Saturday 14 May 2016

सेक्सविषयी अंधार का ???

सेक्सविषयी अंधार का ???
ज्या कृतीमुळे किंवा ज्या क्रिडेमुळे अख्खी दुनिया उजेडात येते ती संभोगक्रीडा अंधारात ठेवण्याचा तत्ववेत्त्यांचा अट्टहास कळत नाही. संभोग शब्दही अश्लील मानला जातो, त्याबाबत काही विचारण्याची सोय नाही, चारचौघांत चर्चा करायला गेलो तर हिणवले जाते, अश्लीलतेचा शिक्का मारून टाळले जाते, संभोगक्रीडेबाबत जागरूक असलेले पालकही आपल्या वयात आलेल्या मुला-मुलींना कामशास्त्रीय ज्ञान देण्यास टाळाटाळ करतात. त्यांच्या थेट प्रश्नांना बगल देऊन ‘कळेल तुला सर्व...’ किंवा ‘पाण्यात पडल्यावर पोहता येतेच की...’ असे सांगून वेळ निभावून नेतात. वयात येणाऱ्या मुला-मुलींना लैगिक शिक्षणासोबतच शारीरिक आकर्षण, प्रेम, प्रणयक्रीडा, कामक्रीडेचे महत्त्व, त्यातील चढ-उतार, कामतृप्ती, यशस्वी संभोग इ. इ. कामशास्त्रीय संज्ञांचा ओझरता का होईना परिचय करून देणे आवश्यकच असते. मात्र 'लैंगिक ज्ञाना'च्या नावाखाली मुलींना ‘त्यांचा मासिक धर्म, त्यातील शास्त्रीय ज्ञान’ देण्यात आणि मुलांना ‘वयात येतांना होणारे शारीरिक बदल कोणते?’ इतकेच नाममात्र ज्ञान देण्यात आपण धन्यता मानतो. इथेही संभोगक्रीडेबाबत मौन बाळगून, ‘तसल्या’ कामशास्त्रीय ज्ञानाला ‘अश्लील’ ठरवून अजूनही अंधारात गाडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे तो निश्चितच निषेधार्ह आहे.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

१)वयात येणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींत भिन्नलिंगी आकर्षण उत्पन्न होणे हे काळ्या दगडावरची रेघ आहे. संप्रेरकांच्या प्रभावाखाली अनेक मुले-मुली एकमेकांच्या गुह्य आणि अंधारात असणाऱ्या बाबी धुंडाळू पाहतात. प्रेमोन्मादाच्या भरात एकमेकांच्या शरीराचा आस्वाद देखील घेतला जातो. त्यात गैर आहे असे मुळीच नाही. पूर्वापार चालत आलेल्या रूढी-कायद्याने असा अनैतिक संभोग म्हणजे गुन्हा ठरविलेला आहे. निसर्गाच्या आणि सृष्टीच्या नियमानुसार असा शारीरिक आकर्षणातून घडलेला संभोग हा अव्वल नंबरी असतो! अशा कामक्रीडेस पैकीच्या पैकी मार्क देण्यात निर्सग कधीच मागेपुढे पाहणार नाही. असे अनैतिक कृत्य म्हणजे गुन्हा ठरविणारे आपण (सो कॉल्ड) उत्क्रांतलेले मानव करंटेच ठरतो.
२)निसर्गात आपण पाहतो, जो नर उमदा असतो, जो स्वतःला सिद्ध करतो, जो इतर नरांच्या तुलनेत हुशार व धष्टपुष्ट असतो अशाच नराशी मादी मैथून करण्यास राजी होते. तद्वत जो पुरुष देखणा आहे, पाहताच छाप पाडू शकेल अशा व्यक्तिमत्वाचा आहे, जो स्वतःचे कौशल्य पणास लावून उच्चतम पातळी गाठलेला आहे अशा पुरुषाकडे स्त्री नकळत आकर्षित होणे हा निसर्गनियम असूनही रूढी-परंपरांचा जाच सहन करीत स्त्री आपल्याला आवडलेल्या पुरुषाला कायम मनात दडपून ठेवत समाजाने गळ्यात बांधून दिलेल्या विजोड पुरुषाशी संसार थाटण्यास वरकरणी राजी होते, आतून मात्र ती तिला आवडलेल्या पुरुषाशी रत होण्याचे स्वप्न बाळगून असते आणि कदाचित नावडत्या पुरुषाशी संभोग करतांना ती नक्कीच आवडत्या पुरुषाला कल्पून त्या क्रीडेत रस घेत असेल का? अशी शंका घ्यायला नक्कीच वाव आहे!
३)पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीच्या कामभावनांचा कुठेही विचार केलेला आढळत नाही. स्त्री केवळ उपभोग्य वस्तू, वापरून टाकून देण्यात खरा पुरुषार्थ मानला जातो. 'जो जास्त स्त्रिया उपभोगील तोच खरा मर्द!' अशी टिमकी पुरुष वाजवीत असतो. परंतु क्वॉन्टीटीपेक्षा क्वॉलिटी केव्हाही सरस ठरते. पुरुषाने दहा स्त्रिया उपभोगू दे पण त्या जर त्याच्याकडून कामतृप्त होत नसतील तर त्याच्या मर्दुमकीला काडीचाही अर्थ नाही, याउलट जर पुरुषाने एकच स्त्री मनसोक्त उपभोगली ज्याद्वारे ती कमालीची कामतृप्त झाली तरच तो खरा परिपूर्ण पुरुष ठरतो! बाकीचे संभोग म्हणजे उरकण्याची क्रिया समजणारे पुरुष कधीही स्त्रीच्या मनात आपले स्थान टिकवून ठेऊ शकत नाहीत.  पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आतून अतृप्त राहते, आपले मनोगत दडपून ठेवते, पुरुषाकडून शरीरसुख मिळत नाही हे ती कोणालाही सांगू शकत नाही आणि याचाच परिणाम म्हणून तिला इतर पुरुषाकडून ते कामतृप्तीचे सुख हवे असते, त्या दृष्टीने ती प्रयत्न करू लागते यामध्ये कामशास्त्रीयदृष्ट्या  काहीएक गैर नाहीये...!
४)म्हणूनच अंधारात अधांतरी ठेवला गेलेला यशस्वी संभोगाचा विषय प्रत्येक पुरुषाला अवगत व्हायला हवा. स्त्रीची कामतृप्ती कशात असते, तिला आपण तृप्त कसे करावे, स्त्रीला कोणती प्रणयक्रीडा विशेष भावते याचा अभ्यास पुरुषाने जरूर करावा. कामशास्त्राचे उचित ज्ञान प्राप्त केल्याखेरीज स्त्रीला हात लावूच नये तरच वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आस्वाद घेता येईल...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment