Monday 21 November 2016

कामोत्तेजक आहार...

कामोत्तेजक आहार...


आपल्याला दैनंदिन कार्य करण्याच्या ज्या गरजा आवश्यक असतात, तशीच एक महत्वाची अत्यावश्यक शारीरिक गरज म्हणजे ‘सेक्स’ होय. परंतु तो काही ठरवून अमलांत आणता येणारा घटक नसतो. मुद्द्माहून कामोत्तेजित होण्यापेक्षा रंगत वाढवित, चढत्या क्रमाक्रमाने, प्रणयाचे टप्पे पार करीत येणारा कामोत्तेजक अनुभव काही वेगळाच असून त्यातील माधुर्य इतर घाईघाईने संपणाऱ्या सेक्सपेक्षा कैकपटीने अधिक परिणामकारक असते.
पुरुषाला सतत वाटत असते की, मला आणखी जास्तवेळ संभोग करता आला पाहिजे, अजून काही मिनिटे माझे लिंग ताठच राहिले पाहिजे किंवा स्त्रीला पूर्ण तृप्त करून देणारा संभोग करता आलाच पाहिजे. त्यासाठी असा एखादा कामोत्तेजक आहार किंवा जडीबुटी मिळेल काय? याचा शोध घेण्यासाठी तो कायमच आसुसलेला असतो. पूर्वापार चालत आलेला हा ‘कामोत्तेजक आहारा’चा शोध अजूनही संपलेला नाहीये हे विशेष! –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com
१)मटण-मासे-मांसाहार केला म्हणजे अधिक कामवासना जागृत होऊन परिणामकारक संभोग साधता येऊ शकतो असा दृढ (गैर)समज आजही अस्तित्वात आहे. मसालेदार खाण्याने सुद्धा कामोत्तेजना लाभते असे पुरुषाला वाटत असते. ते तितकेसे खरे नाहीच!
२)दूध, दुग्धजन्य पदार्थ सेवन केल्याने वीर्य वाढते आणि परिणामस्वरूप सेक्सची ताकद अंगी येते असाही खोटा समज जनमानसांत पसरलेला आढळतो. तेही साफ खोटे आहे.अशा पदार्थांनी कोणतीही कामोत्तेजन लाभल्याचे सिध्द होऊ शकलेले नाही.
३)गेंड्याच्या शिंगाचे औषध, आयुर्वेदातील कामोत्तेजक कल्प, रजतवर्खी गोळ्या, मकरध्वज, अश्वगंधा, वृष्यवटी, शिलाजित, स्पानिश फ्लाय, योहीम्बीन, कस्तुरी, सांड्याचे तेल, पलंगतोड तांबुलपान इ. इ. सेवन केल्याने लिंगात ताकद येऊन जास्तवेळ संभोग करता येतो याचाही शाश्वत पुरावा सिध्द झालेला नाही.
४)पुरुषाची कामोत्तेजना ही अपोआप घडून येणारी कार्यप्रणाली असल्याने अमुक तमुक कामोत्तेजक आहार घेतल्याने त्यात वाढ होईल असे मुळीच घडत नाही. जगात असा कोणताच आहार उपलब्ध नाहीये की जेणेकरून पुरुषाचे लिंग तासनतास ताठ राहू शकेल!
५)स्त्रीचे प्रणयसुलभ आकर्षक दर्शन, तिचा मोहक उत्तेजक स्पर्श आणि तिने आवर्जून केलेल्या कामलीला हाच पुरुषासाठी कामोत्तेजक आहार असतो, याचा सर्वांनी विचार करायला हवा. जी स्त्री पुरुषाला आपल्या विविध चेष्टांनी कलात्मकरित्या पुरुषाला समागमास प्रवृत्त करते तोच पुरुषासाठीचा खरा कामोत्तेजक क्षण असतो... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in

No comments:

Post a Comment