Thursday 5 January 2017

वेश्यागमनातील त्रूटी आणि धोके...

वेश्यागमनातील त्रूटी आणि धोके...

प्रत्येक पुरुष एकदा तरी वेश्यागमन करतो किंवा करू पाहतो. वेश्येकडे जावे लागण्याला अनेक कारणे असतात. त्याचा ऊहापोह मागील एका लेखांकात केलेला आहेच. वेश्याव्यवसाय हा एक धंदा असल्याने त्यात व्यवहार हा असतोच. तारुण्यातील उन्मादक स्थिती मूळ पदावर आणण्यासाठी वेश्यागमन हा पर्याय उपलब्ध असला तरी त्यात अनेक त्रूटी आणि धोके लपलेले असतात हे पुरुषाने लक्षात घेतले पाहिजे.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)काही पुरुष यौवनाची नशा जोखण्यासाठी वेश्यागमन करतात. परंतु वेश्येशी येणारा शारीरिक संबंध हा क्षणिक असल्याने स्वतःचे पुरुषत्व सिध्द करण्याची कसोटी ठरू शकत नाही. वेश्यागमन हा व्यवसाय आहे सेक्ससंबंधी शिक्षण मिळण्याचे ठिकाण नाही. त्यामुळे सेक्स शिकायला मिळले या भ्रमात राहून वेश्यागमन करणे चुकीचे ठरेल.
२)वेश्येकडून मिळणारी सर्व्हिस ही तुम्ही ‘किती’ पैसे मोजता त्यावर अवलंबून असते. कितीही पैसे ओतले तरी शेवट पुरुषाची पर्यायाने ग्राहकाची विर्यच्युती हाच असतो! त्यामुळे संबंधित युवती कामानंद देण्याचा प्रयत्न करतेय असे दाखवून पुरुषाला पटकन नामोहरम करण्याच्या हेतूने यांत्रिकवत संभोगक्रिया उरकू पाहते. त्यामुळे ही घाईची मिरवणूक वेळेअभावी लवकरच विसर्जित करण्याचा धोका संभवतो!
३)गुप्तरोगांची लागण होण्याच्या अनेक शक्यता वेश्यागमन केल्याने संभवतात. हे तर सर्वश्रुतच आहे. त्यावरील उपाययोजना हा चर्चीण्याचा उद्देश नाही. परंतु केवळ कामलालसा शमविण्याच्या नादात पुरुष मोठे धोके पत्करत असतात हे लक्षात घेणे जरुरीचे आहे.
४)पुरेसा वेळ देऊन पुरुषाला कामतृप्त केले जात नाही ही या व्यवसायातील मोठी त्रूटी आहे. पटकन कपडे काढायला लावून झटकन लिंग हाताळून विर्यस्राव करवून देणे म्हणजे पैसे फिटले असे होत नाही. अशी कृती करून मिळणारा क्षणिक कामानंद तर स्वतः पुरुष हस्तमैथुन करुनही मिळवू शकतोच की!
५)जास्त वेळ कामक्रीडा करायला जास्त पैसे मोजावे लागतात. तसेच देखणी, कमनीय, हाय प्रोफाइल, नटी, हिरोईन यांचे रेट वेगळे आणि भरमसाठ असतात. मागेल तितक्या नोटा मोजून हिरोईनकडून तशीच ‘दिलनशी सर्व्हिस’ मिळेलच याची काही शाश्वती देता येत नाही. शिवाय वेश्यागमन हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा असल्याने ‘रेड’ पडण्याची टांगती तलवार धंदा करणाऱ्यांवर तसेच ग्राहकावरही असतेच असते!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

स्त्रीचा ‘फुल्ल बॉडी’ मसाज...

स्त्रीचा ‘फुल्ल बॉडी’ मसाज...

मसाज सेंटरचे अनेक नामांकित शहरातून मोठे पेव फुटले आहे. कोपऱ्याकोपऱ्यावर अशी झगमगीत दुकाने चकचकीतपणा थाटून सजलेली आढळतात. पुरुषांचे जसे मसाज सेंटर असतात, तसेच स्त्रियांसाठीसुद्धा असतात. पुरुषांचा मसाज जशा तरूण पोरी करवून देण्याची सोय’ असते तद्वत स्त्रीचा मसाज तरूण आणि बलदंड पुरुषांकडून करवून देण्याची ‘सोय’ केलेली असते! मसाज मध्ये अनेकविध प्रकार सुचविलेले असले तरी फुल्ल बॉडी मसाज जास्त प्रचलित होण्याचे कारण काय? नेमका काय प्रकार असतो?
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)धावपळीचे जीवन, व्यायामाचा अभाव, शरीरात येणारा सुस्तपणा, आलस्य दूर करण्यासाठी शरीराची मालिश करणे, अंग रगडून घेणे हा प्रकार फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. फरक इतकाच की तो आता स्त्रियांसाठीही पॉश केबिनमध्ये साजरा करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे.
२)कोणत्याही प्रकारच्या मालीशने शरीरातील रक्ताभिसरण वाढते. त्यायोगे त्वचा टवटवीत आणि तजेलदार तर होतेच शिवाय शरीरात उत्साह व मोकळेपणा संचारतो. मात्र स्त्रीचा फुल्ल बॉडी मसाज हा प्रकार काहीसा कामविषयाकडे झुकणारा आहे.
३)या प्रकारच्या मसाजमध्ये अर्थातच एक अथवा दोन वस्त्रे अंगावर ठेऊन शरीराची तेल मालिश केली जाते. नखशिखांत त्वचा रगडून घेणे आणि ‘मोकळे’ होणे हे इप्सित या फुल्ल बॉडी मसाजने साध्य केले जाते. हा मसाज तरुण पुरुषाकडून करवून घेण्यात वेगळीच मौज आहे हे अनेक स्त्रिया खाजगीत मान्य करतात!
४)मागील अनेक लेखांकात सांगितल्याप्रमाणे स्त्रीची कामोद्दीपित करणारी केंद्रे सर्व शरीरभर विखुरलेली असल्याने त्यांना विशिष्ट पद्धतीने ‘स्ट्रोक्स’ देऊन चेतविणे हेच खरे ‘काम’ या फुल्ल बॉडी मसाजने साध्य होते!
५)या मालिश मध्ये प्रत्यक्ष सेक्स घडत नसला तरी सेक्सशी संबंधित कामभावना उद्दीपित होऊन स्त्रीला पुलकित करवणारा अनामिक आनंद प्राप्त होत असतो. तो कामानंदच आहे हे स्त्रीला ठोसपणे जाणवत नाही. परंतु स्त्रीला फुल्ल बॉडी मसाजची ‘ओढ’ लागून राहते हे मात्र नक्की!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

पुरुषाचा थंड प्रतिसाद...

पुरुषाचा थंड प्रतिसाद...

स्त्री सेक्ससाठी अधीर झालेली असतांना पुरुष इंटरेस्ट घेत नाही. त्याला सेक्स नको असतो. वास्तविक पाहता पुरुष स्त्रीच्या आधीच उत्तेजित असावयास हवा परंतु काही पुरुषांच्या बाबतीत असे घडत नाही. ते स्त्रीला टाळू पाहतात. स्त्रीशी संग करू इच्छित नाहीत. असे का घडते. पुरुषाची कामोत्तेजना स्त्री पेक्षा अधिक असूनही तो ऐनवेळी पडती बाजू का बरे घेत असेल? याचा ऊहापोह या लेखांकात होईल... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)काही पुरुषांवर घरात कोणीच पुरुष नसल्याने यथोचित कामसंस्कार होतच नाहीत. त्याच्या आजूबाजूला सर्व स्त्रियाच असल्याने आणि इतर मित्रांमध्ये न मिसळल्याने त्याला काम संज्ञेचा विसर पडतो. नकळत त्याचे वागणे बोलणे स्त्री सारखे होते. आपण पुरुष असून आपल्या लिंगाचे कार्य नेमके काय हेच त्याला उमजलेले नसते. असा पुरुष विनाकारण तृतीयपंथी गणला जातो!
२)काही पुरुषांवर अध्यात्मिक संस्कारांचा जबरदस्त पगडा पडतो. घरातील अध्यात्मिक वातावरण त्याला कामविषयक माहिती घेण्यास किंवा त्याच्यासंबंधी इतरांशी बोलण्यात अटकाव येतो. सेक्स करणे महापाप असल्याचे बिंबवले गेल्याने तो त्या कृतिशी फटकून वागू पाहतो. त्यामुळे तो कोणत्याच स्त्रीला कामप्रतिसाद देऊ शकत नाही.
३)ब्रह्मचर्य हेच जीवन वीर्यनाश म्हणजे मृत्यू हे वचन काही पुरुष मनाशी बांधून ठेवतात. ते कधीच संभोग करून वीर्यनाश करवून घेण्याच्या फंदात पडत नसतात. ही निराधार आणि अशास्त्रीय संकल्पना गोंजारण्यातच त्यांना स्वारस्य असते. इतरांनी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते सांगणाऱ्यालाच वेड्यात काढतील!
४)काही पुरुषांना वयात येतांना रात्रीच्या झोपेत ‘वीर्यस्राव’ होण्याची सवय होते. वर्तमानपत्रातील अनेक जाहिरातींतून या लक्षणाला ‘स्वप्नदोष’ असे संबोधल्याने तो पुरुष हताश होतो. काही पुरुषांना हस्तमैथून करून कामसुख मिळविण्याची गरज वाटते. या क्रियेला देखील ‘तरूणपणतील चूक’ असे संबोधल्याने पुरुष बावचळून जातो. आपल्याला हे आजार झालेलेच आहेत ही खुणगाठ मनाशी बाळगून जेव्हा तो स्त्रीच्या सहवासात येतो तेव्हा त्याच्या पूर्वानुभवामुळे पटकन विर्यच्युती होऊन जाते आणि तो स्वतःला ‘शीघ्रपतन’ झाल्याचे समजू लागतो. असे का होतेय याचे शास्त्रीय ज्ञान कोणीही व्यवस्थित देत नसल्याने तो स्वतःच्याच कोषात गुरफटला जाऊन स्त्रीच्या सेक्स विषयक मागणीला थंड प्रतिसाद देतो.
५)काही पुरुष आपल्याला सेक्स जमेल की नाही या विवंचनेत सापडतात. याचे उत्तर शोधण्यासाठी ते वेश्यागमनाचा पर्याय निवडतात. वेश्याव्यवसाय हे काही सेक्स शिकवण्याचे केंद्र नसून तो एक धंदा असल्याने तिथे उरक आणि फूट असा खाक्या असतो. त्याठिकाणी जाऊन पुरुषाचा भ्रमनिरास झालेला असतो आणि आपल्याला जमणारच नाही या निष्कर्षाप्रत तो येऊन ठेपतो. परिणामी बेडवर प्रणयचेष्टा करण्यात स्वतः पुढाकार घेणाऱ्या स्त्रीला तो कामप्रतिसाद देऊ शकत नाही.
वरील कारणांचा निपटारा केला की पुरुषाच्या थंड प्रतिसादाची समस्या सुटू लागते. स्वप्नदोष ह दोष नसून एक नैसर्गिक फ्युज आहे हे लक्षात घ्यावे लागेल. कामसंज्ञेची पातळी वाढली की विर्यच्युती होणारच असते. लोड वाढला की फ्युज उडणारच ठरला! हस्तमैथून सुद्धा कधीच वाईट नसते. शीघ्रपतन देखील फार मोठी आणि सुटू शकणार नाही अशी समस्या आहे हे पुरुषाने मनातून पुसून टाकले तर तो स्त्रीला यशस्वी कामप्रतिसाद देऊ लागतो.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

स्त्रीचा थंड प्रतिसाद...

स्त्रीचा थंड प्रतिसाद...

कधी कधी पुरुष इतका उत्तेजित झालेला असतो की त्याला लगेच सेक्स हवा असतो. परंतु स्त्री पटकन राजी होत नाही. मग त्याचा हिरमोड होऊन जातो. स्त्रीला कसे तयार करावे या विचारात गुंतल्याने त्याचे शिस्न शिथिल पडते, त्याची कामेच्छेची नशा उतरू लागते. पुरुष या प्रसंगी स्त्रीला फ्रीजीड अथवा थंड प्रतिसादाची म्हणून हिणवतो... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)मूळातच स्त्रीची कामेच्छा पुरुषाला तयार करावी लागते. प्रणयाराधन, प्रणय, चेष्टा, कायिक-वाचिक जोक्स, रोमान्सने ओतप्रोत असलेली आणि ऐकवणे अशा उपायांनी तो स्त्रीला सेक्ससाठी उत्तेजित करू शकतो.
२)स्त्रीच्या मागे अनेक विवंचना लागलेल्या असल्याने पुरुषाला नेहमी नेहमी सेक्सच हवा असतो, दुसरे काही सुचतच नाही जवळ आलं की... अशी टिपण्णी स्त्री करू लागते. सेक्ससाठी स्त्री मनातून तयार नसल्याने ती कामोद्दीपित होत नाही किंवा पुरुषाच्या कामोत्तेजक स्पर्शाला थंड प्रतिसाद देते.
३)स्त्रीची कामलालसा तिच्या वयाच्या तिसाव्या वर्षी आणि त्यानंतर अधिक वाढल्याचे दिसून येते. चाळीशीनंतर स्त्रीचा प्रतिसाद थंडावू लागतो. मासिकधर्म सुरु असतांना देखील पूर्वापार चालत आलेल्या आणि मनावर कोरल्या गेलेल्या रुढी-परंपरांच्या ओझ्यामुळे ती पुरुषाला कामप्रतिसाद देत नाही.
४)काही स्त्रियांवर आवश्यक ते कामविषयक संस्कार झालेले नसतात. सेक्स करणे आवश्यक आहे, शरीराची गरज आहे हेच स्त्रीला मान्य नसते. काही स्त्रिया सेक्स म्हणजे घृणास्पद कृती समजतात. अशा स्त्रिया आयुष्यभर फ्रीजीड लक्षणाने ग्रासलेल्या आढळतात. या स्त्रिया पुरुषाला पुरेसे कामसुख देऊ शकत नसल्याने बहुदा त्यांचा संसार पूर्णत्वास जातच नाही.
५)वयाच्या पन्नाशीनंतर आणि रजोनिवृत्ती झाल्यानंतर योनीत कामसलील स्रवण्याचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे संभोग कष्टप्रद ठरतो. म्हणून स्त्री कामप्रतिसाद देत नाही. याशिवाय मुले-बाळे, नातवंडे आणि इतर जबाबदाऱ्या वाढल्याने, तसेच एकांताचा अभाव असल्यानेदेखील ती पुरुषाच्या जवळ येऊ इच्छित नसते.
अशा थंड प्रतिसाद देणाऱ्या स्त्रीला बोलते करून नेमके कारण शोधून त्यावर उपाय योजना करण्याची जबाबदारी पुरुषावर येते. काही दिवस स्त्रीला ट्रीपला नेऊन एकांतात वरील कारणांचा शोध घ्यावा. योनीमार्ग शुष्क असल्यास ल्युब्रीकंट जेलीचा उपयोग करता येईल. पोर्नक्लिप्स दाखवून स्त्रीला कामोद्दीपित करता येऊ शकते...
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

कामपिपासूपणा...

कामपिपासूपणा...

व्यक्तीच्या मनी-ध्यानी नेहमी काम-विषयक भावना बळावत राहून ती नेहमीच उत्तेजित अवस्थेत असणे म्हणजे कामपिपासूपणा म्हणता येईल. काही व्यक्ती कोणताही विषय सारखा सारखा कामविषयाकडे वळवू पाहतात. काही व्यक्ती इतर व्यक्तींच्या कोणत्याही वाक्याला द्विअर्थी घेतात किंवा सदरहू वाक्य द्विअर्थी आहे असे संबोधून गालात्तल्या गालात हसत राहतात. सदानकदा ब्ल्यू फिल्म पाहणे, कामोत्तेजक साहित्य वाचणे, पोर्नक्लिप्स पाहणे, त्या इतरांना पाठविणे या सर्व कृती कामपिपासू व्यक्तींच्या बाबतीत घडतात. जोडीदाराला सेक्सचा वीट येईल कंटाळा येईल इतक्यावेळा सेक्स करीत राहणे, सेक्ससाठी नेहमीच उत्तेजित राहणे ही लक्षणे देखील कामपिपासू सदरात येतात.हे योग्य आहे की अयोग्य याचा विचार करावा लागेल... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाची कामलालसा स्त्रीच्या सहापट अधिक असल्याने बहुदा कामपिपासू संज्ञा पुरुषालाच लागू पडते. स्त्री कायम कामोत्तेजित राहू शकत नसते. तसेच तिची कामोत्तेजक केंद्रे सर्वांगीण असल्याने स्त्री बऱ्याचदा कामविषयक वाक्यांना थंड प्रतिसाद देते.
२)पुरुष सदानकदा कामलालसा जपून ठेवत असतो. एखादी मादक स्त्री किंवा कमनीय ललना दृष्टीस पडता तो पटकन कामोत्तेजित होऊ शकतो. त्या देखण्या स्त्रीशी रत होण्याचे स्वप्न तो पाहू लागतो. ती ललना किती उन्मादक आहे याचे वर्णन मित्रमंडळीत चर्चेला घेतो.
३)कामपिपासू पुरुष चटकन कामोत्तेजित होतात तसेच पटकन विर्यच्युत देखील होतात. म्हणजेच कामपिपासू पुरुषांचा सेक्सड्राईव्ह कमालीचा वेगवान असतो. असे पुरुष शीघ्रपतन, स्वप्नदोष या कामसमस्यांच्या लक्षणांनी घेरले जातात.
४)प्रत्येक गोष्टीला काळवेळ, ठिकाण असते. चारचौघांत प्रत्येक विषय कामसंज्ञेकडे वळवीत नेणे चुकीचे ठरते. अशा कामपिपासू पुरुषापासून इतर व्यक्ती चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. स्त्रिया या पुरुषांना टाळू लागतात.
५)कामपिपासू व्यक्ती कधीच षंढ असत नाही, ती नेहमीच कामोत्तेजित असते. मात्र पुरुषांना शिस्नाचे ताठरपण टिकवून ठेवण्यात कुठलाच धरबंध उरत नाही आणि केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा कामपिपासू पुरुष प्रत्यक्ष संभोगाच्या वेळी मात्र गलीतगात्र ठरतो!
–भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

Tuesday 3 January 2017

लैंगिक कोंडमारा...

लैंगिक कोंडमारा...

एखाद्या व्यक्तीला मग ती स्त्री असो वा पुरुष जर कामेच्छा निर्माण झाली आणि काही कारणास्तव ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही तर व्यक्तीमध्ये उद्भवणाऱ्या मानसिक अवस्थेस लैंगिक कोंडमारा म्हणता येईल. स्त्रीची कामेच्छा निर्मिती संथ प्रकारची असते तर पुरुषाची कामेच्छा वेगवान आणि प्रबळ असते. बहुदा पुरुषाची सेक्सची इच्छा चटकन पेटून उठते तर स्त्री त्याच्या कामेच्छेला तत्काळ प्रतिसाद देऊ शकेलच असे नाही. योनीत पुरेसे कामसलील स्रवले नसेल तर पुरुषाच्या इच्छेला मान देऊन घडणारा संभोग कष्टप्रद होतो, त्यात स्त्रीला रस वाटत नाही, लिंगाचा योनिप्रवेश वेदनादायी होतो आणि असा बळजबरीचा संभोग सम्यकभोग न राहता केवळ उपभोग ठरतो. स्त्रीची म्हणावी तशी साथ न मिळाल्यामुळे पुरुष वीर्यच्युती करून बाजूला होतो, मात्र स्त्री अधुरीच राहते, अतृप्त राहते, तिची कामेच्छा पूर्ण न झाल्याने तिचा लैंगिक कोंडमारा होत राहतो. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)वयात येतांना पुरुषाला सेक्सची पुरेशी ओळख होण्याआधीच त्याचे वीर्यपतन झालेले असते. वीर्यस्रावासाठी योनीची साथ लाभल्यास आत्यंतिक उच्च कामसुख प्राप्त होते हे पुरुषाला समजलेले नसते. त्यामुळे कामेच्छा निर्माण झाली की तो हस्तमैथून करून आपला कामानंद प्राप्त करून घेतो. त्यामुळे या नवख्या वयात पुरुषाचा लैंगिक कोंडमारा होणे संभवत नाही.
२)वयात आलेली स्त्री प्रत्येक बाबीत फारच चोखंदळ असल्याने एखादा पुरुष आवडला तरी त्याचे प्रेम, शाश्वत आधार या गोष्टी ती आवर्जून तपासते. सेक्स ही फार शेवटी घडणारी घटना ठरते. पुरुषाच्या सहवासात ती सेक्सच्या बाबतीत बरीच उदासीन असते. ती हस्तमैथुन अजिबात करीत नसते. पुरुषाइतकी तिला प्रबळ कामेच्छा निर्माण होईलच असेही नाही. त्यामुळेही तिचा लैंगिक कोंडमारा होत नसतो.
३)जेव्हा स्त्री-पुरुष परस्पर संमतीने सेक्स करतात, तेव्हा तो त्यांच्या प्रेमाचा खरा उत्सव असतो. तो प्रणय, ती कामानुभूती, ती कामतृप्ती ते दोघेही अनुभवतात आणि त्यांच्या लक्षात येते की शिस्न-योनीच्या संयोगातून लाभणारी तृप्तीची मौज काही औरच आहे. मग इथून पुढे सुरु होतो तोच अनुभव पुन्हापुन्हा घेण्याचा अट्टहास!
४)हाच क्षण महत्वाचा असतो. वेळोवेळी आणि कामेच्छा निर्माण झाली की सेक्स करायला अवसर मिळेल अशी तजवीज करण्यासाठी धडपड करावी लागते. कधी एकांत नसतो, तर कधी स्त्री तयार नसते. कधी पुरुष मूडमध्ये नाही येत तर कधी स्त्री थंड प्रतिसाद देते... अशा अनेक कारणांनी अपेक्षितवेळी संभोग होत नाही. पुरुष मग हस्तमैथून करून क्षुधा शमवण्याचा प्रयत्न करतो परंतु दुधाची तहान ताकावर कशी भागेल? कडकडीत उन्हातून आल्यावर थंड पाण्यानेच तृष्णा शमेल उष्ण जलाचे प्रयोजनच फसेल! तसेच हस्तमैथुनामुळे पुरुषाला लाभणारी कामतृप्ती ही योनीतील लिंगप्रवेशानंतर मिळणाऱ्या कामतृप्तीपेक्षा कमी प्रतीची असते!
५)काही प्रसंगी स्त्री फारच उतावीळ होऊन पुरुषाला छेडू लागते. तो व्यवस्थित रेडी असेल तर ठीक नाहीतर घडणारा संग हा एकांगीच ठरण्याचा संभव असतो. घाईगडबडीत होणारा संभोग पुरुषाचे शिघ्रपतन घडविण्यास कारणीभूत ठरतो. त्याची क्षणात विर्यच्युती होऊन जाते, लिंग शिथिल पडते  आणि नेमक्या याचवेळी स्त्री कामोत्तेजीत झालेली असल्याने अतृप्त राहते. तिचा लैंगिक कोंडमारा होण्यास प्रारंभ होतो. ती चिडचिडी आणि असमाधानी बनते. कामेच्छा अतृप्त राहिल्याने तिचे कशातच लक्ष लागत नाही. कामतृप्तीसाठी स्त्री पुरुषावर अवलंबून असल्याने तिचा लैंगिक कोंडमारा प्रकर्षाने जाणवू लागतो.
यावर एकच उपाय म्हणजे तारुण्यात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा सेक्सचा आनंद स्त्री-पुरुषांनी घेतला पाहिजे. पुरुषाने स्त्रीची कामतृप्ती होईल याकडे विशेष लक्ष देऊन प्रणयाची वेळ प्रत्यक्ष संभोगापेक्षा जास्त कशी असेल याचे नियोजन करावे.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blospot.in 

बहुपत्नीत्व...

बहुपत्नीत्व...

भूतपूर्व कथानकांमध्ये एका राजाला अनेक पत्नी असतात असे उल्लेख आढळतील. एकपत्नीत्व जपण्याची अट पाळण्याचा हिंदू विवाह कायदा अमलांत येईतो अनेक पुरुषांना अनेक स्त्रिया पत्नी या नात्याने घरी ‘ठेवण्याची’ मुभा मिळाली होती. निसर्गात हेच आढळून येईल की एका नराला अनेक माद्यांशी संग करावा लागतो. चराचरातील कोणताही नर हा बहुपत्नीत्व निभावत असतो. मानवप्राण्याच्या बाबतीतच हा विरोधाभास किंवा एकपत्नीत्व जपण्याचा अट्टाहास का आणि कशासाठी? कायद्याला पळवाटा असतातच, त्यानुसार पुरुष आयुष्यभरात पत्नीव्यतिरिक्त इतर कोणतीच स्त्री उपभोगणार नाही याची शाश्वती देता येत नाही. नव्हे अनेक स्त्रिया उपभोगण्याचा पुरुषाचा नैसर्गिक हक्कच आहे! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)मागील अनेक लेखांकात उल्लेख केल्या प्रमाणे पुरुषाची कामोत्तेजना स्त्रीच्या तुलनेत सहापट अधिक असल्याने तो त्वरित कामोत्तेजीत होऊ शकतो. तसे स्त्रीचे नाही. तिला उत्तेजित करण्यास बरेच कसब लावणे भाग पडते. त्यामुळे पुरुषाला जी स्त्री आधी रिस्पोन्स देईल तिच्याकडे तो आकृष्ट होणे साहजिक आहे.
२)स्त्रीला पुरुषाच्या तुलनेत अधिक प्रापंचिक-संसारिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडावयाची असल्याने ती पुरुषाला प्रत्येक वेळी उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळेही पुरुष इतर उपलब्ध स्त्रीकडे ओढला जाऊ शकतो.
३)मेरा पती सिर्फ मेरा रहेगा ही स्त्रीची मानसिकताच पुरुषाला इतर स्त्रीकडे लक्ष देण्यास कारणीभूत ठरते. पुरुषाचा जितका जास्त लैंगिक कोंडमारा होईल तितका जास्त तो वर उफाळून येत असतो. एकपत्नीत्वाच्या जोखडाखाली दबून पिचलेल्या पुरुषाला स्वातंत्र्य हवे असते, आणि इतर स्त्रीचा शोध घेऊन तो त्याची भूक मिटवू पाहतो, कोंडलेली वाफ दुसऱ्या स्त्रीच्या सान्निध्यात उत्सर्जित करण्याचा प्रयत्न करतो. कायद्याचा बडगा असल्याने तो ही बाहेरख्याली उघड न होईल याच्या अटोकाट प्रयत्नात असतो!
४)निसर्गात नरांची संख्या मादींच्या तुलनेत नेहमीच कमी असते. कारण मादीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी झगडा होतो, त्यात जो नर वरचढ असेल तोच जिंकतो. हरलेल्या नराला जगणे मुश्कील होते, त्याचे खायचे वांधे होतात. शिवाय जन्मलेल्या पिल्लांपैकी जी नर पिल्ली असतात त्यांची हत्या स्वतः बाप करतो कारण त्याला पुढे जाऊन प्रतिस्पर्धी नकोसा असतो!
५)अनेक मादींशी ‘जुगणे’ हा तर प्रत्येक नराचा नैसर्गिक स्वभावधर्मच! त्याला पुरुष तरी अपवाद कसा ठरेल? त्यामुळे पुरुषाच्या चोरीछिपे का होईना अस्तित्वात असणाऱ्या बहुपत्नीत्वाची कदरच करायला हवी!
 –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

नृत्याची आवड...

नृत्याची आवड...

नृत्य करणे कोणाला आवडत नाही. सर्वांनाच नृत्य भावते. दुसऱ्याला नाचतांना पाहून आपलीही पावले थिरकू लागतात. नृत्य हा काही व्यक्तींच्या जीवनाचा आवश्यक घटक बनतो. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी नाचून पाहतच असते. त्यातून मिळणारा आनंद काही औरच असतो. नृत्य ही संकल्पना मानवात रूढ होण्यासंबंधी संशोधन करण्यात आले. त्यातून काही नवीनच निष्कर्ष हाती लागले. त्यातील काही गोष्टी ह्या थेट सेक्सशी निगडीत असलेल्या आढळल्याने त्यांचा ऊहापोह या लेखांकात केला जाणार आहे. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)कोणताही व्यायाम केला की शरीरातील रक्ताभिसरण वाढते. नवनवीन संवेदना जास्त प्रकर्षाने जाणवतात. त्वचेखालील सूक्ष्म चेतातंतू अधिक क्षमतेने कार्य करू लागतात. साहजिकच कामसंवेदना सुद्धा व्यायामानंतर जास्त वेगाने आणि परिणामकारकपणे संवाहन केल्या जातात असे आढळून आलेले आहे. जी व्यक्ती व्यायाम करत नाही तिच्या बाबतीत वरील नियम शिथिल पडतो. म्हणजेच व्यायामाअभावी शरीरात चरबीचे प्रमाण वाढते, जे की संवेदना संवाहन करण्यात अडचणीचे ठरत आले आहे. त्वचेखाली जितकी जास्त चरबी असेल तितक्या संवेदना मिळण्यात अडसर ठरू लागतो. त्यामुळेच नित्य व्यायाम करणारी व्यक्ती अधिक तजेलदार, उत्साही, टवटवीत आणि विशेष समाधानी दिसते!
२)नृत्य हा देखील सर्वांगीण व्यायामप्रकार आहे. पुरुष जेव्हा नृत्य करीत असतो. तेव्हा त्याच्या जघनभागातील स्वयंप्रेरित चेतातंतू उद्दीपित होऊ लागतात. पुरुषाला हे मुळीच जाणवत नाही. मात्र त्याला सेक्सची अनामिक ओढ लागून राहते. पुरुषाची कामोत्तेजीत करणारी स्पर्शकेंद्रे सर्वथा शिस्नाच्या ठिकाणी एकवटलेली असल्याने जेव्हा कधी नृत्य करतांना वस्त्रांचा हलकासा किंवा जोरकस स्पर्श लिंगाला होत राहतो, तेव्हा तेव्हा पुरुष कामोत्तेजित होऊ लागतो असे सिद्ध झालेले आहे. कटीभागाच्या हालचाली करणारे नृत्य प्रकार याकामी जास्त परिणामकारक ठरतात असेही दिसून आलेले आहे. ज्या पुरुषांना स्वयंप्रेरित चेतासंस्थेच्या क्षीणतेमुळे लैंगिक उत्तेजनेचा अभाव निर्माण झालेला आढळतो त्यांना आवर्जून असे नृत्याचे धडे आणि व्यायामप्रकार सेक्सतज्ञ सुचवीत असतात. त्या नृत्याच्या व्यायामानंतर सदरहू पुरुषांत कामभावना उत्तेजित करण्यात सेक्सतज्ञांना यश मिळाले आहे.
३)स्त्री जेव्हा नृत्य करते तेव्हा तिच्या कामभावना पुरुषाच्या तुलनेत जास्त उद्दीपित होतात असे आढळून आलेले आहे. याचे कारण म्हणजे स्त्रीची कामसंवेदना टिपण्याची केंद्रे सर्व शरीरभर पसरलेली असतात. नृत्य करतांना स्त्रीच्या स्तनाग्रांना मोहक स्पर्श होत राहतो. आपसूकच स्त्री कामोत्तेजीत होऊ लागते. तिला अनामिक आनंद प्राप्त होऊ लागतो. खरे तर हा कामानंदाचा अनुभव असतो, पण तो त्या स्त्रीला स्पष्टपणे जाणवत नाही. एक प्रकारची उत्साही चेतना शरीरभर उसळत जात असते. तसेच कटीभागाच्या आणि जघनभागाच्या हालचाली झाल्यामुळे किंवा मांड्या जुळवणे, विलग करणे अशा क्रियांमुळे योनीभगोष्ठांची उघडझाप होऊन नकळत शिस्निका उद्दीपित होत असते. ही कामसंवेदना स्त्रीला कळते पण त्यामुळे मन उल्हसित होण्याची प्रक्रिया घडते. शरीरात उन्माद आणि उत्साह सळसळतो. स्त्रीची कामचेतना सर्वांगीण असल्याने स्तनाग्रे ताठर होऊन अधिक उद्दीपित होतात आणि शिस्निका घर्षणाने उद्दीपित होत राहते. कामभावना पुलकित झाल्याचा आनंद स्त्रीला मिळू लागतो. झुम्बा, अरोबिक्स या नृत्याच्या व्यायामप्रकारांनी स्त्रीचे सर्व कामसंवेदक बिंदू उद्दीपित होऊन तिला अनाकलनीय कामानंद प्राप्त होत राहतो. ज्या स्त्रियांना फ्रीजीड किंवा थंड प्रतिसाद देणाऱ्या समजले जाते अशा स्त्रियांना नृत्य करायला लावून त्यांची कामभावना उद्दीपित करण्याचे प्रयत्न यशस्वी होतांना आढळतात!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com 

Monday 2 January 2017

शृंगाराचे कौतुक...


शृंगाराचे कौतुक...

स्त्रीने शृंगार करताच तिचे सौंदर्य अधिक खुलते. पुरुषाचे तिकडे लक्ष असेल तर ठीक नाहीतर स्त्री हिरमुसली होऊन जाते. आकर्षक पेहराव करणे, अलंकार किंवा स्वर्णाभूषणे ल्याने, चेहरा अधिक दिलखेचक दिसावा म्हणून मेकअप करणे, पुरुषाला भावेल अशी टिकली लावणे, जराशी हटके केशभूषा करणे... हातात किणकिणत राहणाऱ्या नाजूक बांगड्या, कानातले झुलते डूल, गळ्यातले मोहक नेकलेस किंवा चेन, नाकात असेल तर बारीक खडा किंवा छोटी मोरणी, पायातील रुणझुणत मंजुळ नादात बोलणारे पैंजण... अशा कितीतरी प्रकारे स्त्री शृंगार करून पुरुषाला मोहीत करण्याचा प्रयत्न करीत असते. स्त्रीच्या या कृतीवर पुरुषाची जी प्रतिक्रिया येते ती स्त्रीला अधिकाधिक महत्वाची वाटत असते. --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)चतुर, हुशार आणि जबाबदार पुरुष स्त्रीचा शृंगार बारीक-सारीक निरीक्षणाने मनात नोंदवून घेतात आणि वेळीच त्याची स्त्रीपुढे प्रशंसनीय शब्दांत त्या शृंगाराची यथोचित वाच्यता करतात. तिच्या शृंगाराचे मनःपूर्वक कौतुक करतात. ती स्तुती, ती वाखाणणी ऐकून स्त्री पुरुषावर लगेच अनुरक्त होते. अशा पुरुषांची सूक्ष्म नजर स्त्रीच्या देहावरून काहीच क्षण फिरली तरी स्त्रीने केलेला शृंगार हे पुरुष विसरू शकत नसतात. स्त्रीने कोणत्या शेडची लिपस्टिक लावली आहे, मागील भेटीच्या वेळी कोणता शेड वापराला होता आणि त्यातील तुलनात्मक फरक विवेचन करून स्त्रीला पटेल असा सल्ला सौम्य शब्दांत देऊन टाकतात. स्त्रीने परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांची मोजक्या शब्दांत परंतु परिणामकारक केलेली वाखाणणी स्त्रीला भावविभोर करून टाकते. पुरुषाचे आपल्या प्रत्येक कृतीकडे, छोट्याशा शृंगाराकडे देखील बारीक लक्ष आहे हे पाहूनच स्त्रीला प्रेमाचे भरते येऊ लागते. पुरुषाच्या या कौतुकास्पद शब्दांनी तिला आधार प्राप्त झाल्याचे समाधान लाभते अशा कौतुक करणाऱ्या पुरुषाच्या प्रेमात कोणतीही स्त्री आकंठ बुडून जाण्यास वेळ लागत नाही!
२)काही पुरुषांना स्त्रीने केलेला शृंगार दिसत असतो. त्या कृतींची नोंदही ते घेतात परंतु स्त्रीला तिच्या शृंगाराबद्दल एकाही शब्दाने सूचित करीत नाहीत. स्त्रीने खोल गळ्याचा ब्लाउज घातला आहे हे अशा पुरुषांना कळते पण त्यावर टिपण्णी करीत स्त्रीला खुश करण्याचे कसब त्यांना अवगत झालेले नसते. नेमक्या कोणत्या शब्दांत तिचे खोल गळ्यातून दिसणारे यौवन किती उल्लेखनीय आहे हे सांगावे, याबाबत त्यांना ठोस निर्णय घेता येत नाही. किंतु त्यांच्या डोळ्यांमधून ते कौतुक प्रतिबिंबित होतच असते. कारण त्यांनी स्त्रीचा हा शृंगार टिपलेला असतो. तो आवडला असल्याची पोचपावती त्यांच्या नजरेत उतरलेली असते. परंतु केवळ नजरेने न्याहाळून गप्प राहणारे पुरुष स्त्रीला आवडत नाहीत. आपण इतके मस्त आवरलेलं असतांना हा ब्र शब्दही काढत नाही, याचे वैषम्य स्त्रीला वाटत राहते आणि अशा शांत, अबोल पुरुषाशी स्त्री जराशी फटकून वागू लागते!
३)काही पुरुषांना मात्र स्त्रीने केलेला शृंगार अजिबातच दिसत नाही! म्हणजे ते रसिक असत नाहीत. त्यांची नजर स्त्रीच्या बारीकसारीक कृतींना सरावलेली नसते. त्यांना स्त्री आवडते मात्र का आवडली हेच कळत नाही, तिने केलेला मेकअप काडीमात्रही ओळखता येत नाही. अशा अरसिक, घुम्या आणि कृतीशून्य पुरुषाला कोणतीच स्त्री वश होऊ शकत नाही किंवा अशा पुरुषाकडे कोणतीही स्त्री ढुंकूनसुद्धा पाहत नसते!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com