Friday 16 October 2015

लग्न- स्त्रीचा एक जुगार...!

लग्न- स्त्रीचा एक जुगार...!
नारळ फोडण्याआधी कसा निघेल याचा अंदाज देता येत नाही. पपईचं देखणं फूल नर आहे की मादी, ते फळ देईल की नाही याचा भरोसा नसतो. तसेच लग्नाआधी नवरा कसा निघेल याचा नेम नसतो. ठरवून केलेल्या लग्नामुळे पुरुषाचे ‘सगळे’ वर्तन विचारपूस करून जाणून घेता येत परंतु त्याचे ‘लैंगिक’ वर्तन कसे आहे? त्याच्या सेक्सबाबतच्या भावना कशा आहेत? तो संभोगापूर्वी प्रणय रंगवू शकतो का? याचे काडीमात्रही ज्ञान प्रचलित लग्नसंस्थेत जाणून घेता येत नाही. विवाहपूर्व समुपदेशन ही काळाची गरज असतांना अनेक पुरुष सेक्सविषयक शास्त्रीय ज्ञान जाणून घेण्याची जिज्ञासा अजिबात बाळगत नाहीत, हीच खरी वैवाहिक जीवनाची शोकांतिका ठरते. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
पुरुष वयात आल्यावर त्याच्या लैंगिक भावना स्फोटक असतात. थोड्याशा उत्तेजनेनेदेखील तो कामोत्सुक होतो. मग हस्तमैथुन किंवा स्वप्नदोष या ‘नैसर्गिकक्रिया’ अपोआप घडून येतात. काही पुरुष हस्तमैथुन किंवा स्वप्नदोष झाल्यावर निराश होतात. त्यांना वीर्यनाश झाला म्हणजे अशक्तपणा येईल असे वाटू लागते. मग ते हस्तमैथुन टाळू लागतात. हस्तमैथुन आणि स्वप्नदोष या पूर्णतया नैसर्गिकक्रिया असल्याने त्याबाबत बाऊ करून घेण्याचे कारण नसते. पण असा निराशाजनक विचार केल्याने त्याचा परिणाम भावी लैंगिक संबंधावर होऊ शकतो.
लग्नापूर्वी पुरुषाने सेक्स नेमका कसा करावा याचे शास्त्रीय ज्ञान घेतले नसेल तर त्याची अवस्था अंधारात चाचपडनाऱ्या योद्ध्यासारखी होते. भलत्याच प्रकारे सेक्स करून स्त्रीचा रोष पत्करावा लागतो. स्त्रीला व्यवस्थित तयार केले गेले नाही तर कामसलील न स्त्रवल्यामुळे संभोग कष्टप्रद होतो. काही पुरुष पोर्नफिल्म पाहून तसेच करू पाहतात, जे की अवास्तव आणि अनैसर्गिक असते. मुळात स्त्रीला असा द्राविडी डोंबारकीचा संभोग असह्य होत असतो पण तिला निमूट सहन करावे लागते.
शीघ्रपतन हे प्रथम संभोगाच्यावेळी हटकून होतच असते. पुरुष कामोद्दीपित लवकर होत असल्याने उच्च क्षणाच्या संवेदना त्याने मानसिकपातळीवरच पूर्ण केलेल्या असतात आणि मग शिस्नाला योनीचा स्पर्श होताच विर्यच्युती होऊन जाते. असे झाल्याने तो हिरमुसतो परिणामी आपल्यात काहीतरी कमी असल्याची भावना बळावते आणि पुढील वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. यावर उपाय काय आहेत ते शीघ्रपतन या शीर्षकाखाली  नमूद केले आहेतच.
काही पुरुषांना सेक्स बाबत मुळीच आकर्षण वाटत नसते. पौरुष हार्मोन्सच्या कमतरतेमुळे हे घडू शकते. पण बहुदा हे कारण नगण्य असून प्रमुख कारण मानसिकतेत दडलेले आढळते. स्त्री विषयी ओढ वाटली तरच पुरुष उत्तेजित होऊ शकतो. अशा धीम्या गतीच्या पुरुषाला कामोत्सुक करण्यासाठी स्त्रीला कामचतुराई दाखवावी लागते. परंतु तिचा बेडवरील अर्धाधिक वेळ पुरुषाला उत्तेजित करण्यात जातो तोवर तिची उत्तेजना संपत आलेली असते. अशावेळी दोघांचे वैवाहिक समुपदेशन करणे गरजेचे ठरते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment