषापुढे नेहमीच आकर्षकपणे पेश करावी लागते. आपला सुडौल बांधा, उन्नत उरोज, पुष्ट नितंब, योनीची महिरपी कलाकृती... यांना शृंगारिक वस्त्रे लेवून अशी प्रकट करावी लागते की पुरुष ते पाहून आसूसलाच पाहिजे!
५)पुरुषाचे कामोद्दीपित केंद्र बव्हंशी शिस्नात एकवटलेले असल्याने इतर ठिकाणी स्पर्श करून त्याला उत्तेजित करीत बसण्यापेक्षा थेट लिंगाशी चाळा सुरु केला तर तो लवकर वश होऊन सेक्सला राजी होतो. हे स्त्रीने लक्षात ठेवावे. सुरुवातीला तो नकार देईल परंतु त्याचे लिंग नाजूकपणे हाताळताच त्याच्या कामेच्छा जागृत होऊ लागतात. लिंग व आसपासचा प्रदेश बोटांच्या कलात्मक स्पर्शांनी उत्तेजित केला असता पुरुषाचे शिस्न कमालीचे ताठर बनण्यास काहीच क्षण पुरेसे ठरतात!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blodspot.in  

स्त्रीचा ‘सेक्स’बाबत असहकार...

स्त्रीचा ‘सेक्स’बाबत असहकार...


स्त्री तयार असेल तरच संभोगाची खरी मौज पुरुषाला चाखता येते. स्त्रीची इच्छा नसतांना केलेला संभोग हा वन वे ट्राफिक सारखा एकसुरी होऊन त्यातील स्त्रीची तृप्तता पुरुषाला जाणवत नाही. आणि स्त्री जर अशा नकोशा शरीरसंबंधातून नेहमीच अतृप्त राहू लागली तर तिचे चित्त विचलित होऊन तिच्या व्यभिचारास खतपाणी मिळण्याचा संभव अधिक असतो...
स्त्रीचा सेक्सबाबत असहकार चालू आहे हे कसे ओळखावे आणि त्यावर मात करून पुरुषाने कसे स्त्रीला पुन्हा सहकारी बनवून घ्यावे याची चर्चा करणे उचित ठरेल.. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)स्त्रियांचे नकोशा सेक्सबाबत प्रतिक्रिया देण्याचे तीन प्रकार करता येतील. पहिल्या प्रकारची स्त्री सोशिक गटात मोडते. सेक्स हा पुरुषाला करू देण्याचा अधिकार आहे अशीच त्यांची धारणा बनलेली असते. पुरुषाने मागणी करताच मनाने किंवा शरीराने तयारी नसली तरी ती सेक्सला राजी होऊन वेदना सहन करीत राहते. अशा स्त्रिया पुरुषाची मर्जी राखण्यासाठी पाळी आलेली आहे आणि सेक्स नको इतकेही म्हणू शकत नाहीत!
२)दुसऱ्या गटातील स्त्रिया सेक्स नको असेल तर पुरुषाला टाळू लागतात. त्याच्याजवळपास येत नाहीत. अंतर राखून वर्तलाप करतात. सेक्सचा विषय निघताच विषय बदलतात किंवा प्रापंचिक, आर्थिक, शारीरिक अडचणी सांगून पुरुषाला संभ्रमात टाकतात व तो फारच बळजबरी करू लागला तर ‘पाहिजे तर घे उरकून...’ म्हणत सताड मांड्या फाकवतात!
३)तिसऱ्या गटातील स्त्रिया मात्र स्पष्टवक्त्या, कडक स्वभावाच्या आणि अहंकारी असल्याने त्यांना जर सेक्स नकोसा असेल तर ताबडतोब पुरुषाला सडेतोड शब्दांत थोपवतात. ‘आज माझा मुळीच मूड नसल्याने मी सेक्स करू देणार नाही, तुला काय करायचे ते कर...’ असे खडसावून सांगितल्यावर ऐकणारा पुरुष कासवाने किंवा गोगलगायीने संकुचित व्हावे तसे स्वतःच्या सेक्ससंबंधीच्या अनिवार भावना आकसून घेतो. असे पुरुष मग हस्तमैथुनाने क्षुधाशांती करण्याचा सोयीस्कर मार्ग निवडतात!
४)मुळात स्त्रीचा सेक्सबाबत असहकार का निर्माण होतो याचाच पुरुषाने सखोल विचार करायला पाहिजे असतो, पण तो तसा विचार करीत नाही, कुणाचे मार्गदर्शनही घेत नाही, कामशास्त्रीय माहिती घेण्याचा प्रयत्न करीत नाही. स्त्रीच फ्रीजीड किंवा थंड आहे असा शिक्का मारून मोकळा होतो. आपलेच काही चुकत नसेल का? यासाठीचे आत्मपरीक्षण करण्याचे मनावर घेत नाही. त्यामुळे दोघेही अतृप्तच राहतात!
५)स्त्रीला उत्तेजित करण्यासाठीचे अनेक मार्ग असतात. प्रेमळ वार्तालाप, विनोदी चुटकुले, द्विअर्थी संवाद किंवा किंवा गाणी, लैंगिकतेकडे झुकणारे जोक्स सांगून तिचे मन इतर गोष्टीकडून सेक्सकडे कसे वळवता येईल याचे नियोजन करावे लागते. स्त्रीची कामोत्तेजित करणारी अंगप्रत्यंगे हळुवारपणे हाताळावी लागतात. तिच्या हरेक अंगाची प्रेमळ चुंबने घेऊन तिला तयार करता येते. तिच्या शरीराची माफक स्तुती करीत तिला आत्मसंतुष्ट करावे लागते. नंतर प्रणयक्रीडा रंगवीत कामक्रीडा करण्याचे संकेत मिळू लागल्यावरच सेक्स करावा लागतो. परंतु पुरुष बेडवर पडल्या पडल्या लगेच प्रत्यक्ष संभोग करू पाहतो हे सर्वथा चुकीचे असते. आधी पेटती काडी टाकावी लागते मगच वणवा पेटतो, हे पुरुषाने कायम लक्षात ठेवले पाहिजे!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

स्त्रियांसाठी ‘सेक्स टॉनिक’...

स्त्रियांसाठी ‘सेक्स टॉनिक’...


‘मला सेक्स करतांना त्रासच वाटतो,’ ‘मला इंटरेस्ट राहिलाच नाही बघ,’ ‘शारीरिक संबंध नकोसेच वाटतात...’ अशा तक्रारी स्त्री आपल्या जिवलग मैत्रिणीकडे करू लागली की तक्रारी ऐकणारी मात्र मनातून सुखावते! त्यामानाने आपण किती सुखी आहोत हेच पटवून देण्याचा प्रयत्न करते. वस्तुतः ती ऐकणारी मैत्रीणसुद्धा याच कचाट्यात सापडलेली असते, परंतु वरकरणी तसे न दाखवता ‘मी मात्र सुखी आहे बघ...’ म्हणत तिच्यावर रुबाब गाजवू पाहते.
अशा अतृप्त स्त्री साठी असते का एखादे ‘सेक्स टॉनिक’? –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)रूढी आणि परंपरा प्रिय स्त्रिया पुरुषसत्ताक जीवन पद्धतीला प्रमाण मानून जगत असतात. संभोगाचे सुख केवळ पुरुषासाठीच आहे, ते सुख त्याने मागणी करताच दिले पाहिजे असा एकसुरी कार्यक्रम स्त्री पार पाडत असते. तिला तशा जबरदस्तीच्या क्रियेतून काहीच कामसुख मिळत नाही, उलट तो संभोग वेद्नादायीच ठरतो. जो तिला नकोसा असतो.
२)पुरुषाची कामोद्दीपित करणारे केंद्रे बव्हंशी शिस्नाशी संबंधित असतात. याउलट स्त्रीला कामोद्दीपित करणारे बिंदू तिच्या शरीरभर विखुरलेले असतात. गुप्तांगात आपले लिंग घुसडले की स्त्री सुद्धा कामतृप्त होतो हा पुरुषाचा मोठा गैरसमज पूर्वापर चालत आलेला आहे. त्याची विर्यच्युती झाली की तो कामतृप्त झालेला असतो, याच्या विरुद्ध स्त्रीची कामतृप्ती असते. त्यामुळे तिला अतृप्त ठेवणारा शारीरिक संबंध नकोच वाटणे साहजिक आहे.
३)आपण कसे उत्तेजित होतो, आपली कामोद्दीपन कुठे स्पर्श केल्यास अधिक होते, आपल्याला कामतृप्ती कशी लाभू शकते... याविषयी स्त्री पुरुषाशी मोकळेपणाने बोलत नाही. मग तो त्याला आवडेल तसाच संभोग करतो, स्त्रीचे कामसुख त्याच्यालेखी दुय्यम ठरते. आणि मग स्त्रीला तो घाईघाईचा, उरकलेला, यंत्रवत चालणारा संभोग आवडतच नाही.
४)आपले सुख कशात दडले आहे हे न बोलता स्त्रीने पुरुषाला खुणेने सुचविले पाहिजे. ‘माझ्या शरीराची अनिवार चुंबने घेण्याने मी उत्तेजित होते, ओठ-स्तनाग्रे-शिस्निका यांचे हळूवार पीडन केल्याने मी कामतृप्त होते, प्रत्यक्ष संभोगाऐवजी प्रणय खुपवेळ रंगला तरच मला कामसुख मिळते...’ हे स्त्रीने पुरुषाला स्पष्टपणे सांगायलाच पाहिजे. कारण हे कामशास्त्रीय ज्ञान पुरुषाला कुणीही सांगितलेले नसते, त्याने कुठेही हे अनुभवलेले नसते किंवा त्याने अशा यथोचित प्रणयाचा अभ्यासच केलेला नसतो. संभोग म्हणजे केवळ ‘घिसडघाई’ हे त्याच्या अजाण मनावर बिंबले गेलेले असते.
५)वरील सर्व चुकीच्या कृती टाळून जो पुरुष स्त्रीला प्रणयाने भावविभोर करून जातो, तिच्या शरीराच्या प्रत्येक उन्मादक बिंदूंचा नेहमी शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशा कामोद्दीपित करणाऱ्या स्थानांना हळुवार चुंबत जातो, त्यावर नाजूक स्पर्शाची नक्षी रेखित राहतो आणि स्त्री कमालीची उत्कट झाल्यावरच प्रत्यक्ष संभोगक्रियेला सुरुवात करतो... हाच रंगणारा प्रणय, हीच उत्तरोत्तर उत्तेजित करणारी कामक्रीडा आणि हाच पुरुषाचा प्रेमळ, अल्हादी, हवाहवासा स्पर्श.. हेच एका स्त्रीसाठी ‘सेक्स टॉनिक’ असते!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

पुरुषासाठी ‘सेक्स टॉनिक’...

पुरुषासाठी ‘सेक्स टॉनिक’...


इतर मित्रांसोबत गप्पाटप्पा मारतांना एकेमकांच्या वरचढ गुजगोष्टी सांगण्याच्या नादात सहज फुशारकी मारली जाते की, मी कित्येक तास संभोग करू शकतो, माझे लिंग खूपवेळ कडकच राहते, मी एकाच रात्रीत चारपाच वेळा विनासायास संभोग करू शकतो... हे ऐकणारे वाहवा करतात, पण मनातून मात्र कष्टी होतात. हे आपल्याला का जमत नाहीये? या विचाराने खंगून जातात...
साहजिकच तो बढाया मारणारा अमुकतमुक सेक्स टॉनिकचे नाव पुढे करतो, अर्थात ते निखालस खोटे असते. त्या टॉनिकचे सेवन करून देखील ऐकणाऱ्या पुरुषाच्या लैंगिक कार्यक्षमतेत काडीमात्र वृद्धी झाल्याचे दिसत नाही आणि सेक्स टॉनिक घेणारा आणखी निराशेच्या गर्तेत डुबू लागतो. पुरुषासाठी एखादेतरी ‘सेक्स टॉनिक’ आहे का? –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)कामविषयक ज्या काही समस्या पुरुषाला भेडसावतात, त्या केवळ अज्ञान व गैरसमजुतीतून आलेल्या असतात. त्याला खतपाणी घालणारी काही बढाईखोर मित्रमंडळीच तशा समस्यांना मोठे स्थान देण्याचा प्रयत्न करीत असतात. आपले शिस्न बारकुळे आहे, करंगळी एवढेच आहे, जास्तवेळ ताठ राहत नाही, लगेच वीर्य गळून जाते... अशा समस्या त्याला पोखरत असतात.
२)स्त्रीला कामतृप्त करण्यासाठी लांबसडक आणि भल्यामोठ्या लिंगाची आवश्यकता अजिबातच नसते. मागे एका लेखात उल्लेखिल्याप्रमाणे छोटे लिंग असले तरी ते स्त्रीला नक्कीच कामतृप्त करू शकते. फक्त ते व्यवस्थित उत्तेजित झालेले असावे इतकीच अट आहे!
३)शीघ्रपतन ही काही समस्या नसून तो एक धसमुसळेपणाने अंगवळणी पडणारा मानसिक स्फोट आहे. प्रयत्नांती त्यावर नक्कीच विजय मिळवता येतो. त्यावर सविस्तर चर्चा मागे एकदा झालेली आहेच. लिंग खूप काळ ताठ राहणे म्हणजे स्त्रीला कामतृप्त करता येणे हे समीकरण अतिशय चुकीचे असते!
४)शिस्नाचे नियंत्रण करणारे केंद्र मेंदूत आणि विर्यच्युतीची स्वयंप्रेरित प्रक्रिया घडवून आणणारे केंद्र हे मज्जरज्जुत असते. ज्याप्रमाणे सिलिंग फॅनचे रेग्युलेटरचे भिंतीवरील बटन जास्त वाढविल्यास पंख्याचा वेग जास्त होतो. तसेच मेंदूतील कामकेंद्र जितके अधिक उद्दीपित होईल तितक्या जास्त प्रमाणात संदेश मेंदूकडून लिंगाकडे पाठविले जाऊन ते अधिक ताठर बनत जाईल!
५)म्हणूनच पंचज्ञानेंद्रिया मार्फत मिळणाऱ्या कामोत्तेजक संवेदना जितक्या जास्त प्रमाणात मेंदूकडे पोहोचल्या जातील तितक्या जास्त प्रमाणात उत्तेजित करणारे आदेश मेंदूकडून लिंगाकडे पाठवले जातील. याचाच अर्थ अशी उत्तेजित करणारी समंजस, कामक्रीडेत रस घेणारी, काम विषयाची माहिती असणारी, प्रेमळ ‘स्त्री’ म्हणजेच पुरुषाचे ‘सेक्स टॉनिक’ होय... –भोगगुरू कामदेव.    kaamvishva.blogspot.in  

कामोत्तेजक आहार...

कामोत्तेजक आहार...


आपल्याला दैनंदिन कार्य करण्याच्या ज्या गरजा आवश्यक असतात, तशीच एक महत्वाची अत्यावश्यक शारीरिक गरज म्हणजे ‘सेक्स’ होय. परंतु तो काही ठरवून अमलांत आणता येणारा घटक नसतो. मुद्द्माहून कामोत्तेजित होण्यापेक्षा रंगत वाढवित, चढत्या क्रमाक्रमाने, प्रणयाचे टप्पे पार करीत येणारा कामोत्तेजक अनुभव काही वेगळाच असून त्यातील माधुर्य इतर घाईघाईने संपणाऱ्या सेक्सपेक्षा कैकपटीने अधिक परिणामकारक असते.
पुरुषाला सतत वाटत असते की, मला आणखी जास्तवेळ संभोग करता आला पाहिजे, अजून काही मिनिटे माझे लिंग ताठच राहिले पाहिजे किंवा स्त्रीला पूर्ण तृप्त करून देणारा संभोग करता आलाच पाहिजे. त्यासाठी असा एखादा कामोत्तेजक आहार किंवा जडीबुटी मिळेल काय? याचा शोध घेण्यासाठी तो कायमच आसुसलेला असतो. पूर्वापार चालत आलेला हा ‘कामोत्तेजक आहारा’चा शोध अजूनही संपलेला नाहीये हे विशेष! –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)मटण-मासे-मांसाहार केला म्हणजे अधिक कामवासना जागृत होऊन परिणामकारक संभोग साधता येऊ शकतो असा दृढ (गैर)समज आजही अस्तित्वात आहे. मसालेदार खाण्याने सुद्धा कामोत्तेजना लाभते असे पुरुषाला वाटत असते. ते तितकेसे खरे नाहीच!
२)दूध, दुग्धजन्य पदार्थ सेवन केल्याने वीर्य वाढते आणि परिणामस्वरूप सेक्सची ताकद अंगी येते असाही खोटा समज जनमानसांत पसरलेला आढळतो. तेही साफ खोटे आहे.अशा पदार्थांनी कोणतीही कामोत्तेजन लाभल्याचे सिध्द होऊ शकलेले नाही.
३)गेंड्याच्या शिंगाचे औषध, आयुर्वेदातील कामोत्तेजक कल्प, रजतवर्खी गोळ्या, मकरध्वज, अश्वगंधा, वृष्यवटी, शिलाजित, स्पानिश फ्लाय, योहीम्बीन, कस्तुरी, सांड्याचे तेल, पलंगतोड तांबुलपान इ. इ. सेवन केल्याने लिंगात ताकद येऊन जास्तवेळ संभोग करता येतो याचाही शाश्वत पुरावा सिध्द झालेला नाही.
४)पुरुषाची कामोत्तेजना ही अपोआप घडून येणारी कार्यप्रणाली असल्याने अमुक तमुक कामोत्तेजक आहार घेतल्याने त्यात वाढ होईल असे मुळीच घडत नाही. जगात असा कोणताच आहार उपलब्ध नाहीये की जेणेकरून पुरुषाचे लिंग तासनतास ताठ राहू शकेल!
५)स्त्रीचे प्रणयसुलभ आकर्षक दर्शन, तिचा मोहक उत्तेजक स्पर्श आणि तिने आवर्जून केलेल्या कामलीला हाच पुरुषासाठी कामोत्तेजक आहार असतो, याचा सर्वांनी विचार करायला हवा. जी स्त्री पुरुषाला आपल्या विविध चेष्टांनी कलात्मकरित्या पुरुषाला समागमास प्रवृत्त करते तोच पुरुषासाठीचा खरा कामोत्तेजक क्षण असतो... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

Thursday 17 November 2016

दांपत्यांचे प्रकार...

दांपत्यांचे प्रकार...



जगात किंवा आपल्या आजूबाजूला असंख्य नमुन्याची जोडपी आढळतात. जरा बारकाईने निरीक्षण केले की कोणत्या जोडप्याचे एकमेकांशी (पलंगावरही) पटते ते ओळखता येते. काही जोडपी इतरांसमोर मस्त मजेत सुखात असल्याचा आव आणतात, तर काही जोडपी इतरांपुढे देखील आपल्या जोडीदाराचा पाणउतारा करायला मागेपुढे पाहत नसतात. काहींच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज विलसत असते, तर काही जोडपी कायम मरगळलेल्या, ओढग्रस्त आणि तणावपूर्ण चेहऱ्याने वावरत असतात...
क्युबर आणि हेरॉक या दोन मनोवैज्ञानिकांनी अनेक जोडप्यांच्या अभ्यासातून असा निष्कर्ष काढला की जगातील विवाहित दाम्पत्यांचे केवळ पाच प्रकारात वर्गीकरण करता येईल. थोड्याफार फरकाने प्रत्येक जोडपे यातील एकतरी वर्गात समाविष्ट करता येईल... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)विसंवादी जोडप्यांमध्ये कधीच सुसंवाद घडत नाही. दोघांची तोंडे छत्तीसच्या आकड्याप्रमाणे विरुध्द दिशेला असतात. समाजाच्या जोखडाखाली किंवा एक मजबुरी म्हणून ते संसाराचा गाडा ओढत असतात. त्यात प्रेमाचा लवलेश पासंगालाही पुरणारा नसतो. सदानकदा एकमेकांची उणीदुणी काढीत, भांडणे करीत, इतरांनाही शिव्याशाप देत रडतखडत आयुष्य कंठत असतात. यांचे जसे बाहेर वर्तन असते तसेच बेडवरही असते. मुळात ते एका अंथरुणावर झोपतच नसतात पण यदाकदाचित झोपलेच तर तिथेही त्यांची चांगलीच जुंपते! एकेमकांवर पराकोटीचा संशय घेणे यांच्या रक्तातच भिनलेले असते. जोडीदाराच्या कोणत्याही कृतीकडे ते संशयानेच पाहतात. अशा व्यस्त दाम्पत्यांमध्ये घटस्फोटाचे आणि विभक्त होण्याचे प्रमाण अधिक आढळते. अशी जोडपी समाजात टीकेचा किंवा चघळण्याचा विषय बनलेली असतात.
२)दुसऱ्या प्रकारच्या दाम्पत्यांमध्ये सामंजस्य आढळते परंतु ते केवळ दिखाव्यापुरते असते. म्हणजेच ही जोडपी समाजापुढे आम्ही खूप सुखी आहोत असे भासविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु ते वैवाहिक आयुष्यात एकमेकांना सुखी ठेवू शकलेले नसतात. एकतर पुरुष तरी स्त्रीकडून तृप्त झालेला नसतो किंवा स्त्री तरी पुरुषाने तृप्त करून सुखी ठेवलेली नसते. असे दांपत्य एकमेकांच्या आवडीनिवडी जपतांना दिसतात मात्र ते तितकेसे खरे नसते. केवळ दिखावा या सदरात ते मोडते. अशी जोडपी जीवन एक कसेबसे जगण्याचे साधन समजून जगत राहतात. सामाजिक आयुष्यात तर ती सुखी समाधानी नसतातच तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी हार मानलेली असते. अशी दाम्पत्ये आत्महत्येचा पर्याय निवडतांना दिसतील.
३)तिसऱ्या प्रकारची जोडपी ही कमालीची स्वयंकेंद्रित असतात. दोघेही एकमेकांची स्पेस कसोशीने पाळतात, एकमेकांच्या कोणत्याच गोष्टीत दखल घेतांना दिसत नाहीत. त्याला/ तिला पाहिजे ते करू देत, मी नाही टोकणार... असा त्यांचा एकंदर अविर्भाव असतो. अशी दांपत्ये वैवाहिक जीवनात बेतासबात किंवा जशास तसे प्रकारचा प्रणय अंगीकारून तोलून मापून प्रेम करतात, मोजकाच सेक्स करतात. ही जोडपी देखील आयुष्यात सुखी ठरू शकत नाहीत. स्वतःची आत्मप्रौढी, आत्मगौरव, आत्मप्रशंसा यातच त्यांना स्वारस्य असते. जोडीदाराचे कौतुकसुद्धा ते तोलूनमापूनच करतांना दिसतील. त्यांच्यात प्रेम असते असे नाही, परंतु ते कमालीचे व्यावहारिक, काटेकोर आणि पर्यायाने यंत्रवत असे असते. म्हणून ही जोडपी समाजात थोडीबहुत आदर्श मानली जात असली तरी परिपूर्ण अशी नसतातच! स्पेस जपण्याच्या भानगडीमुळे अशी दांपत्ये एकमेकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत व्यभिचारास प्रवृत्त होतांना आढळतात.
४)चौथ्या प्रकारातील दांपत्ये स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाचा अधिक विचार करतात. जोडीदाराच्या मतांचा आदर करीत साथ देतात. वैवाहिक आयुष्य अधिक मुक्तपणे आणि सर्वकाही झोकून देत व्यतीत करतांना दिसतात. मी, माझा/माझी जोडीदार आणि आमचे कुटुंब असे यांचे सुखी जग असते. जीवनातील प्रत्येक आनंद ते कुटुंबासह लुटण्याचा प्रयत्न करतात. जोडीदारांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास तर असतोच परंतु त्या विश्वासाला तडा जाऊ नये असे कोणतेही कृत्य त्यांच्याकडून कधीच घडत नसते. समाजातही अशा जोडप्यांना आदर्शवत मानले जाते. खंत एकच असते ती ही की अशी दांपत्ये समाजात मिसळत नाहीत, समाजकार्यात सहभाग नोंदवीत नाहीत, आपण भले, आपले कुटुंब भले असा त्यांचा जीवनविचार असतो. एकंदरीत अशी जोडपी कुटुंब’केंद्रित असतात. तरीही समाज त्यांना ‘समजूतदार दांपत्य’ नावाची पदवी बहाल करीत आलेला असतो.
५)पाचव्या प्रकारातील जोडपी एकदम आदर्शवत असतात. म्हणजे वरील चौथ्या प्रकारातील जोडपे सर्व निकष पूर्ण करून समाजात आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजात मिसळणे, समाजकार्य करणे, इतरांना मदत करणे अशासाठी ते सदैव तत्पर असतात. वैवाहिक जीवनात ते हमखास यशस्वी असतात. जोडपे पूर्णतया एकमेकांसोबत तृप्त असते. त्यामुळे कुटुंबाचा काही वेळ समाजकार्याला दिला तर त्यांचा आक्षेप नसतो. त्यामुळे अशी जोडपी रब ने बना दी जोडी असे नावारूपाला येऊन समाज त्यांना आदर्श दांपत्य अशी सर्वोच्च पदवी प्रदान करतांना बिलकुल कचरत नाही असे दिसून येते. नवीन जोडप्यांना यांचाच आदर्श घ्या असे सुचविण्यास देखील समाज मागेपुढे पाहत नाही. म्हणजेच सर्वच पातळीवर यशस्वी ठरणारे जोडपे या प्रकारात येत असल्याने यांचा हेवा वाटणे साहजिक ठरते!!!
तेव्हा प्रत्येक स्त्री-पुरुषाने आपण कोणत्या गटात जायचे हे आधीच ठरवून टाकावे... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

Tuesday 15 November 2016

पुरुषावरील ‘काम’संस्कार...

पुरुषावरील ‘काम’संस्कार...


पुरुषाची कामकेंद्रीय मज्जासंस्था स्त्रीच्या तुलनेत अधिक प्रबळ असते. स्त्रीच्या सहापट अधिक वेगाने त्याची कामोद्दीपिता होते. म्हणजेच पुरुष स्त्री पेक्षा कैकपटीने सेक्ससाठी आसुसलेला असतो. निसर्गातील कोणताही नरप्राणी केवळ याच एका हेतूने प्रेरित होऊन बारा पिपळावरच्या मुंज्यासारखा मादीच्या शोधात हिंडत असतो. पुरुष जरी मनुष्यप्राणी असला तरी विचाराने प्रगल्भ असल्याने सेक्सच्या बाबतीत पशुवत आक्रस्ताळेपणा करीत नाही, जरा सबुरीनं घेतो. पण आजकालचे पालक त्याच्यावर काम संस्कार करायचे दूरच, ‘त्या’ बाबतीत जरा जास्तच सबुरीनं घेण्याचा पाठ गिरवून घेतात... हे मात्र अयोग्य आहे. मग पुरुषावर भलतेच ‘काम’संस्कार होणार नाहीत तर काय? ... --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)भावनोत्तेजित होण्याच्या अजाणत्या वयात ताठरलेल्या लिंगाचे काय करायचे? या प्रश्नाला कोणत्याही पालकाकडे उत्तर नसते. कोणाला विचारणे म्हणजे महत्पाप असे पूर्वीच बिंबवले गेलेले असल्याने पुरुष फुरफुरणारे शिस्न चड्डीतच दाबून ठेवत कसोशीने आपली उत्सुकता दमन करून टाकतो. एकांतात असतांना ताठ झालेल्या शिस्नाना कुरवाळायला सुरुवात होते आणि बघू तरी काय घडते, असे वाटून तो लिंग मुठीत दाबू लागतो, तो दाब हवाहवासा वाटून आपसूकच पुढेमागे हाताची हालचाल होत जाऊन हे काहीतरी विस्मयकारक आणि अंगभर शहारे आणणारे आहे, अशी जाणीव होताच त्या स्पर्शाची भूक वाढत जाते आणि अखेर विस्फोटक अशी विर्यच्युती होऊन त्याचा तुंबलेला बांध फुटतो... ही खरी हस्तमैथूनाची हकीकत झाली.
२)त्यापुढील वयात तरुण मुलींचे आकर्षण वाढते. त्यांची शरीररचना कशी असेल हे शोधण्याची त्याची जिज्ञासा उचल खाते. समाजपुरस्कृत नीती-नियमांचा घनिष्ट पगडा असल्याने त्याला कुठेही याचे शास्त्रीय ज्ञान मिळत नाही. मग चोरीछिपे तो मुलींच्या मागावर राहतो, एखाद्या मुलीला नग्न पाहण्याची त्याची इच्छा तीव्र होते. सार्वजनिक बाथरूम, टॉयलेट किंवा जेथे सोयीस्कर होईल अशा ठिकाणी छुपे कॅमेरे लावण्याचा उद्योग होतो. किंवा बाथरूमच्या भिंतीला पलीकडून होल पाडून पाहिले जाते. तरीही काही हशील होत नाही. एक मात्र होते नग्न स्त्री पाहून अधिक उत्तेजना लाभल्याचा नवा साक्षात्कार होतो आणि साहजिकच हस्तमैथुनाची सवय लागून जाते.
३)कधीकधी एखाद्या स्त्रीचे वाळत घातलेले कपडे चोरून किंवा नजर चुकवून आणून त्यांना ताठरलेले लिंग घासण्याचा नवा प्रयोग सुरु होतो. ब्रा किंवा नीकर मध्ये लिंग घालून पुढेमागे करीत हस्तमैथूनाचा वेगळा आनंद शोधला जातो. पुढे पुढे काही अशाच एकांतवासी मित्रांच्या सहवासाने पिवळी पुस्तके हाती पडतात. त्यातील रंगविलेल्या गोष्टी डोक्यावरून जात असल्या तरी त्यातील कामोत्तेजक वाङ्मय हस्तमैथुन करण्यास उद्युक्त करू लागते.
४)आता तर डिजिटल जमान्यात कित्येक पोर्न क्लिप्स स्मार्टफोनवर डाउनलोड करून एकांतात पहाता येतात. त्याने भलतेच ज्ञान प्रसारित होते. त्या फिल्म मध्ये स्त्रीच्या कामतृप्तीला काडीचेही स्थान दिलेले नसते, तसा प्रयोग एखादा करू लागल्यास संभोग व्यर्थ ठरतो!
५)त्यानंतर येणाऱ्या तारुण्यात जर एखादी पोरगी पटली तर तिच्यासोबत फिरणे घडते. क्वचित रात्री ती स्वप्नात येऊन त्याचा अचानक विस्फोट होऊन जातो. विर्यच्युती झाल्याने त्याला जाग येते, पण ते स्वप्नच होते याची जाणीव झाल्याने तो हिरमुसतो. मग प्रत्यक्ष गेम मारण्याची तयारी सुरु होते. अनेक आढेवेढे घेताघेता ती तयार झाली की एकांतप्रिय मित्राची खोली किंवा शहराबाहेरचा लॉज शोधला जातो. ठरल्यावेळी सर्व निर्व्यत्यय घडून येते परंतु सेक्स ही काही ठरवून करण्याची कृती नसल्याने त्याचे वीर्यपतन तिचे आतील कपडे काढेतोवरच होऊन जाते! शीघ्रपतन म्हणजे काय ते त्याला तेव्हा कळते. अर्थात यावर उपाय म्हणून नियमित संभोग करणे हाच असूनही तो नियमित घडत नाही, हस्तमैथुन मात्र होत राहते कारण तेवढेच त्याच्या हातात असते.!
६)कालांतराने तो स्वतःवरच नाराज झाल्याने तिला त्यागतो आणि बोहल्यावर चढतो. हक्काची स्त्री मिळाल्यामुळे तो आनंदात असतो, तोवरच सुहागरात येते. ह्याच्यापेक्षा तिचीच घालमेल जास्त असते. काही स्त्रिया पुरुषाला शिकवतात, सांभाळून घेतात, सेक्समध्ये तरबेज करतात. याउलट काही स्त्रिया कशाला हा उपद्व्याप? सेक्स न जमणाऱ्या पुरुषासोबत राहायचे कशाला? असा विचार करून एकतर काडीमोड तरी घेतात किंवा दुसरा एखादा तरबेज पुरुष शोधून संसार कडेला लावतात!
७)लग्नानंतरची तीन वर्षे महत्वाची मानली जातात. या कालावधीत वेळोवेळी सेक्स करून पुरुष तरबेज झाला, काम-कौशल्ये शिकला, स्त्रीला कामतृप्त करू शकला तर ठीक नाहीतर नशिबी आपला हात जगन्नाथ आलाच म्हणून समजा!
सारांश काय तर सेक्स ही अंधारातली गोष्ट उजेडात आणून त्याबाबत काही बोलणे म्हणजे अश्लीलता समजून पुरुषाला खितपत ठेवले जाते. जो पुरुष वेळीच सावध होऊन शास्त्रीय ज्ञान मिळवतो, त्याची उजळणी प्रत्यक्ष संभोगावेळी स्त्रीवर करतो, तिची कामतृप्ती कशात आहे हे चाणाक्षपणे ओळखून तिला तृप्त करतो तोच यशस्वी पुरुष म्हणून गणला जातो...
म्हणूनच येणाऱ्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक पुरुषावर त्याच्या प्रत्येक पित्याने यथोचित ‘काम’संस्कार करणे अगत्याचे ठरते. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

प्रेमविवाह का फसतो?

प्रेमविवाह का फसतो?


कोवळ्या वयाची शिरशिरी अंगभर दौडू लागल्यावर त्यात मोहरून जाण्यासाठी विजातीय धृवाची ओढ लागून राहते, भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होऊ लागते. तो किती छान बोलतो, त्याचे शब्द किती मधुर असतात, त्याचा चेहरा किती हसरा आणि प्रसन्न असतो, नेहमीच तो तजेलदार स्मित करीत असतो, तो किती हँडसम दिसतो, त्याचे वागणे किती सुसंगत आणि मला आवडणारे आहे, तो किती काळजीपूर्वक माझे ऐकतो, मला काय हवं काय नको ते किती तत्परतेने पाहतो, लगेच रिऍक्ट होतो, म्हणूनच मला तो जीवापाड आवडतो... अशी स्वप्नरंजने रंगवीत ती आपसूक त्याच्याकडे खेचली जाऊन धप्पकन प्रेमात पडते...
याउलट त्याच्या दृष्टीकोनातून ... ती किती कमनीय दिसते, किती सेक्सी आहे, तिचे अंग किती गौरवर्णीय आहे, तिचा उभार किती उन्नत दिसतो, तिचे नितंब कसे घेरदार आणि डौलदार दिसतेय, पाहताचक्षणी ती काळजात रुतलीय, कधी एकदा हिला पंखाखाली घेतो असे झालेय यार...
वयात आलेल्या दोन भिन्न लिंगांचे विचारचक्र असे विरोधाभासी असते. मुलांच्या दृष्टीने मुलगी ही मादी असते, तिला उपभोगुन घेतले की आपले कार्य संपले असा सरळ सरळ नैसर्गिक नराचा हेतू प्रकट होत असतो. तर मुली नेहमी मुलाच्या केअरिंग शेअरिंग वर भाळतात, त्याचे मोहविणारे वागणे-बोलणे त्यांना भावते आणि त्या त्याच्यातील नराची शिकार होतात. आणि त्यामुळेच केवळ शारीरिक आकर्षणावर बेतलेले प्रेमविवाह फुसके ठरतात! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)अजाणत्या वयात सर्रकन प्रेमात घसरून पडणे मुळीच वावगे नाही, ते नैसर्गिकच असते. शरीरातील विविध संप्रेरकांचा तो प्रभाव असतो. पुरुषाला पौरुषत्वाचे भान देणे आणि स्त्रीला तिच्यातील स्रैणत्वाची जाणीव करून देणे हाच त्या प्रभावाचा स्वभाव असतो.
२)मुली मुलांच्या दिसण्यापेक्षा ‘असण्या’वर जास्त भाळतात. तो कसा आहे? याचा जास्त विचार करतात. तो कायमची साथ देईलच याची खुणगाठ आंधळेपणाने बांधतात. आपली काळजी घेतो, हवेनको ते पाहतो, म्हणजे आपल्याला सुयोग्य आहे असा त्यांचा (गैर)समज होऊन बसतो. आणि त्या त्याच्या प्रत्येक कृतीला होकार देऊन बसतात!
३)याउलट मुलांचे वर्तन असते. पौरुषी हार्मोन्सचा प्रभाव त्यांना अचाट कर्तृत्व सिद्ध करण्यास भाग पाडतो. आवडलेल्या मुलीवर इम्प्रेशन मारण्याच्या नादात ते काहीही करतात... अगदी स्वभावाच्या विरुद्ध जाऊन ‘गोडबोले’सुद्धा होतात. हवी ती मादी मिळाली म्हणजे झालं, इतकाच त्यांचा सूप्त हेतू असतो, तो तडीस नेण्यासाठी ते पाहिजे ती वचने, आणाभाका घ्यायला एका पायावर तयार झालेले असतात.
४)निसर्गात जसा प्रत्येक नरप्राणी मादीला भुरळ घालून आपले ‘इप्सित’ साध्य करून घेतो तसेच मुलेही आपले ‘सूप्त हेतू’  (अर्थात सेक्सच!) साधण्यासाठी मादीला मनवू लागतात, हरप्रकारे रिझवू लागतात. आपण कोणती आश्वासने देत चाललो आहोत, हे त्यांच्या गावीही नसते. आयुष्यभर साथ देण्याचे वचन मिळाले की मादी खुश होऊन आपले ‘सर्वस्व’ नराच्या हवाली करून (नखशिखांत) मोकळी होते!
५)नराला त्याचा ‘खाऊ’ मिळाला की तो पहिल्या मादीच्या नादी लागणे टाळू लागतो. कारण त्याला दुसरी कोणतीतरी कमनीय मादी ‘आकर्षित’ करू लागते. कारण तिने त्या दोघांचा उत्सव लांबूनच पाहिलेला असतो, ज्यासाठी ती आसुसलेली असते, झुरत असते, तिलाही तो अनुभव हवाच असतो! नेमके नराचे पौरुषी हार्मोन्स उचल खातात आणि ते मूळस्वभावाला झुकते माप टाकून नव्या मादीकडे झुकू लागतात. कारण पुरुषाला ‘नित्यनव्याची’ कायम आस असतेच असते. प्रत्येकवेळी ‘नवी मादी’ उपभोगण्याची त्याची ‘उपजत नैसर्गिक प्रवृत्ती’ त्याला कदापि स्वस्थ बसू देत नाही!
६)तू आता पहिल्यासारखा वागत नाहीस, तुला माझा विसर पडत चालला आहे, तुला माझ्यात आता इंटरेस्ट राहिलाच नाही, तुझे पहिल्यासारखे प्रेम आता जाणवत नाही, तुझा माझ्यावर जीव राहिलाच नाही आता... अशी वाक्ये तिच्या मुखातून निघू लागतात आणि आपण या नालायक माणसाला सर्वस्व अर्पण करून बसलोत असे हतबल अश्रू डोळ्यांतून ओघळू लागतात. माझं नशीबच फुटकं... म्हणत ती दैवाला कोसू लागते.
७)तुझ्यात पहिल्यासारखा ‘चार्म’ राहिलाच नाही, पूर्वीसारखी तू ‘आकर्षित’ राहिलीय का बघ जरा, तुला घरातील कोणतीच जबाबदारी धडपणे हाताळता येत नाही, मला माझा व्यवसाय /नोकरी करणे अगत्याचे असतांना तू सारखी माझ्यामागे हिंडत राहतेस, सारखा संशय घेतेस... अशा त्याच्या तक्रारी असतात.
८)मुळात भारतीय लग्नसंस्था प्रेमविवाह मान्य करीत नाही. तिला नियोजित लग्नच फक्त मान्य आहे. त्यामुळे असे वादविवाद झाले की इतर नातेवाईक बघ्याची भूमिका घेतात किंवा आगीत तेल ओतण्याचे काम करतात--'तरी मी तुला म्हणत होते- तो असाच नालायक निघणार. जाऊदे दे सोडून...'
आणिसोडूनच द्यायचे तर दुसरा कोणीतरी शोधवाच लागणार, मग ती सुद्धा तिला 'हवा तसा' जोडीदार शोधून ठेवते!!!
सारांश दोघांनीही जर पूर्वीच समजूतदारीने ‘काम’ घेतले असते तर प्रेमविवाह नक्कीच टिकले असते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

केसाळ लिंग...




केसाळ लिंग...


आजकाल श्मश्रू (दाढी) वाढविण्याची क्रेझ उसळलेली दिसते. जो-तो आपली श्मश्रू वाढविण्यात, तिला कलात्मक आकार देण्यात गुंगलेला दिसून येत आहे. परंतु ‘सेक्सोमा’ नामक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार तब्बल ऐंशी टक्के स्त्रियांना शेव्हिंग केलेले पुरुषच आवडतात असे सांगितलेले आहे!
काय असते स्त्रीची या सफाचट, गोंडस, गोऱ्या-गोमट्या श्मश्रूबाबतची संकल्पना? केस वाढविलेले पुरुष तिला का आवडत नाहीत? हे झाले दर्शनी केसांच्या बाबत, परंतु पुरुषाचे लिंग जर केसाळ असेल तर तिची पहिली प्रतिक्रिया काय उमटते? हा केसाळ काळा प्राणी तिला भावतो का? काय असते स्त्रीची आवड? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)खजुराहोची पाषाणशिल्पे पाहिली असता तेथील मिथुन-युगुलांमध्ये पुरुषाची श्मश्रू वाढलेली दिसून येत नाही. तसेच पुरुषाच्या लिंगाभोवती सुद्धा केसांचा अजागळपणा आढळत नाही. म्हणजेच त्या प्राचीन समयी देखील पुरुष आवर्जून आपले शिस्न केसांच्या गुंत्यातून सोडवून घेत होता!
२)स्त्री नेहमीच टापटीप, स्वच्छता, शुचिता यांची भोक्ती असते. वाढलेल्या श्मश्रूचा पुरुष अंगचटीला घेणे तिला मानवत नाही. केसांच्या अनाकलनीय स्पर्शाने स्त्रीला गुदगुल्याच होण्याचा संभव अधिक असतो! त्यामुळे गोऱ्या गोमट्या चेहऱ्याचा पुरुष तिला आवडत असावा.
३)स्त्रीला पुरुषाच्या लिंगाचे परीक्षण करावे, ते मनसोक्त हाताळावे, त्याच्याशी लाडीकपणे खेळावे असे बिलकुल वाटत नसते! मात्र याउलट स्त्रीने आपल्या शिस्नाशी नेहमीच खेळावे हा पुरुषाच्या कामोत्तेजक कल्पनाविलासाचा परिपाक असतो. मागे एकदा सांगितल्याप्रमाणे स्त्री केवळ प्रेमाची, प्रेमपूर्वक वार्तालापाची, सर्वांगाने मोहरून जात कामतृप्त होणाऱ्या स्पर्शांची भुकेली असते. तिच्या सेक्सच्या भावना अंगभर होणाऱ्या कामोद्दीपित स्पर्शांशी निगडीत असतात. केवळ लिंग हाताळल्याने ती कामतृप्त तर होत नाहीच, कामोद्दीपितही नाही, हे पुरुषाने लक्षात ठेवावे.
४)वर नमूद केल्याप्रमाणे स्त्रीला शुचिता आवडत असल्याने शेव्हिंग केलेले शिस्न तिला नक्कीच भावते. केसाळ लिंगाला हाताळण्यापेक्षा सफाचट केलेले शिस्न हातात घेणे (प्रसंगी मुखात घेणे देखील) तिला आवडेल यात शंका नाही.  मुळात स्त्रीचे सेक्सच्यावेळी सर्व लक्ष तिला अंगभर होणाऱ्या उत्तेजक स्पर्शांकडे असते, क्वचितच ती शिस्नाच्या केशविहीनतेकडे लक्ष देते!
५)पुरुषाचे कामोद्दीपित केंद्र शिस्नात एकवटलेले असल्याने तो अगत्याने लिंगाभोवतीचे केस शेव्हिंग करून ‘रेडी पझेशन’ अवस्थेत असतो! याउलट काही सेक्स तज्ञ असे निरीक्षण मांडतात की शिस्नाच्या मूलभागी म्हणजे वृषणांच्या अगदी विरुध्द बाजूला (कामदेवतेच्या डोंगरावर!) केसांचा काही पुंजका ठेवून शेव्हिंग केल्यास स्त्रीला अधिक कामतृप्तता लाभते. त्याचे कारण असे की प्रत्यक्ष संभोगादरम्यान शिश्नाचा मूलभाग (कामदेवतेचा डोंगर) योनीतील शिस्निकेशी घर्षण करीत असतो. तेथे असलेल्या केसांच्या पुंजक्यामुळे ते महत्वाचे घर्षण अधिक सुखावह आणि अधिक कामतृप्तीचे कारण ठरू शकते. तेव्हा पुरुषाने याचाही विचार करून शेव्हिंग केल्यास जास्त यशस्वी संभोग अनुभवता येईल यात शंका नाही. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

‘शेटाळ’ योनी...

‘शेटाळ’ योनी...


खजुराहोची मिथुन-युगुलांची पाषाणशिल्पे असोत किंवा रति-मदनाची अन्य ठिकाणची चित्रशिल्पे असोत कुठेही स्त्रीची योनी ‘केसाळ’ आहे असे दर्शविलेले नाही. त्याकाळी स्त्रिया आपले गुह्यांग कसे काय शुचिर्भूत आणि केसविहीन करीत असतील? असा गुंतागुंतीचा प्रश्न पडतो. एकतर त्यावेळी स्त्रीचे शरीर आणखी कमनीय कसे दिसेल याचा विचार तिच्या सखी-सोबतिणी, खास नोकरानी करीत असतील किंवा ती स्वतःतरी आपल्या शरीरावरील नको असलेली लव आणि केस नियमितपणे काढून टाकीत असेल.
आजच्या धावपळीच्या युगात ‘नको असलेले’ केस काढून टाकण्याविषयी सुचविणाऱ्या जाहिराती नित्यनेमाने प्रसारित करून तशा ‘नाजूक’ कामासाठी उपयुक्त ठरणारे रेझर्स, बॉडी लोशन्स, हेअर रिमूव्हर क्रीम्स, गम्स, ग्लू पेपर्स इत्यादींचा भडीमार टीव्हीवर होतांना आढळतो! त्यांचा यथोचित वापर करून स्त्री आपल्या पुरुषाला उत्तेजित करण्याचा चतुरपणा दाखवते का? हाच खरा प्रश्न आहे! –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)कोणतेही केस हा वृद्धिंगत होणारा शरीराचा ‘जैविक भाग’ आहेत. केस वाढविणे ही आजकालची ‘फॅशन’ असली तरी कोणत्या भागाचे केस वाढू द्यायचे आणि कोणत्या भागाचे नाहीत याची ‘पॅशन’ बाळगणे जरुरीचे ठरते. वस्तुतः जेव्हा मानव प्राणी नग्न हिंडायचा त्यावेळी सदरहू गुह्यभाग नेहमीच ओलसर राहून तेथे बुरशीजन्य प्रादुर्भाव होऊ नये म्हणून केसांची दुलई पांघरून त्याचे संरक्षण व्हावे याहेतूने निसर्गानेच केसांच्या वाढीची योजना केलेली होती. इतर प्राण्यांना आपले गुह्यत्व झाकण्यासाठी शेपटी असते किंवा शेपटी हलवून आणि स्वतः जिव्हेने चाटून ती जागा बहुतांश प्राणी नेहमीच स्वच्छ करतांना दिसतात. त्यामुळे काही अपवाद वगळता एकाही प्राण्याच्या गुह्यभागी अवास्तव केस असत नाहीत!
२)परंतु आजकाल कोणतीही व्यक्ती नग्न फिरत नसल्यामुळे गुह्यांगावरील केस ही एक टाकाऊ, कुचकामी आणि अनावश्यक बाब ठरली आहे. उलट त्या भरमसाठ केसांमुळेच अनेकविध त्वचाविकार निर्माण होण्याचा धोका भेडसावत असतो. कारण आदिमानवाच्या काळी उघडा राहिलेला भाग आता पूर्णतया झाकला गेल्याने तेथील ओलसरपणा वाळण्याची सुतराम शक्यता उरत नाही. चड्ड्यांवर चड्ड्या नेसल्याने गर्मी मात्र वाढत जाऊन त्वचाविकार बळावतात. याचा अनेक व्यक्तींना अनुभव आलाच असेल!
३)म्हणूनच आदिमानवाच्या नंतरच्या वात्सायनाच्या काळात योनीशुचिता आवर्जून उल्लेखिली गेलेली आढळते. गुह्यांगावरील केस कसे नष्ट करावेत किंवा कसे काढावेत याबाबत अनेकविध आयुर्वेदिक वनस्पती आणि अनेक सहजसोपे उपाय त्या काळी ज्ञात असावेत, हे खजुराहोची मिथुन-युगुल शिल्पे पाहून पडताळता येते. त्या प्राचीनकाळी स्त्रिया योनीचे केस का काढत असाव्यात? असा प्रश्न नक्कीच पडतो.
४)पुरुषाचे कामोद्दीपन कमनीय स्त्रीला पाहून अधिक उत्तमप्रकारे होते हे आपण मागे जाणलेच आहे. प्रश्न असा असतो की स्त्री आपले कमनियत्व कसे प्रदर्शित करते याचा. स्त्री देहाचे आकर्षण पुरुषाला जन्मतःच असते. निसर्गातील प्रत्येक नर प्राणी मादीचे नेमके ‘तेच अंग’ हुंगतांना आढळतो! तद्वत पुरुषाला सुद्धा योनीचे आकर्षण असणारच ठरले.
५)सेक्स तज्ञांनी केलेल्या पुरुषांच्या सर्वेक्षणात ‘शेटाळ’ योनी बहुतेक पुरुषांना मुळीच आवडत नाही, असे सिद्ध झालेले आहे. केसांत लपलेली गुह्य जागा शोधत बसण्यात त्याला अजिबात रस नसतो. स्त्रीची मादकता बव्हंशी तिच्या गुह्यांगात दडलेली असते. योनीची कोरीव कमान आणि आखीव रेखीवता पुरुषाला कामोत्तेजित करण्यात ‘पन्नास टक्के’ सहभाग नोंदवते असाही निष्कर्ष एका पाहणीत आढळून आलेला आहे. म्हणून सेक्स करण्यापूर्वी आपली योनी ‘शेटाळ’ तर नाहीये ना? याकडे स्त्रीने आवर्जून लक्ष द्यावे... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

मैत्री, प्रेम आणि सेक्स...

मैत्री, प्रेम आणि सेक्स...

मुलांची मुलांशीच मैत्री असणे किंवा मुलींची मुलींशीच दोस्ती असणे भारतीय संस्कृतीला निखालस मान्य आहे. परंतु मुलीची मुलाशी होणारी मैत्री मात्र भुवया उंचावणारी ठरते, अशा मैत्रीकडे पूर्वग्रहदूषित नजरेनेच पाहिले जाते, अशी मैत्री म्हणजे सेक्सची पूर्वतयारी होय असा शिक्का आपसूकच मारला जातो...
खरेच असे असते का? मुलांनी मुलीशी मैत्री करावी का? मुलींनी मुलाशी मैत्री करतांना कोणत्या लक्ष्मणरेखा पाळाव्यात? मैत्री आणि प्रेम यातील धूसर सीमारेषा कशी जाणून घ्यावी? प्रेमात पडल्यावर सेक्स अनिवार्य का ठरतो? अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे ठरते. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)मुलांची मुलीशी किंवा स्त्रीची पुरुषाशी होणारी मैत्री समाजाला पुरेशी समजत नाहीच! समाज अशा निर्भेळ मैत्रीला ‘लफडे’ नावाचे गोंडस नाव देऊन मोकळा होतो. तसे पाहिले तर ही मैत्री कोणत्या स्वरुपात पेलली जाते, कोणत्या परिस्थितीत निर्माण झाली आणि मित्र-मैत्रिणीतील मैत्र नेमके कसे आचरण करते यावर ही भिन्नलिंगी मैत्री निर्भेळ ठरवायची की लफड्यात गुंडाळायची हे ठरत असते.
२)मुलींनी मुलांशी मैत्री जरूर करावी. त्यामुळे भावी आयुष्यात पुरुष नेमका कसा वागतो याचा अदमास मुलींना घेता येऊ शकतो. मित्राच्या वागण्या-बोलण्यावरून पुरुष जातीच्या भावभावना, आंदोलने, आचारविचार यांचा अनुभव घेता येऊन आगामी वैवाहिक जीवनात मुलींना नक्कीच चतुरतेने आपल्या पुरुषाचा स्वभाव पटकन जाणता येऊ शकेल.
३)मुलांनीही मुलींशी मैत्री करणे काहीच गैर नाही. त्यायोगे मुलींना कोणत्या समस्या भेडसावतात? त्यांना आधार, आश्रय, प्रेम यांची कशा प्रकारे गरज असते? लांबून भरगच्च दिसणाऱ्या मुली जवळून कशा दिसतात, त्यांना कोणते स्पर्श नकोसे असतात? कोणते हवे असतात? त्यांचे स्वभाव, त्यांच्या जाणीवा-नेणीवा आणि त्यांच्या भावी जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षा कोणत्या असतात? याचे ज्ञान मुलांना करून घेता येते. जेणेकरून पुढील यशस्वी वैवाहिक जीवनात अशा मुद्द्यांची उजळणी करून पुरुष आपल्या स्त्रीला अधिक सुखासमाधानात ठेवू शकतो.
४)स्त्री पुरुष एकमेकांचे स्वभाव, वागणे बोलणे आवडले की एकमेकांकडे आपसूक खेचले जातात. सुरुवातीला मैत्री नामक या नात्याला अनेकरंगी पदर लगडत जातात आणि त्या मैत्रचे इंद्रधनुष्य कधी होते ते समजतसुद्धा नाही. मैत्री आणि प्रेम यात आखलेली लाल रंगाची रेघ कधी गुलाबी होऊन जाते कळत नाही. त्यामुळे जर एखाद्याला/एखादीला ‘त्या’ वाटेने जायचे नसेल तर त्याला/तिला स्पष्ट शब्दांत सांगावे, ‘मला तुझ्याकडून केवळ मैत्रीची अपेक्षा आहे, प्रेमाची नाही आणि सेक्सची तर त्याहूनही नाही.’ बहुदा मुलीच अशा शब्दांत मुलांना खडसावत आल्या आहेत. त्याला पुरुषाच्या सदानकदा ‘रेडी असण्याच्या’ पौरुषी हार्मोन्सचा प्रभाव कारणीभूत ठरतो.
५)विजातीय धृवांमध्ये नेहमीच आकर्षण असते. तसेच भिन्न लिंगांना देखील एकमेकांची ओढ उत्पन्न होणे निसर्गनियमाला धरूनच असते. त्यामुळे स्त्री-पुरुषाची मैत्री ही नेहमीच सेक्सकडे झुकू शकते. एकांतात तर हमेशा ‘तो’ हुरहुरता अनुभव घ्यावाच अशी उचल घेतली जाते. मैत्रीनंतर प्रेम होणे काळ्या दगडावरची रेघ ठरावी इतके नैसर्गिक असते आणि एकदा का प्रेमाच्या भाव भावना मोकळ्या झाल्या की वस्त्रांच्या गाठी मोकळ्या होण्यास फारसा अवधी अजिबात लागत नसतो!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in