Wednesday 9 September 2015

लिंगाची लांबी किती असावी...?

व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक पुरुषाच्या शिस्नाची लांबी ते पूर्ण ताठरलेले असतांना कमी अधिक असते. आपले लिंग छोटे आहे, वाकडे आहे, खाली वळलेले आहे वगैरे शंकांनी घेरून तरुण पुरुष चिंताग्रस्त होऊ शकतो. कारण भारतीय कौटुंबिक पद्धतीत वडील आपल्या मुलाला लैंगिक ज्ञान अजिबात देत नाहीत. मित्रांकरवी मिळणारे अशास्त्रीय ज्ञान, कामुक पुस्तके वाचून होणारे बढाई मारणारे ज्ञान आणि स्वतःच स्वतःचे परीक्षण करून अवगत झालेले अपुरे ज्ञान यांमुळे तरुण पुरुष अधिकच बुचकळ्यात पडतो. त्यात भरीस भर म्हणून कि काय इंटरनेटद्वारे मिळणारे अश्लील ज्ञान त्याच्या संभ्रमात अधिकच भर घालून जाते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अश्लील चित्रफिती अतिशयोक्त असतात हेच तो विसरून जातो. त्यामध्ये दाखविल्याप्रमाणे आपले लिंग लांबलचक आणि सरळसोट नाहीये याची खंत त्याला लागून राहते. त्या सेक्स व्हिडीओमध्ये दर्शविल्याप्रमाणे आपण नाहीच आहोत आणि आपल्या अपुऱ्या शिस्नाने आपण आपल्या स्त्रीला खुश ठेवू शकणार नाहीत याची खात्रीच पटते. आपली शक्ती आजमावण्यासाठी मग मित्रांच्या सांगण्यावरून वेश्यागमन केले जाते. तिथेही निराशा पदरी पडते. कारण ती वेश्या आपल्या व्यवसायाला बांधील राहूनच कर्तव्यकर्म उरकते. त्याचे हातांनीच स्खलन करून माघारी पाठवते. त्यामुळे आपल्या लिंगाच्या आकाराचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. त्यातही मित्र नेहमी बढाया मारतांना आढळतात. मी तासनतास गर्लफ्रेंड उपभोगू शकतो, माझे लिंग दहा इंच लांब आहे त्यामुळे ती खुश होते... वगैरे... वगैरे... मग खरी वस्तुस्थिती काय आहे? कामशास्त्र काय सांगते? पुरुषाच्या लिंगाच्या लांबीचा आणि स्त्रीच्या कामपुर्तीचा काहीही संबंध नाही. स्त्रीचा मदनमणी आणि मदनबिंदू हे उद्दीपित झाल्यास तिची कामपुर्ती होत असते. आणि हे दोन्ही स्थाने योनीच्या बाह्यभागात असल्याने तुम्ही कितीही शिस्न आत घालून संभोग केला तरी हि ठिकाणे उद्दीपित झाल्याशिवाय तिची कामतृप्तता होत नाही हे कायम लक्षात असू ध्यावे. म्हणजेच लांब लिंगाचा पुरुषच फक्त स्त्रीला खुश ठेवू शकतो हे निखालस असत्य विधान आहे. पुरुषाच्या लिंगाची लांबी ही केवळ शुक्रजंतू पिचकारीप्रमाणे योनीत सोडणे यासाठीच उपयोगी ठरते. उत्तेजित अवस्थेत प्रत्येकाचे शिस्न नैसर्गिकरीत्या लांब झालेलेच असते आणि तितकी लांबी मदनबिंदू व मदनमणी यांच्या घर्षणास पुरेशी असते असे कामशास्त्र सांगते. मुखमैथुन किंवा हस्तमैथुन यांनी सुद्धा स्त्री पूर्णतः तृप्त होत असतांना शिस्नाच्या लांबीचा प्रश्न उद्भवतच नाही. कारण स्त्रीची कामोद्दीप्क अंगे म्हणजे स्तनाग्रे, मदनमणी आणि मदनबिंदू इतकीच आहेत व हे सर्व बाह्यभाग ठरत असल्याने अंतर्भागात खोलवर शिस्नाचा होणारा प्रवेश गर्भधारणा होण्यापलिकडे कामतृप्तीत अजिबात भाग घेत नाही हेच अंतिम सत्य आहे. तसेच लिंग वाकडे असले काय किंवा खाली तोंड केलेले असले काय, स्त्रीच्या कामपुर्तीशी त्याचा अन्योन्य संबंधही उरत नाही. योनीभगोष्ठांच्या मध्ये वरील बाजूस असलेल्या मदनमण्याचे उद्दीपन होणे आणि त्याचवेळी योनीमार्गात साधारणपणे अडीच ते तीन सेंटीमीटर अंतरावर असलेल्या मदनबिंदूचे घर्षण होणे इतकेच स्त्रीला तृप्त करण्यास अपेक्षित असते. त्यामुळे कोणताही पुरुष आपल्या आखूड, तिरप्या आणि डूचक्या लिंगाने स्त्रीला पुरेपूर कामतृप्त करू शकतो हेच खरे आहे... भोगगुरू कामदेव Kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment