Thursday 5 January 2017

कामपिपासूपणा...

कामपिपासूपणा...

व्यक्तीच्या मनी-ध्यानी नेहमी काम-विषयक भावना बळावत राहून ती नेहमीच उत्तेजित अवस्थेत असणे म्हणजे कामपिपासूपणा म्हणता येईल. काही व्यक्ती कोणताही विषय सारखा सारखा कामविषयाकडे वळवू पाहतात. काही व्यक्ती इतर व्यक्तींच्या कोणत्याही वाक्याला द्विअर्थी घेतात किंवा सदरहू वाक्य द्विअर्थी आहे असे संबोधून गालात्तल्या गालात हसत राहतात. सदानकदा ब्ल्यू फिल्म पाहणे, कामोत्तेजक साहित्य वाचणे, पोर्नक्लिप्स पाहणे, त्या इतरांना पाठविणे या सर्व कृती कामपिपासू व्यक्तींच्या बाबतीत घडतात. जोडीदाराला सेक्सचा वीट येईल कंटाळा येईल इतक्यावेळा सेक्स करीत राहणे, सेक्ससाठी नेहमीच उत्तेजित राहणे ही लक्षणे देखील कामपिपासू सदरात येतात.हे योग्य आहे की अयोग्य याचा विचार करावा लागेल... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाची कामलालसा स्त्रीच्या सहापट अधिक असल्याने बहुदा कामपिपासू संज्ञा पुरुषालाच लागू पडते. स्त्री कायम कामोत्तेजित राहू शकत नसते. तसेच तिची कामोत्तेजक केंद्रे सर्वांगीण असल्याने स्त्री बऱ्याचदा कामविषयक वाक्यांना थंड प्रतिसाद देते.
२)पुरुष सदानकदा कामलालसा जपून ठेवत असतो. एखादी मादक स्त्री किंवा कमनीय ललना दृष्टीस पडता तो पटकन कामोत्तेजित होऊ शकतो. त्या देखण्या स्त्रीशी रत होण्याचे स्वप्न तो पाहू लागतो. ती ललना किती उन्मादक आहे याचे वर्णन मित्रमंडळीत चर्चेला घेतो.
३)कामपिपासू पुरुष चटकन कामोत्तेजित होतात तसेच पटकन विर्यच्युत देखील होतात. म्हणजेच कामपिपासू पुरुषांचा सेक्सड्राईव्ह कमालीचा वेगवान असतो. असे पुरुष शीघ्रपतन, स्वप्नदोष या कामसमस्यांच्या लक्षणांनी घेरले जातात.
४)प्रत्येक गोष्टीला काळवेळ, ठिकाण असते. चारचौघांत प्रत्येक विषय कामसंज्ञेकडे वळवीत नेणे चुकीचे ठरते. अशा कामपिपासू पुरुषापासून इतर व्यक्ती चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. स्त्रिया या पुरुषांना टाळू लागतात.
५)कामपिपासू व्यक्ती कधीच षंढ असत नाही, ती नेहमीच कामोत्तेजित असते. मात्र पुरुषांना शिस्नाचे ताठरपण टिकवून ठेवण्यात कुठलाच धरबंध उरत नाही आणि केवळ तोंडाच्या वाफा सोडणारा कामपिपासू पुरुष प्रत्यक्ष संभोगाच्या वेळी मात्र गलीतगात्र ठरतो!
–भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment