Friday 15 December 2017

सेक्स आणि रूप ...

सेक्स आणि रूप ...
‘रूप’ म्हणजे दिसणे, दाखवणे आणि पाहणे या क्रिया होत. सेक्स दरम्यान या तिन्ही क्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. पहिल्या प्रथम स्त्री–पुरुष एकमेकांना कसे दिसतात, एकमेकांना कसे पाहतात, आपले अवयव एकमेकांना कसे दाखवतात यावर यशस्वी सेक्सचा पाया ठरत असतो. एकेमकांची ओढ निर्माण होण्याला पहिले कारण एकमेकांचे दिसणारे, जाणवणारे आणि दर्शविले जाणारे ‘रूप’ होय. याचे काही नियम आहेत का हे पुरुषाने जाणून घेणे गरजेचे असते. स्त्री तर कोणत्याही परिस्थितीत उत्तेजक द्रव्यच असते म्हणा, परंतु पुरुषाने काय करावे जेणेकरून स्त्री त्याच्या रूपावर भाळली जाईल, तिला त्याच्या रुपाची ओढ वाटेल आणि आपले रुपडे कसे प्रदर्शित करावे म्हणजे स्त्री आपसूक जवळ येईल याचे ज्ञान पुरुषाने आत्मसात केले पाहिजे.
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.in 
१)मूलतः पुरुषाचा चेहरा आश्वासक, हसरा, प्रसन्न आणि बोलका असला पाहिजे. मख्ख, ओढलेल्या, तणावग्रस्त, चिंतातूर, मरगळलेल्या चेहऱ्याने स्त्रीला सामोरे जाल तर ती हमखास तोंड फिरवेल हे पुरुषाने लक्षात ठेवावे. तसेच चेहऱ्यावरील श्मश्रू, दाढी सफाचट असणे आवश्यक आहे. चेहऱ्याला साजेशी केशभूषा असावी. उगाचच भणंगासारखे मजनू बनून दाढी टोकरीत स्त्रीला भेटायला जाऊ नये. वाढलेल्या दाढी-मिशांची स्त्रीला किळस वाटते. पण एक नक्की वाढलेली दाढी मिशा व्यवस्थित ट्रीम केल्या असतील आणि चेहऱ्याला शोभत असतील तर स्त्रीला देखील आवडू शकतात.
२)पुरुषाचे व्यक्तिमत्त्व भारदस्त नसले तरी चालले पण बेंगरूळ असू नये. शरीरयष्टी सिक्सपॅक्स ची नसली तरी चालेल पण चालण्यात रुबाबदारपणा असावा. कपडे नवेकोरे नसले तरी चालतील पण उपलब्ध आहे तेच शरीराला साजेसे, स्वच्छ, इस्त्री केलेले असावेत. अतिशय ढगळ किंवा कमालीचे दाटके कपडे परिधान करू नयेत. आपले बुजगावणे होऊ नये याची काळजी पुरुषाने घेतली पाहिजे. म्हणतात ना- फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन.
३)ज्यावेळी स्त्री-पुरुष बेडवर असतात, त्यावेळी पुरुषाला आपले ताठरलेले लिंग कधी एकदा स्त्रीच्या पुढ्यात ठेवून तिला त्याचे दर्शन घ्यायला लावतो असे झालेले असते. पण पुरुषाने एक नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की स्त्रीला ताठरलेल्या लिंगाचे रुपडे न्याहाळण्यात अजिबात रस नसतो, ती पुरुषाच्या प्रणयक्रीडेची भुकेली असते. थेट शेवटी प्रत्यक्ष संभोगाचे वेळीच तिला ताठरलेले लिंग हाताळण्यात मौज वाटते.
४)पोर्नक्लिप मध्ये पाहून पुरुषालाही वाटू लागते की स्त्रीला शिस्न हातात घेणे, ओठावर ठेवणे, चूषण करणे आवडत असते. परंतु वास्तवात तसे नसते. त्यामुळे शिस्नाचे केवळ दर्शन होण्याने स्त्री कधीच उत्तेजित होत नाही. एक मात्र नक्की ज्यावेळी स्त्री कमालीची उत्तेजित झालेली असते, तेव्हा ती पुरुष म्हणेल तसे करण्यास उद्युक्त होत असते. अशावेळी स्त्री पुरुषाचे शिस्न कौतुकाने पाहू शकते, हाताळते किंवा चूषण करू धजते.
५)ज्यावेळी स्त्री-पुरुषांना एकमेकांच्या देहाची ओढ लागून राहते, आणि स्त्रीला उत्सुकता म्हणून पुरुषाचे ताठरलेले लिंग कसे असेल हे पाहण्याची अनिवार ओढ लागते तेव्हा मात्र पुरुषाने कोणताही आडपडदा न ठेवता तिला आपले लिंग वरून खालून, इकडून तिकडून, या बाजूने त्या बाजूने पाहून द्यावे, हाताळू द्यावे. तत्पूर्वी पुरुषाने लिंगाच्या आजूबाजूचे केस व्यवस्थित काढलेले असावेत. गुळगुळीत शेव्हिंग केलेले शिस्न दिसण्यात अधिक रेखीव असते. स्त्रीला शेव्हिंग केलेल्या शिस्नाचे रुपडे अधिक भावते असे एका पाहणीत आढळून आलेले आहे.
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment