Tuesday 29 November 2016

अश्लीलता पाहणे योग्य की अयोग्य?

अश्लीलता पाहणे योग्य की अयोग्य?


‘श्लील किंवा अश्लील हा वस्तूचा गुण नसून माणसाच्या मेंदूचा गुण आहे!’ –प्रा. र. धों. कर्वे.
‘मानवाचे अन्नविषयक ज्ञान जर त्याला असलेल्या कामविषयक ज्ञानाइतकेच त्रोटक असले असते तर तो चटकन उपाशीच मेला असता!’ –डॉ. डेव्हिड रुबीन.
‘संपूर्णतया श्लीलता असलेले जगातील एकमेव पुस्तक म्हणजे टेलिफोन डिरेक्टरी!’ बर्नोड शॉ.
वरील नामवंताची वक्तव्ये विचारात घेऊन अश्लीलता या संज्ञेअंतर्गत येणारे घटक म्हणजेच- नग्नता दर्शविणारी स्त्री-पुरुषांची चित्रे, नग्नता शब्दांकित करणारी पुस्तके व साहित्य, नग्नतेचा वापर करून संभोगाची रेलचेल असणाऱ्या चित्रफिती हे पाहणे-वाचणे योग्य आहे की अयोग्य? याचा उहापोह केला जावा... --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)अश्लीलता पाहिली असता व्यक्ती कामोद्दीपित होते, तिचा कामविषयक ‘कोंडमारा’ कमी होतो, तिचे कामविषयक भावनांच्या उद्दिपनाने मनोरंजन होते. ताणतणाव निवळतात असे अनेक तज्ञांचे मत आहे. पोर्नोग्राफी पाहिल्याने लैंगिक गुन्हे घडतात याला काहीही शास्त्रीय आधार नाही असेही सिद्ध झालेले आहे!
२)पोर्नोग्राफी पाहिल्याने किंवा कामुक पुस्तके, कादंबऱ्या वाचल्याने व्यक्ती पुढील चोवीस तास कामोद्दीपित राहू शकते. ज्या व्यक्तींना चटकन कामोद्दीपित होता येत नाही अशा व्यक्तींसाठी अश्लीलता पाहणे हा उपचार सेक्स थेरपिस्टकडून आमलात आणता येतो.
३)संभोगक्रियेत तोचतोचपणा येत राहिल्याने सेक्स कंटाळवाणा ठरू शकतो, अशा दाम्पत्यांसाठी पोर्नोग्राफी पाहून नवनवीन संभोगासनांचा वापर करीत कामक्रीडेतील नाविन्य टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. वयोमानानुसार येणारा अनुत्साह पोर्नोग्राफी पाहिल्यास दूर होऊन पुन्हा नव्या जोमाने कामोद्दीपित होता येते.
४)अश्लीलता पाहण्याचे वरील महत्वाचे फायदे जरी असले तरी काही तोटे मात्र संभवतात. विशेषतः पोर्नोग्राफीचा अधिक विपरीत परिणाम दिसून येतो. कारण पोर्नोग्राफीत चित्रित केलेला संभोग हा तासनतास चालणारा, अतर्क्य अशी संभोगासने ठसवणारा, स्त्रीवर नेहमीच वरचढ ठरेल किंवा स्त्रीला संभोगात दुय्यम स्थान देऊन अत्याचारासारखे कृत्य अधोरेखित करणारा असाच असतो. प्रेम, प्रणय, कामक्रीडा या स्त्रीच्या दृष्टीकोनातून आवश्यक असणाऱ्या कृतींना फाटा देऊन भलतेच कामसंस्कार करणाऱ्या अशा या पोर्नफिल्म्स असतात.
५)अजाणत्या वयात किंवा उत्सुकता म्हणून पाहिल्या, वाचल्या जाणाऱ्या अश्लील साहित्यात किंवा चित्रफितीत दर्शविलेले कामशास्त्रीय ज्ञान म्हणजे ‘पाण्यात वाळूचा कण शोधण्याइतके’ तुटपुंजे असते की त्याचा विपरीत असर युवक-युवतींवर होऊन ‘आपण जे पाहतो आहोत तेच कामजीवन’ असा त्यांचा गैरसमज होण्याचा संभव अधिक असतो. कामजीवन हा अतिशय विस्तृत असणारा, जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा आणि प्रत्येकाने अनुसरण्यासारखा आवश्यक विषय असला तरी या ‘विषया’त आजची युवापिढी पारंगत होऊ इच्छित नाही ही कामशास्त्रीयदृष्ट्या नाचक्कीची बाब आहे!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment