Thursday 1 December 2016

प्रणयोत्सुक स्त्री...

प्रणयोत्सुक स्त्री...

पुरुषाची कामोत्तेजना लगेच होत असल्याने तो नेहमीच ‘संभोगोत्सुक’ असतो. मात्र बऱ्याचवेळा असे घडते की स्त्री ‘प्रणयोत्सुक’ नसते. मागे सांगितल्याप्रमाणे स्त्रीला संभोगापेक्षा प्रणयात अधिक रुची असते. स्त्रीचा ‘कल’ पुरुषाला स्पष्ट होत नाही. स्त्री सेक्ससाठी ‘रेडी’ आहे की नाही, हेच कधीकधी पुरुषाला कळत नाही. काहीवेळा स्त्री सेक्ससाठी इंटरेस्ट दाखवीत नाही. अशावेळी पुरुषाने घाई करून केलेला सेक्स वेदनादायी ठरतो किंवा ती एक प्रकारची बळजबरीच असते! परंतु जेव्हा कधी स्त्रीला प्रणयाची ओढ लागते तेव्हा स्त्री तिच्याही नकळत काही अस्पष्ट हालचाली, काही अस्फुटसे संकेत पुरुषाला देत असते. ते अचूक ओळखणारा पुरुष आदर्श समजला जातो... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)सर्वच स्त्रिया सेक्ससाठी लगेच राजी होत नसतात. परंतु ज्यावेळी स्त्रीला प्रणय हवासा असतो तेव्हा त्यांच्या काही हालचाली पुरुषाला समजल्याच पाहिजेत. प्रणयोत्सुक स्त्री रोज करते त्यापेक्षा अधिक नीटनेटका शृंगार करते. हा महत्वाचा बदल पुरुषाने जोखलाच पाहिजे. तिने तिची केशभूषा बदललेली असते. मोजकेच पण लक्षणीय अशीच स्वर्ण आभूषणे-अलंकार तिने ल्यालेले असतात. स्त्री आकर्षक  व रोचक वस्त्रे परिधान करते. तिचा मेकअप देखील वाखाणण्याजोगा झालेला असतो. ती पुरुषाची आवडीने वाट पाहत असल्याचे जाणवते.
२)वरील बदल पुरुषाला काही कारणास्तव जाणता आला नाही तर स्त्री खट्टू होतेच पण काही क्षणात स्वतःला सावरून पुरुषाला नेत्रकटाक्षाने काही आव्हानात्मक संकेत देते. या कामुक नजरेसोबत स्त्री आकर्षक स्मितहास्य रेखाटत असते. नेहमीच्या नजरेपेक्षा ‘पौरुषा’ला आव्हान देणारी ही नजर फार कमी पुरुषांना ओळखता येते. या नजरेला नजर भिडवून प्रत्युत्तर देणारा पुरुषच ते आव्हान जाणू शकतो. नजर चोरणारे पुरुष पळपुटेच ठरतील यात शंका नाही!
३)नजरानजर झाल्यावर स्त्रीच्या गालांवर लालिमा चढल्याचे जाणवते. तिचे ओठ जरासे थरथरू लागतात. बोलतांना स्त्रीचे अधर जरासे अडखळतात. चेहऱ्यावर रक्तिमा जमा होऊ लागतो. स्त्रीला शहारून आल्याचे भास होतात आणि ते स्त्रीच्या रोमांचित होण्याने पुरुषाला जाणता येतात. स्त्रीच्या त्वचेवरील लव आणि केस स्पंदन पावू लागतात. यासाठी पुरुषाने सूक्ष्म दृष्टीचा चाणाक्षपणा दाखविला पाहिजे.
४)इतके करूनही पुरुष अचल राहिला, ढिम्म दिसला तर स्त्री आपल्या कामुक प्रणयरम्य हालचालींतून पुरुषाला संकेत देते. पायांवर पाय घेत पैंजणांचा मंजुळ नाद करते. पुरुषाचे लक्ष वेधण्यासाठी मोहक चालते. ओठांमध्ये किंवा दातांमध्ये करंगळी घेत मादक नजरेने पुरुषाकडे पाहू लागते. नजरानजर होताच स्त्री भृकुटी हलवून किंवा नेत्रांचे विभ्रम निर्माण करून ‘मला जवळ घे ना...’ असे पुरुषाला सुचविण्याचा प्रयत्न करते. पुरुषाच्या जवळ जाऊन त्याला नाजूक बोटांनी स्पर्श करणे हा स्त्रीचा पुढील संकेत असतो.
५)आणखी थेट संकेत देण्याच्या प्रयत्नात स्त्री आपले ‘पुष्टत्व’ पुरुषापुढे पेश करते. स्त्री आपले गोलाकार नितंब आणखी पुष्ट कसे दिसेल याचा प्रयत्न करू लागते. जोरात आणि खोल श्वास घेऊन छातीवरील उन्नत उरोजांचे दर्शन आणि स्पर्शन पुरुषाने करावे या हेतूने स्तनांना हलकेच आंदोलने देऊ लागते. दातांखाली ओठ घेऊन चावत मधाळ आणि कामसूपणे पुरुषाला नखशिखांत न्याहाळू लागते. तिचे हात तिच्याच उरोजांवरून आकर्षकरीतीने फिरू लागतात...
वरील सर्वच्या सर्व संकेत प्रत्येक स्त्री देईलच असे नाही. पहिलाच संकेत जर पुरुषाला कळला नाही तर स्त्री रागावून मनातल्या मनात म्हणते... ‘येडं कुठलं...!’
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment