Saturday 3 October 2015

स्त्री-पुरुषाच्या 'काम'वृत्तीतील फरक..

स्त्री-पुरुषाच्या ‘काम’वृत्तीतील फरक...

स्त्री आणि पुरुष कामरूपी नाण्याच्या दोन बाजू होत. एक काटा असला तर दुसरा छापा असतो. ती कुलूप असते तर तो तिची चावी! शारीरिक ठेवणीत जसा फरक तसाच मानसिक पातळीवरही दोघांच्या कामवृत्तीत भिन्नत्व असते. बेडवर प्रणयाचा टॉस केला असता तो काटाही पडू नये किंवा छापाही, अशी समतोल स्थिती साधावी की ‘टॉस’ उभाच राहिला पाहिजे! कामजीवनाची यशस्वी वाटचाल यातच दडलेली असते. म्हणून दोघांनीही एकमेकांची ‘काम’वृत्ती समजावून घेतली तर असा समतोल राखणे काहीही अवघड नसते. म्हणतात ना ज्यांचे बेडवर चांगले पटते, त्यांचे आयुष्यभर चांगलेच पटते! ही उक्ती प्रत्येकाला तंतोतंत लागू पडते. यास्तव दोघांच्या कामवृत्तीतील फरक माहीत करून घेणे अगत्याचे ठरते... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)--  कामुक विचारांनी पुरुष तात्काळ उत्तेजित होतो आणि त्याची कामतृप्तीसुद्धा तात्काळ स्वरुपाची असते. म्हणजे विर्यच्युती झाली की त्याला कामतृप्ती लाभते. तसे स्त्रीचे नसते. तिला उत्तेजित होण्यास वेळ लागतो. परंतु तिची उत्तेजित अवस्था पुरुषाच्या तुलनेत अधिक काळ टिकून राहते आणि तिची कामतृप्ती सर्वांगीण असते.
२)--  पुरुषाचे कामोत्तेजक बिंदू लिंगाच्या ठिकाणी एकवटलेले असल्याने त्याला प्रत्यक्ष संभोगात अधिक रुची असते आणि त्यामुळे तो उत्तेजित झाल्यास लगेच सेक्स करण्यास सुरुवात करतो. याउलट स्त्रीचे कामोत्तेजक बिंदू हे सर्व शरीरभर पसरलेले असतात. विशेषतः मान, पाठ, गळा, कानाच्या मागील बाजू, स्तनाग्रे, स्तनमंडले, ओटीपोट, नाभी, तळवे, पोटऱ्या, मांड्यांची आतील बाजू, योनिभगोष्ठ, शिस्निका याठिकाणी कामोत्तेजक संवेदना पसरलेल्या असतात. जास्तकरून स्तनाग्रे व शिस्निका ही स्थाने तात्काळ कामोद्दीपित करणारी असतात.
३)--  पुरुषाला प्रत्यक्ष संभोगाची आवड असते. तो उत्तेजित झाल्याबरोबर त्याचे ताठरलेले लिंग योनीमध्ये घुसडू पाहतो. परंतु स्त्रीला प्रत्यक्ष संभोगात अजिबात रस नसतो, त्यापेक्षा पुरुषाने प्रणयाराधन करावे, सर्वांगाला स्पर्श करून कामोत्तेजीत करावे, स्तनाग्रे, शिस्निका यांचे हळूवार उत्पीडन करावे अशी तिची अपेक्षा असते. त्याद्वारे स्त्रीला अधिक कामतृप्ती लाभते. प्रत्यक्ष संभोग अगदी शेवटी तिला हवा असतो. प्रणयक्रीडेने होणारी कामतृप्ती तिला जास्त आवडत असते.
४)--  मानसिकपातळीवर पुरुष हा सुंदर आणि कमनीय दिसणाऱ्या स्त्रीकडे तात्काळ आकर्षित होतो. त्या स्त्रीकडून त्याला लगेच सेक्स हवासा वाटतो. त्याउलट स्त्री गोऱ्यागोमट्या, चिकण्या किंवा बॉडीबिल्डर असलेल्या पुरुषाकडे तात्काळ आकर्षित होऊ शकत नाही. म्हणजेच पुरुषाप्रमाणे केवळ ‘का भुललासी वरलिया रंगा’ असा प्रकार स्त्रीच्या मानसिकतेचा नसतो. पुरुषाकडून ती नेहमीच प्रेमाची आधाराची आणि आश्वासकतेची अपेक्षा धरून असते, ते तिला मिळाले की ती त्याच्याकडे आकृष्ट होऊन आपले सर्वस्व त्याला बहाल करते. पुरुष सेक्ससाठीच स्त्रीवर प्रेम करतो तर स्त्री प्रेमासाठी पुरुषाशी रत होते.
५)--  सेक्स हा पुरुषाचा नैसर्गिक धर्म आहे, ते त्याचे नैसर्गिक आद्य कर्तव्य आहे, सेक्स म्हणजे त्याच्यातील नराचा पुरावा आणि साध्यही आहे. त्याउलट स्त्रीला बालकाचे पालनपोषण गर्भातही आणि बाहेरही करायचे असते. ही तिची नैसर्गिक उर्मी असते. त्यामुळे आधार, प्रेम, संरक्षण याची खात्री करून घेतल्याशिवाय ती सहसा सेक्ससाठी राजी होत नाही. हा तिचा नैसर्गिक बाणा असतो. कारण पुरुषाकडून आधार, प्रेम, संरक्षण मिळाले नाही तर ती अपत्याचे पालनपोषण व्यवस्थित करू शकणार नाही ही तिची नैसर्गिक वृत्ती ‘काम’वृत्तीत देखील प्रतिबिंबित होत असते.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment