Friday 25 September 2015

कामजीवनातील गैरसमज...

कामजीवनातील गैरसमज...

प्रत्येकाच्या आयुष्यात कामजीवन येत असते. केवळ ‘काम’ म्हणजेच ‘जीवन’ नसले तरी ‘त्या’ शिवाय जीवन अधुरे असते. त्यामुळे कामविश्वाची माहिती प्रत्येक स्त्री-पुरुषाला असणे अत्यंत गरजेचे ठरते. दुर्दैवाने कामजीवनासंबंधित ज्ञान कोणीही उघडपणे देत नाही. जो देऊ पाहतो त्या व्यक्तीला हलकट, अश्लील, कामपिपासू असे संबोधून हिणवले जाते. लैंगिक ज्ञान देऊ पाहणाऱ्या प्रा. र. धो. कर्वे यांना देखील सामाजिक रोषाला सामोरे जावे लागले होते. पौगंडावस्थेतील मुला-मुलींना लैंगिक शिक्षण देणे अगत्याचे असतांना स्वतः पालकच कामविश्वाबद्दल अनभिज्ञ असल्याने मूग गिळून गप्प बसतात. परिणामी कुतूहल शमविण्यासाठी पोर्नोग्राफी, बिछानेबाज रंगिली पुस्तके, मित्रांकडून मिळणारे अर्धवट ज्ञान यातूनच पुरुष कामजीवनाबाबत सज्ञान होऊ पाहतो. परंतु प्रस्तुत साहित्यात अतिशयोक्तीचा अधिक भडीमार असल्याने आपल्याला तसे जमत नाही या विवंचनेत गुरफटून पुरुष ऐनवेळी गोंधळून जातो व यशस्वी संभोग करू शकत नाही. कामविश्व हे अगाध आहे. त्यातील शास्त्रीय ज्ञान प्रचलित ज्ञानापेक्षा कैकपटीने भिन्न आहे. मूलतः कामविश्वासंबंधी गैरसमज अधिक वेगाने पसरलेले आढळून येतात. ते गैरसमज मनातून काढून टाकून परिपूर्ण कामजीवन अनुभवावे हेच खरे कामजीवन... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)--  पोर्नोग्राफीतून (अश्लील चित्रफिती) कामजीवनाचे खरे ज्ञान मिळते.
बिलकूल चुकीचे विधान आहे हे! पोर्नोग्राफीत संभोगाच्या विविध कसरती दाखवून फक्त पुरुषाचे मनोरंजन केलेले असते. सामान्य स्त्रीच्या दृष्टीने अशा वाकड्या तिकड्या आसनांना काडीमात्र महत्व नसते. तसले डोंबारकीचे खेळ प्रत्येक युगुलाला जमतीलच असे नाही आणि जरी जमले तरी त्यातून कामतृप्ती लाभेलच असेही नाही. पोर्नोग्राफीत दाखवितात तसा तासनतास संभोग कोणताही पुरुष करू शकत नाही. कित्येक दिवस शुटींग केलेले भाग एकमेकांना जोडून ते सलग दाखविलेले असतात हेच दर्शक विसरून जातो. पोर्नोग्राफीने कामोत्तेजना मिळते इतकाच त्याचा फायदा म्हणता येईल. वयोमानपरत्वे कामप्रतिसाद कमी झाला असतांना पोर्नोग्राफीपाहून उत्तेजना मिळविता येते.
२)--  संभोग करणे ‘पाप’ आहे.
पाप-पुण्य या संकल्पना मानव निर्मित आहेत, निसर्गनिर्मित नाहीत. प्रत्येक प्राणी स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्यासाठी जन्मलेला असतो हा निसर्गनियम आहे. भारतीय संकृतीत ‘काम’ हा नंबर तीनचा पुरुषार्थ मानला जातो. तरीही त्याला पाप समजणे हा किती मोठा विरोधाभास समजावा. आपण ज्यासाठी जन्माला आलो त्याची पूर्तता करणे म्हणजे पाप कसे होऊ शकेल? एक मात्र खरे संभोगाची बळजबरी करणे, बलात्कार, सक्ती यांना पाप म्हणता येईल. परंतु स्त्री-पुरुषाने परस्पर संमतीने संभोग करणे बिलकूल पाप ठरत नाही.
३)--  बॉडीबिल्डर आणि देखण्या पुरुषाला कोणतीही स्त्री लगेच वश होते.
हे विधान निखालस झूठ आहे. पुरुष पिळदार शरीराचा असेल तर उत्तम संभोग करू शकेल असा समज पुरुषाचा स्वतःचा असतो, स्त्रीचा नाही. पुरुषाचे गोरेगोमटे दिसणे, ताकदवान असणे, बॉडीबिल्डर असणे या बाबींचा आणि यशस्वी संभोगाचा काहीही संबंध येत नाही. पुरुषानचे धडधाकट आणि सुदृढ दिसणे, प्रसन्न व्यक्तिमत्व यांकडे तारुण्यसुलभ आकर्षण म्हणून युवती आकृष्ट होतात. तरीही अशा हँडसम पुरुषाला कोणतीही स्त्री वश होईल असे कधीही घडत नसते.
४)--  हस्तमैथुन शाप आहे.
मुळीच नाही. भारतीय सामाजिक संकेतानुसार पुरुषाला लग्नानंतरच संभोग करता येतो. तोपर्यंत मनात आणि शरीरातही उसळणाऱ्या कामोत्तेजक उर्मी शांत करण्याची एकमेव कृती म्हणजे हस्तमैथुन असते. तसेच बऱ्याच कारणांमुळे पती-पत्नीत प्रत्यक्ष संभोग घडत नाही. कधी एकांत मिळत नाही, कधी मुले झोपत नाहीत, कधी कोणी आजारी असते, कधी कमालीचा थकवा जाणवत असतो अशी बरीच कारणे प्रत्यक्ष संभोगाला आडकाठी निर्माण करतात. अशावेळी जर जास्तच इच्छा प्रबळ झाली तर हस्तमैथुन करणे भाग पडते. जगातील प्रत्येक पुरुषाने कधी ना कधी हस्तमैथून करून कामतृप्ती मिळवलेली असते त्यामुळे या क्रियेला कधीही शाप म्हणता येणार नाही.
५)— पुरुषाकडून कामतृप्ती लाभली नाही तर स्त्री विवाहबाह्य संबंध ठेवते.
कधीच नाही. पुरुषाला जशी कामतृप्ती महत्वाची वाटते तशी स्त्रीला वाटत नाही. तिच्यामते प्रणयाराधन, प्रेमळ स्पर्श, प्रणयपूर्व क्रीडा हीच खरी कामतृप्ती असते. स्त्रीला प्रेम आणि मातृत्व संभोगापेक्षा अधिक महत्वाचे वाटते आणि ते तिला केवळ आपल्या पतीकडूनच अपेक्षित असते. केवळ संभोगातून मिळणाऱ्या कामतृप्तीसाठी स्त्री विवाहबाह्य संबंध अजिबात ठेवीत नाही. पुरुष जसा लिंगपिसाट असू शकतो तशी स्त्री कधीच नसते. तिला हवा असतो प्रेमाचा आधार, आपुलकीचे भाषण, तिला अनितीने हे मिळवावेसे वाटत नाही. जर आपल्या पुरुषाकडून तिला अपेक्षित प्रेम मिळू शकत नसेल तर अपोआप ती परपुरुषाकडे ओढली जाते, पण त्याच्याकडून तिला सेक्स हवा नसतो तर प्रेमच हवे असते. त्यामुळे केवळ आणि केवळ कामतृप्तीसाठी स्त्री विवाहबाह्य संबंध ठेवते असे म्हणणे चुकीचे आहे.
६)— रोज रात्री संभोग केलाच पाहिजे.
मुळीच नाही. आपण समजतो तशी संभोगाची क्रिया ऐच्छिक स्वरुपाची नसते. कामेच्छा झाली की संभोग हवा असतो. परंतु कामेच्छा स्वतःहून मुद्दाम निर्माण करता येत नाही. ती स्वयंचलित मज्जासंस्थेच्या अधीन असते. त्यामुळे रोज रात्री ठरवून संभोग करता येणे अशक्य आहे. सुश्रुत महिन्यातून सहा वेळा संभोग करणे इष्ट मानतो तर लुथर आठवड्यातून दोन वेळा. झरतृष्ट व सोलन महिन्यातून तीन वेळा संबंध यावा असे सांगत असले तरी मेनिस मात्र महिन्यातून चौदावेळा संभोग करावा असे म्हणतो. म्हणजे व्यक्तिपरत्वे संभोगाची वारंवारिता बदललेली आढळते. जसे रोज दोनतीन वेळा संभोग करणारे आहेत तसेच वर्षातून फक्त एकदाच एकत्र येणारी जोडपीदेखील आहेत. संभोगाचे प्रमाण, पद्धत आणि कालमर्यादा यात प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते, याबाबत कोणाचेही अनुकरण करू नये किंवा कोणाचे अतिशयोक्त वक्तव्य ऐकून त्याप्रमाणे अट्टहास धरू नये.कामेच्छा ही स्प्रिंग सारखी असते, ती दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर जोरात उसळी मारून बाहेर पडते तर अवाजवी ताणल्यामुळे तिची कार्यक्षमता कमी होत जाते. दिवसातून अनेक वेळा फक्त चहाच पीत राहिलो तर कसे वाटेल? अगदी तसेच संभोगाचेही असते. ज्याला जितके जमेल, जितके रुचेल, जितके पचेल तितके खावे-प्यावे तद्वतच ज्याला जितक्यावेळा संभोग शक्य आहे तितक्यावेळा करावा परंतु तो दररोज रात्री झालाच पाहिजे हा दुराग्रह मुळीच नसावा.
७)--  जास्तवेळ संभोग करणारा पुरुष स्त्रीला आवडतो.
कधीच नाही. स्त्रीला प्रत्यक्ष संभोगात रस नसतो. परंतु तिला संभोगपूर्व काम क्रीडा, प्रणय यांत अधिक रुची असते. तिचे सर्वांग कामतृप्तीत भाग घेत असते. पुरुष किती वेळा शिस्न योनीत ठेवू शकतो यापेक्षा तो किती विविधतेने प्रणयक्रीडा करतो याकडे तिचे जास्त लक्ष असते. पुरुषाने आपल्यावर खुपवेळ प्रेमाचा वर्षाव करावा, आपल्या सर्वांगाला प्रेमळ स्पर्शाने उत्तेजित करावे, आपले कामोद्दीपित करणारे बिंदू हळुवारपणे चुंबावेत अशी तिची अपेक्षा असते. यातूनच तिची अधिक कामपूर्ती होत जाते. आता प्रश्न उरतो पुरुषाच्या अधिकवेळ संभोग करण्याच्या कालावधीचा. कामशास्त्रानुसार सर्वसाधारण पुरुषाचा प्रत्यक्ष संभोगाचा कालावधी हा अर्धा मिनिट ते तीन मिनिट इतकाच असतो. योनीमध्ये शिस्न आतबाहेर करण्याचा हा कालावधी आहे. या कालावधीतच त्याचे वीर्यपतन होऊन लिंग ताठरता कमी होत जाते. आपले पूर्वज असणाऱ्या माकडाचा प्रत्यक्ष संभोगाचा काल फक्त पाच सेकंद आहे, त्यामानाने आजचा पुरुष बराच काळ संभोग करू शकतो. या कालावधीत पुरुषाची कामतृप्ती होत असल्याने स्त्रीला उत्तेजित करून परमोच्च क्षणापर्यंत आणणे आणि नंतर प्रत्यक्ष संभोग करून स्वतःसह तिची कामतृप्ती होईल असा काळ-काम-वेगाचे गणित जुळवणे हीच खरी पुरुषाची कसोटी असते. जास्तवेळ संभोग करून स्त्री उत्तेजित करता येत नाही तर तत्पूर्वी केलेली प्रणयक्रीडाच तिला कामोद्दीपित करीत असते हे. म्हणून जास्तवेळ संभोग करणाऱ्या पुरुषापेक्षा जास्तवेळ प्रणय करणारा पुरुष स्त्रीला आवडत असतो हे कायम लक्षात ठेवावे.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment