Monday 21 November 2016

स्त्रियांसाठी ‘सेक्स टॉनिक’...

स्त्रियांसाठी ‘सेक्स टॉनिक’...


‘मला सेक्स करतांना त्रासच वाटतो,’ ‘मला इंटरेस्ट राहिलाच नाही बघ,’ ‘शारीरिक संबंध नकोसेच वाटतात...’ अशा तक्रारी स्त्री आपल्या जिवलग मैत्रिणीकडे करू लागली की तक्रारी ऐकणारी मात्र मनातून सुखावते! त्यामानाने आपण किती सुखी आहोत हेच पटवून देण्याचा प्रयत्न करते. वस्तुतः ती ऐकणारी मैत्रीणसुद्धा याच कचाट्यात सापडलेली असते, परंतु वरकरणी तसे न दाखवता ‘मी मात्र सुखी आहे बघ...’ म्हणत तिच्यावर रुबाब गाजवू पाहते.
अशा अतृप्त स्त्री साठी असते का एखादे ‘सेक्स टॉनिक’? –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)रूढी आणि परंपरा प्रिय स्त्रिया पुरुषसत्ताक जीवन पद्धतीला प्रमाण मानून जगत असतात. संभोगाचे सुख केवळ पुरुषासाठीच आहे, ते सुख त्याने मागणी करताच दिले पाहिजे असा एकसुरी कार्यक्रम स्त्री पार पाडत असते. तिला तशा जबरदस्तीच्या क्रियेतून काहीच कामसुख मिळत नाही, उलट तो संभोग वेद्नादायीच ठरतो. जो तिला नकोसा असतो.
२)पुरुषाची कामोद्दीपित करणारे केंद्रे बव्हंशी शिस्नाशी संबंधित असतात. याउलट स्त्रीला कामोद्दीपित करणारे बिंदू तिच्या शरीरभर विखुरलेले असतात. गुप्तांगात आपले लिंग घुसडले की स्त्री सुद्धा कामतृप्त होतो हा पुरुषाचा मोठा गैरसमज पूर्वापर चालत आलेला आहे. त्याची विर्यच्युती झाली की तो कामतृप्त झालेला असतो, याच्या विरुद्ध स्त्रीची कामतृप्ती असते. त्यामुळे तिला अतृप्त ठेवणारा शारीरिक संबंध नकोच वाटणे साहजिक आहे.
३)आपण कसे उत्तेजित होतो, आपली कामोद्दीपन कुठे स्पर्श केल्यास अधिक होते, आपल्याला कामतृप्ती कशी लाभू शकते... याविषयी स्त्री पुरुषाशी मोकळेपणाने बोलत नाही. मग तो त्याला आवडेल तसाच संभोग करतो, स्त्रीचे कामसुख त्याच्यालेखी दुय्यम ठरते. आणि मग स्त्रीला तो घाईघाईचा, उरकलेला, यंत्रवत चालणारा संभोग आवडतच नाही.
४)आपले सुख कशात दडले आहे हे न बोलता स्त्रीने पुरुषाला खुणेने सुचविले पाहिजे. ‘माझ्या शरीराची अनिवार चुंबने घेण्याने मी उत्तेजित होते, ओठ-स्तनाग्रे-शिस्निका यांचे हळूवार पीडन केल्याने मी कामतृप्त होते, प्रत्यक्ष संभोगाऐवजी प्रणय खुपवेळ रंगला तरच मला कामसुख मिळते...’ हे स्त्रीने पुरुषाला स्पष्टपणे सांगायलाच पाहिजे. कारण हे कामशास्त्रीय ज्ञान पुरुषाला कुणीही सांगितलेले नसते, त्याने कुठेही हे अनुभवलेले नसते किंवा त्याने अशा यथोचित प्रणयाचा अभ्यासच केलेला नसतो. संभोग म्हणजे केवळ ‘घिसडघाई’ हे त्याच्या अजाण मनावर बिंबले गेलेले असते.
५)वरील सर्व चुकीच्या कृती टाळून जो पुरुष स्त्रीला प्रणयाने भावविभोर करून जातो, तिच्या शरीराच्या प्रत्येक उन्मादक बिंदूंचा नेहमी शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशा कामोद्दीपित करणाऱ्या स्थानांना हळुवार चुंबत जातो, त्यावर नाजूक स्पर्शाची नक्षी रेखित राहतो आणि स्त्री कमालीची उत्कट झाल्यावरच प्रत्यक्ष संभोगक्रियेला सुरुवात करतो... हाच रंगणारा प्रणय, हीच उत्तरोत्तर उत्तेजित करणारी कामक्रीडा आणि हाच पुरुषाचा प्रेमळ, अल्हादी, हवाहवासा स्पर्श.. हेच एका स्त्रीसाठी ‘सेक्स टॉनिक’ असते!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment