Friday 16 June 2017

रीब्ड कंडोम...


रीब्ड कंडोम...

नाविन्यपूर्ण निरोधांचा वापर करतांना पुरुषाने आपल्या स्त्रीला काय आवडते याचा जरासा विचार करावा. प्रत्यक्ष संभोगाच्यावेळी स्त्रीची कामतृप्ती कशी होते यावर बरेच अवलंबून आहे. काही स्त्रियांना लिंगाचे योनीमार्गात स्थिर राहून स्वतः हालचाल करीत कामतृप्त होणे आवडते तर काही स्त्रियांना पुरुषाने शेवटपर्यंत लिंग योनीत पुढेमागे करीत राहावे असे वाटते. तर काही स्त्रियांना पुरुषाने त्याचे शिस्नमुंडच फक्त योनीमार्गात घासत ठेवावे असे आवडते. पूर्ण लिंगप्रविष्ट केले नाही तरी केवळ शिस्नमुंड पुढेमागे करून घर्षित ठेवल्याने त्यांची कामतृप्ती होते. अशा केवळ शिस्नमुंडाचे योनिमार्गातील घर्षण आवडणाऱ्या स्त्रियांना खुश आणि कामतृप्त करण्यासाठी रीब्ड कंडोमची निर्मिती करण्यात आलेली आहे.
  • kaamvishva.blogspot.in
१)अशा रीब्ड कंडोमचा बाहेरील भाग स्पर्श केला असता त्यावर स्प्रिंगसारखी असंख्य वलये निर्माण केलेली आढळतात. थोडक्यात पाण्याच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या तरंगाशी यांची तुलना करता येईल. किंवा ठराविक अंतराने बांगड्या भरलेला हात कसा दिसेल तशी ह्या वळ्यांची रचना असते.
२)ही वर आलेली वलये किंवा वळ्या  किंवा स्र्पिंग्ज कमी अधिक उंचीची असू शकतात. शिवाय दोन्ही रिब्ज मधील अंतर सुद्धा कमी जास्त असू शकते. हा कंडोम शिस्नावर चढवल्यावर हाताला मऊ न लागता खरबरीत लागतो. याच खरबरीतपणाचा  उपयोग करून घेता येतो.
३)ज्या स्त्रीला शिस्निकेऐवजी मदनबिंदूच्या (जी-स्पॉट) उत्पीडनाने अधिकची कामतृप्ती लाभते तिच्यासाठी हा वळ्यावळ्यांचा निरोध उपयुक्त ठरतो.
४)यथोचित प्रणयक्रीडा करून स्त्रीला प्रणयोत्सुक करून पुरुषाने हा रीब्ड कंडोम लिंगावर लावावा. मग उत्तेजित झालेल्या स्त्रीच्या योनीत शिस्न प्रविष्ट करून प्रत्यक्ष संभोग सुरु ठेवावा.
५)स्त्रीचा मदनबिंदू अधिक उत्तेजित कसा करता येईल याच हेतूने शिस्नाची हालचाल करीत राहावी. खरबरीत कंडोम योनीमार्गात घासत राहिल्याने स्त्रीला कमालीची कामतृप्ती लाभते.
--  kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment