Friday 15 December 2017

सेक्स आणि गंध ...

सेक्स आणि गंध ...
सेक्सदरम्यान दरवळणारा मत्त सुगंध स्त्री-पुरुषाला अधिकाधिक उत्तेजित करण्याचे काम करीत असतो. गंध कोणताही असला तरी तो हवाहवासा वाटणारा असला पाहिजे. तसा मदमत्त गंध येताच पूर्वी घडलेल्या मनसोक्त सेक्सची आठवण येऊन कमरेखालच्या गोटात खळबळ माजली पाहिजे! म्हणून प्रत्येक सेक्सच्यावेळी सुगंधित परिमल द्रव्याणि चा यथोचित वापर केल्यास प्रणयरंग यादगार बनून राहतो. गंध रंगाचा असो वा अंगाचा, त्याने ‘काम’भंग व्हायला नको इतकेच महत्वाचे!
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.in
१)स्त्री नेहमीच साजशृंगार करीत असल्याने तिच्या जवळ जाताच वेगळा नकोसा गंध येणं दुरापास्त असतं. मात्र अनेक पुरुष धुम्रपान करून किंवा गुटखा, मसाला खाऊन स्त्रीच्या जवळ जाऊ पाहताच. जवळ येणाऱ्या पुरुषाच्या आधीच त्याचा दर्पयुक्त गंध आल्याने स्त्रीला नकोसे करून सोडतो. त्यामुळे ती पुरुषाला फारसे नजीक येऊ देत नाही, चुंबन घेऊ देत नाही. कर सेक्स आणि हो मोकळा असा तिचा पवित्रा असतो. हा नकारात्मक इशारा समझनेवालोंको काफी है!
२)बेडरूममध्ये जाण्याआधीच जर पुरुषाने स्वच्छ दात घासले तर तोंडाचा येणारा दुर्गंध टाळला जाऊन स्त्रीला अनेक चुंबनांचा प्रसाद देता येऊ शकतो. स्वच्छ अंघोळ करून शरीराचा घामट वास देखील घालवता येत असतो. हे कळत असूनही न वळणारे पुरुष सेक्सची मौज स्त्रीला देऊ शकत नाहीत, आणि स्वतःही घेऊ शकत नाहीत.
३)मुखाची दुर्गंधी दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे मिंटफ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. मिंटचा स्प्रे तोंडात मारला की सगळे दुर्गंध लुप्त होऊन परिमल सुगंध मुखात दरवळू लागतो. अशा साधनांचा निःसंकोच वापर केला जावा ही अपेक्षा.
४) स्त्री स्वतःच्या रूपरंगाची नेहमीच काळजी घेत असते. स्त्री-पुरुष एकत्र येणार असतांना स्त्रीची ‘जय्यत’ तयारी पुरुषापेक्षा कैकपटीने अधिक असल्याचे अनेक पाहणी निष्कर्ष उपलब्ध आहेत. याठिकाणी कमी पडतो तो पुरुष! स्त्रीला डीओचा गंध आवडो न आवडो कोणता का होईना डीओ काखेत, जांघेत पुरुषाने मारलाच पाहिजे. त्यायोगे शारीरिक दर्पापासून मुक्ती मिळते.
५)प्रत्यक्ष कामक्रीडेदरम्यान कमरेखालील अवयवांचे गंध येऊ लागतात. ते टाळण्यासाठी वेळोवेळी शेव्हिंग करणे मस्ट आहे. शिवाय लिंगाला सुगंधित तेल वगैरे चोपडणे देखील वावगे ठरू शकत नाही. आजकाल अनेक गंधाचे चवीचे कंडोम मिळतात. त्यांचा निवडक वापर केल्याने सुद्धा सेक्स यादगार बनून जातो.
--भोगगुरू कामदेव.  Kaavishva.blogspot.com 

सेक्स आणि रस ...

सेक्स आणि रस ...
रस म्हणजे ज्यूस नव्हे! रस म्हणजे चव. जिभेला होणारी जाणीव म्हणजे ‘रस’ होय. सेक्स दरम्यान अनेकदा स्त्री-पुरुष एकमेकांच्या देहाची चुंबने घेत असतात. बहुतेकदा चेहरा, ओठ, मान, पाठ, कंबर, काखा, जांघा या ठिकाणी ओठांचा, जिव्हेचा स्पर्श करीत स्त्री-पुरुष एकमेकांना प्रणयानंद देण्याचा, घेण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी त्या जागेची चव कळत जाते. ती चव किंवा तो शृंगाररस किती उत्तेजक आहे त्यावर पुढील प्रत्यक्ष सेक्सचा डोलारा उभा राहिलेला असतो. म्हणून सेक्स च्या वेळी रस किंवा चवीला महत्व द्यावे लागते.
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.in
१)अनेक पुरुष पानमसाला, गुटखा इ. किक देणारे पदार्थ चघळीत असतात. अशा तीक्ष्ण पदार्थांची तिखट चव स्त्रीला कशी आवडेल बरे? अशा पुरुषांना स्त्री टाळू लागते. किंवा त्यांना तोंडात तोंड घालू देत नाही! परिणामी सेक्स म्हणजे एक ‘उरकण्याचा’ कार्यक्रम ठरून जातो. चुंबने देण्या-घेण्यातील मौज निघून जाते. त्यामुळे जेव्हा स्त्रीशी संपर्क येणार असेल त्यावेळी पुरुषाने तोंडाचा रस जरा गुंडाळूनच ठेवला तर बरे होईल. तोंड स्वच्छ धुवून ब्रश करूनच स्त्रीचे चुंबन घ्यावे.
२)प्रणयक्रीडा दरम्यान पुरुषाला स्त्रीचे कोनेकोपरे चाखावेसे वाटू शकतात. स्त्री स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असल्याने तिचे अंगप्रत्यंग फारच चविष्ट लागतात! याउल पुरुष जरा कंटाळा करतो म्हणून त्याच्या काखा- जांघेला उग्र किंवा घामट चव असू शकते. त्यामुळे स्त्री पुरुषाचे कोनेकोपरे चाखीलच असे नाही. हे टाळण्यासाठी पुरुषाने नियमित काखेतील, जांघेतील केस सफाचट करून तयारीतच असावे लागते. सेक्सपूर्वी साबण लावून चोळूनमोळून अंघोळ केली तर स्त्रीला घामट चव लागणार नाही व ती पुरुषाचे अंगप्रत्यंग चाखण्यास आतुर होईल.
३)मुख मैथुन या प्रकाराबद्दल मागे एका लेखांकात वर्णन आलेले आहेच. येथेही जननेंद्रिये चुषण करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तेथील चव कशी आहे यावर सर्वकाही अवलंबून राहते. स्त्री व्यवस्थित उत्तेजित झाली की तिच्या योनीतून कामसलील स्रवू लागल्याने ओलसरपणा येऊ लागतो. हा पाझर चाखण्याला पुरुष हपापलेला असू शकतो. नव्हे तो त्याच्या आवडीचा भागच असतो म्हणाना! निसर्गातही आपण पाहतो अनेक नर माद्यांचे गुह्यांग चाटतांना उत्तेजित होत जातात. तसेच पुरुष जेव्हा स्त्रीच्या ओलसर योनीची जिभेने चव घेत जातो तेव्हा तेव्हा तो कमालीचा उद्दीपित झाल्याचे निष्कर्ष सेक्सतज्ञ नोंदवतात. स्त्री स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असल्याने तिने अगोदरच शेव्हिंग करून डीओ वगैरेचा वापर करून आपल्या गुह्यांगाचा दर्प घालवलेला असतो.
४)स्त्रीला पुरुषाच्या शिस्नाची गोडी लागते हे पोर्नफिल्म मध्ये बिंबवतात तसे प्रत्यक्षात असत नाही. मुळात पुरुषाच्या लिंगाला असणारी बोंबलाची चव स्त्रीला मुळीच आवडत नसते. एखादा पुरुष जागरूक असेल तर तो शेव्हिंग, डीओ वापरून चव घालवू शकतो. सगळेच असे वागतात असे नाही. शिस्नमुंडाच्या भोवती व लिंगचर्माखाली पांढरा साका जमा होत असतो, जो अतिशय खारट तुरट चवीचा असतो. तो वेळोवेळी साबणाने स्वच्छ करून धुणे अगत्याचे असते. पुरुषाचे ‘अतिस्वच्छ’ लिंगच स्त्रीला चूषण करायला आवडते. अन्यथा ती मुखमैथुनाला राजी होत नाही.
५)काही स्मार्ट पुरुष चवदार कंडोमचा मार्मिक वापर करून स्त्रीला आईस्क्रीम खाण्याचा अनुभव देतात! वेगवेगळ्या चवीचे, रंगाचे, गंधाचे कंडोम उपलब्ध असतात. त्यांचा पुरुषाने खुबीने वापर केल्यास स्त्री लगेच मुखमैथुनाला राजी होऊ शकते. एखाद्या कंडोमचा ‘रस’ जर स्त्रीला भावला तर ती नेहमीच त्या ‘चवीची भोक्ती’ होते हे पुरुषाने जाणून असावे!
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.com  

सेक्स आणि रूप ...

सेक्स आणि रूप ...
‘रूप’ म्हणजे दिसणे, दाखवणे आणि पाहणे या क्रिया होत. सेक्स दरम्यान या तिन्ही क्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. पहिल्या प्रथम स्त्री–पुरुष एकमेकांना कसे दिसतात, एकमेकांना कसे पाहतात, आपले अवयव एकमेकांना कसे दाखवतात यावर यशस्वी सेक्सचा पाया ठरत असतो. एकेमकांची ओढ निर्माण होण्याला पहिले कारण एकमेकांचे दिसणारे, जाणवणारे आणि दर्शविले जाणारे ‘रूप’ होय. याचे काही नियम आहेत का हे पुरुषाने जाणून घेणे गरजेचे असते. स्त्री तर कोणत्याही परिस्थितीत उत्तेजक द्रव्यच असते म्हणा, परंतु पुरुषाने काय करावे जेणेकरून स्त्री त्याच्या रूपावर भाळली जाईल, तिला त्याच्या रुपाची ओढ वाटेल आणि आपले रुपडे कसे प्रदर्शित करावे म्हणजे स्त्री आपसूक जवळ येईल याचे ज्ञान पुरुषाने आत्मसात केले पाहिजे.
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.in 
१)मूलतः पुरुषाचा चेहरा आश्वासक, हसरा, प्रसन्न आणि बोलका असला पाहिजे. मख्ख, ओढलेल्या, तणावग्रस्त, चिंतातूर, मरगळलेल्या चेहऱ्याने स्त्रीला सामोरे जाल तर ती हमखास तोंड फिरवेल हे पुरुषाने लक्षात ठेवावे. तसेच चेहऱ्यावरील श्मश्रू, दाढी सफाचट असणे आवश्यक आहे. चेहऱ्याला साजेशी केशभूषा असावी. उगाचच भणंगासारखे मजनू बनून दाढी टोकरीत स्त्रीला भेटायला जाऊ नये. वाढलेल्या दाढी-मिशांची स्त्रीला किळस वाटते. पण एक नक्की वाढलेली दाढी मिशा व्यवस्थित ट्रीम केल्या असतील आणि चेहऱ्याला शोभत असतील तर स्त्रीला देखील आवडू शकतात.
२)पुरुषाचे व्यक्तिमत्त्व भारदस्त नसले तरी चालले पण बेंगरूळ असू नये. शरीरयष्टी सिक्सपॅक्स ची नसली तरी चालेल पण चालण्यात रुबाबदारपणा असावा. कपडे नवेकोरे नसले तरी चालतील पण उपलब्ध आहे तेच शरीराला साजेसे, स्वच्छ, इस्त्री केलेले असावेत. अतिशय ढगळ किंवा कमालीचे दाटके कपडे परिधान करू नयेत. आपले बुजगावणे होऊ नये याची काळजी पुरुषाने घेतली पाहिजे. म्हणतात ना- फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन.
३)ज्यावेळी स्त्री-पुरुष बेडवर असतात, त्यावेळी पुरुषाला आपले ताठरलेले लिंग कधी एकदा स्त्रीच्या पुढ्यात ठेवून तिला त्याचे दर्शन घ्यायला लावतो असे झालेले असते. पण पुरुषाने एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की स्त्रीला ताठरलेल्या लिंगाचे रुपडे न्याहाळण्यात अजिबात रस नसतो, ती पुरुषाच्या प्रणयक्रीडेची भुकेली असते. थेट शेवटी प्रत्यक्ष संभोगाचे वेळीच तिला ताठरलेले लिंग हाताळण्यात मौज वाटते.
४)पोर्नक्लिप मध्ये पाहून पुरुषालाही वाटू लागते की स्त्रीला शिस्न हातात घेणे, ओठावर ठेवणे, चूषण करणे आवडत असते. परंतु वास्तवात तसे नसते. त्यामुळे शिस्नाचे केवळ दर्शन होण्याने स्त्री कधीच उत्तेजित होत नाही. एक मात्र नक्की ज्यावेळी स्त्री कमालीची उत्तेजित झालेली असते, तेव्हा ती पुरुष म्हणेल तसे करण्यास उद्युक्त होत असते. अशावेळी स्त्री पुरुषाचे शिस्न कौतुकाने पाहू शकते, हाताळते किंवा चूषण करू धजते.
५)ज्यावेळी स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या देहाची ओढ लागून राहते, आणि स्त्रीला उत्सुकता म्हणून पुरुषाचे ताठरलेले लिंग कसे असेल हे पाहण्याची अनिवार ओढ लागते तेव्हा मात्र पुरुषाने कोणताही आडपडदा न ठेवता तिला आपले लिंग वरून खालून, इकडून तिकडून, या बाजूने त्या बाजूने पाहून द्यावे, हाताळू द्यावे. तत्पूर्वी पुरुषाने लिंगाच्या आजूबाजूचे केस व्यवस्थित काढलेले असावेत. गुळगुळीत शेव्हिंग केलेले शिस्न दिसण्यात अधिक रेखीव असते. स्त्रीला शेव्हिंग केलेल्या शिस्नाचे रुपडे अधिक भावते असे एका पाहणीत आढळून आलेले आहे.
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.in  

सेक्स आणि स्पर्श...

सेक्स आणि स्पर्श...
सेक्स करण्यापूर्वी एकमेकांना केले जाणारे स्पर्श उत्तेजित करण्यास तसेच कामानंद मिळविण्यास उपयुक्त असतात. असे स्पर्श झाले नाही तर विशेषतः स्त्रीला सेक्सचा फार त्रास वाटू लागतो. त्यामुळे स्त्रीच्या दृष्टीने तिला मैथुनपूर्व होणारे पुरुषी स्पर्श अतिशय महत्वाचे ठरतात. प्रणयक्रीडेमध्ये पुरुषाने स्त्रीला यथोचित केलेले स्पर्श तिला भावविभोर होण्यास उद्युक्त ठरतात. हे स्पर्श कोठे कसे आणि किती प्रमाणात करावेत याचे ज्ञान प्रत्येक पुरुषाला असावयास हवे. अन्यथा बोट लावीन तिथं गुदगुल्या व्हायला लागल्यावर सेक्सस्फोट होण्याऐवजी हास्य स्फोट व्हायचे! 
--भोगगुरु कामदेव  kaamvishva.blodspot.in
१)स्त्रीला आलिंगन देऊन मिठीत घ्यावे. मिठी हळूवार असावी, उगाचच गच्च पकडून ठेवत पुरुषाने आपले शक्तिप्रदर्शन नको तिथं पाजळू नये. तिला जितक्या प्रेमाने मिठीत घ्याल तितकी जास्त ओढ तिला लागून राहील.
२)थेट ओठांचे चुंबन घेणे टाळावे. कारण स्त्रीचे ओठ हा अवयव जरी पुरुषाच्या आवडीचा असला तरी स्त्रीला ओठांच्या चुंबनापेक्षा तिच्या गालांवर, मानेवर, गळ्यावर, गळ्याच्या खाली, पाठीवर, पोटावर, कमरेवर होणारे चुंबनवर्षाव अधिक कामोत्तेजीत करतात.
३)चुंबनाची पद्धत फुलांना जसे हळूवार आणि अलगद चुंबतात तशी असावी. घाईगडबड, अवास्तव जोरकसपणाने घेतलेले चुंबन स्त्रीला आवडत नाही. स्त्री पुरेशी उत्तेजित झाल्यावर आपोआप ओठांचे चुंबन घेण्याचा इशारा देते. मगच पुरुषाने ओठांच्या चुंबनाची कला दाखवावी.
४)बोटांनी स्त्रीच्या अनावृत्त भागावर कलात्मक नक्षी रेखाटल्यास तिच्या अंगावर कामोत्तेजक रोमांच उभे राहू लागतात. हा इशारा वेळीच ओळखून तिची वक्षस्थळे नाजूकपणे स्पर्शावीत. स्त्रीचे उरोज पुरुषाला अधिकाधिक उत्तेजित करण्याचे साधन असल्याने तो बराच वेळ ओठांनी बोटांनी स्तनचुचूक, स्तनमंडले स्पर्शून तिला अधिकाधिक उत्तेजित करू शकतो.
५)महत्वाचे म्हणजे स्त्रीला वरीलप्रमाणे स्पर्श करून झाल्याशिवाय पुरुषाने कधीही स्त्रीच्या योनीला हात लावू नये. काही पुरुष पहिलाच स्पर्श स्त्रीच्या गुह्येन्द्रीयाला करतात आणि तिचा रोष ओढवून घेतात. वरीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने कृती केल्यास स्त्रीच्या योनीत कामसलील स्रवू लागल्याने ती स्वतःच योनिकडे इशारा करू लागते. मगच स्त्रीच्या ओलसर योनीला पुरुषाने आपल्या ताठरलेल्या शिस्नाचा तिला हवा तसा स्पर्श करीत तिला कामतृप्त करून सोडावे.
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.com