Tuesday 27 December 2016

अष्टावधानी पुरुष...

अष्टावधानी पुरुष...

निसर्गनियमानुसार अनेक माद्यांशी जुगणे हे नराचे आद्यकर्तव्य असते. पुरुषही त्याला अपवाद नसावा. परंतु एकाचवेळी अनेक स्त्रिया कशा काय उपभोगता येतात हे सामान्य पुरुषाला नेहमी पडणारे कोडे असते. चार पाच स्त्रियांना फिरवणारा, नादी लावणारा आणि भोगणारा पुरुष त्या सामान्य पुरुषाला हिरो वाटू लागतो. असा अष्टावधानी पुरुष कसा काय सर्वजणी हाताळू शकतो हे त्याच्या दृष्टीने अचंब्याची गोष्ट ठरते. मुळात असे अष्टावधान राखणे नर प्राण्याच्या अंगी भिनलेले असते. सर्वांनाच त्याचा उपयोग करून घेता येतो असे नाही. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)स्त्रिया पुरुषाच्या दिसण्यापेक्षा समंजस असण्याला, मधुर बोलण्याला, कौतुकास्पद शब्दांच्या पखरणीला आणि तो जीवनात यशस्वी असण्याला भाळतात असा एकंदर अभ्यास सांगतो. त्यामुळे बोलबच्चन किंवा बोलघेवड्या पुरुषाला कोणतीही स्त्री चटकन वश करता येते. स्त्रिया बहिर्मुख म्हणजे सारख्या बडबड करणाऱ्या असतात, त्यांना यथोचित प्रत्युत्तर किंवा संवादात आकर्षक सहभाग घेणारे पुरुष आवडतात.
२)गप्प बसे किंवा घुम्या पुरुषांकडे कितीही यशस्विता असली, ते कितीही ज्ञानी असले तरी आपल्या चांगुलपणाचे गुणगान गाणे त्यांना आवडत नसल्याने किंवा चुप्प राहिल्याने स्त्रिया अशा घुम्या पुरुषांना नक्कीच टाळतात. जो बोलतो त्याची मातीही खपते, या उक्तीनुसार अगदी सामान्य दिसणारा पुरुषही केवळ आपल्या जिव्हेच्या सफाईदार चकमकीने किंवा आजकालच्या दिलखेचक चाटिंगच्या माध्यमातूनही स्त्रीला प्रभावित करू शकतो, तिला जाळ्यात ओढू शकतो.
३)‘स्त्रीशी मधुर बोलाल तर तिला भोगाल’ अशी नवी म्हण निर्माण करता येईल. स्त्रीची आवड-निवड चाणाक्षपणे ओळखून तत्परतेने तसे वागले-बोलले तर स्त्री अनुरक्त होण्यास वेळ लागत नाही. अशा अनेक स्त्रिया पुरुषाला वश करता येतात. परंतु प्रत्येकीला ‘मी फक्त तुझाच आहे’ हे वारंवार पटवून द्यावं लागतं.
४)अनेक स्त्रियांशी लागेबांधे ठेवतांना पुरुषाची त्रेधातिरपीट उडू शकते. पण व्यवस्थित नियोजन केले तर सर्वकाही व्यवस्थित हाताळता येते. अष्टावधान राखून कार्यतत्परता जपावी लागते. पटकन संयुक्तिक निर्णय घेण्याची हातोटी जमावी लागते. तरच सर्व इप्सित साध्य करणे शक्य होते.
५)प्रत्येक पुरुष अनेक स्त्रियांना वश करू शकतो, त्यांना ओलिताखाली ठेवू शकतो आणि यथेच्छ उपभोगूही शकतो. मात्र या सर्व अष्टावधानासाठी पुरेसा वेळ हवा असतो, या बोटावरची थुंकी त्या बोटावर आणण्याची क्षमता अंगी असावी लागते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची धमकही अंगी मुरलेली असावी लागते. अशी सर्व संकटे आणि आपत्या झेलण्याची तयारी असलेल्या पुरुषाचेच हे ‘काम’ आहे. अन्यथा अनेक स्त्रियांना भोगण्याचे ‘दिवास्वप्न’ मितभाषी, मूढ, घुम्या, बुळ्या, शेळपट आणि पळपुट्या पुरुषांनीच पहावे!  --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment