Thursday 22 June 2017

काम‘जेवण’...!

काम‘जेवण’...!

कामजीवनासंबंधित काहीही चर्चा करण्यास, उघड उघड सल्ला घेण्यास आणि खुलेआम वाचन करण्यास समाजाने अलिखित निर्बंध घातला आहे. बालवयापासून कामजीवन म्हणजे काहीतरी पाप आहे, ते वाईट असते, कुकर्म असते... अशा नकारात्मक विचारांचा पगडा मुला-मुलींवर घातला गेलेला असतो. त्यामुळे जेव्हा कामजीवनाची सुरुवात करण्याची वेळ येते तेव्हा पुरुषच काय तर स्त्रीसुद्धा भांबावून जाते! परिणामी अनेक जोडपी कामजीवनाचा ‘खरा’ आनंद मिळविण्यात अयशस्वी ठरतात. कित्येक भारतीय स्त्रियांना तर कामतृप्ती म्हणजे काय असते हे आयुष्याच्या शेवटपर्यंत उमगलेले नसते! चांदीच्या ताटात पंचपक्वान्न घेऊन ताव मारणाऱ्या पुरुषाला आपल्या स्त्रीला कामसुख मिळते की नाही, तिचे काम‘जेवण’ यथोचित होऊन तिला कामतृप्ती लाभते की नाही... याचा विचार करावासा वाटत नाही हीच खरी शोकांतिका आहे.
kaamvishva.blogspot.in
१)स्त्री प्रेमाला भुकेली असली तरी फक्त प्रेमच करून तिला कामतृप्ती कशी लाभेल? त्यासाठी यथोचित प्रणयानंतर यशस्वी संभोग होणे गरजेचे असते.
२)पुरुषाची कामक्षुधा स्त्रीच्या सहापट अधिक असली तरी तिला कामसुख हवेच असते, ते न मिळाल्यास अतृप्त स्त्रीची लक्षणे उत्पन्न होतात. हे मागील एका लेखांकात सांगितले आहेच.
३)प्रत्येक प्राणी आपल्या सारखा सजीव निर्माण करण्याच्या हेतूने जन्म घेत असतो. त्यामुळे संभोग करणे ही कृती सर्व प्राण्यांना अनिवार्य ठरते.
४)मानवाची उत्क्रांती झालेली असल्याने कामक्रीडा, कामसुख, कामतृप्ती आणि अपत्यप्राप्तीचा आनंद अशा भावना विकसित झालेल्या असतात.
५)रोज चविष्ट आणि रुचकर जेवण मिळाले तरच क्षुधाशांती होते, तद्वत आठवड्यातून किमान दोन वेळा जरी स्त्रीला यशस्वी संभोगातून कामतृप्ती लाभली तरी तिचे पुरुषावरील प्रेम अधिक दृढ होत जाते.
६)जेवण मिळाले नाही तर चिडचिड होते, कृशता येते आणि निरुत्साह वाटू लागतो. अगदी तसेच कामजीवनाचे सूत्र आहे. कामसुख मिळाले नाही तर स्त्री संशयी बनते, तिला आकारण मनोकायिक आजार उत्पन्न होतात, ती कामसुख न देणाऱ्या पुरुषात रुची दाखवीत नाही आणि केवळ नाते टिकवायचे म्हणून ती अतृप्ततेचे जोखड ओढत राहते.
७)म्हणून कामतृप्त करणारे कामजीवन हेच स्त्रीसाठी काम‘जेवण’ असते हे पुरुषाने लक्षात घ्यावे. स्त्रीची कामतृप्ती होणे सुखी कामजीवनाची गुरुकिल्ली असते हे त्यानेकायम लक्षात ठेवले पाहिजे.
-- kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment