Monday 2 January 2017

शृंगाराचे कौतुक...


शृंगाराचे कौतुक...

स्त्रीने शृंगार करताच तिचे सौंदर्य अधिक खुलते. पुरुषाचे तिकडे लक्ष असेल तर ठीक नाहीतर स्त्री हिरमुसली होऊन जाते. आकर्षक पेहराव करणे, अलंकार किंवा स्वर्णाभूषणे ल्याने, चेहरा अधिक दिलखेचक दिसावा म्हणून मेकअप करणे, पुरुषाला भावेल अशी टिकली लावणे, जराशी हटके केशभूषा करणे... हातात किणकिणत राहणाऱ्या नाजूक बांगड्या, कानातले झुलते डूल, गळ्यातले मोहक नेकलेस किंवा चेन, नाकात असेल तर बारीक खडा किंवा छोटी मोरणी, पायातील रुणझुणत मंजुळ नादात बोलणारे पैंजण... अशा कितीतरी प्रकारे स्त्री शृंगार करून पुरुषाला मोहीत करण्याचा प्रयत्न करीत असते. स्त्रीच्या या कृतीवर पुरुषाची जी प्रतिक्रिया येते ती स्त्रीला अधिकाधिक महत्वाची वाटत असते. --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)चतुर, हुशार आणि जबाबदार पुरुष स्त्रीचा शृंगार बारीक-सारीक निरीक्षणाने मनात नोंदवून घेतात आणि वेळीच त्याची स्त्रीपुढे प्रशंसनीय शब्दांत त्या शृंगाराची यथोचित वाच्यता करतात. तिच्या शृंगाराचे मनःपूर्वक कौतुक करतात. ती स्तुती, ती वाखाणणी ऐकून स्त्री पुरुषावर लगेच अनुरक्त होते. अशा पुरुषांची सूक्ष्म नजर स्त्रीच्या देहावरून काहीच क्षण फिरली तरी स्त्रीने केलेला शृंगार हे पुरुष विसरू शकत नसतात. स्त्रीने कोणत्या शेडची लिपस्टिक लावली आहे, मागील भेटीच्या वेळी कोणता शेड वापराला होता आणि त्यातील तुलनात्मक फरक विवेचन करून स्त्रीला पटेल असा सल्ला सौम्य शब्दांत देऊन टाकतात. स्त्रीने परिधान केलेल्या अंतर्वस्त्रांची मोजक्या शब्दांत परंतु परिणामकारक केलेली वाखाणणी स्त्रीला भावविभोर करून टाकते. पुरुषाचे आपल्या प्रत्येक कृतीकडे, छोट्याशा शृंगाराकडे देखील बारीक लक्ष आहे हे पाहूनच स्त्रीला प्रेमाचे भरते येऊ लागते. पुरुषाच्या या कौतुकास्पद शब्दांनी तिला आधार प्राप्त झाल्याचे समाधान लाभते अशा कौतुक करणाऱ्या पुरुषाच्या प्रेमात कोणतीही स्त्री आकंठ बुडून जाण्यास वेळ लागत नाही!
२)काही पुरुषांना स्त्रीने केलेला शृंगार दिसत असतो. त्या कृतींची नोंदही ते घेतात परंतु स्त्रीला तिच्या शृंगाराबद्दल एकाही शब्दाने सूचित करीत नाहीत. स्त्रीने खोल गळ्याचा ब्लाउज घातला आहे हे अशा पुरुषांना कळते पण त्यावर टिपण्णी करीत स्त्रीला खुश करण्याचे कसब त्यांना अवगत झालेले नसते. नेमक्या कोणत्या शब्दांत तिचे खोल गळ्यातून दिसणारे यौवन किती उल्लेखनीय आहे हे सांगावे, याबाबत त्यांना ठोस निर्णय घेता येत नाही. किंतु त्यांच्या डोळ्यांमधून ते कौतुक प्रतिबिंबित होतच असते. कारण त्यांनी स्त्रीचा हा शृंगार टिपलेला असतो. तो आवडला असल्याची पोचपावती त्यांच्या नजरेत उतरलेली असते. परंतु केवळ नजरेने न्याहाळून गप्प राहणारे पुरुष स्त्रीला आवडत नाहीत. आपण इतके मस्त आवरलेलं असतांना हा ब्र शब्दही काढत नाही, याचे वैषम्य स्त्रीला वाटत राहते आणि अशा शांत, अबोल पुरुषाशी स्त्री जराशी फटकून वागू लागते!
३)काही पुरुषांना मात्र स्त्रीने केलेला शृंगार अजिबातच दिसत नाही! म्हणजे ते रसिक असत नाहीत. त्यांची नजर स्त्रीच्या बारीकसारीक कृतींना सरावलेली नसते. त्यांना स्त्री आवडते मात्र का आवडली हेच कळत नाही, तिने केलेला मेकअप काडीमात्रही ओळखता येत नाही. अशा अरसिक, घुम्या आणि कृतीशून्य पुरुषाला कोणतीच स्त्री वश होऊ शकत नाही किंवा अशा पुरुषाकडे कोणतीही स्त्री ढुंकूनसुद्धा पाहत नसते!
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment