Friday 15 December 2017

सेक्स आणि रस ...

सेक्स आणि रस ...
रस म्हणजे ज्यूस नव्हे! रस म्हणजे चव. जिभेला होणारी जाणीव म्हणजे ‘रस’ होय. सेक्स दरम्यान अनेकदा स्त्री-पुरुष एकमेकांच्या देहाची चुंबने घेत असतात. बहुतेकदा चेहरा, ओठ, मान, पाठ, कंबर, काखा, जांघा या ठिकाणी ओठांचा, जिव्हेचा स्पर्श करीत स्त्री-पुरुष एकमेकांना प्रणयानंद देण्याचा, घेण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी त्या जागेची चव कळत जाते. ती चव किंवा तो शृंगाररस किती उत्तेजक आहे त्यावर पुढील प्रत्यक्ष सेक्सचा डोलारा उभा राहिलेला असतो. म्हणून सेक्स च्या वेळी रस किंवा चवीला महत्व द्यावे लागते.
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.in
१)अनेक पुरुष पानमसाला, गुटखा इ. किक देणारे पदार्थ चघळीत असतात. अशा तीक्ष्ण पदार्थांची तिखट चव स्त्रीला कशी आवडेल बरे? अशा पुरुषांना स्त्री टाळू लागते. किंवा त्यांना तोंडात तोंड घालू देत नाही! परिणामी सेक्स म्हणजे एक ‘उरकण्याचा’ कार्यक्रम ठरून जातो. चुंबने देण्या-घेण्यातील मौज निघून जाते. त्यामुळे जेव्हा स्त्रीशी संपर्क येणार असेल त्यावेळी पुरुषाने तोंडाचा रस जरा गुंडाळूनच ठेवला तर बरे होईल. तोंड स्वच्छ धुवून ब्रश करूनच स्त्रीचे चुंबन घ्यावे.
२)प्रणयक्रीडा दरम्यान पुरुषाला स्त्रीचे कोनेकोपरे चाखावेसे वाटू शकतात. स्त्री स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असल्याने तिचे अंगप्रत्यंग फारच चविष्ट लागतात! याउल पुरुष जरा कंटाळा करतो म्हणून त्याच्या काखा- जांघेला उग्र किंवा घामट चव असू शकते. त्यामुळे स्त्री पुरुषाचे कोनेकोपरे चाखीलच असे नाही. हे टाळण्यासाठी पुरुषाने नियमित काखेतील, जांघेतील केस सफाचट करून तयारीतच असावे लागते. सेक्सपूर्वी साबण लावून चोळूनमोळून अंघोळ केली तर स्त्रीला घामट चव लागणार नाही व ती पुरुषाचे अंगप्रत्यंग चाखण्यास आतुर होईल.
३)मुख मैथुन या प्रकाराबद्दल मागे एका लेखांकात वर्णन आलेले आहेच. येथेही जननेंद्रिये चुषण करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तेथील चव कशी आहे यावर सर्वकाही अवलंबून राहते. स्त्री व्यवस्थित उत्तेजित झाली की तिच्या योनीतून कामसलील स्रवू लागल्याने ओलसरपणा येऊ लागतो. हा पाझर चाखण्याला पुरुष हपापलेला असू शकतो. नव्हे तो त्याच्या आवडीचा भागच असतो म्हणाना! निसर्गातही आपण पाहतो अनेक नर माद्यांचे गुह्यांग चाटतांना उत्तेजित होत जातात. तसेच पुरुष जेव्हा स्त्रीच्या ओलसर योनीची जिभेने चव घेत जातो तेव्हा तेव्हा तो कमालीचा उद्दीपित झाल्याचे निष्कर्ष सेक्सतज्ञ नोंदवतात. स्त्री स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असल्याने तिने अगोदरच शेव्हिंग करून डीओ वगैरेचा वापर करून आपल्या गुह्यांगाचा दर्प घालवलेला असतो.
४)स्त्रीला पुरुषाच्या शिस्नाची गोडी लागते हे पोर्नफिल्म मध्ये बिंबवतात तसे प्रत्यक्षात असत नाही. मुळात पुरुषाच्या लिंगाला असणारी बोंबलाची चव स्त्रीला मुळीच आवडत नसते. एखादा पुरुष जागरूक असेल तर तो शेव्हिंग, डीओ वापरून चव घालवू शकतो. सगळेच असे वागतात असे नाही. शिस्नमुंडाच्या भोवती व लिंगचर्माखाली पांढरा साका जमा होत असतो, जो अतिशय खारट तुरट चवीचा असतो. तो वेळोवेळी साबणाने स्वच्छ करून धुणे अगत्याचे असते. पुरुषाचे ‘अतिस्वच्छ’ लिंगच स्त्रीला चूषण करायला आवडते. अन्यथा ती मुखमैथुनाला राजी होत नाही.
५)काही स्मार्ट पुरुष चवदार कंडोमचा मार्मिक वापर करून स्त्रीला आईस्क्रीम खाण्याचा अनुभव देतात! वेगवेगळ्या चवीचे, रंगाचे, गंधाचे कंडोम उपलब्ध असतात. त्यांचा पुरुषाने खुबीने वापर केल्यास स्त्री लगेच मुखमैथुनाला राजी होऊ शकते. एखाद्या कंडोमचा ‘रस’ जर स्त्रीला भावला तर ती नेहमीच त्या ‘चवीची भोक्ती’ होते हे पुरुषाने जाणून असावे!
--भोगगुरू कामदेव.  Kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment