Sunday 2 April 2017

लिंगचर्म

लिंगचर्म

शिश्नाच्या गुलाबी मण्यावर त्वचेचे एक आवरण असते. त्यास लिंगचर्म म्हणता येईल. मण्याचे संरक्षण करण्याच्या हेतूने ही नैसर्गिक योजना केलेली असावी.परंतु संभोगाच्यावेळी या आवरणाचा काही पुरुषांना त्रास संभवू शकतो, तर काही पुरुषांना या लिंगचर्माचा अधिकच फायदा होतांना आढळून येतो. लिंगचर्म काही वेळा शस्त्रक्रियेने काढावे लागते तर काही मुलांचे लिंगचर्म ते लहान असतांनाच कापून काढण्याची प्रथा रुजलेली आढळते. ज्या पुरुषांचे लिंगचर्म अबाधित राहिलेले असते त्यांना त्याचा काय आणि कसा उपयोग करून घेता येईल याविषयी चर्चा या लेखांकात केलेली आहे. Kaamvishva.blogspot.com
१)संभोगाच्यावेळी लिंगचर्म मागे सरकून शिस्नमणी बाहेर आलेला असावा अशी नैसर्गिक योजना असते. त्यामुळे स्फुरण पावलेल्या मण्याच्या कडांचे घर्षण योनीतील जी-स्पॉट अधिक उत्तेजित करू शकेल. त्यायोगे स्त्रीला अधिकाधिक उत्तेजना लाभून ती कामतृप्त होऊ शकेल.
२)परंतु काही पुरुषांमध्ये लिंगचर्म मागे गेल्यास त्याची माया कमी असल्याने मागेच राहते, पुढील शिस्नमणी स्फुरण पावल्याने अधिक टम्म फुगतो. वेळीच पुरुषाने त्वचा पुढे घेतली तर ठीक, नाहीतर शिस्नमण्याला ‘फास’ बसतो!!!
३)अशावेळी तातडीने मागे गेलेली त्वचा पुढे घेण्याचे प्रयत्न करावे लागतात. अन्यथा शस्त्रक्रिया करून मणी मोकळा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. ज्यांच्या लिंगचर्माची माया मोठी असते, त्या पुरुषांचे लिंगचर्म सहज पुढे मागे होऊ शकते. त्यांना असा फास बसण्याचा त्रास संभवत नाही.
४)मात्र काही पुरुषांमध्ये लिंगचर्माची माया इतकी छोटी असते की त्यातून शिस्नमणी अजिबात बाहेर येत नाही! त्यामुळे असे पुरुष लिंगचर्मासहित संभोग करू शकतात! शिस्नमणी लिंगचर्माच्या बाहेरच येत नसल्याने फास बसण्याचा प्रकार होतच नाही!
५)अशा लिंगचर्म अबाधित राहिलेल्या पुरुषांना अधिकवेळ सेक्स करता येतो. कारण त्यांचा उत्तेजक बिंदू लिंगचर्माने झाकलेलाच राहतो, त्या बिंदूचे उत्पीडन वीर्यस्राव होईल इतके जोरकस होत नाही. त्यामुळे ते बराच वेळ संभोग करू शकतात.
Kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment