Tuesday 22 September 2015

शीघ्रपतन...

शीघ्रपतन...
अनेक सेक्सविषयक जाहिरातींमध्ये शीघ्रपतन ठळकपणे अधोरेखित केलेले आढळते. ही एक मोठी समस्या असून त्यावर आपल्याकडे अक्सीर इलाज आहे, अशी शेखी तथाकथित वैद्य मिरवत असतो. शीघ्रपतनाला कामसमस्या आणि लैंगिकआजार अशी भयप्रद नावे देऊन शीघ्रपतनाने ग्रासलेल्या पुरुषाला अधिकच नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. शीघ्रपतन म्हणजे कामशास्त्रीयदृष्ट्या नेमके काय आहे याची माहिती प्रत्येक कामोत्सुक पुरुषाला असणे गरजेचे आहे... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
योनीमध्ये लिंग प्रवेश करण्यापूर्वी किंवा योनीमध्ये लिंग प्रवेश झाल्यावर लगेचच विर्यस्त्राव होणे म्हणजे शीघ्रपतन होय. थोडक्यात काय तर बंदुकीने सावज टिपण्याआधीच गोळी निसटणे! हे का होते? प्रत्येक पुरुषाचे होते का? करणे काय? उपाय काय? याचा उहापोह या लेखात करू या...
१)--  विर्यस्त्राव होणे हे काही पुरुषाच्या आज्ञेवर चालत नाही. वीर्यच्युती ही पूर्णतया अनियंत्रित प्रतिक्षिप्त शरीरक्रिया आहे हे आधी लक्षात घ्या. कामोत्तेजक दृश्य पाहून किंवा स्त्रीचा कामोत्तेजक स्पर्श झाल्यास पुरुषाच्या कामसंवेदना जागृत होतात व मेंदू लिंगाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढवतो आणि ते ताठर होऊ लागते. लिंग ताठ झाल्याच्या संवेदना वळून मेंदूकडे पाठविल्या जातात. त्याचबरोबर शिस्नमुंडाच्या खालील कामोत्तेजक बिंदुला स्पर्श झाल्यास पुन्हा उत्तेजन मिळून लिंग टणक होण्याच्या सूचना मेंदू लिंगाकडे पाठवतो. अशाप्रकारे लिंगाला उत्तेजित करणाऱ्या संवेदनांचा कडेलोट झाला की विर्यच्युती होते. कामोत्तेजक संवेदना पायरीपायरी प्रमाणे वाढत जाऊन एक अत्युच्च क्षण असा येतो की पुरुष वीर्यच्युती अजिबात थोपवू शकत नाही. ही झाली वीर्यपतनाची शारीरक्रिया.
२)--  लिंग ताठ होणे किंवा लिंग ताठ करणे पुरुषाच्या अज्ञेधिन असते, परंतु वीर्यस्त्राव आपोआप होतो. ज्यावेळी पुरुष कामुक विचार करू लागतो किंवा स्त्रीशी शय्यासोबत करण्याआधी स्वप्ने रंगवू लागतो तेव्हा त्याचे लिंग ताठ होऊ लागते. प्रत्यक्ष संभोग होण्यास उशीर होत गेला तर शिस्नात आलेले रक्त पुन्हा माघारी फिरून ताठरता नाहीशी होते परंतु त्याने मानसिकरित्या चढलेली कामोत्तेजक पायरी तिथेच राहते. परिणामी पुढील कामोत्तेजक संवेदना अधिक प्रबळपणे निर्माण जरी होत असली तरी त्या प्रमाणात लिंग ताठरता आलेली नसते आणि मानसिकदृष्ट्या अत्युच्च क्षण जवळ येत गेलेला असतो. म्हणजेच मानसिक पातळीवर पुरुषाने सर्व पायऱ्या पूर्ण केलेल्या असतात. त्यामुळेच मग लिंग योनीवर टेकवताक्षणी पुढील एक किंवा दोन संवेद्नातच वीर्यच्युती होऊन जाते. प्रत्यक्ष संभोग तसाच राहतो.
३)--  कामोत्तेजना-> लिंग ताठरता-> अधिक कामसंवेदना-> शिस्नाच्या संवेदना लहरी-> अत्युच्च क्षण-> विर्यस्त्राव. अशा या क्रमानुरूप पायऱ्या पार करीत पुरुष कामतृप्त होतो. परंतु शीघ्रपतनामध्ये शिस्नाच्या संवेदना लहरी पर्यंतच्या पायऱ्या त्याने मानसिक पातळीवरच पूर्ण केलेल्या असतात. लिंग ताठ होऊन शिथिल झालेले असले तरी मानसिक संवेदना शिस्नाच्या संवेदना स्पर्शाचीच वाट पाहत असते. त्यामुळे मग अर्धवट ताठरलेले लिंग योनीजवळ नेताच चौथी पायरी तातडीने पूर्ण होऊन अत्युच्च क्षण येतो व वीर्यस्त्राव होतो. म्हणजेच चौथ्या पायरीवर पोचलेली संवेदना नष्ट करून पुन्हा पहिल्या पायरीने सुरुवात करणे हाच शीघ्रपतनावरील उपचाराचा भाग असतो आणि तो काही फारसा अवघड नाही. अभ्यासाने सहजसाध्य होणारा आहे. त्यामुळे शीघ्रपतनाला आजार म्हणता येणार नाही. पुरुषाचा अधीरपणा, धसमुसळेपणाच म्हणता येईल.
४)--  उपचार- स्त्रीला विश्वासात घेऊन शीघ्रपतनावर मात करता येते. मिस्टर आणि मिसेस जॉन्सन यांनी सुचविलेली ही उपचार पद्धती आहे. दोघांनी प्रणयक्रीडा करून एकमेकांना उत्तेजित करावे. स्त्रीने पुरुषाचे लिंग हातात घेऊन हस्तमैथुन करावे. पण उच्च क्षण येताच पुरुषाने तिला खुण करून थांबवावे. विर्यस्त्राव टाळावा. काही वेळ विश्रांती घेऊन पुन्हा हीच कृती करावी. असे आठवडाभर करावे. या आठवड्यात संभोग वर्ज्य आहे. मात्र स्त्रीची कामतृप्ती हस्तमैथुनाने होऊ द्यावी. पुढील आठवड्यात पुरुषाने स्त्रीला स्वतःवर आरूढ करवून संभोग करावा. उच्च क्षण येताच थांबावे. वीर्यस्त्राव टाळावा. काहीवेळ विश्रांती घेऊन पुन्हा पहिल्यापासून कृती करावी. असे तीन वेळा करावे. हे स्त्रीआरूढ आसन असल्यामुळे तिची कामतृप्ती ती स्वतः करून घेईल. मात्र पुरुषाने अगदी ठरवून अतुच्च क्षण पुढे ढकलावा. शेवटच्या आठवड्यात पुरुषाची खात्री झालेली असते की लिंग योनीमध्ये असतांना देखील वीर्यच्युती टाळता येऊ शकते. मग तो विनासायास पुरुषारूढ आसन वापरून संभोग करू शकतो व त्याने शीघ्रपतनावर विजय मिळविलेला असतो.
५)— फक्त पुरुषाने स्वतःवर करावयाचा उपचार देखील कामशास्त्रात सांगितलेला आहे. मांडी घालून बसायचे आहे. डोळे मिटून श्वास आत घेऊन आपले गुदद्वार शक्य तितके आकुंचित करावयाचे आहे व दहा वीस तीस पर्यंत आकडे मनातल्या मनात मोजावयाचे आहेत. असे दिवसभरातून पाच सहा वेळा अभ्यास करावयाचा असतो. आकुंचन स्थितीतील कालावधीत वाढ करावयाची असते. यांमुळे वीर्यच्युतीच्या संवेदना लांबविल्या जाऊ शकतात. याचप्रकारे आणखी एक व्यायाम करावयाचा असतो. मुत्रविसर्जन करतांना मध्येच थांबायचे. लघवी पूर्ण करायची नाही. काही सेकंदांनी पुन्हा मुत्रविसर्जन सुरु करायचे आणि पुन्हा मध्येच थांबायचे. असे तीन चार वेळा लघवी अडवून ठेवायची. या अभ्यासानेसुद्धा वीर्यच्युती आटोक्यात ठेवता येऊ शकते.
६)— पुरुषाने प्रत्यक्ष संभोगाच्यावेळी अमलांत आणावयाचा एक अभ्यासोपचार देखील फॅरेडेने नमूद केलेला आहे. संभोग करतांना आपले लक्ष मुद्दामहून विचलित करावयाचे, असा तो उपचार आहे. म्हणजे उच्च संवेदना प्राप्त होण्याआधीच प्रापंचिक कटकटी, कडाक्याची भांडणे, आर्थिक नियोजन, सतावणाऱ्या विवंचना असले गहन विषय मुद्दाम आठवायचे असतात. त्यामुळे खाली संभोग चालू ठेवला तरी वरती मात्र भलतेच विचारमंथन चालू असल्याने खालच्या मंथनातून लोणी पडत नाही! लिंगाच्या कामोत्तेजक संवेदना मध्येच खंडित केल्यामुळे उच्च संवेदना निर्माणच होत नाहीत. लिंग मात्र योनीत पुढेमागे होत असल्याने कमालीचे कडक बनत राहते. कारण तो योनीचा लिंगाशी होणारा शारीरिक स्पर्श असतो त्याला मानसिक कामसंवेदनांची जोड मिळत नाही. पर्यायाने वीर्यच्युती लांबवता येते.
अशाप्रकारे शीघ्रपतन हमखास दीर्घपतनात रुपांतरीत करता येते...!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment