Wednesday 4 November 2015

बाहेरख्यालीपणा...

बाहेरख्यालीपणा...

भारतीय विवाहसंस्थेने एकपत्नीत्व, पातिव्रत्यत्व, एकनिष्ठत्व या वचनांचे पालन करून अग्नीच्या साक्षीने संसार करण्यास वधू-वरांस सांगितले आहे. तरीही सर्व नियम, दिलेली वचने, घेतलेल्या शपथा धुळीस मिळवून विवाहित स्त्री पुरुष 'बाहेर'चा मार्ग अनुसरतात. बाहेरच्या व्यक्तीचा ‘ख्याल’ ठेवतात! असे का घडते? केवळ पुरुषच नव्हे तर स्त्री सुद्धा व्यभिचारास का प्रवृत्त होते? लग्नसंस्थेने बांधून दिलेल्या व्यक्तीशी संबंध का नकोसे वाटतात? काय असते यामागील मानसिकता? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blodspot.com
१)भारतीय लग्नसंस्था काहीअंशी आंधळी आहे. रंग-रूप-सेटलमेंट, गाडी-बंगला-नोकर-चाकर, जात-वर्ण-खानदान-पेशा हे सर्व पारखून पाहिलं जातं, मात्र मुळात व्यक्ती कशी आहे? तिचा स्वभाव काय आहे? तिच्या आवडीनिवडी काय? हे एखाद्या दुसऱ्या गाठीभेटीत अजिबात कळून येत नसते. जेव्हा कळते तेव्हा फार उशीर झालेला असतो. मग पिडीत व्यक्तीकडून बंडखोरीचा मार्ग अनुसरला जातो.
२)सेक्स जो की स्त्री-पुरुष संबंधाचा मूळ पाया आहे त्याबाबत विवाहसंस्था कोणतेही प्रश्न विचारू शकत नाही, व्यक्तीचे लैंगिक वर्तन जाणून घेऊ इच्छित नाही, सेक्ससाठी प्रस्तुत व्यक्ती शारीरिक-मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे जाणून घेण्याची कोणतीही प्रश्नावली लग्नाअगोदर विचारात घेतली जात नाही.
३)पुरुष नैसर्गिकरीत्या विविधतेचा भोक्ता असतो. स्त्रीने जर त्याला प्रतिसाद दिला नाही तर तो लगेच वेगळा विचार करू लागतो. थंड किंवा फ्रीजीड स्त्रीसोबत सहवास त्याला नकोसा होतो. सेक्सच्या वेळी पुरुषाला हवा तसा प्रतिसाद स्त्रीकडून मिळाला नाही तर तो चिडतो. मुळात त्याची कामेच्छा स्त्री पेक्षा अधिक असल्याने त्याला त्वरित उत्तेजना मिळून लगेच सेक्स हवा असतो. त्यामानाने स्त्री उशिरा उत्तेजित होत जाते हे त्याच्या नैसर्गिक लैंगिक वेगाला रुचत नाही व तो सेक्सला पटकन तयार होणारी दुसरी एखादी स्त्री मिळते का याचा शोध घेऊ लागतो.
४)स्त्रीला पुरुषाकडून प्रणय, प्रेम, कामपूर्वक्रीडा यांची अपेक्षा असते, मात्र तिचे हे नैसर्गिक लैंगिक वर्तन पुरुषाने लक्षात न घेता थेट संभोगाची मागणी केल्यास स्त्रीला वाटू लागते की पुरुषाला केवळ संभोगातच स्वारस्य आहे, आपल्यात नाही. परिणामी ती पुरुषाच्या अशा अधीर वागण्याला कंटाळते. प्रेम देणारा, प्रणय करणारा, सेक्सची अपेक्षा न ठेवता स्पर्शसुख देणारा दुसरा पुरुष भेटतो का याची शोध घेण्याची उर्मी तिला स्वस्थ बसू देत नाही. असा पुरुष भेटला की प्रथमतः तो स्त्रीवर प्रेम करतो पण त्याचा संभोगाचा मूळ नैसर्गिक स्वभाव तो विसरलेला नसतो. त्याचे प्रेम मिळावे म्हणून स्त्री तिच्याही नकळत त्याच्याशी शारीरसंबंध ठेवते. आणि अशाप्रकारे ती व्याभिचाराला प्रवृत्त होते.
५)स्त्रीला प्रणयक्रीडेनंतर सेक्स हवा असतो तर पुरुषाला थेट संभोगाची आस असते. स्त्रीची कामतृप्ती सर्वांगीण असते तर पुरुषाची कामतृप्ती विर्यच्युतीमध्ये होते. स्त्रीला पंधरा ते वीस मिनिटे प्रणयक्रीडा-कामक्रीडा-संभोग या टप्प्याने सेक्स हवा असतो तर पुरुषाची कामतृप्ती प्रत्यक्ष संभोगावेळी केवळ दहा सेकंद ते जास्तीत जास्त दोन मिनिटांत होऊन जाते! स्त्री-पुरुष दोघांनीही एकमेकांच्या या नैसर्गिक लैंगिक प्रेरणा विचारात घेऊन जर सुवर्णमध्य साधला तर प्रत्येकाचे वैवाहिक जीवन यशस्वी होऊन जाईल. बाहेरख्यालीपणाचा प्रश्नच उपस्थित होणार नाही!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment