Monday 3 August 2015

यौवनरंभा सनीची कहाणी

१३ मे १९८१ रोजी शीख पंजाबी दांपत्याच्या पोटी सर्निया येथे हिचा जन्म झाला. तिचे मूळ नाव करणजीत कौर व्होरा असे होते. तिचे वडील तिबेटचे होते परंतु दिल्लीमध्ये त्यांनी व्यवसाय केला होता तर तिची आई सिरमौर हिमाचल प्रदेश येथील होती. सनीला हॉकी खेळण्याचा शौक होता. ती नेहमी मुलांसोबतच खेळत असे. पब्लिक स्कूलमध्ये असुरक्षित वाटले म्हणून तिला कॅथोलिक स्कूलमध्ये टाकले होते. तिच्या तेराव्या वर्षी तिचे कुटुंबीय फोर्ट ग्राटीओट येथे शिफ्ट झाले आणि त्यानंतर एकाच वर्षात लेक फोरेस्ट कॅलिफोर्निया येथे ते सर्व स्थायिक झाले.
वयाच्या सोळाव्या वर्षी तिचा कौमार्यभंग दुसऱ्या स्कूलमधील एका बास्केटबॉलपटूने केला. वयाच्या अठराव्या वर्षी तिला स्वतःतील दुहेरी व्यक्तिमत्व लक्षात आले. तिला मुलींची ओढ वाटू लागली. मैत्रिणींशी संबंध ठेवावेत असे तिला वाटत असे. तरीही तिला पुरुषच जास्त आवडत असत.
पोर्न फिल्म्स करण्यापूर्वी ती जर्मन बेकरी मध्ये नोकरीस होती. त्यानंतर तिने टैक्स कंपनीत देखील काम केले. ऑरेंज कंट्रीमध्ये पेडीयाट्रिक नर्सिंग कोर्स करीत असतांना तिच्या एका वर्गमित्राने तिची ओळख पेन्थोउस नामक मासिक चालवणाऱ्या जॉन स्टीव्हन या एजंटशी करून दिली. तिथे तिचा फोटोग्राफर म्हणून जे अलेन होता. अडल्ट करियर साठी तिने तिचे नाव सनी असे सांगितले त्यापुढे मासिकाचा मूळ संपादक बॉब गुसिओन याने लिओन शब्द जोडला आणि ती करणजीत कौर आता सनी लिओन या नावाने प्रत्येक कामपिपासूच्या मनात ठाण मांडून बसली आहे.
तिचे त्या मासिकामधील उत्तान आणि न्यूड फोटोज पाहून व्हीविड एंटरटेनमेंट या पोर्नोग्राफी साठी प्रसिध्द असलेल्या कंपनीने सनीला तत्काळ तीन वर्षांसाठी करारबद्ध केले. त्यावेळी तिची अट अशी होती की ती फक्त स्त्रियांसोबतच सेक्स फिल्म करणार. २००५ मध्ये तिची पहिली सनी नामक लेस्बियन सेक्स फिल्म रिलीज झाली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक खपणारी उन्मत्त सुंदरी असा किताब तिला मिळाला. त्यानंतर तिचे तीन लेस्बियन पिक्चर्स येऊन गेले. २००७ मध्ये नवा करार करतांना मात्र पुरुषांसोबत पोर्नफिल्म करण्यास ती तयार झाली. विशेषतः मॅट एरिक्सन ला तिने जास्त पसंती दिली. त्याच्या सोबत सेक्स फिल्म करायला ती उत्सुक होती. तत्पूर्वी तिने सिलिकॉन जेल ने भरलेली उत्तम अशी सिलिकॉन इम्प्लांट स्वतःच्या स्तनांमध्ये ऑपरेशन करून बसवून घेतली. त्यामुळे तिची वक्षस्थळे अधिकच अपील करणारी अशी टंच बनली. सनी लव्हज मॅट या नावाची ती पोर्नफिल्म खूपच चालली आणि २००९ साली सनीला सहापैकी तीन बेस्ट फिमेल पोर्नस्टार ची नामांकने प्राप्त झाली. त्यानंतर तिला एरिक्सन मध्ये अरुची वाटू लागली आणि तिने टॉमी गन, चार्ल्स देरा, जेम्स डीन, वूडू या पुरुषांसोबत सेक्स फिल्म्स केल्या. त्याही खूप प्रसारित झाल्या. करार संपायच्या अगोदर अनड्रेस मी नामक पोर्न फिल्म तिने डॅनियलवेबर याच्यासह केली. तीही खूप पैसा कमावून गेली. २००९ मध्ये सनीने स्वतःचा सनलस्ट नावाचा स्टुडीओ डॅनियल सोबत सुरु केला. त्यामध्ये तिने स्वतः लिहिलेल्या, निर्माण केलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या कितीतरी पोर्नफिल्म्स जगभरात आवडीने पाहिल्या जाऊ लागल्या. त्याच बरोबरीने ती ऑफर आलेल्या इतर स्टुडीओत सुद्धा सेक्स फिल्म्स करीत राहिली…
२०११ मध्ये सनीचा भारतात प्रवेश झाला तो बिगबॉस या रियालिटी शो मधून. महेश भट्ट यांनी तिला जिस्म २ साठी साईन केले. आणि २०१२ मध्ये तो प्रदर्शित झाला. मूळ भारतीय असलेली ही यौवनरंभा रातोरात तरुणांच्या मनातली फँटसी बनली. तिचे उन्मादक सौंदर्य पाहून अनेकजण चळू लागले. तिची प्रणयरम्य अदा पाहून कितीतरी तिचे आंबटशौकीन झाले. तिचे फोटो, तिच्या पोर्नफिल्म्स भारतीय मोबाईल वर फिरू लागल्या. त्यांतर आलेला रागिणी एमएमएस सुद्धा खूप गाजला. मग तिने भारतीय नागरिकत्व पत्करले. ती आणि तिचा नवरा डॅनियल वेबर दोघेही भारताचे नागरिक असून आता इतके व्यस्त आहेत की विचारूच नका. नवीन फिल्म्सच्या ऑफर सनीला मिळत आहेत.
मे २०१५ मध्ये मुंबई पोलिसांकडे सनी विरुद्ध अश्लील फिल्म्स प्रसारित केल्याविरुद्ध एफ आर आय दाखल करण्यात आला. परंतु पोलिसांकडून ‘आम्ही सदरहू वेबसाईटच्या संचालकांशी संपर्क साधून त्यांना आक्षेपार्ह फिल्म्स काढून टाकण्यास सांगून सनीला ताकीत देऊ’ असे वक्तव्य करण्यात आल्याने सानीवर येणारे संकट तूर्तास टळले आहे, हे तिच्या चाहत्यांना दिलासादायक बाब ठरली आहे.
सनीच्या पोर्नफिल्म्स तर जगप्रसिद्ध झाल्याच, आता तिच्या हिंदी फिल्म्स सुद्धा लाळ गळेपर्यंत चवीने पाहिल्या जातील यात शंकाच नाही…
— भोगगुरू कामदेव 29 जून 2015

No comments:

Post a Comment