Tuesday 3 January 2017

नृत्याची आवड...

नृत्याची आवड...

नृत्य करणे कोणाला आवडत नाही. सर्वांनाच नृत्य भावते. दुसऱ्याला नाचतांना पाहून आपलीही पावले थिरकू लागतात. नृत्य हा काही व्यक्तींच्या जीवनाचा आवश्यक घटक बनतो. प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी नाचून पाहतच असते. त्यातून मिळणारा आनंद काही औरच असतो. नृत्य ही संकल्पना मानवात रूढ होण्यासंबंधी संशोधन करण्यात आले. त्यातून काही नवीनच निष्कर्ष हाती लागले. त्यातील काही गोष्टी ह्या थेट सेक्सशी निगडीत असलेल्या आढळल्याने त्यांचा ऊहापोह या लेखांकात केला जाणार आहे. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)कोणताही व्यायाम केला की शरीरातील रक्ताभिसरण वाढते. नवनवीन संवेदना जास्त प्रकर्षाने जाणवतात. त्वचेखालील सूक्ष्म चेतातंतू अधिक क्षमतेने कार्य करू लागतात. साहजिकच कामसंवेदना सुद्धा व्यायामानंतर जास्त वेगाने आणि परिणामकारकपणे संवाहन केल्या जातात असे आढळून आलेले आहे. जी व्यक्ती व्यायाम करत नाही तिच्या बाबतीत वरील नियम शिथिल पडतो. म्हणजेच व्यायामाअभावी शरीरात चरबीचे प्रमाण वाढते, जे की संवेदना संवाहन करण्यात अडचणीचे ठरत आले आहे. त्वचेखाली जितकी जास्त चरबी असेल तितक्या संवेदना मिळण्यात अडसर ठरू लागतो. त्यामुळेच नित्य व्यायाम करणारी व्यक्ती अधिक तजेलदार, उत्साही, टवटवीत आणि विशेष समाधानी दिसते!
२)नृत्य हा देखील सर्वांगीण व्यायामप्रकार आहे. पुरुष जेव्हा नृत्य करीत असतो. तेव्हा त्याच्या जघनभागातील स्वयंप्रेरित चेतातंतू उद्दीपित होऊ लागतात. पुरुषाला हे मुळीच जाणवत नाही. मात्र त्याला सेक्सची अनामिक ओढ लागून राहते. पुरुषाची कामोत्तेजीत करणारी स्पर्शकेंद्रे सर्वथा शिस्नाच्या ठिकाणी एकवटलेली असल्याने जेव्हा कधी नृत्य करतांना वस्त्रांचा हलकासा किंवा जोरकस स्पर्श लिंगाला होत राहतो, तेव्हा तेव्हा पुरुष कामोत्तेजित होऊ लागतो असे सिद्ध झालेले आहे. कटीभागाच्या हालचाली करणारे नृत्य प्रकार याकामी जास्त परिणामकारक ठरतात असेही दिसून आलेले आहे. ज्या पुरुषांना स्वयंप्रेरित चेतासंस्थेच्या क्षीणतेमुळे लैंगिक उत्तेजनेचा अभाव निर्माण झालेला आढळतो त्यांना आवर्जून असे नृत्याचे धडे आणि व्यायामप्रकार सेक्सतज्ञ सुचवीत असतात. त्या नृत्याच्या व्यायामानंतर सदरहू पुरुषांत कामभावना उत्तेजित करण्यात सेक्सतज्ञांना यश मिळाले आहे.
३)स्त्री जेव्हा नृत्य करते तेव्हा तिच्या कामभावना पुरुषाच्या तुलनेत जास्त उद्दीपित होतात असे आढळून आलेले आहे. याचे कारण म्हणजे स्त्रीची कामसंवेदना टिपण्याची केंद्रे सर्व शरीरभर पसरलेली असतात. नृत्य करतांना स्त्रीच्या स्तनाग्रांना मोहक स्पर्श होत राहतो. आपसूकच स्त्री कामोत्तेजीत होऊ लागते. तिला अनामिक आनंद प्राप्त होऊ लागतो. खरे तर हा कामानंदाचा अनुभव असतो, पण तो त्या स्त्रीला स्पष्टपणे जाणवत नाही. एक प्रकारची उत्साही चेतना शरीरभर उसळत जात असते. तसेच कटीभागाच्या आणि जघनभागाच्या हालचाली झाल्यामुळे किंवा मांड्या जुळवणे, विलग करणे अशा क्रियांमुळे योनीभगोष्ठांची उघडझाप होऊन नकळत शिस्निका उद्दीपित होत असते. ही कामसंवेदना स्त्रीला कळते पण त्यामुळे मन उल्हसित होण्याची प्रक्रिया घडते. शरीरात उन्माद आणि उत्साह सळसळतो. स्त्रीची कामचेतना सर्वांगीण असल्याने स्तनाग्रे ताठर होऊन अधिक उद्दीपित होतात आणि शिस्निका घर्षणाने उद्दीपित होत राहते. कामभावना पुलकित झाल्याचा आनंद स्त्रीला मिळू लागतो. झुम्बा, अरोबिक्स या नृत्याच्या व्यायामप्रकारांनी स्त्रीचे सर्व कामसंवेदक बिंदू उद्दीपित होऊन तिला अनाकलनीय कामानंद प्राप्त होत राहतो. ज्या स्त्रियांना फ्रीजीड किंवा थंड प्रतिसाद देणाऱ्या समजले जाते अशा स्त्रियांना नृत्य करायला लावून त्यांची कामभावना उद्दीपित करण्याचे प्रयत्न यशस्वी होतांना आढळतात!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment