Thursday 1 October 2015

अतृप्त स्त्रीची लक्षणे...

अतृप्त स्त्रीची लक्षणे...

शीघ्रपतन झाल्यामुळे किंवा आवश्यक तितका वेळ प्रत्यक्ष संभोग होऊ न शकल्यामुळे स्त्रीची कामतृप्ती होत नाही. रंगलेल्या प्रणयाचा अचानक बेरंग होऊन जातो. काहीवेळा पुरुष त्याची वीर्यच्युती झाली की बाजूला होतो आणि स्त्री तशीच अर्ध्यात राहते, तिची कामतृप्ती झालेली नसते. बहुतेकदा पुरुष थेट संभोगच करू लागतो. पुरेशा प्रणयक्रीडेअभावी स्त्रीची योनी ओलसर होत नाही व लिंगप्रवेश कष्टप्रद होतो. कोरड्या योनीत लिंग घुसडण्याची घाई केल्याने वंगण म्हणून पुरुषाची विर्यच्युती होऊन जाते व लिंग ढिले पडू लागते. तोवर स्त्रीची उत्तेजना काही अंशी सुरु झाल्याने संभोग अपूर्ण राहतो. अशा अधुऱ्या कहाणीमुळे राजाराणीच्या मधुर संबंधात बाधा येऊ लागते. म्हणून पुरुषाला अतृप्त स्त्रीची लक्षणे माहीत असायला पाहिजेत. जेणेकरून तो त्यावर उपाय शोधून आपले कामजीवन यशस्वी करू शकेल... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
लग्नानंतरची वर्ष सहा महिने गुण्यागोविंदाने गेल्यावर मात्र स्त्रीची चिडचिड सुरु होते. तिची असमाधानी वृत्ती उफाळून येते. काही मनोकायिक लक्षणे अचानक दिसू लागतात. छोट्या छोट्या गोष्टींवरून ती रुसू लागते, अबोला धरू लागते. कितीही आवडीच्या साड्या घेतल्या, कितीही महागडे दागिने केले तरी तिचे समाधान काहीकेल्या होत नसते.  हे का घडते आहे हे तिलाही कळत नाही. पुरुष तिच्या अशा असहकार पुकारण्याने गांगरून जातो. त्यालाही उमजत नाही नेमके काय होतेय हिला. नव्याचे नऊ दिवस उलटल्यावर स्त्री मधील कामचेतना जागृत होतात व जर तिला कामतृप्ती होत नसेल तर मात्र अशी असमाधानी लक्षणे प्रकट होऊ लागतात. कोणतीही गोष्ट सामंजस्याने घेण्याऐवजी ती हमरीतुमरीवर का येते हे पुरुषाला कळत नाही. यामागील कामशास्त्रीय कारण लैंगिक अतृप्तीच असते, असे मास्टर आणि जॉन्सन यांनी नमूद केले आहे.
१)--  सकाळच्या रम्य आणि उत्साहवर्धक वेळी स्त्री चिडचिड करू लागते. उठल्यापासून तिची भुणभुण चालू होते. क्षुल्लक कारणांवरून ती त्रागा करू लागते. आपली मनस्थिती अशी का झालीय हेही तिला कळून येत नाही. रात्रीच्यावेळी अपूर्ण राहिलेल्या संभोगाचे ते कारण असते. तिची कामतृप्ती न झाल्यामुळेच तिची घालमेल होत असते.
२)--  काही सोशिक स्त्रिया रात गयी सो बात गयी असे समजून लैंगिक भूक शमली नाही तरी निमूटपणे आपली कामे करीत राहतात. अशा वर्गातील स्त्रिया सेक्स फक्त पुरुषाच्या आनंदासाठीच असतो असे मानून चालत असतात. त्या संभोगात भाग घेतात पण निश्चेष्ट पडून राहतात, पुरुषाला अजिबात प्रतिसाद देत नाहीत.
३)--  काही स्त्रिया मात्र अव्यक्त राहणेच पसंद करतात. आपली कामतृप्ती झालेली नाहीये हे त्यांना उमगलेले असते, परंतु त्याबाबत त्या चकार शब्द काढीत नाहीत. पण हे त्यांचे लैंगिक असमाधान मात्र मनोकायिक लक्षणे उपस्थित करू लागते. मग सकाळी उठल्यावर कंबर दुखते, ओटीपोट ओढल्यासारखे वाटत राहते. कोणताही शारीरिक आजार नसतांना अशी लक्षणे दिसून येतात.
४)--  काही स्त्रिया तात्काळ व्यक्त होणाऱ्या असतात. कामतृप्ती झाली नाही तर त्या पुरुषाला सडेतोड शब्दांत नापसंती दाखविण्याचे धारिष्ट अंगी बाळगतात. पुरुषाला प्रसंगी षंढ ठरविण्यात देखील त्या कचरत नसतात. येताजाता पुरुषाला घालूनपाडून बोलतांना त्यांना काहीच वाटत नाही. क्वचित चारचौघात देखील त्या पुरुषाचा अवमान करू धजतात. रात्रीच्या वेळी बेडवर त्या पुरुषाला झिडकारतात, सेक्स साठी स्पष्ट नकार देतात. काही वेळा कामतृप्ती दुसऱ्या पुरुषाकडून मिळवण्याची बंडखोरीदेखील अशा स्त्रिया करू शकतात.
५)--  भारतातील किमान दहा टक्के स्त्रिया कामतृप्ती बाबत अनभिज्ञ असतात. आयुष्यात त्यांनी कामतृप्ती म्हणजे काय ते अनुभवलेले नसते. अशा स्त्रिया सेक्स झाल्यानंतरही क्लिष्ट विषयांवर घडाघडा बोलू शकतात. संभोगानंतर सुद्धा त्या प्रापंचिक बाबी मनसोक्तपणे चर्चेला घेत असतात. कामतृप्तीनंतर येणारी ग्लानी त्यांना कधी अनुभवास मिळालेलीच नसते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment