Friday 8 January 2016

सेक्स आणि गैरसमजुती...

सेक्स आणि गैरसमजुती...

सेक्स ही कृती नेहमी अंधारात लपलेली, ठेवलेली आणि गुढरम्यतेच्या वलयाखाली अंकित झालेली अशी अनाकलनीय असल्याने सेक्स बाबत अनेक समज-अपसमज, समजुती-गैरसमजुती जनमानसांत पसरलेल्या आढळून येतात. या समजुतीबाबत कोणतीही वडीलधारी व्यक्ती खात्रीशीर शास्त्रीय माहिती देत नाही. सेक्ससंदर्भात लैंगिक शिक्षण तरुण मुला-मुलींना देणे हेच मुळात अश्लील, गैर, पाप मानले जात असल्याने त्याविषयी अळीमिळीगुपचिळी बाळगून तरुणांचा संभ्रम आणखी वाढविला जातो. युवकांचे ‘सेक्स समुपदेशन’ काळाची गरज असतांना त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. नेमके शास्त्रीय कामविश्व तरुणांना उमजत नाही आणि मग इंटरनेटवरून मिळणारी अवास्तव, अशास्त्रीय आणि अतिरंजित माहिती त्यांना खरी वाटून त्याप्रमाणे सेक्स करण्याचा निष्फळ प्रयत्न केला जाऊन पुरुष आणि स्त्री दोघेही निराशेच्या गर्तेत लोटले जातात. म्हणूनच कामविश्व ब्लॉगच्या माध्यमातून तरुणांना सेक्सविषयी जागरूक करण्याचे, संभोगाचे कामशास्त्रीय ज्ञान देण्याचे आणि स्त्री पुरुष लैंगिक संबंध कसे सुधारतील याचा उहापोह करण्याचे शिवधनुष्य उचलेले आहे. अल्पावधीतच कामविश्व ब्लॉगने ५०००० पेजव्ह्युजचा टप्पा ओलांडला आहे ही कौतुकाची आणि अभिमानास्पद बाब आहे. कामविषयक सध्या सोप्या भाषेत काम्शास्त्रीय ज्ञान पुरवणारा कामविश्व हा ब्लॉग वाचून लैंगिक जीवन आनंददायी करण्याचा राजमार्ग वाचकांना आवडला व त्यांनी अमलांत आणला हेच या ब्लॉगचं फलित ठरलं आहे. –भोगगुरू कामदेव. kaamvishv.blogspot.in
१)—संभोग तासनतास चालला पाहिजे तोच खरा मर्द!
लैंगिक वृत्तीत हा फार मोठा गैरसमज अजूनही जपला जातो. वास्तविक पाहता पुरुषाचा प्रत्यक्ष संभोग करण्याचा कालावधी केवळ दहा सेकंद ते तीन मिनिटे असतो. तत्पूर्वी केली जाणारी प्रणयक्रीडा, कामलीला आणि कामक्रीडा किती वेळ चालते तेच महत्वाचे असते. प्रत्यक्ष संभोग करण्यापूर्वीच स्त्रीला अनिवार अधीर आणि कामोत्तेजित करणे ज्याला जमते तोच खरा मर्द! त्यानंतर प्रत्यक्ष संभोगासाठी येणारी स्त्रीची अधीरता तिच्या कामतृप्तीत परावर्तीत होत असते. म्हणजेच जो पुरुष यशस्वी प्रणयक्रीडा करतो तोच स्त्रीला कामतृप्त करून संभोग यशस्वी करू शकतो. पोर्नोग्राफीत दाखवतात तसे तासनतास प्रत्यक्ष संभोग करणे कोणत्याही पुरुषाला शक्य नसते. सेक्स फिल्म मधील ही अवास्तव संभोगक्रिया वास्तवात स्त्रीला आवडत नसते. त्याउलट तिला प्रेमळ वार्तालाप, चावट जोक्स, हलकेसे स्पर्श, प्रणयाराधन, अनिवार चुंबने, सर्वांग स्पर्श, स्तन मर्दन, स्तनाग्रे चूषण यातच जास्त स्वारस्य असते हे तरुणांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून तासनतास संभोग करण्यापेक्षा तासनतास प्रणय रंगविणारा पुरुषच खरा मर्द ठरतो!
२)—कुमारिकेला भोगल्याने किंवा गुदभागी संभोग केल्याने सेक्सपॉवर वाढते!
बिलकुल नाही. हा अपसमज तरुणांच्या अज्ञानातूनच जन्मला आहे. कुमारिकेला उपभोगुन तिचा कौमार्यभंग केला म्हणून सेक्सपॉवर वाढते याला काहीही कामशास्त्रीय आधार नाही. उलट कुमारिकेला होणाऱ्या वेदना पाहून पुरुषातील सैतान जागा झाला असेच म्हणावे लागेल. प्रणय रंगवत नेऊन अगदी शेवटी संभोग झाला तरच कामतृप्तीचा परमानंद लाभतो. बळजबरीने बलात्कार करून असुरी आनंद उपभोगणे याला मर्दुमकी म्हणू नये. ही तर वासना ठरते वासना!
काही पुरुष गुदमैथुन करून आपली सेक्सपॉवर वाढेल अशा गैरसमजातून तृतीयपंथीयांना जुगतात, पण यातही काहीच कामशास्त्रीय तथ्य आढळत नाही. एक सांगता येईल ते हेच की योनीपेक्षा गुदभाग जास्त संकुचित असल्याने शिस्न गुदद्वारात सहजासहजी जात नाही, ते आत घुसावे यास्तव लिंग जास्त कडक व ताठर बनते पण याचा अर्थ असा निघत नाही की सेक्सपॉवर वाढली. याउलट सत्य कामशास्त्रीय परिस्थिती अशी उद्भवेल की- गुदमैथुन करण्याची सवय लागल्यानंतर योनीमैथून (गुदद्वारापेक्षा योनीच्या जराशा सैलपणामुळे) यशस्वी होऊ शकणार नाही.
३)—स्त्रीआरूढ संभोगासन केल्याने स्त्री शेफारते!
बिलकुल खोटा समज आहे हा. संभोगात तोचतोपणा आला की कंटाळवाणे वाटून त्यात स्वारस्य उरत नाही. म्हणून विविध आसनांचा संभोगात कल्पकतेने वापर करून लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटण्याची युक्ती वात्सायनाने देखील फार पूर्वी सांगून ठेवलेली आहे. स्त्रीला पुरुषावर आरूढ होऊन केला जाणारा संभोग स्त्रीसाठी कमालीचा कामतृप्तीदायक ठरतो. पुरुषाचे शीघ्रपतन होत असेल तर 'स्त्रीआरूढ संभोगासन' उपचार म्हणून सेक्स तज्ञ सुचवितात. या आसनामुळे स्त्रीला तिच्या कामोत्तेजक जागा म्हणजेच मदनबिंदू (जी-स्पॉट) व मदनमणी (क्लायटोरीस) यांचे हवे तसे उत्पिडन स्वतः करून घेता येते. किती प्रमाणात घर्षण करून घ्यावे, किती खोलवर शिस्न सारून घ्यावे आणि कितीवेळ पुढेमागे सरकून इच्छित परमोच्च क्षण मिळवावा यासाठी स्त्रीला मोकळीक मिळून तिला पाहिजे तितकी कामतृप्ती करून घेता येते. याचा अर्थ ती शेफारते असा नसून स्त्री पुरुषावर कमालीचा जीव ओवाळून टाकते असाच होतो!
अशा अनेक गैरसमजांचे गाठोडे मनावर वागवीत पुरुष चाचपडत, चुकतमाकत आणि स्वतःच शिकत लैंगिकक्रीडा करीत राहतो. त्यातील काहींचा उहापोह मागील एका लेखांकात केलेला होताच. अशा गैरसमजांना मुठमाती देऊन खरे कामशास्त्रीय ज्ञान अवगत करणे व त्याचे कल्पकतेने अनुसरण करीत मनसोक्त लैंगिक आनंद प्राप्त करणे हेच प्रत्येक तरूणाचे इप्सित असावे... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment