Tuesday 3 January 2017

बहुपत्नीत्व...

बहुपत्नीत्व...

भूतपूर्व कथानकांमध्ये एका राजाला अनेक पत्नी असतात असे उल्लेख आढळतील. एकपत्नीत्व जपण्याची अट पाळण्याचा हिंदू विवाह कायदा अमलांत येईतो अनेक पुरुषांना अनेक स्त्रिया पत्नी या नात्याने घरी ‘ठेवण्याची’ मुभा मिळाली होती. निसर्गात हेच आढळून येईल की एका नराला अनेक माद्यांशी संग करावा लागतो. चराचरातील कोणताही नर हा बहुपत्नीत्व निभावत असतो. मानवप्राण्याच्या बाबतीतच हा विरोधाभास किंवा एकपत्नीत्व जपण्याचा अट्टाहास का आणि कशासाठी? कायद्याला पळवाटा असतातच, त्यानुसार पुरुष आयुष्यभरात पत्नीव्यतिरिक्त इतर कोणतीच स्त्री उपभोगणार नाही याची शाश्वती देता येत नाही. नव्हे अनेक स्त्रिया उपभोगण्याचा पुरुषाचा नैसर्गिक हक्कच आहे! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)मागील अनेक लेखांकात उल्लेख केल्या प्रमाणे पुरुषाची कामोत्तेजना स्त्रीच्या तुलनेत सहापट अधिक असल्याने तो त्वरित कामोत्तेजीत होऊ शकतो. तसे स्त्रीचे नाही. तिला उत्तेजित करण्यास बरेच कसब लावणे भाग पडते. त्यामुळे पुरुषाला जी स्त्री आधी रिस्पोन्स देईल तिच्याकडे तो आकृष्ट होणे साहजिक आहे.
२)स्त्रीला पुरुषाच्या तुलनेत अधिक प्रापंचिक-संसारिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडावयाची असल्याने ती पुरुषाला प्रत्येक वेळी उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळेही पुरुष इतर उपलब्ध स्त्रीकडे ओढला जाऊ शकतो.
३)मेरा पती सिर्फ मेरा रहेगा ही स्त्रीची मानसिकताच पुरुषाला इतर स्त्रीकडे लक्ष देण्यास कारणीभूत ठरते. पुरुषाचा जितका जास्त लैंगिक कोंडमारा होईल तितका जास्त तो वर उफाळून येत असतो. एकपत्नीत्वाच्या जोखडाखाली दबून पिचलेल्या पुरुषाला स्वातंत्र्य हवे असते, आणि इतर स्त्रीचा शोध घेऊन तो त्याची भूक मिटवू पाहतो, कोंडलेली वाफ दुसऱ्या स्त्रीच्या सान्निध्यात उत्सर्जित करण्याचा प्रयत्न करतो. कायद्याचा बडगा असल्याने तो ही बाहेरख्याली उघड न होईल याच्या अटोकाट प्रयत्नात असतो!
४)निसर्गात नरांची संख्या मादींच्या तुलनेत नेहमीच कमी असते. कारण मादीवर प्रभुत्व मिळविण्यासाठी झगडा होतो, त्यात जो नर वरचढ असेल तोच जिंकतो. हरलेल्या नराला जगणे मुश्कील होते, त्याचे खायचे वांधे होतात. शिवाय जन्मलेल्या पिल्लांपैकी जी नर पिल्ली असतात त्यांची हत्या स्वतः बाप करतो कारण त्याला पुढे जाऊन प्रतिस्पर्धी नकोसा असतो!
५)अनेक मादींशी ‘जुगणे’ हा तर प्रत्येक नराचा नैसर्गिक स्वभावधर्मच! त्याला पुरुष तरी अपवाद कसा ठरेल? त्यामुळे पुरुषाच्या चोरीछिपे का होईना अस्तित्वात असणाऱ्या बहुपत्नीत्वाची कदरच करायला हवी!
 –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment