Monday 5 October 2015

पक्षी-प्राणी-मानव आणि सेक्स...

पक्षी-प्राणी-मानव आणि सेक्स...

मैथून ही प्रत्येक चराचराची नैसर्गिक प्रेरणा असते. त्यायोगे त्यांना आपल्यासारखा सजीव निर्माण करण्याची उपजत उर्मी आलेली असते. म्हणूनच नर मादीच्या शोधात भटकत राहतात, कधीकधी मादी नराच्या शोधात फिरतांना आढळते. पक्षी प्राण्यांत जसे मैथून आढळते, तसे मनुष्यप्राण्यात असते का? नेमकी कोणती भिन्नता आणि कोणती साम्यता दोहोंच्या कामवृत्तीत आढळते? निसर्गातील मैथुनाचे सिंहावलोकन करून पुरुषाला काही टीप्स मिळू शकतील का? त्यांची माहिती मिळवून प्रत्यक्ष कामजीवनात चतुरतेने वापर करून सुखी वैवाहिक जीवन व्यतीत करता येईल का? –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)— पशु पक्षी आणि प्राण्यांमध्ये बहुतेकदा मैथून केले जाते. मैथून अनेकांशी अनेकवेळा केलेला संभोग असतो तर मानव प्राणी सहसा संभोग करतो. म्हणजे एकावेळी एकाच जोडीदाराशी सम्यक भोग (दोघांनाही कामतृप्ती लाभेल असे मैथून) ठेवतो. निसर्गातील नर नेहमी मादीवर कुरघोडी करून बळजबरीचा सेक्स करतांना आढळतो. मार्जार कुळातील नर मादीच्या मानगुटीवर चावा घेत मैथून करतो. तसेच काही कुक्कुटवर्गातील पक्षी मादीच्या डोक्यावरील पिसे चोचीने ओढून मैथून करतांना आढळतात. मादी राजी नसतांना तिला गनिमीकाव्याने पकडून मैथुनाला सज्ज करण्याचा हा प्रकार असतो. असा बळजबरीचा संभोग पुरुषाने स्त्रीशी केला तर तो मात्र गुन्हा ठरतो!
२)--  निसर्गात मैथूनाशी संबंधित काही विलोभनीय दृश्ये पहावयास मिळतात. मादीला मनवण्यासाठी नर हरतऱ्हेचे प्रयत्न करतांना दिसतात. सुगरणीचा नरपक्षी वैशिष्टपूर्ण खोपा बांधून मादीला आकर्षित करू पाहतो. तिला जे घरटे आवडेल म्हणजे ज्याची कला आवडेल त्याच्याशी ती संसार थाटते. पण हा नर पक्षी चलाखपणाही दाखवतो. तो एकापेक्षा अनेक खोपी बांधून जास्तीत जास्त आपलीच ‘चलती’ कशी राहील याकडे लक्ष देतांना आढळतो! इतरही प्राणी मादीला आकर्षित करण्यासाठी निरनिराळे आवाज काढतात, आपली बळकट काया, देखणे रंग, आपल्यातील कसब दर्शवितात. म्हणजेच पुरुषालादेखील आपल्या सदगुणांचे प्रदर्शन करून स्त्रीला आकृष्ट करता येते हे नक्की. ज्याच्याकडे वैभव आहे, जो वेलसेटल्ड आहे, ज्याच्याकडे गाडी-बंगला आहे, त्यालाच स्त्री डोळे झाकून पसंत करते हे त्रिवार नैसर्गिक सत्य आहे असेच म्हणावे लागेल. म्हणजेच पुरुषाने स्त्रीच्या स्वागताची जय्यत तयारी केल्याबिगर पुढे पाऊल टाकू नये असेच निसर्गाला सूचित करायचे तर नसेल ना?
३)--  मयूरनृत्य सर्वांना परिचित आहेच. ढगांना पाहून मोर नाचतो हे खरे नसून लांडोरीचा अनुनय करण्यासाठी तो पिसारा फुलवून आपले रंगीले वैभव प्रकट करीत तिला भुरळ पाडीत असतो. ज्या नराचा पदन्यास उत्तम, ज्याचे प्रणयाराधन डौलदार असते आणि जो नर आपले मोरपिसांचे वैभव दर्शवून डोळ्यांचे पारणे फेडू शकतो अशाच नराशी मादी जुगते. म्हणजे संभोगपूर्व क्रीडेला निसर्गात जितके महत्व आहे तितके पुरुषाने द्यायला हवे. कामक्रीडा केल्याशिवाय प्रत्यक्ष संभोग अजिबात करू नये, असा एकतर्फी संभोग ‘सम्यक’ भोग न राहता केवळ ‘उपभोग’ ठरतो.
४)--  निसर्गातील अनेक नर मादीसाठी घमासान लढाई करतांना दिसतात. त्यात जो जिंकेल तोच मादीला जुगतो. प्रसंगी कमकुवत नराला धाराशायी पडावे लागते. जो शक्तिमान, जो ताकतवर, जो सुदृढ असेल तोच मादीला जिंकू शकतो. पुरुषालासुद्धा स्वतःला सिध्द केल्याशिवाय बोहल्यावर चढता येत नाही, परिणामी स्त्रीवरही चढता येत नाही! विनोदाचा भाग सोडला तरी हे त्रिकालाबाधित सत्य आहेच की! पुरुषाकडे एखादातरी प्लस पॉईंट असायलाच हवा ज्यावर स्त्री अनुरक्त व्हावी. या स्पर्धेत जो टिकेल तोच स्त्री जिंकेल!
५)— बहुतेक प्राणी पक्षी मादीला मागील बाजूने जुगतांना दिसतात. त्यामुळे त्यांचे मैथून केवळ गर्भधारणेपुरतेच मर्यादित राहते. शिवाय मैथूनाचा कालावधी अत्यल्प असतो. पशु-पक्षी-प्राण्यांचे मैथून केवळ काही सेकंदेच चालू राहते. कामतृप्ती हा प्रकार मानवेतर प्राण्यांमध्ये आढळून येत नाही. म्हणून पुरुषाने अधिक सजग असणे गरजेचे आहे. स्त्री-पुरुषांचा संभोग हा काही मिनिटे ते काही तास चालत असल्याने त्यात विविधता असणे, पुरेसा प्रणय अंतर्भूत करणे आणि स्त्रीची कामोद्दीपित करणारी स्थाने लक्षात ठेवून आवर्जून त्यांचे उत्पीडन करणे आवश्यक ठरते. पुरुषाची आवड म्हणून तो श्वानानुनय संभोगासन म्हणजे डॉगी स्टाईल सेक्स करण्याची इच्छा बाळगतो. परंतु यात स्त्रीची शिस्निका जी की कामोद्दीपनाची सौदामिनी ठरते, तिचे उत्पीडन अजिबात होत नसल्याने स्त्रीला प्रत्यक्ष संभोगातून येणारी कामतृप्ती बिलकुल लाभत नाही.
--भोगगुरु कामदेव.  kaamvishva.blogspot.com

No comments:

Post a Comment