Friday 9 December 2016

शिस्नाची शरीररचना...

शिस्नाची शरीररचना...


पुरुषाचे लिंग हा शरीराच्या बाहेरील बाजूस असलेला प्रभाग असल्याने स्पष्ट दृगोचर होत असतो. मात्र त्यामागील रचना जरा गुतागुंतीची असते. शिस्नाच्या ठिकाणी कामोद्दीपन केंद्रे एकवटलेली असतात. त्यामुळे ते ताठर बनते. तसेच लिंगाच्या पुढील टोकाला एक छोटे छिद्र असून त्यातूनच मूत्रविसर्जन आणि वीर्यच्युती होत असते. म्हणजेच स्त्रीच्या योनीमध्ये असणारे तीन प्रभाग कामोद्दीपन, मूत्रविसर्जन आणि योनिद्वारे संभोग अशी वेगवेगळी कार्ये करतात. तसे पुरुषाच्या लिंगात वेगळे प्रभाग नसून वरील तीनही कार्ये एकाच अवयवाने सिध्द होत असल्याचे दिसते. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)प्रौढ पुरुषाचे लिंग हे ताठर अवस्थेत साधारणतः तिने ते चार सेमी जाड आणि चार ते सहा इंच लांब होते. शिस्नावर ‘लिंगचर्म’ नामक पातळ त्वचेचे आवरण असते. ते मागे घेतल्यावर अंडाकृती गुलाबी लालसर रंगाचा ‘शिस्नमणी’ दिसतो. कधी कधी काही पुरुषांत ही त्वचा अजिबात मागे जात नाही, आणि संभोगादरम्यान योनीत लिंग प्रविष्ट होत असतांना ती त्वचा किंचीतशी फाटून मागे जाते, याला ‘पुरुषाचा कौमार्यभंग’ म्हणता येईल. काहीवेळा मागे गेलेली अशी घट्ट त्वचा अजिबात पुढे येत नाही, शिस्नमणी काळानिळा होऊन टम्म फुगतो, अशावेळी तातडीने शस्त्रक्रिया करून ‘सुंथा’ करावा लागतो!
२)शिस्नाच्या मूलभागी लोंबणारी त्वचेची पिशवी असते. त्यात दोन गोट्या सदृश ‘वृषणे’ असतात. यातच शुक्राणू निर्माण होतात. शुक्राणूंचे तपमान योग्य राखण्यासाठी ही वृषणे आखडतात किंवा लोंबतात. विर्यच्युतीच्या वेळी ही वृषणे इतके आखडतात की शिस्नाच्या मूलभागी दिसेनाशी होऊन त्यातील शुक्राणू मूत्रवाहिनीत ढकलले जातात.
३)शिस्नमण्याच्या खालील बाजूस जेथे वरील त्वचा मण्याला चिकटलेली असते तेथे अधिक चेतातंतू असल्याने पुरुषाची कामोद्दीपित करणारी केंद्रे एकवटलेली असतात. हा बिंदू पुरुषाला त्वरित उत्तेजित करण्यासाठी उपयुक्त असतो. ताठरलेल्या लिंगाला अधिक रक्तपुरवठा झाल्याने कामोत्तेजक संवेदना देखील जास्त प्रमाणात ग्रहण केल्या जातात.
४)पुरुषाचे लिंग हा स्नायूंनी बनलेला मांसल प्रभाग असला तरी त्यात सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे भरगच्च जाळे असते. ज्यावेळी लिंग शिथिल असते त्यावेळी ते कमालीचे नरम आणि लिबलिबीत लागते. मात्र जेव्हा पुरुष उत्तेजित होतो तेव्हा रक्तपुरवठा वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्त भरले जाते आणि रक्ताचा शरीराकडे जाणारा मार्ग स्नायूंनी रोखला जाऊन ते अधिकाधिक ताठर बनत जाते, इतके की एखादे कडक लाकूड भासावे!
५)स्त्रीला पुरुषाच्या लिंगाचे अजिबात आकर्षण नसते. पोर्नक्लिप मध्ये दाखवतात तसे स्त्रीला पुरुषाच्या शिस्नाशी खेळावे, ते ओठांनी चोखावे असे बिलकुल वाटत नसते. शिवाय लिंगाचे कार्य शुक्राणू योनीत पोहचविणे इतकेच असल्याने त्याच्या जाडीशी वा लांबीशी स्त्रीला काहीच घेणेदेणे नसते. ते पुरेसे उत्तेजित होऊन योनीप्रविष्ट होत असेल तरी काहीच प्रश्न उरत नसतो. ‘शिस्न लांब व जाड असावे तरच स्त्री कामतृप्त होईल,’ हा केवळ पुरुषाचा पोकळ भ्रम असतो!
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment