Friday 25 September 2015

कामजीवनातील गैरसमज...

कामजीवनातील गैरसमज...

प्रत्येकाच्या आयुष्यात कामजीवन येत असते. केवळ ‘काम’ म्हणजेच ‘जीवन’ नसले तरी ‘त्या’ शिवाय जीवन अधुरे असते. त्यामुळे कामविश्वाची माहिती प्रत्येक स्त्री-पुरुषाला असणे अत्यंत गरजेचे ठरते. दुर्दैवाने कामजीवनासंबंधित ज्ञान कोणीही उघडपणे देत नाही. जो देऊ पाहतो त्या व्यक्तीला हलकट, अश्लील, कामपिपासू असे संबोधून हिणवले जाते. लैंगिक ज्ञान देऊ पाहणाऱ्या प्रा. र. धो. कर्वे यांना देखील सामाजिक रोषाला सामोरे जावे लागले होते. पौगंडावस्थेतील मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देणे अगत्याचे असतांना स्वतः पालकच कामविश्वाबद्दल अनभिज्ञ असल्याने मूग गिळून गप्प बसतात. परिणामी कुतूहल शमविण्यासाठी पोर्नोग्राफी, बिछानेबाज रंगिली पुस्तके, मित्रांकडून मिळणारे अर्धवट ज्ञान यातूनच पुरुष कामजीवनाबाबत सज्ञान होऊ पाहतो. परंतु प्रस्तुत साहित्यात अतिशयोक्तीचा अधिक भडीमार असल्याने आपल्याला तसे जमत नाही या विवंचनेत गुरफटून पुरुष ऐनवेळी गोंधळून जातो व यशस्वी संभोग करू शकत नाही. कामविश्व हे अगाध आहे. त्यातील शास्त्रीय ज्ञान प्रचलित ज्ञानापेक्षा कैकपटीने भिन्न आहे. मूलतः कामविश्वासंबंधी गैरसमज अधिक वेगाने पसरलेले आढळून येतात. ते गैरसमज मनातून काढून टाकून परिपूर्ण कामजीवन अनुभवावे हेच खरे कामजीवन... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)--  पोर्नोग्राफीतून (अश्लील चित्रफिती) कामजीवनाचे खरे ज्ञान मिळते.
बिलकूल चुकीचे विधान आहे हे! पोर्नोग्राफीत संभोगाच्या विविध कसरती दाखवून फक्त पुरुषाचे मनोरंजन केलेले असते. सामान्य स्त्रीच्या दृष्टीने अशा वाकड्या तिकड्या आसनांना काडीमात्र महत्व नसते. तसले डोंबारकीचे खेळ प्रत्येक युगुलाला जमतीलच असे नाही आणि जरी जमले तरी त्यातून कामतृप्ती लाभेलच असेही नाही. पोर्नोग्राफीत दाखवितात तसा तासनतास संभोग कोणताही पुरुष करू शकत नाही. कित्येक दिवस शुटींग केलेले भाग एकमेकांना जोडून ते सलग दाखविलेले असतात हेच दर्शक विसरून जातो. पोर्नोग्राफीने कामोत्तेजना मिळते इतकाच त्याचा फायदा म्हणता येईल. वयोमानपरत्वे कामप्रतिसाद कमी झाला असतांना पोर्नोग्राफीपाहून उत्तेजना मिळविता येते.
२)--  संभोग करणे ‘पाप’ आहे.
पाप-पुण्य या संकल्पना मानव निर्मित आहेत, निसर्गनिर्मित नाहीत. प्रत्येक प्राणी स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्यासाठी जन्मलेला असतो हा निसर्गनियम आहे. भारतीय संकृतीत ‘काम’ हा नंबर तीनचा पुरुषार्थ मानला जातो. तरीही त्याला पाप समजणे हा किती मोठा विरोधाभास समजावा. आपण ज्यासाठी जन्माला आलो त्याची पूर्तता करणे म्हणजे पाप कसे होऊ शकेल? एक मात्र खरे संभोगाची बळजबरी करणे, बलात्कार, सक्ती यांना पाप म्हणता येईल. परंतु स्त्री-पुरुषाने परस्पर संमतीने संभोग करणे बिलकूल पाप ठरत नाही.
३)--  बॉडीबिल्डर आणि देखण्या पुरुषाला कोणतीही स्त्री लगेच वश होते.
हे विधान निखालस झूठ आहे. पुरुष पिळदार शरीराचा असेल तर उत्तम संभोग करू शकेल असा समज पुरुषाचा स्वतःचा असतो, स्त्रीचा नाही. पुरुषाचे गोरेगोमटे दिसणे, ताकदवान असणे, बॉडीबिल्डर असणे या बाबींचा आणि यशस्वी संभोगाचा काहीही संबंध येत नाही. पुरुषानचे धडधाकट आणि सुदृढ दिसणे, प्रसन्न व्यक्तिमत्व यांकडे तारुण्यसुलभ आकर्षण म्हणून युवती आकृष्ट होतात. तरीही अशा हँडसम पुरुषाला कोणतीही स्त्री वश होईल असे कधीही घडत नसते.
४)--  हस्तमैथुन शाप आहे.
मुळीच नाही. भारतीय सामाजिक संकेतानुसार पुरुषाला लग्नानंतरच संभोग करता येतो. तोपर्यंत मनात आणि शरीरातही उसळणाऱ्या कामोत्तेजक उर्मी शांत करण्याची एकमेव कृती म्हणजे हस्तमैथुन असते. तसेच बऱ्याच कारणांमुळे पती-पत्नीत प्रत्यक्ष संभोग घडत नाही. कधी एकांत मिळत नाही, कधी मुले झोपत नाहीत, कधी कोणी आजारी असते, कधी कमालीचा थकवा जाणवत असतो अशी बरीच कारणे प्रत्यक्ष संभोगाला आडकाठी निर्माण करतात. अशावेळी जर जास्तच इच्छा प्रबळ झाली तर हस्तमैथुन करणे भाग पडते. जगातील प्रत्येक पुरुषाने कधी ना कधी हस्तमैथून करून कामतृप्ती मिळवलेली असते त्यामुळे या क्रियेला कधीही शाप म्हणता येणार नाही.
५)— पुरुषाकडून कामतृप्ती लाभली नाही तर स्त्री विवाहबाह्य संबंध ठेवते.
कधीच नाही. पुरुषाला जशी कामतृप्ती महत्वाची वाटते तशी स्त्रीला वाटत नाही. तिच्यामते प्रणयाराधन, प्रेमळ स्पर्श, प्रणयपूर्व क्रीडा हीच खरी कामतृप्ती असते. स्त्रीला प्रेम आणि मातृत्व संभोगापेक्षा अधिक महत्वाचे वाटते आणि ते तिला केवळ आपल्या पतीकडूनच अपेक्षित असते. केवळ संभोगातून मिळणाऱ्या कामतृप्तीसाठी स्त्री विवाहबाह्य संबंध अजिबात ठेवीत नाही. पुरुष जसा लिंगपिसाट असू शकतो तशी स्त्री कधीच नसते. तिला हवा असतो प्रेमाचा आधार, आपुलकीचे भाषण, तिला अनितीने हे मिळवावेसे वाटत नाही. जर आपल्या पुरुषाकडून तिला अपेक्षित प्रेम मिळू शकत नसेल तर अपोआप ती परपुरुषाकडे ओढली जाते, पण त्याच्याकडून तिला सेक्स हवा नसतो तर प्रेमच हवे असते. त्यामुळे केवळ आणि केवळ कामतृप्तीसाठी स्त्री विवाहबाह्य संबंध ठेवते असे म्हणणे चुकीचे आहे.
६)— रोज रात्री संभोग केलाच पाहिजे.
मुळीच नाही. आपण समजतो तशी संभोगाची क्रिया ऐच्छिक स्वरुपाची नसते. कामेच्छा झाली की संभोग हवा असतो. परंतु कामेच्छा स्वतःहून मुद्दाम निर्माण करता येत नाही. ती स्वयंचलित मज्जासंस्थेच्या अधीन असते. त्यामुळे रोज रात्री ठरवून संभोग करता येणे अशक्य आहे. सुश्रुत महिन्यातून सहा वेळा संभोग करणे इष्ट मानतो तर लुथर आठवड्यातून दोन वेळा. झरतृष्ट व सोलन महिन्यातून तीन वेळा संबंध यावा असे सांगत असले तरी मेनिस मात्र महिन्यातून चौदावेळा संभोग करावा असे म्हणतो. म्हणजे व्यक्तिपरत्वे संभोगाची वारंवारिता बदललेली आढळते. जसे रोज दोनतीन वेळा संभोग करणारे आहेत तसेच वर्षातून फक्त एकदाच एकत्र येणारी जोडपीदेखील आहेत. संभोगाचे प्रमाण, पद्धत आणि कालमर्यादा यात प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, याबाबत कोणाचेही अनुकरण करू नये किंवा कोणाचे अतिशयोक्त वक्तव्य ऐकून त्याप्रमाणे अट्टहास धरू नये.कामेच्छा ही स्प्रिंग सारखी असते, ती दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर जोरात उसळी मारून बाहेर पडते तर अवाजवी ताणल्यामुळे तिची कार्यक्षमता कमी होत जाते. दिवसातून अनेक वेळा फक्त चहाच पीत राहिलो तर कसे वाटेल? अगदी तसेच संभोगाचेही असते. ज्याला जितके जमेल, जितके रुचेल, जितके पचेल तितके खावे-प्यावे तद्वतच ज्याला जितक्यावेळा संभोग शक्य आहे तितक्यावेळा करावा परंतु तो दररोज रात्री झालाच पाहिजे हा दुराग्रह मुळीच नसावा.
७)--  जास्तवेळ संभोग करणारा पुरुष स्त्रीला आवडतो.
कधीच नाही. स्त्रीला प्रत्यक्ष संभोगात रस नसतो. परंतु तिला संभोगपूर्व काम क्रीडा, प्रणय यांत अधिक रुची असते. तिचे सर्वांग कामतृप्तीत भाग घेत असते. पुरुष किती वेळा शिस्न योनीत ठेवू शकतो यापेक्षा तो किती विविधतेने प्रणयक्रीडा करतो याकडे तिचे जास्त लक्ष असते. पुरुषाने आपल्यावर खुपवेळ प्रेमाचा वर्षाव करावा, आपल्या सर्वांगाला प्रेमळ स्पर्शाने उत्तेजित करावे, आपले कामोद्दीपित करणारे बिंदू हळुवारपणे चुंबावेत अशी तिची अपेक्षा असते. यातूनच तिची अधिक कामपूर्ती होत जाते. आता प्रश्न उरतो पुरुषाच्या अधिकवेळ संभोग करण्याच्या कालावधीचा. कामशास्त्रानुसार सर्वसाधारण पुरुषाचा प्रत्यक्ष संभोगाचा कालावधी हा अर्धा मिनिट ते तीन मिनिट इतकाच असतो. योनीमध्ये शिस्न आतबाहेर करण्याचा हा कालावधी आहे. या कालावधीतच त्याचे वीर्यपतन होऊन लिंग ताठरता कमी होत जाते. आपले पूर्वज असणाऱ्या माकडाचा प्रत्यक्ष संभोगाचा काल फक्त पाच सेकंद आहे, त्यामानाने आजचा पुरुष बराच काळ संभोग करू शकतो. या कालावधीत पुरुषाची कामतृप्ती होत असल्याने स्त्रीला उत्तेजित करून परमोच्च क्षणापर्यंत आणणे आणि नंतर प्रत्यक्ष संभोग करून स्वतःसह तिची कामतृप्ती होईल असा काळ-काम-वेगाचे गणित जुळवणे हीच खरी पुरुषाची कसोटी असते. जास्तवेळ संभोग करून स्त्री उत्तेजित करता येत नाही तर तत्पूर्वी केलेली प्रणयक्रीडाच तिला कामोद्दीपित करीत असते हे. म्हणून जास्तवेळ संभोग करणाऱ्या पुरुषापेक्षा जास्तवेळ प्रणय करणारा पुरुष स्त्रीला आवडत असतो हे कायम लक्षात ठेवावे.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

Wednesday 23 September 2015

कामविश्वाचे महत्व...

कामविश्वाचे महत्व...
आयुष्यातील अर्धाधिक कालावधी प्रत्येकजण बेडवर घालवत असतो. प्रत्येक रात्र काही डाराडूर झोपण्यासाठी असत नाही. जवळ निजलेल्या जोडीदारासोबत प्रणयक्रीडा करून संभोगानंद लुटण्यासाठी देखील असते, याचा विसर पुरुषाला पडला आहे की काय कोण जाणे? काही मिनिटांत आपला कार्यभाग उरकून पुरुष झोपी जातो ही काही यशस्वी पुरुषाची लक्षणे नाहीत. अशा क्षणिक आणि अपुऱ्या मिलनामुळे स्त्री-पुरुषातील वैवाहिकजीवनासंबंधीचे ताण-तणाव वाढत चालले आहेत याकडे डोळेझाक करून कसे चालेल?
येताजाता आपल्या भारतीय संस्कृतीतील धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचा डंका पिटायचा आणि नेमक्या ‘काम’ विषयाला फाटा देऊन, ‘त्या’विषयी मौन बाळगून, ‘काम’ विषयाला नीतीमत्तेचे-सामाजिक संकेताचे बंधन घालून त्याबाबत ब्र देखील उच्चारायचा नाही म्हणजे कोत्या मनाचे लक्षण आहे. आपल्या संस्कृतीत अध्यात्माचा उदोउदो करतांना कामविश्वाचा बळी दिला जातो. अध्यात्मिक पुरुष किंवा स्त्री विषयासक्त असून चालत नाही, नव्हे ती व्यक्ती ब्रम्हचारी असेल तर लवकर मोक्षप्राप्ती करेल अशी काळ्या दगडावरची अलिखित रेघ आहे. परंतु एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात कामजीवनाचा आनंद लुटण्याला पारखे होणे यापरीस करंटेपणा नसावा. मोक्ष आहे की नाही माहीत नसतांना कामविषयक परमानंद टाळून भक्तीमार्गात एकाकी आयुष्य कंठणे कितीसे संयुक्तिक आहे?
आजही समाजात काय दिसते? जो कोणी कामविषयक चर्चा करील त्याला विकृत समजले जाऊन त्याची हेटाळणी केली जाते. आजही भारतीयांचे कामविश्व पाप, लज्जा, संकोच, भीती यांच्याच दबावाखाली दबले जाऊन त्याबाबत बोलणाऱ्याला अशिष्ट, अश्लील, लिंगपिसाट संबोधले जाते. स्त्री-पुरुषांचा विवाह देवादिकांच्या साक्षीने होतो म्हणून तो पूज्य, मातृत्व हे वात्सल्याचे मूर्तिमंत स्वरूप म्हणून पूजनीय परंतु स्त्रीला माता बनविण्यासाठी जी कृती केली जाते तो ‘संभोग’ मात्र अर्वाच्च्य, अश्लील, त्याविषयी ज्ञान मिळविण्यात अनास्था, संभोग म्हणजे केवळ अंधारात उरकण्याचे कार्य, स्त्रीचा उपभोग म्हणजे संभोग...? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
स्वतः तरुण असतांना हस्तमैथुन करायचे आणि आता आपल्या मुलाने हस्तमैथुन केले तर त्याबाबत शास्त्रीय माहिती न देता थेट शिक्षाच करायची? स्वतः तरुणपणी पाहिलेले सेक्सी पिक्चर विसरायचे आणि आपल्या पोरांनी पोर्नफिल्म पाहू नये म्हणून मोबाईल लॉक करायचे? कामजीवनाचे शास्त्रीय ज्ञान मुलाला न देता त्याला अशा अश्लील साईट्स पाहून कुतूहल शमविण्यापासून रोखायचे? पारंपारिक दडपणाला पुरुषाने बळी पडणे कितपत योग्य आहे? पुरुष किती दांभिक असतो याचे हे ठळक उदाहरण!
कामजीवनाची शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकांची वानवा आहे तोपर्यंत पोर्नोग्राफी पाहिली जाईल. अगदी वैद्यकीयशिक्षणात देखील कामजीवनाचा पुसटसा देखील उल्लेख येत नाही. प्रजोत्पादनासंबंधी विस्तृत विवेचन आढळते मात्र कामविषयक माहिती बाबत मौन ठेवलेले आढळते. स्त्री=पुरुषांच्या जननेंद्रियांची सखोल माहिती दिलेली आढळते मात्र स्त्री-पुरुष एकांतात आल्यावर काय घडते? कामोद्दीपन, कामतृप्ती म्हणजे नेमके काय? याबाबत वैद्यकशास्त्र काहीच सांगू शकत नाही. विवाह झालेल्या सत्तर टक्के जोडप्यांना शरीरसंबंधाविषयी काहीच शास्त्रीय माहिती नसते. ती मिळविणे देखील त्यांना गरजेचे वाटत नाही, त्यामुळे कित्येक जोडपी आयुष्यभर विवाहाचे जोखड ओढत राहतात. कामतृप्ती म्हणजे काय हे दहा टक्के स्त्रियांना आयुष्याच्या अंतापर्यंत कळत नाही. अनेक अतृप्त स्त्रिया सामाजिक संकेतांचा पगडा असल्याने केवळ पतीच्या कामसुखासाठी संभोगात सहभागी होतात, पण त्यांना तसा यंत्रवत संबंध नकोसा असतो. कामविषयक शास्त्रीय माहिती घेण्यापेक्षा कामवासना जागृत करणाऱ्या स्त्री देहाचे नग्न दर्शन, शिस्न ताठ करणारे अश्लील साहित्य पाहण्या-वाचण्यातच पुरुष रुची ठेवतो, हीच खरी भारतीयांची शोकांतिका आहे.
चौथ्या शतकात वात्सायनाने ‘कामसूत्रम’ नामक कामजीवनासंबंधित ग्रंथ लिहिला, परंतु त्यातील विविध आसनेच प्रचलित करण्यापलीकडे पुरुषाने काहीएक केले नाही. परंतु त्याने आपल्या ग्रंथात सांगितलेली काही मार्गदर्शक तत्वे आजचा पुरुष साफ विसरला आहे. ती तत्वे पुढील प्रमाणे—
१)--  ‘न स्त्री पुरुषवदेव भावमधिगच्छति’ असे वात्सायन सांगतो. म्हणजे स्त्रीचे कामसुख पुरुषाच्या कामसुखाहून भिन्न आहे. तरीही आजचा पुरुष त्याविषयीचे ज्ञान मिळविण्यात रस दाखवत नाही.
२)— ‘कामसलील निर्माण झाल्याशिवाय संभोग करू नये’ असेही वात्सायनाने नमूद केले आहे. तरीही पुरुष प्रणयक्रीडा टाळून थेट संभोगाची घाई गडबड करतो व स्त्रीला कायम अतृप्त ठेवतो.
३)— ‘प्रीती उत्पन्न करणाऱ्या आलिंगनादी क्रिया म्हणजे कामतंत्र आणि प्रत्यक्ष समागम म्हणजे आवाप’ अशा संज्ञा वात्सायनाने दिलेल्या असून त्यांचे विस्तृत विवेचन ग्रंथात केलेले आहे. कामतंत्र म्हणजे संभोगापुर्वी चुंबन आलिंगन यांमुळे उत्पन्न झालेले हवेहवेसे सुख म्हणजे स्त्रीच्या दृष्टीने खरे रतिसुख असते, असेही तो सांगून जातो. याकडे आजच्या पुरुषाने सोयीस्करपणे पाठ फिरवलेली दिसते.
४)--  संभोगाला पर्याय म्हणून पुरुष आणि स्त्रीसुद्धा हस्तमैथुन करतात असेही निरीक्षण सोळाशे वर्षांपूर्वी वात्सायनाने नमूद केले होते! हे आजही अजिबात खोटे ठरत नाही.
५)--  ‘वेश्या ही समाजाच्या नितीमत्तेची रक्षण करणारी रक्षणकर्ती आहे’ असेही तो बिनधास्त सांगून जातो. त्यामुळे वेश्यागमन करून कामजीवनासंबंधी ज्ञान मिळविणे चुकीचे नाही असाच संकेत यातून मिळतो!
वात्सायनाची उपरोक्त निरीक्षणे आजही कामजीवनात जशीच्या तशी लागू पडतात. त्याने उल्लेखिलेली केवळ संभोगासने पडताळण्यापेक्षा त्याच्या छत्तीस अध्यायांत समावलेल्या सव्वाहजार श्लोकातील निवडक श्लोक जरूर अभ्यासावेत. तरच आपले कामजीवन यशस्वी होऊ शकेल...
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

Tuesday 22 September 2015

शीघ्रपतन...

शीघ्रपतन...
अनेक सेक्सविषयक जाहिरातींमध्ये शीघ्रपतन ठळकपणे अधोरेखित केलेले आढळते. ही एक मोठी समस्या असून त्यावर आपल्याकडे अक्सीर इलाज आहे, अशी शेखी तथाकथित वैद्य मिरवत असतो. शीघ्रपतनाला कामसमस्या आणि लैंगिकआजार अशी भयप्रद नावे देऊन शीघ्रपतनाने ग्रासलेल्या पुरुषाला अधिकच नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. शीघ्रपतन म्हणजे कामशास्त्रीयदृष्ट्या नेमके काय आहे याची माहिती प्रत्येक कामोत्सुक पुरुषाला असणे गरजेचे आहे... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
योनीमध्ये लिंग प्रवेश करण्यापूर्वी किंवा योनीमध्ये लिंग प्रवेश झाल्यावर लगेचच विर्यस्त्राव होणे म्हणजे शीघ्रपतन होय. थोडक्यात काय तर बंदुकीने सावज टिपण्याआधीच गोळी निसटणे! हे का होते? प्रत्येक पुरुषाचे होते का? करणे काय? उपाय काय? याचा उहापोह या लेखात करू या...
१)--  विर्यस्त्राव होणे हे काही पुरुषाच्या आज्ञेवर चालत नाही. वीर्यच्युती ही पूर्णतया अनियंत्रित प्रतिक्षिप्त शरीरक्रिया आहे हे आधी लक्षात घ्या. कामोत्तेजक दृश्य पाहून किंवा स्त्रीचा कामोत्तेजक स्पर्श झाल्यास पुरुषाच्या कामसंवेदना जागृत होतात व मेंदू लिंगाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढवतो आणि ते ताठर होऊ लागते. लिंग ताठ झाल्याच्या संवेदना वळून मेंदूकडे पाठविल्या जातात. त्याचबरोबर शिस्नमुंडाच्या खालील कामोत्तेजक बिंदुला स्पर्श झाल्यास पुन्हा उत्तेजन मिळून लिंग टणक होण्याच्या सूचना मेंदू लिंगाकडे पाठवतो. अशाप्रकारे लिंगाला उत्तेजित करणाऱ्या संवेदनांचा कडेलोट झाला की विर्यच्युती होते. कामोत्तेजक संवेदना पायरीपायरी प्रमाणे वाढत जाऊन एक अत्युच्च क्षण असा येतो की पुरुष वीर्यच्युती अजिबात थोपवू शकत नाही. ही झाली वीर्यपतनाची शारीरक्रिया.
२)--  लिंग ताठ होणे किंवा लिंग ताठ करणे पुरुषाच्या अज्ञेधिन असते, परंतु वीर्यस्त्राव आपोआप होतो. ज्यावेळी पुरुष कामुक विचार करू लागतो किंवा स्त्रीशी शय्यासोबत करण्याआधी स्वप्ने रंगवू लागतो तेव्हा त्याचे लिंग ताठ होऊ लागते. प्रत्यक्ष संभोग होण्यास उशीर होत गेला तर शिस्नात आलेले रक्त पुन्हा माघारी फिरून ताठरता नाहीशी होते परंतु त्याने मानसिकरित्या चढलेली कामोत्तेजक पायरी तिथेच राहते. परिणामी पुढील कामोत्तेजक संवेदना अधिक प्रबळपणे निर्माण जरी होत असली तरी त्या प्रमाणात लिंग ताठरता आलेली नसते आणि मानसिकदृष्ट्या अत्युच्च क्षण जवळ येत गेलेला असतो. म्हणजेच मानसिक पातळीवर पुरुषाने सर्व पायऱ्या पूर्ण केलेल्या असतात. त्यामुळेच मग लिंग योनीवर टेकवताक्षणी पुढील एक किंवा दोन संवेद्नातच वीर्यच्युती होऊन जाते. प्रत्यक्ष संभोग तसाच राहतो.
३)--  कामोत्तेजना-> लिंग ताठरता-> अधिक कामसंवेदना-> शिस्नाच्या संवेदना लहरी-> अत्युच्च क्षण-> विर्यस्त्राव. अशा या क्रमानुरूप पायऱ्या पार करीत पुरुष कामतृप्त होतो. परंतु शीघ्रपतनामध्ये शिस्नाच्या संवेदना लहरी पर्यंतच्या पायऱ्या त्याने मानसिक पातळीवरच पूर्ण केलेल्या असतात. लिंग ताठ होऊन शिथिल झालेले असले तरी मानसिक संवेदना शिस्नाच्या संवेदना स्पर्शाचीच वाट पाहत असते. त्यामुळे मग अर्धवट ताठरलेले लिंग योनीजवळ नेताच चौथी पायरी तातडीने पूर्ण होऊन अत्युच्च क्षण येतो व वीर्यस्त्राव होतो. म्हणजेच चौथ्या पायरीवर पोचलेली संवेदना नष्ट करून पुन्हा पहिल्या पायरीने सुरुवात करणे हाच शीघ्रपतनावरील उपचाराचा भाग असतो आणि तो काही फारसा अवघड नाही. अभ्यासाने सहजसाध्य होणारा आहे. त्यामुळे शीघ्रपतनाला आजार म्हणता येणार नाही. पुरुषाचा अधीरपणा, धसमुसळेपणाच म्हणता येईल.
४)--  उपचार- स्त्रीला विश्वासात घेऊन शीघ्रपतनावर मात करता येते. मिस्टर आणि मिसेस जॉन्सन यांनी सुचविलेली ही उपचार पद्धती आहे. दोघांनी प्रणयक्रीडा करून एकमेकांना उत्तेजित करावे. स्त्रीने पुरुषाचे लिंग हातात घेऊन हस्तमैथुन करावे. पण उच्च क्षण येताच पुरुषाने तिला खुण करून थांबवावे. विर्यस्त्राव टाळावा. काही वेळ विश्रांती घेऊन पुन्हा हीच कृती करावी. असे आठवडाभर करावे. या आठवड्यात संभोग वर्ज्य आहे. मात्र स्त्रीची कामतृप्ती हस्तमैथुनाने होऊ द्यावी. पुढील आठवड्यात पुरुषाने स्त्रीला स्वतःवर आरूढ करवून संभोग करावा. उच्च क्षण येताच थांबावे. वीर्यस्त्राव टाळावा. काहीवेळ विश्रांती घेऊन पुन्हा पहिल्यापासून कृती करावी. असे तीन वेळा करावे. हे स्त्रीआरूढ आसन असल्यामुळे तिची कामतृप्ती ती स्वतः करून घेईल. मात्र पुरुषाने अगदी ठरवून अतुच्च क्षण पुढे ढकलावा. शेवटच्या आठवड्यात पुरुषाची खात्री झालेली असते की लिंग योनीमध्ये असतांना देखील वीर्यच्युती टाळता येऊ शकते. मग तो विनासायास पुरुषारूढ आसन वापरून संभोग करू शकतो व त्याने शीघ्रपतनावर विजय मिळविलेला असतो.
५)— फक्त पुरुषाने स्वतःवर करावयाचा उपचार देखील कामशास्त्रात सांगितलेला आहे. मांडी घालून बसायचे आहे. डोळे मिटून श्वास आत घेऊन आपले गुदद्वार शक्य तितके आकुंचित करावयाचे आहे व दहा वीस तीस पर्यंत आकडे मनातल्या मनात मोजावयाचे आहेत. असे दिवसभरातून पाच सहा वेळा अभ्यास करावयाचा असतो. आकुंचन स्थितीतील कालावधीत वाढ करावयाची असते. यांमुळे वीर्यच्युतीच्या संवेदना लांबविल्या जाऊ शकतात. याचप्रकारे आणखी एक व्यायाम करावयाचा असतो. मुत्रविसर्जन करतांना मध्येच थांबायचे. लघवी पूर्ण करायची नाही. काही सेकंदांनी पुन्हा मुत्रविसर्जन सुरु करायचे आणि पुन्हा मध्येच थांबायचे. असे तीन चार वेळा लघवी अडवून ठेवायची. या अभ्यासानेसुद्धा वीर्यच्युती आटोक्यात ठेवता येऊ शकते.
६)— पुरुषाने प्रत्यक्ष संभोगाच्यावेळी अमलांत आणावयाचा एक अभ्यासोपचार देखील फॅरेडेने नमूद केलेला आहे. संभोग करतांना आपले लक्ष मुद्दामहून विचलित करावयाचे, असा तो उपचार आहे. म्हणजे उच्च संवेदना प्राप्त होण्याआधीच प्रापंचिक कटकटी, कडाक्याची भांडणे, आर्थिक नियोजन, सतावणाऱ्या विवंचना असले गहन विषय मुद्दाम आठवायचे असतात. त्यामुळे खाली संभोग चालू ठेवला तरी वरती मात्र भलतेच विचारमंथन चालू असल्याने खालच्या मंथनातून लोणी पडत नाही! लिंगाच्या कामोत्तेजक संवेदना मध्येच खंडित केल्यामुळे उच्च संवेदना निर्माणच होत नाहीत. लिंग मात्र योनीत पुढेमागे होत असल्याने कमालीचे कडक बनत राहते. कारण तो योनीचा लिंगाशी होणारा शारीरिक स्पर्श असतो त्याला मानसिक कामसंवेदनांची जोड मिळत नाही. पर्यायाने वीर्यच्युती लांबवता येते.
अशाप्रकारे शीघ्रपतन हमखास दीर्घपतनात रुपांतरीत करता येते...!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

पुरुषाचे हस्तमैथून...

पुरुषाचे हस्तमैथून...
अनेक जाहिरातींमध्ये तारुण्यातील मोठी चूक म्हणून हस्तमैथून सांगितले जाते. खरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील नव्वद टक्के पुरुष हस्तमैथुन करीत असतात. मग हस्तमैथूनाचा बागुलबुवा कशासाठी उभा केला जातो? काय आहेत कामशास्त्रीय कारणे? पुरुषाच्या संभोग शक्तीवर हस्तमैथूनाचा काय प्रभाव पडतो? हस्तमैथून योग्य की अयोग्य? अशा अनेक विषयांचा विचार येथे केला आहे... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)--  एकटा जीव सदाशिव असला की नेहमीच ‘आपला हात जगन्नाथ’ बनून जातो. झिंगण्यासाठी ‘हातभट्टी’ चालवली जाते. अनावर झालेल्या भावना दाबून टाकण्यापेक्षा हाताने घुसळून बाहेर काढाव्यात यासाठी रवी हाताळून ‘तूप काढले’ जाते. मनात उचंबळून येणाऱ्या लाटा थोपविण्यासाठी ‘मुठ्ठा मारला’ जातो. काटा पोरीचा कमनीय बांधा पाहून उठलेल्या तरंगांचे ‘फुगे सोडले’ जातात. एखादी सुंदर स्त्री आपली होऊ शकली तर काय होईल हे आजमावण्यासाठी तिच्यावर ‘मूठ मारली’ जाते...! अशी कित्येक ‘स्वान्तसुखाय’ कारणे हस्तमैथूनासाठी दिली जातात.
२)--  पुरुष नैसर्गिकरीत्या सदानकदा संभोगासाठी आतूर असतो. निसर्गातील प्रत्येक नराचे निरीक्षण केल्यास हेच आढळते की प्रत्येक नर माजावर असतो तसाच मादीच्या मागावर पण असतो. कधी एखादा चान्स मिळतो आणि मी तिच्यावर चढतो.. असे त्याला नेहमी वाटत असते. म्हणूनच तो नेहमी तशा तयारीतच असतो. संधी मिळताच चढणे हे त्याचे इप्सित असते!!!
३)--  परंतु पुरुषाच्या बाबतीत होते काय की त्याच्या लिंगाला हवी तेव्हा योनी मिळत नाही. तो तारुण्यात असतांना धुमसणाऱ्या भावना, कोंडलेली वाफ, तीव्र झालेली कामेच्छा सामाजिक संकेत पाळावे लागत असल्याने व्यक्त करता येत नाही. लग्नझाल्याशिवाय संभोग करायला मिळत नाही. लग्नाआधी जरी एखादा चान्स मिळाला तरी तो तुटपुंजा ठरतो. त्याला पुन्हा पुन्हा सेक्स हवा असतो. प्रत्येकवेळी बायको काय किंवा गर्लफ्रेंड काय त्याची इच्छा पूर्ण करू शकत नसते.
४)— ऐन तारुण्यात पुरुषाच्या चाळवलेल्या भावना बंदिस्त राहतात. मग आपसूक त्याचा हात कमरेखाली जाऊन शिस्न कुरवाळू लागतो. मनात संभोगाचे विचार आणून शिस्नाला उत्तेजित केले जाते. ती कामतृप्ती अनुभवण्यासाठी ताठरलेल्या लिंगावर हाताची मूठ वळवून लयबध्द हालचाली होत राहतात. सर्व शरीर आकसू लागते आणि एकच परिस्फोट होऊन पाच-सहा वेळा आचके देत लिंगातून वीर्यच्युती होत राहते.
५)--  हस्तमैथून करतांना पुरुषाला आपल्या लिंगाच्या संवेदनबिंदूची ओळख होते. शिस्नमुंडाच्या खाली लिंगचर्म जेथे चिकटलेले असते तिथे सर्व चेतातंतू एकवटल्यामुळे हा बिंदू असतो. स्त्रीशी प्रत्यक्ष संभोग करण्यापूर्वी त्या बिंदूवर अचूकपणे स्थानिक बधिरीकरण करणारा स्प्रे मारला असता वीर्यच्युती कमाल कालावधीच्या पलिकडे लांबविता येते. हासुद्धा हस्तमैथूनाचा फायदाच म्हणावा लागेल. जो हस्तमैथून करीत नाही त्या पुरुषाला हा बिंदू नेमका कोठे आहे ते कळणार नाही.
६)--  हस्तमैथुनाने पुरुष मोकळा मोकळा होतो आणि पुढील कर्तव्याला जुंपून घेतो. कोंडलेली वाफ बाहेर पडून हुश्श व्हावे तसे त्याला वाटते. यात गैर असे काहीएक नसतांना उगाचच हस्तमैथून बदनाम केले गेले आहे. ‘ब्रम्हचर्य हेच जीवन, वीर्यनाश म्हणजे मृत्यू...’ वगैरे सारख्या भंपक कल्पना काहीएक ‘कामा’च्या नाहीत. पुरुषाने हस्तमैथून नियमित केले तरी काहीएक बिघडत नाही. एकट्या जीवाला मिळालेले ते वरदानच आहे!
७)--  हस्तमैथूनाने प्रत्यक्ष संभोगावर काडीमात्रसुद्धा परिणाम होत नसतो. त्याउलट काही सेक्सॉलॉजिस्ट म्हणतात की हस्तमैथून केल्यानंतर काही तासांनी स्त्रीशी संभोग केल्यास वीर्यच्युती खूपच लांबविता येते. प्रत्यक्ष मैथूनाचा कालावधी वाढलेला आढळतो. पुरुष जास्तवेळ स्त्रीशी संभोग करू शकतो. त्यामुळे पुरुषाने मुक्तहस्ते ‘काम’रंगांची उधळण करावी...!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

Sunday 20 September 2015

सेक्सबाबतच्या जाहिराती ...

सेक्सबाबतच्या जाहिराती...

यौनसंबंधात कमजोरी असणे, स्वप्नदोष, शीघ्रपतन, लिंग छोटे, वाकडे असणे, लिंगात शिथिलता येणे अशा अनेक संज्ञांचा वापर करून वर्तमानपत्रे, भित्तीपत्रके, व्हिजिटिंग कार्ड्स, छोट्या जाहिराती यांच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित केले जाते. लैंगिक समस्या अस्तित्वात नसतांना त्या आहेत असे भासवले जाते. मुळातच लैंगिक संबंध, सेक्स, प्रणय, संभोग या गोष्टी पालकांकडून उपवर मुलीला किंवा मुलाला अजिबात समजावून सांगितल्या जात नाहीत. मित्रमंडळी किंवा मैत्रिणी ज्या सांगतील त्या तुटपुंज्या आणि बहुधा अशास्त्रीय ज्ञानावरच नवदाम्पत्य आपली पहिली रात्र पार पाडतात. पहिल्या रात्रीचा अनुभव पुरुषासाठी निराशादायक असतो. जर त्याने अगोदर कधीही स्त्रीशी संभोग केला नसेल तर नक्कीच त्याला पहिल्या रात्री शीघ्रपतन आणि लैंगिक दौर्बल्य जाणवते. मात्र तो आधीच सेक्स बाबत योग्य शास्त्रीय ज्ञान मिळवून तरबेज झाला असेल तर त्याची पहिली रात्र आनंददायी ठरते. पण एका निरीक्षणानुसार जवळपास ८०% नवविवाहित पुरुष पहिल्या रात्री अंधारात चाचपडत ढगात गोळ्या मारून आलेले असतात. त्यांची अवस्था तह स्वीकारलेल्या मांडलिक राजासारखी झालेली असते. मग वरील जाहिराती करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित भोंदू डॉक्टरांच्या जाळ्यात तो आपसूक ओढला जातो. उपरोक्त संज्ञा कशा तकलादू आहेत याचे शास्त्रीय ज्ञान आजच्या प्रत्येक तरुणाला मिळालेच पाहिजे. तरच त्याला वरील निर्दिष्ट केलेले आजार कसे फोल आहेत ते समजून येईल...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)-- कोणत्याही सुदृढ पुरुषात यौनकमजोरी असू शकत नाही. उत्तेजक चित्र, नग्न स्त्रीचे चित्र पाहिले की कोणताही पुरुष चळतोच. त्याचे लिंग आपोआप ताठ होत जाते. किंवा त्याचा हात आपसूक लिंगाकडे जाऊन तो आपले लिंग ताठ करतो. त्यामुळे यौनकमजोरी ही संज्ञा चुकीची ठरते.
२)--  स्वप्नदोष झाला नाही असा एकही पुरुष गवसणार नाही. रात्रीच्यावेळी लिंग अचानक ताठ होऊन कामोत्तेजक स्वप्न पाहतांना वीर्यस्त्राव होतो. ही पूर्णतया नैसर्गिक बाब आहे. रात्रीच्या वेळी पुरुष हार्मोन्सचे (टेस्टेस्टेरॉन) प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे शिस्न ताठ होणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे. अशावेळी उच्चतम संवेदना लहरी उत्पन्न होऊन वीर्य बाहेर पडते. यात दोष असण्यासारखे काहीच नसतांना विनाकारण या नैसर्गिक क्रियेला स्वप्नदोष असे हिणवून आजाराचे नाव दिले आहे.
३)— शीघ्रपतन ही समस्या पूर्णतः मानसिक असून त्यावर देखील विजय मिळवता येतो, याविषयी विस्तृत चर्चा पुढील लेखांकात केली जाईल.
४)--  लिंग छोटे किंवा वाकडे असले तरी पुरुष स्त्रीला कामतृप्त करू शकतो हे मागील एका लेखात नमूद केले आहेच. स्त्रीची कामतृप्ती ८०% प्रणयात आणि २०% संभोगात होत असल्याने योग्य प्रणय करून स्त्रीला उत्तेजित केल्यास लिंगाच्या छोटेपणाचा काही फरक पडत नाही. स्तनाग्रे, मदनमणी आणि मदनबिंदू ही तीनच स्थाने स्त्रीला कामतृप्त करीत असल्याने त्यांचे उत्तेजन दोन इंच लांबीच्या लिंगाने देखील यशस्वीपणे करता येते असे प्रयोगांती सिध्द झालेच आहे.
५)--  लिंगात शिथिलता येणे हे पूर्णतः मानसिक कारणाचे लक्षण आहे. आपण आपल्या स्त्रीला खुश ठेवू की नाही? तिच्याशी यशस्वी संभोग करू की नाही? अशा निरर्थक प्रश्नांमुळे नवविवाहित पुरुष दबावाखाली येतो. त्यामुळे लिंगाचे योग्य प्रमाणात उत्तेजन होत नाही, त्यात ताठरता येत नाही. बिनधास्त आणि कोणताही किंतु मनात न ठेवता जर बेडवर गेलात तर नक्कीच चौकार-षटकारांची आतषबाजी होईल यात शंका नाही.
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com

स्त्रीचा लठ्ठपणा आणि सेक्स ...

स्त्रीचा लठ्ठपणा आणि सेक्स...

स्त्री जर जाडीजुडी असेल तर पुरुषाच्या (दोन्हीही) तोंडाला पाणी सुटते. तिचे गुबगुबीत उरोज मनसोक्त कुरवाळायला मज्जा येईल, तिच्या बिलबिलीत योनीमध्ये आपले लिंग घुसडायला भरपूर आनंद मिळेल, तिच्यावर कितीही जोरदार प्रहार केले तरी उशीत सुरी खुपसल्यासारखे शिस्न विनासायास आतबाहेर करता येईल... अशी अनेक कामोत्तेजक दिवास्वप्ने पुरुष पाहू लागतो आणि म्हणूनच त्याच्या (दोन्हीही) तोंडातून लाळ ठिबकणे साहजिक आहे. पण थांबा... कामशास्त्र काय सांगते याचा विचार करूनच लठ्ठ स्त्रीशी कसा यशस्वी संभोग साधावा यासंदर्भातील काही टीप्स आमलांत आणाव्यात...
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)— सेक्सॉलॉजिस्ट फॅरेडे म्हणतो की लठ्ठ स्त्रीची संवेदनशीलता इतर स्त्रियांच्या तुलनेत कमीच असते. त्यामुळे तिला अनेकदा प्रणयक्रीडा करून उत्तेजित करणे भाग पडते. शिवाय ती लवकर कामतृप्त होईलच असेही नाही. सर्व शरीरभर चरबीचे अतिरिक्त आवरण असल्यामुळे ज्ञानतंतूपर्यंत स्पर्शाची चेतना पुरेशी पोचत नाही व ती मनाने जरी कामातुर झालेली असली तरी शरीराने लवकर संभोगोत्सुक होत नाही.
२)--  याउलट सेक्सॉलॉजिस्ट दांपत्य श्री व सौ जॉन्सन यांचे मत वेगळे आहे. ते म्हणतात की योग्य प्रणयक्रीडा केली तर लठ्ठ स्त्रीदेखील चटकन प्रतिसाद देऊन कामतृप्त होऊ शकते. परंतु सेक्सॉलॉजिस्ट डॉ. विजय पाटील यांनी त्यांचे म्हणणे खंडन करून लठ्ठ स्त्री कामजीवनात अजिबात रस घेत नसल्याचे नमूद केले आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक दाम्पत्यांच्या पाहणीतून त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे.
३)--  यावर उपाय सुचवितांना काही सूचना उपरोक्त सेक्सॉलॉजिस्ट करतात—चरबीमुळे जरी लठ्ठ स्त्री कामप्रतिसाद देत नसली तरी तिची सेक्सची कल्पना काय आहे? संभोगाच्या बाबतीत तिची फँटसी काय आहे हे स्पष्ट विचारून त्याप्रमाणे प्रणय केल्यास ती नक्कीच कमालीची उत्तेजित होत जाते. लठ्ठ स्त्रीच्या कामोत्तेजक बिंदुंमध्ये प्रामुख्याने स्तनाग्रे, मदनमणी (शिस्निका) व मदनबिंदू (जी-स्पॉट) ही तीन स्थाने येत असल्याने त्यांना पुरुषाने अधिक हाताळून उत्तेजित करणे अपेक्षित आहे.
४)--  स्त्री उत्तेजित झाल्यावर प्रत्यक्ष संभोगासन कोणते घ्यावे हे सांगताना सेक्सॉलॉजिस्ट म्हणतात की तिच्या योनीभोवती सुद्धा चरबी जास्त असल्याने शिस्निकेचे उद्दीपन नीटसे होत नाही. ते व्हावे म्हणून तिला तिच्या मांड्या शक्यतो अधिक विलग करण्यास सांगावे. योनी पुरेशी विस्फारलेली असतांनाच संभोग करावा. शिस्न आतबाहेर करण्यात शक्ती घालविण्यापेक्षा ते योनीच्या वरील बाजूस जास्त घासले जाईल याकडे लक्ष द्यावे.
५)--  पुरुषाने दोन्ही हातांनी तिची पावले पकडून तिच्या मांड्या ताठ अवस्थेत ठेवून दोन्ही बाजूला फाकवून मागे ढकलाव्यात म्हणजे योनी खूपच विस्फारते व संभोग करणे सुखकर होते. यावेळीही ताठरलेले लिंग आत बाहेर करण्यापेक्षा योनीच्या मधोमध वरील टोकाला असलेल्या शिस्निकेला घासत ठेवल्यास लट्ठ स्त्रीला सुद्धा व्यवस्थित कामतृप्त करता येते. लठ्ठ स्त्रीला कामतृप्ती लाभण्यासाठी पुरुषाने तिच्या योनीचे हस्तमैथुन किंवा मुखमैथुन केले तरी वावगे ठरत नाही.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com

Wednesday 16 September 2015

मासिकपाळी आणि संभोग...

मासिकपाळी आणि संभोग...

त्या चार दिवसांत स्त्रीने बाजूला बसणे समाजमान्य रूढी होती. होती, म्हणण्याचे कारण आता तसे कोणी सक्तीची सुट्टी घेऊ शकणार नाहीत. तशी परिस्थिती राहिलेली नाही. पूर्वी शिवताशिवत वगैरे प्रकार स्त्रीवर लादले जायचे. सद्याचे सुपरफास्ट युग स्त्रीला चार दिवस एकाच ठिकाणी बसू देऊ शकणार नाही. बहुतेक स्त्रिया काहीतरी नोकरी करतांना आढळतात. एकंदर पाहिले तर ते चार दिवससुद्धा स्त्रीसाठी कामासाठीच द्यावे लागतात. मग तिने ते ‘कामा’साठीही द्यावेत का...?
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
सहसा ठरवून संभोगाची रात्र येत नसते. इच्छा निर्माण झाली की पुरुषाला संभोग हवा असतो. त्याची नैसर्गिक प्रेरणाच तशी असते. स्त्रीच्या मागे मात्र अनेक व्यवधाने असल्याने पुरुषाची इच्छा ती तात्काळ मान्य करीलच असे नाही. शिवाय कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन झाले नसेल, मूल नको असतांना संभोग करण्यासाठी पटकन कंडोम उपलब्ध नसेल तर ऐन बेडवर स्त्री संभोगाला नकार देते. मग असे खाडे होणाऱ्या रात्रीत आणखी ‘त्या’ चार रात्रींची भर पडली की पुरुषाचे उपवास वाढू लागतात. म्हणून स्त्रीची मासिक पाळी चालू असतांना संभोग करावा काय? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. यामागील शास्त्रीय कारणे कोणती याची माहिती स्त्री आणि पुरुष दोघांनाही असणे गरजेचे आहे.
१)-- कामशास्त्र असे सांगते की स्त्रीची पाळी चालू असतांना इतर पाळीविरहीत काळापेक्षा तिला अधिक कामेच्छा निर्माण होते. पाळी येण्याच्या क्रियेमुळे गर्भाशयाकडील तसेच योनिमार्गाकडील रक्तप्रवाह काहीप्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे तेथील संवेदना अधिक प्रकर्षाने जाणवू लागतात. साहजिकच स्त्रीला कामेच्छा निर्माण होते.
२)— ज्याप्रमाणे कान दुखायला लागल्यावरच आपल्या लक्षात येते की आपल्याला कानही आहे, तसेच पाळी येत असतांना, योनीची स्वच्छता राखावी लागते आणि स्त्रीला जाणीव होते की आपल्यालाही योनी आहे, व तिचे ‘काम’ काय असते? आणि तो गुह्य भाग हाताळतांना तिला कामेच्छा होत जाते.
३)— आजकाल स्त्री छोटे मोठे सॅनिटरी नॅपकिन्स वापरत असते. ते बदलतांना, लावल्यानंतर नकळत योनीला वेगळा स्पर्श होत गेल्याने उत्तेजना मिळून तिला कामेच्छा निर्माण होते. शिवाय चालतांना नॅपकीन घासून योनीभगोष्ठ उत्तेजित होत असतात. म्हणून सुद्धा कामेच्छा होऊ लागते.
४)— असे असतांना स्वच्छतेची काळजी घेऊन पुरुषाने अजिबात चान्स सोडू नये. त्या चार दिवसांत वरील तीन कारणांनी स्त्री कामप्रबळ झालेली असतेच तेव्हा संभोग केला तर काही बिघडत नाही. म्हणजेच त्या चार रात्री देखील पुरुषाला बोनस म्हणून मिळवता येऊ शकतात!!!
५)— फक्त स्वच्छता पाळावी. संभोगापुर्वी स्त्रीने स्वच्छ अंघोळ करावी. योनीच्या भोवती सुगंधी डीओचा स्प्रे मारावा. असे वाटले खूप स्त्राव होत आहे तर पुरुषाने कंडोम वापरला तरी चालेल. नाही वापरला तर आठवणीने संभोगानंतर लिंग साबणाने धुवावे. म्हणजे जंतूसंसर्ग होणार नाही. व्यवस्थित स्वच्छता पाळली तर मासिक पाळीत सुद्धा संभोगाचा परमानंद लुटता येतो...!

--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

स्त्रीचा 'काम'प्रतिसाद...

स्त्रीचा ‘काम’प्रतिसाद...
पुरुष उत्तेजित झाला आहे हे त्याच्या ताठरलेल्या लिंगावरून सिध्द होते. पण स्त्री उत्तेजित झालेली आहे किंवा नाही हे बहुतेक पुरुषांना न समजल्यामुळे संभोग कष्टप्रद होत असतो. म्हणजे स्त्री उत्तेजित झालेली नसतांना लिंग योनीमार्गात सुखदायकरित्या शिरू शकत नाही. योनीमार्ग कोरडाच राहिल्याने त्यात शिस्नाचा प्रवेश सहजगत्या होण्याऐवजी वेदनादायी होतो. पुरुषाला लिंग आत घुसडण्याची कमालीची घाई झालेली असते कारण पुरुषाच्यामते संभोग म्हणजेच मैथून असते. परंतु स्त्रीच्या मते प्रणय हेच मैथून असते. संभोग तिला खूप शेवटी हवा असतो. पुरुष आधी संभोग करू पाहतो आणि स्त्रीला ते कष्टदायक वाटते व ती असा घाईघाईचा संभोग टाळू पाहते. म्हणून स्त्री उत्तेजित झालेली आहे किंवा नाही हे पुरुषाने कसे ओळखावे त्याच्या काही टीप्स यशस्वी संभोगासाठी पुरुषाला जाणून घ्यायलाच हव्यात... 
(--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  )
१)-- पुरेपूर प्रणय आमलांत आणल्यानंतर स्त्री डोळे मिटून घेते.तिचे ओठ थरथरू लागतात. पापण्या शहारतात. अंगांग रोमांचित होत जाते. योग्य प्रणयक्रीडेने ती अधिक उत्तेजित होत जाते. चेहऱ्यावर आसुसलेपणाची भावना प्रकट होऊ लागते. ती पुरुषाला अधिक घट्ट बिलगून जाते. जवळ ओढू लागते. प्रथम मिलनाच्यावेळी ही लक्षणे अधिक प्रखरतेने दिसून येतात. वयोमानाप्रमाणे त्यात कमीपणा दिसू लागतो.
२)— उत्तेजित झाल्यांनतर स्त्री देहामध्ये अतिशय मोहक बदल जाणवतात. तिची वक्षस्थळे तरारून येतात आणि अधिकच तट्ट होतात. स्तनाग्रे ताठर बनतात. त्याभोवती असलेली स्तनामंडल गडद रंगाचे होऊन किंचित फुगीर होते. तिचा श्वास गती घेतो त्यामुळे तिची हपापणारी छाती उरोजांना मस्तपैकी झोके देतांना दिसते. ताठरलेल्या स्तनाग्रांना पुरुषाने हळुवार कुस्करावे, आपले स्तन पुरुषाने दाबावेत, चोखावेत असे ती कृतीतून दाखवून देऊ लागते.
३)— तिच्या जघनभागाची हालचाल सुरु होते. कटिभाग ती पुरुषाच्या कटीवर वरखाली करू लागते. तिचा गुह्यभाग ती पुरुषाच्या मांड्यांना घासू लागते. अशावेळी तिच्या योनीतून कामसलील स्रवत राहते आणि योनीला स्पर्श केला असता ती अधिक ओलसर झाल्याचे जाणवते. योनीमध्ये हळूच बोट घालून आजमावले असता ते विनासायास सहज आत जाते, इतका बुळबुळीतपणा आलेला असतो. योनीचे बाह्यभगोष्ठ फुगलेले दिसतात. आतील भगोष्ठ अपोआप विलग होऊन मदनिकेचे उन्नतत्व जाणवण्याइतपत शिस्निका उत्तेजित झालेली दिसते. योनीमार्ग विस्फारला जाऊन पुरुषाचे ताठरलेले शिस्न आत घेण्यास आतुर झालेला असतो.
४)— अशी पूर्णतः उत्तेजित झालेली स्त्री लगेच पुरुषाला अंगावर ओढून त्याचे लिंग आपल्या मांड्या विलग करून योनीमार्गात सरकवून खोलवर आत घेते. साधारणतः ३ ते ३० वेळा पुरुषाने वरून धक्के दिले की मदनमणी व मदनबिंदू यांच्या घर्षणाचा परमोच्च क्षण येऊन स्त्रीची योनी दोन्ही भागोष्ठांनी लिंगाला जखडून ठेवते, आतून दाब देत राहते, शिस्नाला हातात पकडावे तशी योनी धरून ठेवते. शेवटच्या अत्युच्च बिंदुला आपले लिंग योनीने कमालीचे फिट्ट पकडले आहे असे पुरुषाला जाणवत राहते. हाच क्षण स्त्रीच्या कामतृप्तीचा असतो. पुरुषाने ठरवून याचवेळी वीर्य उत्सर्जन केले तर संभोग यशस्वी झाला असे समजावे.
५)— तृप्त झालेली स्त्री ग्लानी आल्याप्रमाणे पुरुषाच्या छातीवर निवांत पहुडते. तिच्या चेहऱ्यावर कामतृप्तीचे समाधान विलसत असते. तिची सर्व गात्रे शिथिल होऊन तिचा श्वासही हळूहळू धीमा होऊ लागतो. छातीचा ताठरलेला उभार कमीकमी होऊन पूर्ववत होतो. तिची फुगीर झालेली योनी सावकाश मूळ आकारात येऊ लागते...
एका संभोगामध्ये स्त्रीला तीन ते पाचवेळा कामतृप्तीचा आनंद मिळू शकतो पण पूर्ण तृप्ती लाभल्यावर मात्र स्त्री ४ तास ते २४ तास पुन्हा उत्तेजित होऊ शकत नाही हे लक्षात असू द्यावे.
--भोगगुरू कामदेव.

kaamvishva.blogspot.com

Wednesday 9 September 2015

लिंगाची लांबी किती असावी...?

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक पुरुषाच्या शिस्नाची लांबी ते पूर्ण ताठरलेले असतांना कमी अधिक असते. आपले लिंग छोटे आहे, वाकडे आहे, खाली वळलेले आहे वगैरे शंकांनी घेरून तरुण पुरुष चिंताग्रस्त होऊ शकतो. कारण भारतीय कौटुंबिक पद्धतीत वडील आपल्या मुलाला लैंगिक ज्ञान अजिबात देत नाहीत. मित्रांकरवी मिळणारे अशास्त्रीय ज्ञान, कामुक पुस्तके वाचून होणारे बढाई मारणारे ज्ञान आणि स्वतःच स्वतःचे परीक्षण करून अवगत झालेले अपुरे ज्ञान यांमुळे तरुण पुरुष अधिकच बुचकळ्यात पडतो. त्यात भरीस भर म्हणून कि काय इंटरनेटद्वारे मिळणारे अश्लील ज्ञान त्याच्या संभ्रमात अधिकच भर घालून जाते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अश्लील चित्रफिती अतिशयोक्त असतात हेच तो विसरून जातो. त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे आपले लिंग लांबलचक आणि सरळसोट नाहीये याची खंत त्याला लागून राहते. त्या सेक्स व्हिडीओमध्ये दर्शविल्याप्रमाणे आपण नाहीच आहोत आणि आपल्या अपुऱ्या शिस्नाने आपण आपल्या स्त्रीला खुश ठेवू शकणार नाहीत याची खात्रीच पटते. आपली शक्ती आजमावण्यासाठी मग मित्रांच्या सांगण्यावरून वेश्यागमन केले जाते. तिथेही निराशा पदरी पडते. कारण ती वेश्या आपल्या व्यवसायाला बांधील राहूनच कर्तव्यकर्म उरकते. त्याचे हातांनीच स्खलन करून माघारी पाठवते. त्यामुळे आपल्या लिंगाच्या आकाराचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. त्यातही मित्र नेहमी बढाया मारतांना आढळतात. मी तासनतास गर्लफ्रेंड उपभोगू शकतो, माझे लिंग दहा इंच लांब आहे त्यामुळे ती खुश होते... वगैरे... वगैरे... मग खरी वस्तुस्थिती काय आहे? कामशास्त्र काय सांगते? पुरुषाच्या लिंगाच्या लांबीचा आणि स्त्रीच्या कामपुर्तीचा काहीही संबंध नाही. स्त्रीचा मदनमणी आणि मदनबिंदू हे उद्दीपित झाल्यास तिची कामपुर्ती होत असते. आणि हे दोन्ही स्थाने योनीच्या बाह्यभागात असल्याने तुम्ही कितीही शिस्न आत घालून संभोग केला तरी हि ठिकाणे उद्दीपित झाल्याशिवाय तिची कामतृप्तता होत नाही हे कायम लक्षात असू ध्यावे. म्हणजेच लांब लिंगाचा पुरुषच फक्त स्त्रीला खुश ठेवू शकतो हे निखालस असत्य विधान आहे. पुरुषाच्या लिंगाची लांबी ही केवळ शुक्रजंतू पिचकारीप्रमाणे योनीत सोडणे यासाठीच उपयोगी ठरते. उत्तेजित अवस्थेत प्रत्येकाचे शिस्न नैसर्गिकरीत्या लांब झालेलेच असते आणि तितकी लांबी मदनबिंदू व मदनमणी यांच्या घर्षणास पुरेशी असते असे कामशास्त्र सांगते. मुखमैथुन किंवा हस्तमैथुन यांनी सुद्धा स्त्री पूर्णतः तृप्त होत असतांना शिस्नाच्या लांबीचा प्रश्न उद्भवतच नाही. कारण स्त्रीची कामोद्दीप्क अंगे म्हणजे स्तनाग्रे, मदनमणी आणि मदनबिंदू इतकीच आहेत व हे सर्व बाह्यभाग ठरत असल्याने अंतर्भागात खोलवर शिस्नाचा होणारा प्रवेश गर्भधारणा होण्यापलिकडे कामतृप्तीत अजिबात भाग घेत नाही हेच अंतिम सत्य आहे. तसेच लिंग वाकडे असले काय किंवा खाली तोंड केलेले असले काय, स्त्रीच्या कामपुर्तीशी त्याचा अन्योन्य संबंधही उरत नाही. योनीभगोष्ठांच्या मध्ये वरील बाजूस असलेल्या मदनमण्याचे उद्दीपन होणे आणि त्याचवेळी योनीमार्गात साधारणपणे अडीच ते तीन सेंटीमीटर अंतरावर असलेल्या मदनबिंदूचे घर्षण होणे इतकेच स्त्रीला तृप्त करण्यास अपेक्षित असते. त्यामुळे कोणताही पुरुष आपल्या आखूड, तिरप्या आणि डूचक्या लिंगाने स्त्रीला पुरेपूर कामतृप्त करू शकतो हेच खरे आहे... भोगगुरू कामदेव Kaamvishva.blogspot.com