Sunday 20 September 2015

सेक्सबाबतच्या जाहिराती ...

सेक्सबाबतच्या जाहिराती...

यौनसंबंधात कमजोरी असणे, स्वप्नदोष, शीघ्रपतन, लिंग छोटे, वाकडे असणे, लिंगात शिथिलता येणे अशा अनेक संज्ञांचा वापर करून वर्तमानपत्रे, भित्तीपत्रके, व्हिजिटिंग कार्ड्स, छोट्या जाहिराती यांच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित केले जाते. लैंगिक समस्या अस्तित्वात नसतांना त्या आहेत असे भासवले जाते. मुळातच लैंगिक संबंध, सेक्स, प्रणय, संभोग या गोष्टी पालकांकडून उपवर मुलीला किंवा मुलाला अजिबात समजावून सांगितल्या जात नाहीत. मित्रमंडळी किंवा मैत्रिणी ज्या सांगतील त्या तुटपुंज्या आणि बहुधा अशास्त्रीय ज्ञानावरच नवदाम्पत्य आपली पहिली रात्र पार पाडतात. पहिल्या रात्रीचा अनुभव पुरुषासाठी निराशादायक असतो. जर त्याने अगोदर कधीही स्त्रीशी संभोग केला नसेल तर नक्कीच त्याला पहिल्या रात्री शीघ्रपतन आणि लैंगिक दौर्बल्य जाणवते. मात्र तो आधीच सेक्स बाबत योग्य शास्त्रीय ज्ञान मिळवून तरबेज झाला असेल तर त्याची पहिली रात्र आनंददायी ठरते. पण एका निरीक्षणानुसार जवळपास ८०% नवविवाहित पुरुष पहिल्या रात्री अंधारात चाचपडत ढगात गोळ्या मारून आलेले असतात. त्यांची अवस्था तह स्वीकारलेल्या मांडलिक राजासारखी झालेली असते. मग वरील जाहिराती करणाऱ्या तथाकथित स्वयंघोषित भोंदू डॉक्टरांच्या जाळ्यात तो आपसूक ओढला जातो. उपरोक्त संज्ञा कशा तकलादू आहेत याचे शास्त्रीय ज्ञान आजच्या प्रत्येक तरुणाला मिळालेच पाहिजे. तरच त्याला वरील निर्दिष्ट केलेले आजार कसे फोल आहेत ते समजून येईल...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)-- कोणत्याही सुदृढ पुरुषात यौनकमजोरी असू शकत नाही. उत्तेजक चित्र, नग्न स्त्रीचे चित्र पाहिले की कोणताही पुरुष चळतोच. त्याचे लिंग आपोआप ताठ होत जाते. किंवा त्याचा हात आपसूक लिंगाकडे जाऊन तो आपले लिंग ताठ करतो. त्यामुळे यौनकमजोरी ही संज्ञा चुकीची ठरते.
२)--  स्वप्नदोष झाला नाही असा एकही पुरुष गवसणार नाही. रात्रीच्यावेळी लिंग अचानक ताठ होऊन कामोत्तेजक स्वप्न पाहतांना वीर्यस्त्राव होतो. ही पूर्णतया नैसर्गिक बाब आहे. रात्रीच्या वेळी पुरुष हार्मोन्सचे (टेस्टेस्टेरॉन) प्रमाण वाढलेले असते. त्यामुळे शिस्न ताठ होणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे. अशावेळी उच्चतम संवेदना लहरी उत्पन्न होऊन वीर्य बाहेर पडते. यात दोष असण्यासारखे काहीच नसतांना विनाकारण या नैसर्गिक क्रियेला स्वप्नदोष असे हिणवून आजाराचे नाव दिले आहे.
३)— शीघ्रपतन ही समस्या पूर्णतः मानसिक असून त्यावर देखील विजय मिळवता येतो, याविषयी विस्तृत चर्चा पुढील लेखांकात केली जाईल.
४)--  लिंग छोटे किंवा वाकडे असले तरी पुरुष स्त्रीला कामतृप्त करू शकतो हे मागील एका लेखात नमूद केले आहेच. स्त्रीची कामतृप्ती ८०% प्रणयात आणि २०% संभोगात होत असल्याने योग्य प्रणय करून स्त्रीला उत्तेजित केल्यास लिंगाच्या छोटेपणाचा काही फरक पडत नाही. स्तनाग्रे, मदनमणी आणि मदनबिंदू ही तीनच स्थाने स्त्रीला कामतृप्त करीत असल्याने त्यांचे उत्तेजन दोन इंच लांबीच्या लिंगाने देखील यशस्वीपणे करता येते असे प्रयोगांती सिध्द झालेच आहे.
५)--  लिंगात शिथिलता येणे हे पूर्णतः मानसिक कारणाचे लक्षण आहे. आपण आपल्या स्त्रीला खुश ठेवू की नाही? तिच्याशी यशस्वी संभोग करू की नाही? अशा निरर्थक प्रश्नांमुळे नवविवाहित पुरुष दबावाखाली येतो. त्यामुळे लिंगाचे योग्य प्रमाणात उत्तेजन होत नाही, त्यात ताठरता येत नाही. बिनधास्त आणि कोणताही किंतु मनात न ठेवता जर बेडवर गेलात तर नक्कीच चौकार-षटकारांची आतषबाजी होईल यात शंका नाही.
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment