Thursday 22 June 2017

कंपनकडी (व्हायब्रेटर रिंग)


कंपनकडी (व्हायब्रेटर रिंग)

निरनिराळे सेक्स टोइज वापरात येत असतांना काही पुरुषांना त्यांचे लिंग अधिक ताठर राहावे असे वाटत असते, तर काही स्त्रियांना शिस्निकेचे जास्त उत्पीडन होऊन कामतृप्ती हवी असते. या दोन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनकडीची निर्मिती केली गेली. मागे एका लेखांकात उल्लेखिल्या प्रमाणे जसा रबरबँड शिस्न अधिकवेळ ताठर ठेवण्याचे कार्य करतो तसेच ही रिंग काम करते. याच रिंगला वरील बाजूने बंद-चालू करता येऊ शकेल असा कंपक (व्हायब्रेटर) बसवलेला असतो. मोबाईल व्हायब्रेट होतो तसा हा भाग कंपित होऊन योनीवरील शिस्निकेचे उत्पीडन करतो आणि स्त्रीला अधिक कामतृप्ती प्रदान करतो.
  • kaamvishva.blogspot.com
१)ही कंपन कडी सिलिकॉन रबरापासून तयार केलेली असते. ती मऊ आणि स्थितीस्थापकत्व असलेली असते. ती शिस्नावर शिस्नमूलाशी सारून बसवावी लागते.
२)या कडीला वरील बाजूने ताईताच्या आकाराचा आडवा कंपक असतो. त्यात छोट्या सेलवर चालणारा व्हायब्रेटर बसविलेला असतो. हा कंपक चालू बंद करायला बारीकसे स्वीच असते.
३)रिंग शिस्नमुलाशी बसवली की ताठरपणा वाढीस लागतो. पुढे जाणारा रक्तप्रवाह चालू राहतो मात्र मागे येणारे रक्त रिंग आवळल्याकारणाने थोपवून धरले जाते. परिणामी शिस्न जास्तीच ताठर होऊन जाते.
४)व्हायब्रेटर चालू करून प्रत्यक्ष संभोग करावा. त्यामुळे शिस्न खोलवर गेल्यानंतर व्हायब्रेटर शिस्निकेला स्पर्श करीत कंपने देऊ लागतो.
५)ही कंपने पूर्वापार चालत आलेल्या धक्क्यांपेक्षा अधिक सुखावह असल्याने स्त्रीला कमालीचे कामतृप्ती देऊन जातात.
६)ही कंपनकडी धुवून, वाळवून पुनःपुन्हा वापरता येते. तिला लुब्रीकेटेड केले तर आणखी सुखद संवेदना स्त्रीला लाभून ती कामतृप्त होत राहते.
- kaamvishva.blogspot.in 

No comments:

Post a Comment