Tuesday 3 November 2015

सेक्ससाठी महत्वाच्या गोष्टी...

सेक्ससाठी महत्वाच्या गोष्टी...

ठरवून सेक्स करता येत नाही. जेव्हा सेक्स ठरवून केला जातो तेव्हा त्यात तांत्रीकपणाचा दोष दिसू लागतो. एखादी यंत्रवत क्रिया करायची म्हणून ठरवून केलेला सेक्स टाळलेला बरा. विशेषतः स्त्रीच्या दृष्टीने ठरवून केलेला सेक्स ही मोठी कष्टप्रद गोष्ट असते. स्त्रीच काय कधीकधी पुरुषाचा देखील सेक्स करण्याच्या मूड नसतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रस्त्यांतून, बसमधून अनेक धक्के खात घरी आलेल्या स्त्री-पुरुषांना निवांत निद्रा हवी असते, सेक्स नकोसा वाटत असतो. मनसोक्त आणि आनंददायी यशस्वी सेक्स घडून येण्यात अनेक नकारात्मक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम दाखवत असतात. कोणत्या असतात त्या गोष्टी? त्यांचे परिमार्जन कसे करावे? त्या गोष्टी चतुरपणे कशा टाळता येतील? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)एकांत हवाच--- सेक्ससाठी स्त्री-पुरुषाला एकांताची नितांत गरज असते. सद्यघडीला जरी त्रिकोणी चौकोनी कुटुंब असले तरी लहान मुलांना आईजवळ निजण्याची आस लागून राहिलेली असतेच. स्त्री वात्सल्यमूर्ती असल्याने ती साहजिकच सेक्स ऐवजी मुलांना घेऊन झोपण्यास प्राधान्य देते. यावर उपाय म्हणून मुलांना लवकर निजवून स्त्री-पुरुषांनी एकांत अनुभवावा.
२)मूड महत्वाचा--- स्त्री पेक्षा पुरुषाची कामेच्छा पाचपट अधिक असल्याने तो तात्काळ कामोद्दीपित होतो, मात्र स्त्री नेहमी हळूहळू सेक्सच्या रुळावर येते. स्त्रीचा मूड नसेल तर तिला सेक्ससाठी खूप मस्का लावावा लागतो, आणि तिची मनधरणी करणे म्हणजे पुरुषासाठी एक प्रकारची कसोटीच ठरते. सेक्ससाठी लांबलेले क्षण पुरुषासाठी निराशाजनक ठरतात.
३)चिंता नकोतच--- बेडरूममध्ये येतांना सर्व चिंता-विवंचना-समस्या दाराबाहेरच सोडून येण्याची सवय लावून घेतली पाहिजे. मनात अनेक किंतु असतांना सेक्स करणे म्हणजे एक यंत्रवत काम पार पाडणे ठरते. टेन्शन सर्वांनाच असते पण ते बाजूला सारून सेक्सचा परिपूर्ण आनंद घेतल्यास कोणतेही टेन्शन हलके झाल्याचे जाणवते, इतकी उर्जात्मक ताकत त्या कामतृप्तीच्या ग्लानीत असते!
४)वैयक्तिक स्वच्छता महत्वाची--- सेक्स करण्यापूर्वी स्त्री-पुरुषांनी स्नान करणे आवश्यक असते. काखा आणि जांघेतील केस आवर्जुन काढलेले असावेत. त्यामुळे लैंगिक स्पर्शसुख छानपैकी अनुभवास मिळते. सुगंधी डीओ किंवा परफ्युम वापरून सर्वांग चुंबनाचे वातावरण निर्माण करता येते. मुखदुर्गंधी अजिबात येऊ देऊ नये, त्यासाठी मेंथोल टूथपेस्ट वापरावी. नाईट ड्रेस सुद्धा स्वच्छ आणि फ्रेश हवेत.
5)प्रणयरम्य बेडरूम-- बेडरूममधील वातावरण प्रसन्न असावे. रूमफ्रेशनरचा वापर करावा. बेडसीट निर्मळ असावे. मंद प्रकाशाचा नाईट लॅम्प लावावा. बेड व्यतिरिक्त इतर ठिकाणी उदा. खुर्चीवर, सोफ्यावर, कमोडवर, शॉवरखाली प्रत्यक्ष सेक्स करू नये. स्त्रिला ते आवडत नसते. परंतु उपरोक्त ठिकाणी प्रणयक्रीडा केलेली स्त्रिला फार आवडते.
6)फोर प्ले मस्टच--- पुरुषाची कामोत्तेजक केंद्रे शिस्नात एकवटलेली असल्याने त्याला थेट संभोग हवा असतो, तर याउलट स्त्रीचे कामोद्दीपित बिंदू सर्वांगीण पसरलेले असल्याने तिला कामपूर्वक्रीडा, प्रणयक्रीडा हव्याशा वाटतात. हे लक्षात ठेऊन पुरुषाने स्त्रीला प्रणयक्रीडेने उद्दीपित करणे महत्वाचे ठरते.
वरील षडसूत्री व्यवस्थित अवलंबिली की सेक्स यशस्वी ठरणार हे नक्की!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment