Tuesday 13 December 2016

शिस्नाचे आकार प्रकार...

शिस्नाचे आकार प्रकार...

प्रौढ निरोगी पुरुषाचे शिस्न उत्तेजित अवस्थेत साधारणतः चार ते सहा सेमी जाड आणि चार ते सहा इंच लांब असते. या आकारमानात व्यक्तीनुरूप बदल असू शकतो. व्यवस्थित कामोत्तेजना लाभली असता शिस्न ताठर बनण्याचा व लांब-रुंद होण्याचा परिणाम कामोत्तेजक संवेदनानुसार कमीजास्त असू शकतो. त्यामुळेच किडकिडीत पुरुषाचे शिस्न उत्तेजना लाभली असता बलदंड पुरुषाच्या शिस्नापेक्षाही अधिक लांब-रुंद होऊ शकते!  --भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)साधारणपणे शिस्न ताठर अवस्थेत शरीराशी लघुकोन करते, म्हणजेच ते ताठर स्थितीत वरील दिशेने वळलेले दिसते. जशीजशी कामोत्तेजना वाढेल तसेतसे हा कोन कमी होत जाऊन लिंग अधिकाधिक वरील बाजूकडे जाते. आपले पूर्वज जे मर्कट होते ते मादीला मागील बाजूने ‘जुगत’ असत. गर्भाशयाची शारीरिक ठेवण आणि आकार लक्षात घेतल्यास मागील बाजूने जुगतांना शुक्राणू थेट गर्भाशयमुखाशी पडावेत या हेतूनेच शिस्न उत्तेजित अवस्थेत वरील बाजुकडे झेपावू लागत असते!
२)काही पुरुषांचे लिंग वाकडे, एका बाजूला झुकलेले किंवा खाली वळलेले आढळते. या वक्रतेचा संबंधित पुरुष उगाच बाऊ करून घेऊन नाराज असतो. लिंगाचे असे वक्रीभूत असण्याने प्रत्यक्ष संभोगात किंवा यशस्वी गर्भधारणेत काहीही फरक पडत नसतो. ही वक्रता केवळ मानवप्राण्यातच आढळून येते! इतर प्राण्यांचे लिंग ताठर अवस्थेत अगदी सरळ आणि वरील बाजूला झुकणारेच असते. याचे मुख्य कारण म्हणजे मानवेतर प्राणी ‘फिट्ट अंडरवियर’ घालत नाहीत हेच आहे!
३)पोर्नक्लिप मध्ये दाखवितात तसे पुरुषाचे लिंग चक्क फुटभर लांबीचे तसेच भरपूर जाडीचे असते! असे प्रत्यक्षात होऊ शकते मात्र त्यासाठी शस्त्रक्रिया गरजेची आहे. ‘सिलिकॉन बॉल’ वापरून पोर्नस्टार स्त्रिया जसे आपले स्तन उन्नत करतात तसाच काहीसा हा प्रकार आहे! शिस्नाच्या मधोमध ‘सिलिकॉनचे रॉड’ टाकून त्याची लांबी वाढविता येणे शक्य आहे. यातील तोटा असा की हे ‘सिलिकॉन रॉडचे लिंग’ कायम ताठच राहते. संभोगाव्यतिरिक्त इतर वेळी ते ओटीपोटावर दुमडून बसवावे लागते!
४)आपले लिंग लांब असावे, सरळसोट असावे, मनगटाच्या जाडीचे असावे हा कल्पनाविलास फक्त पुरुषाचाच असतो. स्त्रीला पुरुषाच्या शिस्नाच्या लांबी-जाडीचे मुळातून आकर्षण नसतेच. स्त्रीने आपले शिस्न हाताळावे, त्याची प्रशंसा करावी असे स्वप्न पुरुषच पाहू शकतो. स्त्रीला मात्र पुरुषाच्या शिस्नाच्या लांबी जाडी पेक्षा त्याने संभोगापूर्वी केलेल्या प्रेमाची व प्रणयक्रीडेची खोली-उंची अधिक प्रिय वाटत असते!
५)शिस्नमण्यावरील लिंगचर्म प्रत्यक्ष संभोगादरम्यान मागे जाणे अपेक्षित असते, परंतु काही पुरुषांना हे त्रासदायक ठरू शकते. अशावेळी शस्त्रक्रिया करून ‘सुंथा’ करावा लागतो. असे ‘चर्महीन’ शिस्न आकर्षकच दिसते, कारण शिस्नमण्याला ‘गुप्त’ ठेवणारे चर्म तेथे नसते आणि उत्तेजित अवस्थेत शिस्नमणी टम्म फुगून ‘लाल-गुलाबी’ अशा चित्ताकर्षक रंगात बदलत असतो! काही जाती-धर्मांमध्ये आजही पुरुषाचे लिंगचर्म बालवयातच कापून टाकले जाते. त्यामुळे लिंगचर्म शिस्नमण्याला जिथे चिकटते तो बिंदू थोडासा बोथट होण्याची शक्यता असते. पुरुषाला कामोद्दीपित करणारा व विर्यच्युती घडवून आणणारा हा महत्वाचा बिंदू शस्त्रक्रियेनंतर किंवा सुंथा केल्यामुळे काहीसा ‘बधीर’ झाल्याने संभोगाचा कालावधी लांबविता येत असेल का? यावर संशोधन चालू आहे...
 --भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment