Friday 9 October 2015

वयानुरूप स्त्री-पुरुषातील सेक्स...

वयानुरूप स्त्री-पुरुषातील सेक्स...

कामवासना ही प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या शेवटपर्यंत टिकून राहते. व्यक्तीच्या वयानुसार व लिंगानुसार कामवासनेचा दर्जा, तीव्रता यात फरक पडतांना आढळतो. कामवासना नेहमीच स्त्रीत पुरुषाच्या केवळ एकचतुर्थांश इतकीच असते. वयाच्या सतरा अठराव्या वर्षी पुरुषाची कामवासना अत्त्युच्च पातळीवर असते व त्यानंतर त्यात उतार पडत जातो. तसे स्त्रीत आढळत नाही. स्त्रीची कामोत्तेजना उच्च पातळीवर पंचवीस ते तीस या वयात आढळते. या वयात पुरुषाची कामेच्छा काहीशी कमी झाल्याने त्याला सेक्स नकोसा वाटतो तर स्त्रीची कामेच्छा अधिक असल्याने तिला संभोगाची आवड व असूया निर्माण झालेली असते. यात जो सुवर्णमध्य साधेल तोच वैवाहिक जीवनात यशस्वी ठरेल.
उतारवयात स्त्री-पुरुषांनी नियमित संभोग केल्यास संप्रेरकांची पातळी यथोचित राहून दीर्घायुष्य लाभते असे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहेच. उतारवयात संभोग करणारे पुरुष अधिक जगतात असेही आढळून आलेले आहे!    --भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
जगविख्यात सेक्सतज्ञ ‘किन्से’ यांनी १२ हजार पुरुष व ८ हजार स्त्रियांची मुलाखत घेऊन वयानुसार स्त्री-पुरुषात होणाऱ्या सेक्स विषयी काही निष्कर्ष काढले ते नक्कीच अभ्यासण्याची गरज आहे.
१)-- वयात येईतो स्त्री-पुरुषाला फारशी कामेच्छा निर्माण होत नाही.
२)--  वयात आल्यानंतर स्त्री-पुरुषांची कामेच्छा वाढते मात्र पुरुषाची कामेच्छा स्त्रीच्या पाचपट अधिक असते. म्हणजेच पुरुष स्त्रीच्या पाचपट अधिक वेगाने उद्दीपित होत असतो.
३)--  वयात आल्यापासून रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीचा कामोद्दीपनाचा आलेख समांतर असतो. म्हणजे तिला वयात आल्यापासून प्रत्यक्ष संभोगाऐवजी प्रणयक्रीडा, प्रेम, सहवास यांचा हव्यास असतो. पुरुषाने स्तनमर्दन, स्तन चूषण, शिस्निका उत्पीडन यांचा वापर करून कामतृप्त करावे अशी तिची अपेक्षा असते. यातूनच स्त्रीला अधिक कामतृप्ती लाभत असते. याउलट पुरुषाला प्रत्यक्ष संभोगातूनच कामतृप्ती मिळते. हा फरक पुरुषाने आवर्जून लक्षात ठेऊन यातील सुवर्णमध्य गाठला की कामजीवन यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.
४)--  स्त्री तिच्या तिशीत अधिक कामप्रवण झालेली असते तर पुरुष किंचित उताराला लागलेला असतो. तरीही त्याची कामोत्तेजना नेहमीच स्त्रीच्या पाचपट अधिक असल्याने तो तिला नक्कीच कामतृप्त करू शकतो. हे वय दोघांसाठी अधिक महत्वाचे ठरते. या वयात स्त्री कामतृप्तीसाठी अधीर झालेली असतांना पुरुषाने तिच्या कामतृप्तीकडे कानाडोळा करून चालत नाही. काही सेक्सतज्ञ प्रणयक्रीडा करून झाल्यांनतर उत्तेजित झालेल्या स्त्रीची हस्तमैथूनाने कामतृप्ती करून द्यावी आणि नंतर स्वतःची कामतृप्ती प्रत्यक्ष संभोगातून करून घ्यावी अशी सामोपचाराची उपचार पद्धती सुचवितात.
५)— रजोनिवृत्तीनंतर बहुतेक स्त्रिया संभोगासाठी राजी नसतात. याच वयात पुरुषाची देखील कामेच्छा कमी प्रमाणात येत असते. योनीमार्गात कामसलील पुरेसे तयार न होणे, योनीचे स्नायू लवचिक नसणे यांमुळे स्त्री संभोग नको म्हणते.
६)--  वय वाढत जाते तसे स्त्री-पुरुषातील कामेच्छा कमी निर्माण होतात. हे खरे असले तरी पुरुषाची कामेच्छा नेहमीच स्त्रीच्या पाचपट अधिक असल्याने तो साठीत सुद्धा सोळा वर्षीय तरुणीपेक्षा अधिक कामेच्छा बाळगून असतो. पुरुषाला योग्य संवेदना लाभल्या तर तो साठीत देखील परिणामकारक संभोग करू शकतो.
७)--  वयानुसार स्त्री-पुरुषातील कामेच्छा कमी अधिक आढळण्याचे कारण काय तर पुरुषाचे नैसर्गिक काम शुक्रजंतू गर्भाशयापर्यंत पोहचविणे हेच आहे, त्यामुळे त्याची कामेच्छा स्त्रीच्या पाचपट अधिक असते. याउलट स्त्रीला गर्भ पालन, गर्भ पोषण, मातृत्व, संगोपन ही नैसर्गिक कर्तव्ये पार पाडावयची असल्याने मुळात तिचा कल केवळ शुक्रजंतू सामावून घेण्याकडे असतो. संभोगक्रीडा कोणत्या प्रकारे केली, किती वेळ चालली, कितीवेळा घडून आली यात तिला बिलकुल स्वरस्य नसते. पुरुषाकडून प्रत्यक्ष संभोगापूर्वी मिळणारे प्रेम, आधार, प्रणय, आश्वासक साथ यांची गरज स्त्रीला अधिक भासते. कारण स्त्रीची नैसर्गिक प्रेरणाच मुळी मातृत्व या संकल्पनेभोवती एकवटलेली असते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment