Tuesday 29 November 2016

बालपणातील कामभावना...

बालपणातील कामभावना...

निसर्गातील पशुपक्ष्यांप्रमाणे मनुष्य प्राण्याला जरी उपजत कामज्ञान असले तरी ते त्रोटक ठरते. कारण पशु-पक्ष्यांचे मैथून उघड्यावर, त्यांच्या आईबापांसमोर, भावंडासह होत असल्याने त्यांना त्यातील ज्ञान घेण्याची अजिबात आवश्यकता भासत नाही. निसर्गाला अपेक्षित असलेली वंशवृद्धीची सहजप्रवृत्ती प्राण्यांमध्ये मुबलकतेने विकसित होतांना दिसते. त्याउलट ‘नग्नता म्हणजे वाईट कृत्य’, ‘संभोग म्हणजे अंधारात करावयाची कृती’, ‘त्याबद्दल चारचौघांत चर्चा करणे म्हणजे पाप किंवा अश्लीलता’ असे चुकीचे संस्कार लहानपणापासून मुला-मुलींवर होत राहिल्याने ‘काम’शास्त्रीय ज्ञान त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत मिळू शकत नाही व ते कामजीवनात अतृप्त राहतात.
म्हणून बालपणातील मुला-मुलींच्या कामभावना वेळीच ओळखून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर देऊन त्यांना ‘काम’साक्षर करणे हे अत्यंत महत्वाचे असते.  –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)बालपण हे अनुकरणप्रिय वय असते. मुले-मुली जे पाहतात, ऐकतात तसे करण्याचा, वागण्याचा प्रयत्न करतात. उदा. खोटे खोटे भातुकलीचे खेळ खेळतांना मुली आई तर मुले बाबा बनतात, एकत्र निजतात! किंवा एखादा मुलगा डॉक्टर बनून मुलीच्या नितंबावर काडीने इंजेक्शन टोचतो!
२)कधीकधी मुला-मुलींची उत्सुकता चाळवल्यामुळे ते एकमेकांचे गुह्येंद्रिय पाहण्याची कृती करतात. काही मुले मुलींना मागील बाजूने पकडून श्वानासन संभोगकृती करू पाहतात! या कृती म्हणजे क्षणिक कामभावनांचा कल्लोळ असून त्या क्रिया ‘विकृती’ मुळीच नसतात! यावरील पालकांच्या बालकांना मारहाण करून कामविषयक प्रश्न अनुत्तरीत ठेवण्याच्या कृती मात्र विकृती गणल्या जाऊ शकतात!
३)काही मुले-मुली अश्लील साहित्य वाचून त्यातून नवीन काही कळतेय का, कामविषयक ज्ञान मिळतेय का? अशी चाचपणी करून आपली उत्सुकता तडीस नेतात. काहीवेळा पोर्नोग्राफी पाहून नको ते अवास्तव संस्कार मनावर करून घेतात! हे वेळीच ओळखून त्यांचे कामविषयी असलेले शंकानिरसन करणे पालकांचे आद्य कर्तव्य असते.
४)लहानग्यांच्या हरेक कामविषयक प्रश्नाला पालकांनी शास्त्रीयदृष्ट्या योग्य असेल असे उत्तर त्यांना समजेल अशाच शब्दांत द्यावे लागते. असे जर झाले नाही, त्यांचा बालबोध प्रश्न धुडकावून लावला तर ते कामशास्त्राबाबत उदासीन बनतात किंवा असे काही करणे म्हणजे गुन्हा आहे, चूक आहे, नग्नता म्हणजे अपराध आहे... अशा अनेक समजुती बालकांच्या मनात रुतून बसल्याने ज्यावेळी प्रत्यक्ष ‘काम’ करण्याचे प्रसंग येतात त्यावेळी त्यांची मानसिकता बावचळून गेलेली आढळून येते!
५)कोंबडा कितीही झाकला तरी पहाट होण्याचे थांबत नाही त्याप्रमाणे बालकांच्या मनातील कामविषयक उत्सुकता कितीही दाबून ठेवली तरी उसळी घेतेच. अशावेळी योग्य मार्गदर्शन लाभले नाही तर मुले-मुली इतर चोरीच्या मार्गाने कामविषयक ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करतात. भावना उद्दीपित करणारी पिवळी पुस्तके, पोर्नफिल्म्स, इंटर्नेटवर उपलब्ध असलेली अशास्त्रीय माहिती घेण्याचे प्रयत्न होतात. भावी ‘काम’जीवनात असे अशास्त्रीय ज्ञान तकलादू ठरते किंवा अवास्तव अपेक्षा राखणारे ठरू शकते, ज्याचा दुष्परिणाम म्हणून अनेकांना कामजीवनात दुःखाचा सामना करत जगावे लागते.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment