Saturday 21 May 2016

सेक्स आणि कामुक साहित्य...

सेक्स आणि कामुक साहित्य...


वयात येतांना प्रत्येकाने एकदा तरी कामुक साहित्याचा आस्वाद घेतलेला असतो. सेक्सची शाब्दिक वर्णने, सेक्सी कादंबऱ्या, सेक्सी क्लिप्स हे सर्व म्हणजे कामुक साहित्य होय. हे वाचतांना किंवा पाहतांना आपण नकळत त्या वर्णनाच्या स्वप्नात विहरू लागतो.  ती क्रिया प्रत्यक्ष अनुभवतो आहोत असा भास होत राहतो. मग त्या कामुक उत्तेजनाची सवय लागते, त्यातूनच हस्तमैथुन घडून येते. पुढे पुढे अशा कामुक साहित्याच्या आहारी जाण्याने ते वर्णन वाचल्याशिवाय किंवा सेक्सी क्लिप पाहिल्याशिवाय लिंगात ताठरताच येत नाही! कामोत्तेजना अशा दुय्यम वस्तूवर अवलंबून राहिल्याने प्रत्यक्ष स्त्रीचा सहवास नकोसा होतो. प्रणय क्रीडेत रस उरत नाही. थेट प्रत्यक्ष संभोगच आवडू लागतो. याचे दूरगामी परिणाम स्त्री-पुरुष संबंधावर होत राहतात. केवळ पुरुषच असे साहित्य आजमावतात असे नाही तर स्त्रिया देखील पोर्न फिल्म्स पाहून कामतृप्ती मिळविण्याचा प्रयत्न करतात असे सेक्सोलॉजिस्टनी नमूद करून ठेवले आहे. त्यामुळे असे कामुक साहित्य वाचावे, पाहावे की नको? याचे विवेचन या लेखांकात केले आहे...
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)वयात येतांना सेक्स म्हणजे नेमका काय असतो, या उत्सुकतेपोटी कामुक साहित्याचा आधार घेतला जातो. मित्रांकडून किंवा मैत्रिणींकडून असे साहित्य इकडून तिकडे फिरत राहते. त्यात नेहमी अतिशयोक्त वर्णने रंगविलेली असतात. आठवड्यातील सात दिवस, रोज तीन चार वेळा संभोग करून मज्जा लुटतो असे अशाश्वत लिखाण केलेले असते. त्यामुळे पुरुषाच्या मनावर त्याचा पगडा बसून यथोचित प्रणयक्रीडा करण्याऐवजी तो जास्तीत जास्त वेळ संभोग करीत राहण्याचा प्रयत्न करीत राहतो. वास्तविक पाहता स्त्रीला कामतृप्त करण्यासाठी अनेकवेळा संभोगाऐवजी अनेकवेळा प्रणयक्रीडा आणि कामक्रीडाच करावी लागते हे तो पूर्णतया विसरलेला असतो. मग स्त्रीची चिडचिड होणे साहजिक असते.
२)नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे ठराविक वयानंतर गात्रेही शिथिल होत जातात. वय वाढले की अनेक विवंचना हात धुवून मागे लागलेल्या असतात, प्रापंचिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. अशा प्रौढ वयात पूर्वीइतका जोरकस संभोग करणे जमत नाही, उत्तेजनासुद्धा कमी प्रमाणात मिळत असते. कामक्रीडेतला तोच तोचपणा नकोसा वाटतो, अशावेळी मात्र कामुक साहित्य नक्कीच उपयोगी पडते. कामुक वर्णने वाचून सेक्सची इच्छा प्रबळ होते व लिंगात ताठरपणा येऊ लागतो. तसेच प्रौढ वयात स्त्रीची कामेच्छा कमी होत असल्यास पोर्न क्लीपने उत्तेजित करता येते.
३)वयात येतांना, संभोगाचा अनुभव घेतलेला नसतांना कामुक साहित्य वाचणे म्हणजे केवळ स्वप्नविहार असतो. शिवाय त्यात अतिशयोक्ती असल्याने मला असे जमत नाही, इतकावेळ लिंग ताठ राहत नाही, स्त्रीला मी तृप्त करू शकणार नाही नकारात्मक विचारांचे प्राबल्य पुरुषात वाढू लागते. त्याऐवजी कामशास्त्रीय ज्ञान जर तरुण पिढीला वेळीच मिळाले तर नक्कीच स्त्री-पुरुष संबंध आणखी दृढ होत राहतील!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment