Monday 3 August 2015

अध्यात्माच्या नावाखाली लफडासदन

सर्वात जास्त बिनभांडवली धंदा म्हणजे बुवा-बाबा-महाराज होऊन बायकांना भोगणे होय. अर्थात सर्वच बुवा बाबा महाराज यातले नसतात. पण जे असतात त्यांचे दरबार मात्र बायकांनी भरून ओसंडलेले असतात. नुकतेच घडलेले बापू प्रकरण पहा. असा राम कोणी चिंतिला नसावा, इतका त्या बापूंनी भोगलालसेचा कळस केला. त्यांचे सुपुत्र साई सुद्धा इतके घाईत होते की त्यांनीही नाहत्या गंगेत संभोगासन घालून पाहिले!
सत्तरीच्या दशकात रामवाडीत नावारूपाला आलेला वाघमारे बाबा तर योनीपुजा करायचा! अनेक अतृप्त स्त्रियांना त्याने नादी लावले, आपल्या पूजेचे साहित्य त्याने असे काही उपयोगात आणले की एकाच कुटुंबातील आजी, सासू व सुना सुद्धा त्याच्याकडे योनीपुजा करून घ्यायला रांग लावत असत!
ओशोबाबांनी तर संभोगातून कशी समाधी साधावयाची याचे प्रात्यक्षिक दाखवत अख्ख्या जगाला वेड लावले होते. त्यांच्या त्या सेमिनारला अनेक जोडपी नग्न होऊन खुलेआम समाधिस्त होत असत. धन्य ते बाबा आणि धन्य त्यांची करणी!
फार कशाला सद्य स्थितीला बंगलोर स्थित एक गुरु त्यांच्या विश्वव्यापी मठांमधून ब्लेसिंग नामक कोर्स भरवतात. या कोर्स मध्ये जो स्नातक (स्त्री/पुरुष) भाग घेईल त्याने त्याच्या मार्गदर्शक गुरुसमोर आपल्या सेक्स विषयक कल्पना विस्तृतपणे विशद करावयाच्या असतात! समजा एखाद्या मुलीला शांतता लाभत नसेल तर तिने आपले मन इथे मोकळे करायचे. तिला सेक्स ची भावना कधी उत्पन्न झाली? की कोणी इतर व्यक्तीने (स्त्री/पुरुष) उत्पन्न केली? तिचे स्वरूप काय आहे? ती भावना व्यक्तिगतरित्या (हस्तमैथुन) पूर्ण करवून घेतली जाते की इतर व्यक्ती (स्त्री/पुरुष) ती भावना पूर्ण करते? वैवाहिक जीवनात किती वेळा सेक्स परिपूर्ण झाल्याचा अनुभव आला? किंवा आपल्या नवऱ्यासोबत सेक्स करतांना इतर पुरुषाला कल्पून सेक्स मध्ये सहभाग घ्यावा लागतो का? सेक्सची क्षुधा कितपत आहे? ती भागवण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त कशावर अवलंबून राहता? नवऱ्याकडून तृप्तता लाभली नाही तर तुम्ही हस्तमैथुन करता का? अतिशय खाजगी बाबी उघड करणारी ही प्रश्नावली संबंधित कोर्समध्ये सोडवावी लागते. खरे खरे सांगितल्यास ती व्यक्ती इतरांना आशीर्वाद देण्यालायक ठरते म्हणे!!!
आजही आपण अनेकदा पेपर मधून अमूक तमूक बाबाने स्त्रीचा विनयभंग/ बलात्कार केला, असे वाचत असतोच. मुळात प्रश्न असा आहे की असे भोंदू बुवा बाबा आपल्या खाजगी विश्वात ढवळाढवळ करेपर्यंत सुज्ञ आणि सुशिक्षित स्त्रिया गप्प राहतातच कशा? काय कारण असू शकते? अनेक स्त्रियांशी चर्चा करून आलेले उत्तर सर्व पुरुषांनी नक्कीच विचार करून आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे—
पुरुष सदानकदा सेक्सची मागणी करतो, संभोग झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले की तो बाजूला होतो, स्त्रीची तृप्ती झाली आहे किंवा नाही याकडे कानाडोळा करतो किंवा ते त्याला महत्वाचे वाटत नाही. याउलट स्त्रीला सेक्सऐवजी प्रेमालाप, प्रेमळ स्पर्श, आधार, आपुलकी, जवळीक, हळुवार चुंबने, सर्वांग स्पर्श यांची ओढ असते. प्रत्यक्ष संभोग ही स्त्रियांच्या मते अतिशय गौण बाब आहे तरीही तितकीच महत्वाची सुद्धा आहे. पुरुषाने रतीक्रीडा, कामक्रीडा उत्तम केली तर त्याची स्त्री परिपूर्ण मैथूनानंद घेते आणि व्यवस्थित तृप्त होते. पुरुषाचे इथेच चुकते त्याला डायरेक्ट दोन मांड्याच्या मधली जागा हवी असते. किंवा काही पुरुष स्त्रीला चेतविता चेतविता कधी स्वतःच विझून जातात हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. पण असे झाले, पाणी पोचण्याआधीच बांध फुटला तर बावचळून जायचे करणा नसते. लगेच स्वतःला सावरून आपल्या जिभेने वा बोटाने उत्तेजित झालेल्या योनिला हळुवार स्पर्श करून स्त्रीला तृप्त करून सोडावे, स्त्रीला अर्ध्यावर सोडून तुम्ही झोपलात तर ती सुद्धा तुमची साथ अर्ध्यावरच सोडेल याची खात्री बाळगा. येन केन प्रकारे आपली स्त्री पूर्ण तृप्त झालीच पाहिजे अशी खुणगाठ प्रत्येक सेक्स करतेवेळी मनाशी पक्की बांधून ठेवल्यास स्त्री बाहेरचे पाणी शेंदायला जाणार नाही…
सेक्स करतांना पुरुषासाठी संयम फार महत्वाचा! फोरप्ले तर अत्यावश्यक असतोच. स्त्रीला उत्तेजित करून इतके उत्कट करावे की तिच्या मांड्या आपोआप खुलल्या पाहिजेत. यासाठी तीन पायऱ्या ठरलेल्या असतात-
सेक्सी वार्तालाप करणे. पांचट जोक करणे, अश्लील विनोद सांगणे. ज्यामुळे तिचे मन व शरीर आसुसू लागते. तिचा मूड प्रापंचिक विवंचनेतून सेक्सकडे वळू लागतो.
सर्वांग स्पर्श करणे. मग तो बोटांनी असो वा नखांनी वा फुलांनी. मात्र तो हळुवार असावा याची दक्षता घ्यावी. यामुळे ती मोहरू लागते. तिचे डोळे बंद होऊन ती स्पर्शाची सुखद अनुभूती घेऊ लागते. ही तिची उत्तेजित अवस्था असते.
नंतर हळूहळू एक एक कपडा उतरवून स्तनमंडले, स्तनाग्रे यांचे मर्दन, चूषण करून इतके उत्तेजित करावे की स्त्रीने तिची ओलावलेली, विस्फारलेली, तुमच्या शिस्नासाठी आतुरलेली योनी तुमच्या पुढे उघड केलीच पाहिजे. ही तिची उन्मदावस्था असते. यानंतर तुम्ही तुमचे पौरुषत्व व्यवस्थित गाजवू शकता…
मग अशा तयार झालेल्या जमिनीवर कसेही पाणी ओतले तरी ती फळणारच ठरली.. हो की नाही? !!!
— भोगगुरू कामदेव. 29 जून 2015

No comments:

Post a Comment