Monday 21 November 2016

पुरुषासाठी ‘सेक्स टॉनिक’...

पुरुषासाठी ‘सेक्स टॉनिक’...


इतर मित्रांसोबत गप्पाटप्पा मारतांना एकेमकांच्या वरचढ गुजगोष्टी सांगण्याच्या नादात सहज फुशारकी मारली जाते की, मी कित्येक तास संभोग करू शकतो, माझे लिंग खूपवेळ कडकच राहते, मी एकाच रात्रीत चारपाच वेळा विनासायास संभोग करू शकतो... हे ऐकणारे वाहवा करतात, पण मनातून मात्र कष्टी होतात. हे आपल्याला का जमत नाहीये? या विचाराने खंगून जातात...
साहजिकच तो बढाया मारणारा अमुकतमुक सेक्स टॉनिकचे नाव पुढे करतो, अर्थात ते निखालस खोटे असते. त्या टॉनिकचे सेवन करून देखील ऐकणाऱ्या पुरुषाच्या लैंगिक कार्यक्षमतेत काडीमात्र वृद्धी झाल्याचे दिसत नाही आणि सेक्स टॉनिक घेणारा आणखी निराशेच्या गर्तेत डुबू लागतो. पुरुषासाठी एखादेतरी ‘सेक्स टॉनिक’ आहे का? –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)कामविषयक ज्या काही समस्या पुरुषाला भेडसावतात, त्या केवळ अज्ञान व गैरसमजुतीतून आलेल्या असतात. त्याला खतपाणी घालणारी काही बढाईखोर मित्रमंडळीच तशा समस्यांना मोठे स्थान देण्याचा प्रयत्न करीत असतात. आपले शिस्न बारकुळे आहे, करंगळी एवढेच आहे, जास्तवेळ ताठ राहत नाही, लगेच वीर्य गळून जाते... अशा समस्या त्याला पोखरत असतात.
२)स्त्रीला कामतृप्त करण्यासाठी लांबसडक आणि भल्यामोठ्या लिंगाची आवश्यकता अजिबातच नसते. मागे एका लेखात उल्लेखिल्याप्रमाणे छोटे लिंग असले तरी ते स्त्रीला नक्कीच कामतृप्त करू शकते. फक्त ते व्यवस्थित उत्तेजित झालेले असावे इतकीच अट आहे!
३)शीघ्रपतन ही काही समस्या नसून तो एक धसमुसळेपणाने अंगवळणी पडणारा मानसिक स्फोट आहे. प्रयत्नांती त्यावर नक्कीच विजय मिळवता येतो. त्यावर सविस्तर चर्चा मागे एकदा झालेली आहेच. लिंग खूप काळ ताठ राहणे म्हणजे स्त्रीला कामतृप्त करता येणे हे समीकरण अतिशय चुकीचे असते!
४)शिस्नाचे नियंत्रण करणारे केंद्र मेंदूत आणि विर्यच्युतीची स्वयंप्रेरित प्रक्रिया घडवून आणणारे केंद्र हे मज्जरज्जुत असते. ज्याप्रमाणे सिलिंग फॅनचे रेग्युलेटरचे भिंतीवरील बटन जास्त वाढविल्यास पंख्याचा वेग जास्त होतो. तसेच मेंदूतील कामकेंद्र जितके अधिक उद्दीपित होईल तितक्या जास्त प्रमाणात संदेश मेंदूकडून लिंगाकडे पाठविले जाऊन ते अधिक ताठर बनत जाईल!
५)म्हणूनच पंचज्ञानेंद्रिया मार्फत मिळणाऱ्या कामोत्तेजक संवेदना जितक्या जास्त प्रमाणात मेंदूकडे पोहोचल्या जातील तितक्या जास्त प्रमाणात उत्तेजित करणारे आदेश मेंदूकडून लिंगाकडे पाठवले जातील. याचाच अर्थ अशी उत्तेजित करणारी समंजस, कामक्रीडेत रस घेणारी, काम विषयाची माहिती असणारी, प्रेमळ ‘स्त्री’ म्हणजेच पुरुषाचे ‘सेक्स टॉनिक’ होय... –भोगगुरू कामदेव.    kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment