Tuesday 15 November 2016

मैत्री, प्रेम आणि सेक्स...

मैत्री, प्रेम आणि सेक्स...

मुलांची मुलांशीच मैत्री असणे किंवा मुलींची मुलींशीच दोस्ती असणे भारतीय संस्कृतीला निखालस मान्य आहे. परंतु मुलीची मुलाशी होणारी मैत्री मात्र भुवया उंचावणारी ठरते, अशा मैत्रीकडे पूर्वग्रहदूषित नजरेनेच पाहिले जाते, अशी मैत्री म्हणजे सेक्सची पूर्वतयारी होय असा शिक्का आपसूकच मारला जातो...
खरेच असे असते का? मुलांनी मुलीशी मैत्री करावी का? मुलींनी मुलाशी मैत्री करतांना कोणत्या लक्ष्मणरेखा पाळाव्यात? मैत्री आणि प्रेम यातील धूसर सीमारेषा कशी जाणून घ्यावी? प्रेमात पडल्यावर सेक्स अनिवार्य का ठरतो? अशा अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे ठरते. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)मुलांची मुलीशी किंवा स्त्रीची पुरुषाशी होणारी मैत्री समाजाला पुरेशी समजत नाहीच! समाज अशा निर्भेळ मैत्रीला ‘लफडे’ नावाचे गोंडस नाव देऊन मोकळा होतो. तसे पाहिले तर ही मैत्री कोणत्या स्वरुपात पेलली जाते, कोणत्या परिस्थितीत निर्माण झाली आणि मित्र-मैत्रिणीतील मैत्र नेमके कसे आचरण करते यावर ही भिन्नलिंगी मैत्री निर्भेळ ठरवायची की लफड्यात गुंडाळायची हे ठरत असते.
२)मुलींनी मुलांशी मैत्री जरूर करावी. त्यामुळे भावी आयुष्यात पुरुष नेमका कसा वागतो याचा अदमास मुलींना घेता येऊ शकतो. मित्राच्या वागण्या-बोलण्यावरून पुरुष जातीच्या भावभावना, आंदोलने, आचारविचार यांचा अनुभव घेता येऊन आगामी वैवाहिक जीवनात मुलींना नक्कीच चतुरतेने आपल्या पुरुषाचा स्वभाव पटकन जाणता येऊ शकेल.
३)मुलांनीही मुलींशी मैत्री करणे काहीच गैर नाही. त्यायोगे मुलींना कोणत्या समस्या भेडसावतात? त्यांना आधार, आश्रय, प्रेम यांची कशा प्रकारे गरज असते? लांबून भरगच्च दिसणाऱ्या मुली जवळून कशा दिसतात, त्यांना कोणते स्पर्श नकोसे असतात? कोणते हवे असतात? त्यांचे स्वभाव, त्यांच्या जाणीवा-नेणीवा आणि त्यांच्या भावी जोडीदाराकडून असणाऱ्या अपेक्षा कोणत्या असतात? याचे ज्ञान मुलांना करून घेता येते. जेणेकरून पुढील यशस्वी वैवाहिक जीवनात अशा मुद्द्यांची उजळणी करून पुरुष आपल्या स्त्रीला अधिक सुखासमाधानात ठेवू शकतो.
४)स्त्री पुरुष एकमेकांचे स्वभाव, वागणे बोलणे आवडले की एकमेकांकडे आपसूक खेचले जातात. सुरुवातीला मैत्री नामक या नात्याला अनेकरंगी पदर लगडत जातात आणि त्या मैत्रचे इंद्रधनुष्य कधी होते ते समजतसुद्धा नाही. मैत्री आणि प्रेम यात आखलेली लाल रंगाची रेघ कधी गुलाबी होऊन जाते कळत नाही. त्यामुळे जर एखाद्याला/एखादीला ‘त्या’ वाटेने जायचे नसेल तर त्याला/तिला स्पष्ट शब्दांत सांगावे, ‘मला तुझ्याकडून केवळ मैत्रीची अपेक्षा आहे, प्रेमाची नाही आणि सेक्सची तर त्याहूनही नाही.’ बहुदा मुलीच अशा शब्दांत मुलांना खडसावत आल्या आहेत. त्याला पुरुषाच्या सदानकदा ‘रेडी असण्याच्या’ पौरुषी हार्मोन्सचा प्रभाव कारणीभूत ठरतो.
५)विजातीय धृवांमध्ये नेहमीच आकर्षण असते. तसेच भिन्न लिंगांना देखील एकमेकांची ओढ उत्पन्न होणे निसर्गनियमाला धरूनच असते. त्यामुळे स्त्री-पुरुषाची मैत्री ही नेहमीच सेक्सकडे झुकू शकते. एकांतात तर हमेशा ‘तो’ हुरहुरता अनुभव घ्यावाच अशी उचल घेतली जाते. मैत्रीनंतर प्रेम होणे काळ्या दगडावरची रेघ ठरावी इतके नैसर्गिक असते आणि एकदा का प्रेमाच्या भाव भावना मोकळ्या झाल्या की वस्त्रांच्या गाठी मोकळ्या होण्यास फारसा अवधी अजिबात लागत नसतो!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment