Thursday 5 January 2017

पुरुषाचा थंड प्रतिसाद...

पुरुषाचा थंड प्रतिसाद...

स्त्री सेक्ससाठी अधीर झालेली असतांना पुरुष इंटरेस्ट घेत नाही. त्याला सेक्स नको असतो. वास्तविक पाहता पुरुष स्त्रीच्या आधीच उत्तेजित असावयास हवा परंतु काही पुरुषांच्या बाबतीत असे घडत नाही. ते स्त्रीला टाळू पाहतात. स्त्रीशी संग करू इच्छित नाहीत. असे का घडते. पुरुषाची कामोत्तेजना स्त्री पेक्षा अधिक असूनही तो ऐनवेळी पडती बाजू का बरे घेत असेल? याचा ऊहापोह या लेखांकात होईल... –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)काही पुरुषांवर घरात कोणीच पुरुष नसल्याने यथोचित कामसंस्कार होतच नाहीत. त्याच्या आजूबाजूला सर्व स्त्रियाच असल्याने आणि इतर मित्रांमध्ये न मिसळल्याने त्याला काम संज्ञेचा विसर पडतो. नकळत त्याचे वागणे बोलणे स्त्री सारखे होते. आपण पुरुष असून आपल्या लिंगाचे कार्य नेमके काय हेच त्याला उमजलेले नसते. असा पुरुष विनाकारण तृतीयपंथी गणला जातो!
२)काही पुरुषांवर अध्यात्मिक संस्कारांचा जबरदस्त पगडा पडतो. घरातील अध्यात्मिक वातावरण त्याला कामविषयक माहिती घेण्यास किंवा त्याच्यासंबंधी इतरांशी बोलण्यात अटकाव येतो. सेक्स करणे महापाप असल्याचे बिंबवले गेल्याने तो त्या कृतिशी फटकून वागू पाहतो. त्यामुळे तो कोणत्याच स्त्रीला कामप्रतिसाद देऊ शकत नाही.
३)ब्रह्मचर्य हेच जीवन वीर्यनाश म्हणजे मृत्यू हे वचन काही पुरुष मनाशी बांधून ठेवतात. ते कधीच संभोग करून वीर्यनाश करवून घेण्याच्या फंदात पडत नसतात. ही निराधार आणि अशास्त्रीय संकल्पना गोंजारण्यातच त्यांना स्वारस्य असते. इतरांनी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते सांगणाऱ्यालाच वेड्यात काढतील!
४)काही पुरुषांना वयात येतांना रात्रीच्या झोपेत ‘वीर्यस्राव’ होण्याची सवय होते. वर्तमानपत्रातील अनेक जाहिरातींतून या लक्षणाला ‘स्वप्नदोष’ असे संबोधल्याने तो पुरुष हताश होतो. काही पुरुषांना हस्तमैथून करून कामसुख मिळविण्याची गरज वाटते. या क्रियेला देखील ‘तरूणपणतील चूक’ असे संबोधल्याने पुरुष बावचळून जातो. आपल्याला हे आजार झालेलेच आहेत ही खुणगाठ मनाशी बाळगून जेव्हा तो स्त्रीच्या सहवासात येतो तेव्हा त्याच्या पूर्वानुभवामुळे पटकन विर्यच्युती होऊन जाते आणि तो स्वतःला ‘शीघ्रपतन’ झाल्याचे समजू लागतो. असे का होतेय याचे शास्त्रीय ज्ञान कोणीही व्यवस्थित देत नसल्याने तो स्वतःच्याच कोषात गुरफटला जाऊन स्त्रीच्या सेक्स विषयक मागणीला थंड प्रतिसाद देतो.
५)काही पुरुष आपल्याला सेक्स जमेल की नाही या विवंचनेत सापडतात. याचे उत्तर शोधण्यासाठी ते वेश्यागमनाचा पर्याय निवडतात. वेश्याव्यवसाय हे काही सेक्स शिकवण्याचे केंद्र नसून तो एक धंदा असल्याने तिथे उरक आणि फूट असा खाक्या असतो. त्याठिकाणी जाऊन पुरुषाचा भ्रमनिरास झालेला असतो आणि आपल्याला जमणारच नाही या निष्कर्षाप्रत तो येऊन ठेपतो. परिणामी बेडवर प्रणयचेष्टा करण्यात स्वतः पुढाकार घेणाऱ्या स्त्रीला तो कामप्रतिसाद देऊ शकत नाही.
वरील कारणांचा निपटारा केला की पुरुषाच्या थंड प्रतिसादाची समस्या सुटू लागते. स्वप्नदोष ह दोष नसून एक नैसर्गिक फ्युज आहे हे लक्षात घ्यावे लागेल. कामसंज्ञेची पातळी वाढली की विर्यच्युती होणारच असते. लोड वाढला की फ्युज उडणारच ठरला! हस्तमैथून सुद्धा कधीच वाईट नसते. शीघ्रपतन देखील फार मोठी आणि सुटू शकणार नाही अशी समस्या आहे हे पुरुषाने मनातून पुसून टाकले तर तो स्त्रीला यशस्वी कामप्रतिसाद देऊ लागतो.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment