Wednesday 23 November 2016

लैंगिक शिक्षणाचे महत्व...

लैंगिक शिक्षणाचे महत्व...


एका सर्वेक्षणांती असे सिध्द झाले आहे की दहा टक्के स्त्री-पुरुषांमध्ये लैंगिक शिक्षणाचा संपूर्ण अभाव असतो. दहा टक्के स्त्रियांना आयुष्यात कधीच कामतृप्ती लाभलेली नसते. दहा टक्के जोडप्यांना अखेरपर्यंत संभोग जमत नाही!
असे का घडते? सर्वच स्त्री-पुरुषांना कामशास्त्रीय ज्ञान का मिळत नाही? जीवनात लैंगिक शिक्षण अनिवार्य असतांना ते का दिले जात नाही? काय आहे लैंगिक शिक्षणाचे महत्व?  --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)समाजाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या या लैंगिक शिक्षणाच्या अभावातून निर्माण झालेल्या आहेत. उदा. कुमारी मातृत्व, लैंगिक अत्याचार, वासनाकांड, वेश्याव्यवसाय, गुप्तरोगांचा सुळसुळाट, भोंदू लिंगवैदू, घटस्फोट... अशा समस्या योग्य लैंगिक शिक्षण दिल्यास नक्कीच कमी होतील.
२)वयात येणाऱ्या मुला-मुलींना अनेक लैंगिक प्रश्न पडत असतात. परंतु पालकांच्या धाकाने ते विचारीत नाहीत किंवा पालक त्यांच्या प्रशांना उत्तरे देण्यास असमर्थ असतात वा थेट टाळतात. असे प्रश्न अधांतरीत राहिल्याने मुला-मुलींमध्ये लैंगिक आगळीक घडण्याचा धोका असतो.
३)लैंगिक विज्ञानाचे पाठ्यपुस्तक अजूनही उपलब्ध नाही. मुळात हा विषय चार-चौघांत चर्चीण्यायोग्य नाही, अश्लील आहे, घृणास्पद आहे... म्हणत टाळला जातो. पाठ्यपुस्तक निर्माण करावे या हेतूने १६० विद्यापीठांतील प्राध्यापकांना कामविषयक प्रश्नपत्रिका पाठवून उत्तरे मागविण्यात आली. धक्कादायक निष्कर्ष असा निघाला की, ‘सुशिक्षित प्राध्यापकांनाही काम विषयाचे विस्तृत ज्ञान नाहीये!’
४)कामशास्त्रीय ज्ञानाला भीती, लज्जा, संकोच यांनी ग्रासलेले आहे, ते प्रावरण दूर करून अंधारातील हे ज्ञान उजेडात आणणे महत्वाचे आहे. पालकांनीच स्वतः लैगिक साक्षर होऊन आपल्या पाल्यांना यथोचित लांगिक ज्ञान क्रमक्रमाने दिले पाहिजे. मुला-मुलींना पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेच पाहिजे. तरच लैंगिक दुराचार फोफावणार नाहीत, कामसमस्या उद्भवणार नाहीत.
५)आपल्या भारतातील अनेक प्राचीन मंदिरांच्या शिखरांवर, भिंतींवर पाषाण शिल्पे आहेत की ज्यातून लैंगिक शिक्षण दिले गेले आहे. त्याकाळी जर खुलेआम असे चित्रण पाहिले जात असेल तर आजच्या काळात त्याला गहनतेचे वेष्टन घालून, अश्लीलतेचा शिक्का मारून किंवा त्याबद्दल मौन बाळगून अज्ञानात राहणे कितपत योग्य आहे?
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment