Tuesday 15 November 2016

प्रेमविवाह का फसतो?

प्रेमविवाह का फसतो?


कोवळ्या वयाची शिरशिरी अंगभर दौडू लागल्यावर त्यात मोहरून जाण्यासाठी विजातीय धृवाची ओढ लागून राहते, भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होऊ लागते. तो किती छान बोलतो, त्याचे शब्द किती मधुर असतात, त्याचा चेहरा किती हसरा आणि प्रसन्न असतो, नेहमीच तो तजेलदार स्मित करीत असतो, तो किती हँडसम दिसतो, त्याचे वागणे किती सुसंगत आणि मला आवडणारे आहे, तो किती काळजीपूर्वक माझे ऐकतो, मला काय हवं काय नको ते किती तत्परतेने पाहतो, लगेच रिऍक्ट होतो, म्हणूनच मला तो जीवापाड आवडतो... अशी स्वप्नरंजने रंगवीत ती आपसूक त्याच्याकडे खेचली जाऊन धप्पकन प्रेमात पडते...
याउलट त्याच्या दृष्टीकोनातून ... ती किती कमनीय दिसते, किती सेक्सी आहे, तिचे अंग किती गौरवर्णीय आहे, तिचा उभार किती उन्नत दिसतो, तिचे नितंब कसे घेरदार आणि डौलदार दिसतेय, पाहताचक्षणी ती काळजात रुतलीय, कधी एकदा हिला पंखाखाली घेतो असे झालेय यार...
वयात आलेल्या दोन भिन्न लिंगांचे विचारचक्र असे विरोधाभासी असते. मुलांच्या दृष्टीने मुलगी ही मादी असते, तिला उपभोगुन घेतले की आपले कार्य संपले असा सरळ सरळ नैसर्गिक नराचा हेतू प्रकट होत असतो. तर मुली नेहमी मुलाच्या केअरिंग शेअरिंग वर भाळतात, त्याचे मोहविणारे वागणे-बोलणे त्यांना भावते आणि त्या त्याच्यातील नराची शिकार होतात. आणि त्यामुळेच केवळ शारीरिक आकर्षणावर बेतलेले प्रेमविवाह फुसके ठरतात! –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)अजाणत्या वयात सर्रकन प्रेमात घसरून पडणे मुळीच वावगे नाही, ते नैसर्गिकच असते. शरीरातील विविध संप्रेरकांचा तो प्रभाव असतो. पुरुषाला पौरुषत्वाचे भान देणे आणि स्त्रीला तिच्यातील स्रैणत्वाची जाणीव करून देणे हाच त्या प्रभावाचा स्वभाव असतो.
२)मुली मुलांच्या दिसण्यापेक्षा ‘असण्या’वर जास्त भाळतात. तो कसा आहे? याचा जास्त विचार करतात. तो कायमची साथ देईलच याची खुणगाठ आंधळेपणाने बांधतात. आपली काळजी घेतो, हवेनको ते पाहतो, म्हणजे आपल्याला सुयोग्य आहे असा त्यांचा (गैर)समज होऊन बसतो. आणि त्या त्याच्या प्रत्येक कृतीला होकार देऊन बसतात!
३)याउलट मुलांचे वर्तन असते. पौरुषी हार्मोन्सचा प्रभाव त्यांना अचाट कर्तृत्व सिद्ध करण्यास भाग पाडतो. आवडलेल्या मुलीवर इम्प्रेशन मारण्याच्या नादात ते काहीही करतात... अगदी स्वभावाच्या विरुद्ध जाऊन ‘गोडबोले’सुद्धा होतात. हवी ती मादी मिळाली म्हणजे झालं, इतकाच त्यांचा सूप्त हेतू असतो, तो तडीस नेण्यासाठी ते पाहिजे ती वचने, आणाभाका घ्यायला एका पायावर तयार झालेले असतात.
४)निसर्गात जसा प्रत्येक नरप्राणी मादीला भुरळ घालून आपले ‘इप्सित’ साध्य करून घेतो तसेच मुलेही आपले ‘सूप्त हेतू’  (अर्थात सेक्सच!) साधण्यासाठी मादीला मनवू लागतात, हरप्रकारे रिझवू लागतात. आपण कोणती आश्वासने देत चाललो आहोत, हे त्यांच्या गावीही नसते. आयुष्यभर साथ देण्याचे वचन मिळाले की मादी खुश होऊन आपले ‘सर्वस्व’ नराच्या हवाली करून (नखशिखांत) मोकळी होते!
५)नराला त्याचा ‘खाऊ’ मिळाला की तो पहिल्या मादीच्या नादी लागणे टाळू लागतो. कारण त्याला दुसरी कोणतीतरी कमनीय मादी ‘आकर्षित’ करू लागते. कारण तिने त्या दोघांचा उत्सव लांबूनच पाहिलेला असतो, ज्यासाठी ती आसुसलेली असते, झुरत असते, तिलाही तो अनुभव हवाच असतो! नेमके नराचे पौरुषी हार्मोन्स उचल खातात आणि ते मूळस्वभावाला झुकते माप टाकून नव्या मादीकडे झुकू लागतात. कारण पुरुषाला ‘नित्यनव्याची’ कायम आस असतेच असते. प्रत्येकवेळी ‘नवी मादी’ उपभोगण्याची त्याची ‘उपजत नैसर्गिक प्रवृत्ती’ त्याला कदापि स्वस्थ बसू देत नाही!
६)तू आता पहिल्यासारखा वागत नाहीस, तुला माझा विसर पडत चालला आहे, तुला माझ्यात आता इंटरेस्ट राहिलाच नाही, तुझे पहिल्यासारखे प्रेम आता जाणवत नाही, तुझा माझ्यावर जीव राहिलाच नाही आता... अशी वाक्ये तिच्या मुखातून निघू लागतात आणि आपण या नालायक माणसाला सर्वस्व अर्पण करून बसलोत असे हतबल अश्रू डोळ्यांतून ओघळू लागतात. माझं नशीबच फुटकं... म्हणत ती दैवाला कोसू लागते.
७)तुझ्यात पहिल्यासारखा ‘चार्म’ राहिलाच नाही, पूर्वीसारखी तू ‘आकर्षित’ राहिलीय का बघ जरा, तुला घरातील कोणतीच जबाबदारी धडपणे हाताळता येत नाही, मला माझा व्यवसाय /नोकरी करणे अगत्याचे असतांना तू सारखी माझ्यामागे हिंडत राहतेस, सारखा संशय घेतेस... अशा त्याच्या तक्रारी असतात.
८)मुळात भारतीय लग्नसंस्था प्रेमविवाह मान्य करीत नाही. तिला नियोजित लग्नच फक्त मान्य आहे. त्यामुळे असे वादविवाद झाले की इतर नातेवाईक बघ्याची भूमिका घेतात किंवा आगीत तेल ओतण्याचे काम करतात--'तरी मी तुला म्हणत होते- तो असाच नालायक निघणार. जाऊदे दे सोडून...'
आणिसोडूनच द्यायचे तर दुसरा कोणीतरी शोधवाच लागणार, मग ती सुद्धा तिला 'हवा तसा' जोडीदार शोधून ठेवते!!!
सारांश दोघांनीही जर पूर्वीच समजूतदारीने ‘काम’ घेतले असते तर प्रेमविवाह नक्कीच टिकले असते.
--भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment