Tuesday 13 December 2016

अनुरूपता...

अनुरूपता...

किती मुली पहिल्या पण एकही पसंत पडत नाही किंवा कितीतरी मुले सांगून आली पण हिने नाकारली. या पसंत-नापसंतीच्या मागे काय हेतू दडलेला असतो? सुदृढ असलेली व्यक्ती सुद्धा ‘क्लिक होत नसल्याने’ नाकारणे म्हणजे काय असते? पाहताचक्षणी प्रेमात पडणाऱ्या व्यक्ती अनुरुपतेची कोणती दखल घेत असतील?
एखादी व्यक्ती आपल्याला अनुरूप आहे किंवा नाही ही कसोटी मानवप्राण्याकडून जास्तीत जास्त वेळा लावली जाते. निसर्गातील इतर चराचरांचा भावनिक-वैचारिक विकास मानवाइतका झालेला नसल्याने तसे घडणे शक्य आहे. मानवेतर प्राणी अनुरुपतेच्या शोधार्थ दारोदार भटकत नाहीत. त्यांना ‘हवे ते’ प्रकर्षाने जाणवत असले की लगेच नर-मादीशी ‘जुगु’ लागतो! –भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.in  
१)रंग-रूप ही अनुरुपतेची पहिली कसोटी मानता येईल. ज्या व्यक्तीशी ‘एकरूप’ व्हावेसे वाटते अशा व्यक्तीची छबी मनात आकार घेत असते. ‘त्या’ चौकटीत समोरील व्यक्ती रंग-रूपाने बसते आहे किंवा नाही याचा विचार केला जाऊन सदरहू व्यक्ती स्वीकारली वा अव्हेरली जाते. कैकदा रंगरूपतेच्या वेगवेगळ्या कसोट्या व्यक्तीपरत्वे भिन्नभिन्न असू शकतात.
२)व्यक्ती स्थिरावलेली आहे किंवा नाही ही कसोटी विशेषतः स्त्रियांकडून लावली जाते. स्त्रीचा नैसर्गिक कल शाश्वत आधार, अलोट प्रेम याकडे असल्याने ती नेहमीच ‘वेलसेटल्ड’ पुरुष निवडते. निसर्गातील माद्यासुद्धा उमद्या, धडधाकट, पराक्रमी अशा नरालाच सर्वस्व बहाल करतांना आढळून येतात. कोणतीही मादी मरतुकड्या, मनहूस, अकार्यक्षम नराच्या सावलीलासुद्धा उभी राहत नसते!
३)शेलाट्या अंगाची, नितळ त्वचेची, आकर्षक बांध्याची आणि क्लिक होणाऱ्या चेहऱ्याची कसोटी बहुदा पुरुषाकडून लावली जाते. मूलतः दर्शनाने प्रभावित होण्याचा व चटकन प्रेमात पडण्याचा स्थायीभाव पुरुषाने निसर्गातील नरांकडून उचललेला असतो. पुरुषाला केवळ ‘एकच’ गोष्ट स्त्रीकडून हवी असते. ‘ती’ क्लिक झाली की त्याला स्त्री पसंत पडते!
४)आजकाल लग्नापूर्वी स्त्री-पुरुषाला एकांतात बोलू देण्याची मुभा मिळते. प्रचलित भारतीय लग्नसंस्थेतील हा बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. परंतु व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याचा प्रतिसाद काही मिनिटांच्या भेटीने उलगडू शकत नसतो. निसर्गनियमानुसार विशेषतः पुरुष नेहमीच स्त्रीवर प्रभाव टाकून तिचा स्वभाव जिंकण्याचा प्रयत्न करीत असल्याने तो अशा क्षणिक भेटीत कमालीचा ‘गुळचट’ बोलण्याचा संभव वाढतो!
५)लिव्ह इन रिलेशनशिपचा पायंडा पडू पाहतो आहे तो निश्चितपणे अनुसरण्यासारखा आहे. या कसोटीनुसार स्त्री-पुरुष काही दिवस (आणि रात्रीही!) ठरवून एकत्र राहतात. अशावेळी एकमेकांची ‘बेडवरील’ अनुरूपता जोखली जात असते आणि ‘हीच कसोटी’ महत्वाची ठरते. नाहीतर छत्तीस गुण जुळलेली जोडपीसुद्धा छत्तीसच्या आकड्यासारखी फारकत घेऊन बेडवर निमूटपणे निजत लग्नाचे ‘जोखड’ ओढत राहिल्याची कैक उदाहरणे देता येतील!
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment