Wednesday 23 September 2015

कामविश्वाचे महत्व...

कामविश्वाचे महत्व...
आयुष्यातील अर्धाधिक कालावधी प्रत्येकजण बेडवर घालवत असतो. प्रत्येक रात्र काही डाराडूर झोपण्यासाठी असत नाही. जवळ निजलेल्या जोडीदारासोबत प्रणयक्रीडा करून संभोगानंद लुटण्यासाठी देखील असते, याचा विसर पुरुषाला पडला आहे की काय कोण जाणे? काही मिनिटांत आपला कार्यभाग उरकून पुरुष झोपी जातो ही काही यशस्वी पुरुषाची लक्षणे नाहीत. अशा क्षणिक आणि अपुऱ्या मिलनामुळे स्त्री-पुरुषातील वैवाहिकजीवनासंबंधीचे ताण-तणाव वाढत चालले आहेत याकडे डोळेझाक करून कसे चालेल?
येताजाता आपल्या भारतीय संस्कृतीतील धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचा डंका पिटायचा आणि नेमक्या ‘काम’ विषयाला फाटा देऊन, ‘त्या’विषयी मौन बाळगून, ‘काम’ विषयाला नीतीमत्तेचे-सामाजिक संकेताचे बंधन घालून त्याबाबत ब्र देखील उच्चारायचा नाही म्हणजे कोत्या मनाचे लक्षण आहे. आपल्या संस्कृतीत अध्यात्माचा उदोउदो करतांना कामविश्वाचा बळी दिला जातो. अध्यात्मिक पुरुष किंवा स्त्री विषयासक्त असून चालत नाही, नव्हे ती व्यक्ती ब्रम्हचारी असेल तर लवकर मोक्षप्राप्ती करेल अशी काळ्या दगडावरची अलिखित रेघ आहे. परंतु एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात कामजीवनाचा आनंद लुटण्याला पारखे होणे यापरीस करंटेपणा नसावा. मोक्ष आहे की नाही माहीत नसतांना कामविषयक परमानंद टाळून भक्तीमार्गात एकाकी आयुष्य कंठणे कितीसे संयुक्तिक आहे?
आजही समाजात काय दिसते? जो कोणी कामविषयक चर्चा करील त्याला विकृत समजले जाऊन त्याची हेटाळणी केली जाते. आजही भारतीयांचे कामविश्व पाप, लज्जा, संकोच, भीती यांच्याच दबावाखाली दबले जाऊन त्याबाबत बोलणाऱ्याला अशिष्ट, अश्लील, लिंगपिसाट संबोधले जाते. स्त्री-पुरुषांचा विवाह देवादिकांच्या साक्षीने होतो म्हणून तो पूज्य, मातृत्व हे वात्सल्याचे मूर्तिमंत स्वरूप म्हणून पूजनीय परंतु स्त्रीला माता बनविण्यासाठी जी कृती केली जाते तो ‘संभोग’ मात्र अर्वाच्च्य, अश्लील, त्याविषयी ज्ञान मिळविण्यात अनास्था, संभोग म्हणजे केवळ अंधारात उरकण्याचे कार्य, स्त्रीचा उपभोग म्हणजे संभोग...? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
स्वतः तरुण असतांना हस्तमैथुन करायचे आणि आता आपल्या मुलाने हस्तमैथुन केले तर त्याबाबत शास्त्रीय माहिती न देता थेट शिक्षाच करायची? स्वतः तरुणपणी पाहिलेले सेक्सी पिक्चर विसरायचे आणि आपल्या पोरांनी पोर्नफिल्म पाहू नये म्हणून मोबाईल लॉक करायचे? कामजीवनाचे शास्त्रीय ज्ञान मुलाला न देता त्याला अशा अश्लील साईट्स पाहून कुतूहल शमविण्यापासून रोखायचे? पारंपारिक दडपणाला पुरुषाने बळी पडणे कितपत योग्य आहे? पुरुष किती दांभिक असतो याचे हे ठळक उदाहरण!
कामजीवनाची शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकांची वानवा आहे तोपर्यंत पोर्नोग्राफी पाहिली जाईल. अगदी वैद्यकीयशिक्षणात देखील कामजीवनाचा पुसटसा देखील उल्लेख येत नाही. प्रजोत्पादनासंबंधी विस्तृत विवेचन आढळते मात्र कामविषयक माहिती बाबत मौन ठेवलेले आढळते. स्त्री=पुरुषांच्या जननेंद्रियांची सखोल माहिती दिलेली आढळते मात्र स्त्री-पुरुष एकांतात आल्यावर काय घडते? कामोद्दीपन, कामतृप्ती म्हणजे नेमके काय? याबाबत वैद्यकशास्त्र काहीच सांगू शकत नाही. विवाह झालेल्या सत्तर टक्के जोडप्यांना शरीरसंबंधाविषयी काहीच शास्त्रीय माहिती नसते. ती मिळविणे देखील त्यांना गरजेचे वाटत नाही, त्यामुळे कित्येक जोडपी आयुष्यभर विवाहाचे जोखड ओढत राहतात. कामतृप्ती म्हणजे काय हे दहा टक्के स्त्रियांना आयुष्याच्या अंतापर्यंत कळत नाही. अनेक अतृप्त स्त्रिया सामाजिक संकेतांचा पगडा असल्याने केवळ पतीच्या कामसुखासाठी संभोगात सहभागी होतात, पण त्यांना तसा यंत्रवत संबंध नकोसा असतो. कामविषयक शास्त्रीय माहिती घेण्यापेक्षा कामवासना जागृत करणाऱ्या स्त्री देहाचे नग्न दर्शन, शिस्न ताठ करणारे अश्लील साहित्य पाहण्या-वाचण्यातच पुरुष रुची ठेवतो, हीच खरी भारतीयांची शोकांतिका आहे.
चौथ्या शतकात वात्सायनाने ‘कामसूत्रम’ नामक कामजीवनासंबंधित ग्रंथ लिहिला, परंतु त्यातील विविध आसनेच प्रचलित करण्यापलीकडे पुरुषाने काहीएक केले नाही. परंतु त्याने आपल्या ग्रंथात सांगितलेली काही मार्गदर्शक तत्वे आजचा पुरुष साफ विसरला आहे. ती तत्वे पुढील प्रमाणे—
१)--  ‘न स्त्री पुरुषवदेव भावमधिगच्छति’ असे वात्सायन सांगतो. म्हणजे स्त्रीचे कामसुख पुरुषाच्या कामसुखाहून भिन्न आहे. तरीही आजचा पुरुष त्याविषयीचे ज्ञान मिळविण्यात रस दाखवत नाही.
२)— ‘कामसलील निर्माण झाल्याशिवाय संभोग करू नये’ असेही वात्सायनाने नमूद केले आहे. तरीही पुरुष प्रणयक्रीडा टाळून थेट संभोगाची घाई गडबड करतो व स्त्रीला कायम अतृप्त ठेवतो.
३)— ‘प्रीती उत्पन्न करणाऱ्या आलिंगनादी क्रिया म्हणजे कामतंत्र आणि प्रत्यक्ष समागम म्हणजे आवाप’ अशा संज्ञा वात्सायनाने दिलेल्या असून त्यांचे विस्तृत विवेचन ग्रंथात केलेले आहे. कामतंत्र म्हणजे संभोगापुर्वी चुंबन आलिंगन यांमुळे उत्पन्न झालेले हवेहवेसे सुख म्हणजे स्त्रीच्या दृष्टीने खरे रतिसुख असते, असेही तो सांगून जातो. याकडे आजच्या पुरुषाने सोयीस्करपणे पाठ फिरवलेली दिसते.
४)--  संभोगाला पर्याय म्हणून पुरुष आणि स्त्रीसुद्धा हस्तमैथुन करतात असेही निरीक्षण सोळाशे वर्षांपूर्वी वात्सायनाने नमूद केले होते! हे आजही अजिबात खोटे ठरत नाही.
५)--  ‘वेश्या ही समाजाच्या नितीमत्तेची रक्षण करणारी रक्षणकर्ती आहे’ असेही तो बिनधास्त सांगून जातो. त्यामुळे वेश्यागमन करून कामजीवनासंबंधी ज्ञान मिळविणे चुकीचे नाही असाच संकेत यातून मिळतो!
वात्सायनाची उपरोक्त निरीक्षणे आजही कामजीवनात जशीच्या तशी लागू पडतात. त्याने उल्लेखिलेली केवळ संभोगासने पडताळण्यापेक्षा त्याच्या छत्तीस अध्यायांत समावलेल्या सव्वाहजार श्लोकातील निवडक श्लोक जरूर अभ्यासावेत. तरच आपले कामजीवन यशस्वी होऊ शकेल...
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment