Wednesday 23 November 2016

संभोगाचे इष्ट परिणाम...

संभोगाचे इष्ट परिणाम...


काही व्यक्ती संभोग करणे म्हणजे काहीतरी अश्लील करणे, पाप करणे, काही तरी द्ष्कृत्य करणे असे मानतात व संभोग शक्यतो टाळतात! काही व्यक्ती मात्र नियमितपणे संभोग करतात, त्यातील मौज लुटतात, जोडीदाराला तृप्त करतात! अशा दोन टोकांची व्यक्तिमत्वे आढळून येतील. परंतु कामशास्त्रीयदृष्ट्या संभोग करणे स्त्री आणि पुरुष दोहोंसाठी खूपच अनिवार्य, जास्तीत जास्त फायदेशीर आणि एकमेकांवरील प्रेम दृढ करण्याचा उत्तम मार्ग असतो. म्हणून प्रत्येकाने नियमित, आवर्जून, तृप्त करणारा संभोग हा केलाच पाहिजे... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)संभोग करणे (हस्तमैथून नव्हे!) म्हणजे एकाचवेळी अनेक स्नायूंनी भरगच्च व्यायाम करणे होय! जघनभागाचे स्नायू, कमरेचे स्नायू, पोटांचे स्नायू, हातांचे पायांचे स्नायू... असे अनेकविध स्नायू या क्रियेत सहभाग नोंदवितात. आदर्श व्यायाम म्हणून संभोगाकडे पाहिले जावे.
२)संभोग करतांना हृद्य गती किंवा नाडीचे ठोके जवळपास दुप्पट होतात, म्हणजे किती छान व्यायाम होत असतो पहा! हृदयाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळून ते अधिक कार्यक्षमतेने काम करू लागतात. नियमित संभोग करणाऱ्या व्यक्तींना त्यामुळेच हृद्यविकार संभवत नसतो!
३)संभोगातील अंतिम स्थितीत स्त्री-पुरुष एकमेकांना इतके घट्ट बिलगलेले असतात की अशी मिठी, असे प्रेम, अशी एकरूपता इतर कोणत्याही क्रियेत संभवत नाही. म्हणूनच एकमेकांवरील दृढ प्रेमाची पोचपावती म्हणजेच संभोग असतो!
४)दिवसभर कडाकडा भांडणारी जोडपी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हसतमुखाने एकेमकांना टाळी देतात, याचे न उलगडणारे कोडे म्हणजे रात्रीचा यशस्वी झालेला आणि कामतृप्तता लाभलेला संभोगच असतो. याचमुळे संभोग हा दाम्पत्यांमधील अतूट बंधनाचे कारण असते!
५)संभोगानंतर येणारी सुखावह ग्लानी, गाढ निद्रा आणि कृतकृत्य झाल्याची भावना इतर कोणत्याही व्यायाम प्रकाराने लाभत नाही हेच इथे अधोरेखित होते. म्हणून नियमित संभोग करणे प्रत्येक व्यक्तीस अनिवार्य आहे. ‘केल्याने होत आहे रे... आधी केलेचि पाहिजे!’ ही उक्ती काही चुकीची नाहीच!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment